जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदित्यचे हिंदी डायलॉग जेव्हा असतात तेव्हा मला ते बर्‍यापैकी सफाईदार वाटतात. काही मराठी शब्द ऐकताना ते जरा वेगळ्या लहेजात वाटतात मात्र Happy

मला मेघनाच बोलण नेहमीच रडक या कॅटेगरीतल वाटत...>>>>>>+१

नुसतच रडक नाही तर आपण काहीतरी खूप मोठ सिक्रेट सान्गत आहोत असे भाव चेहेर्‍यावर आणुन ती हळू सावकाश, जमेल तसे बोलत असते. चेहेर्‍या वर कायम आता पुढे काय होईल अशा टाईपचा तणाव असतो.Meghana.jpg

मुग्धा आणि रश्मी करेक्ट अगदी.

झीवाल्यांना चांगल्या हिरोईन मिळत नाहीत का शिरेलीसाठी. अर्थात सर्वच channelवर आनंदी- आनंद असतो म्हणा काही अपवाद वगळता.

ती DDD मधली मीनल आवडते मला.

नॉर्मल हाक सुद्धा एखादी आजाराने जर्जर झालेल्या जख्खड म्हातारीने पाण्याच्या शेवटच्या घोटासाठी याचना करावी अश्या पद्धतीने मारते.

ती DDD मधली मीनल आवडते मला >>>>> अन्जु ती बाबाजी आणि आरतीताईंची मुलगी आहे... दिसायला म्हणजे आईची झेरॉक्स काढावी अशी आहे..

अन्जू तसे का रे दुरावा वर जरी मी टीका केली तरी त्यात अदिती आणी रजनी दोघीन्चा कामाबाबतचा आणी स्वतःबद्दलचा आत्मविश्वास जाणवतो, निदान त्या मेघना इतक्या हळुबाई तरी नाहीत. हो मीनल मला पण आवडते, धमाल काम करते.

ही सिरीयल आता काहीच कामाची राहीलेली नाही. बन्द करुन नवीन आणा म्हणाव. काल १० मिनिटे नवरा बायकोच्या एकमेकाना न्याहाळण्यात घालवली.

हो माहितेय. स्वानंदी टिकेकर. काम छान करते.

ती रेश्मा, सखी गोखले (मोहन-शुभांगी ची मुलगी). रडी आहे. इथल्या मेघनाची बहिण वाटते.

नॉर्मल हाक सुद्धा एखादी आजाराने जर्जर झालेल्या जख्खड म्हातारीने पाण्याच्या शेवटच्या घोटासाठी याचना करावी अश्या पद्धतीने मारते.

>> किंवा कुंथल्यासारखी..

आदीत्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य.. Uhoh

आर्या आंबेकर सारखी वाटते का थोडी ? मेघना?>>> मलापण वाटली आर्या मेघनासारखी

>>
अरेरे!
आर्या कित्ती गोड दिसते आणि ही शुंभ दिसते

नॉर्मल हाक सुद्धा एखादी आजाराने जर्जर झालेल्या जख्खड म्हातारीने पाण्याच्या शेवटच्या घोटासाठी याचना करावी अश्या पद्धतीने मारते>> +१...अगदी अगदी

सगळ्या जगाच दुखः हिच्या माथी असल्यासारखा सारखा चेहरा असतो मेघनाचा बारा महिने अठरा काळ Angry

आर्या आधी खूप गोड दिसायची, परवा हवा येउद्या मध्ये फार वेगळी वाटली. नाही एवढी आवडली. आधीचीच डोळ्यासमोर येत राहिली माझ्या.

मलाही आर्या नाही आवडली Sad उगाच मेक-अप, केस स्ट्रेट केलेले. ती मुळची खरतर सुंदर आहे पण त्या मेक-अप मुळे नाही आवडली.

नताशा करेक्ट.

हल्ली ती बऱ्याचदा अशीच असते. मागे गौरव महाराष्ट्राचा मध्ये गायला आली तेव्हापण सेम. नाही आवडली.

देवा वाचव. परवा पिकू बघून आले आता टीव्हीवरच्या कोणाकोणा पात्राला कॉन्स्टिपेशन असावं असा विचार डोक्यात आला. Sad

मेघनाचा नम्बर पहिला आहे, कारण कायम तणावात असते. आदित्य दुसरा, कारण तो बळजबरीने चेहेर्‍यावर हसू आणुन तोन्ड घट्ट दाबुन सगळे सहन करत असतो. अर्चु तिसरी, कारण तिचे फ्रस्ट्रेशन सारखे फसफसत असते.

Pages