दादा

Submitted by सन्केत राजा on 15 July, 2014 - 09:03

"ए राजा, अरे काय झालं सांगशील का? की नुसता रडतच बसणार आहेस? हे बघ, काय झालंय ते बिनधास्तपणे सांग. तुझा हा दादा कुणालाही काहीही सांगणार नाही. विश्वास नाही का तुझा माझ्यावर?" "नको रे दादा असं बोलूस. तुला माहितीय ना मी सगळ्यात जास्त तुलाच जवळचा मानतो." अरे मग सांग ना काय झालय ते. तु नुसता रडतच बसलायस. कोणी काही बोललं का? की आईने मारलंय? बोल ना राजा."
अविनाश 10 वर्षांच्या सूरजला समजावत होता आणि सूरज आपल्या या 21 वर्षे वय असलेल्या दादाच्या मांडीवर डोके ठेऊन हमसाहमशी रडत होता. तो असा का रडतो आहे हे काही केल्या अविला समजत नव्हतं सूरजच्या घराच्या शेजारीच त्याचं घर होतं. 1 वर्षापुर्वीच तो त्याच्या आईवडिलांसोबत तिथे राहायला आला होता. मनाने खूप चांगला आणि प्रेमळ. कधीही कुणाला उलट न बोलणारा अवि इथे आल्यावर सगळ्या छोट्या मुलांचा आवडता अविदादा बनला होता, खास करून सूरजचा. सूरज त्याला फक्त दादा म्हणायचा. त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे अल्पावधीतच सूरजचा आवडता दादा झाला होता. अविलाही सूरज आवडायचा तो त्याच्या निरागस चेहेर्यामुळे आणि हसतमुख स्वभावाभुळे. प्रेमाने तो सूरजला राजा म्हणायचा. सूरज अविला सगळं सांगायचा शाळेतल्या अभ्यासापासून ते घरातल्या जेवणापर्यंत. अविसुद्धा त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेई न चिडता, रागावता. कधी घरी आई सूरजला रागाने काही बोलली की तो रागावून अविकडे यायचा. मग अवि त्याचं गार्हाणं शांतपणे ऐकून घ्यायचा. तो बोलून थांबला की अवि त्याला प्रेमाने आपल्याजवळ बसवून समजावायचा की आई त्याला का बोलली असेल. आणि असा काही बोलायचा की सूरज आईवरचा राग विसरून जायचा. असा हि सूरज आज शाळेतून आल्या आल्या अविकडे धावत आला होता आणि त्याच्या मिठीत शिरून बेभाऐनपणे रडत होता. अविला हा का रडतोय हेच समजत नव्हते. तो फक्त आता मांडीवर डोके ठेऊन रडणार्यि सूरजला थोपटत होता. थोड्या वेळाने रडण्याचा जोर ओसरल्यावर सूरजने वर पाहिले तेव्हा अवि प्रेमाने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडेच बघत होता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users