Submitted by dr.sunil_ahirrao on 11 July, 2014 - 01:56
टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा
जन्मभर होतीच आषाढी, विठोबा
मोजली कोणी अशी ही पापपुण्ये
चांगला तू आण मापारी, विठोबा
पारखोनी घे जरा तू भक्त आता
हे तुला विकतील व्यापारी, विठोबा
शेवटी आलास ना गोत्यात तूही
माणसे असतात थापाडी, विठोबा
सोड गाभारा, अता घे वीट हाती
झोड जी झोडायची माथी, विठोबा
देहभर पाण्यात तरला जन्म देवा
तू खरा निष्णात नावाडी, विठोबा !
डॉ.सुनील अहिरराव
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोड गाभारा, अता घे वीट
सोड गाभारा, अता घे वीट हाती
झोड जी झोडायची माथी, विठोबा
देहभर पाण्यात तरला जन्म देवा
तू खरा निष्णात नावाडी, विठोबा !
या द्विपदींचा आशय छान. रद्दीफ सफाईने आल्यासारखे वाटत नाही काही ठिकाणी (मतल्यात)
सगळे शेर आवडले खयाल छान आहेत
सगळे शेर आवडले
खयाल छान आहेत . रदीफ सगळीकडे व्यवस्थीत हाताळली गेली आहे
पारखोनी घे तुझे हे भक्त आता<< असे केल्यास अधिक सफाईदार वाटेल असे वै.म. जरासे भक्त असे म्हणण्यापेक्षा हे भक्त असे मलातरी योग्य वाटते आहे (जरासे असे म्हणणे फारसे अप टू द पॉइंट वाटत नाही )
सोड गाभारा, अता घे वीट हाती
झोड जी झोडायची माथी, विठोबा<<<< सर्वोत्तम . हा असा हाणामारी करणारा विठ्ठल पाहण्यात येत नाही कुठे नवा वाटतो
रदीफच्या पूर्वी स्वल्पविरम अनावश्यक (त्यामुळेच बहुधा बी. ए. ना वर सफाई जाणवली नसावी
हा असा हाणामारी करणारा विठ्ठल
हा असा हाणामारी करणारा विठ्ठल पाहण्यात येत नाही
टीचभर ही भूक सांभाळी,
टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा
जन्मभर होतीच आषाढी, विठोबा
व्वा.
@ब्रम्हांड आठवले, वैवकु, समीर
@ब्रम्हांड आठवले, वैवकु, समीर चव्हाण
सरजी,
पारखोनी घे तुझे हे भक्त आता.. नंतर पुढच्या ओळीत 'हे' ची पुनरावृत्ती होत होती,त्यामुळे सध्या:
पारखोनी घे जरा तू भक्त आता
हे तुला विकतील व्यापारी, विठोबा
असा बदल केला आहे.पुन्हा वाटले तर हा सुद्धा बदलता येईल.
'हा असा हाणामारी करणारा विठ्ठल पाहण्यात येत नाही!' (Y)
खूप खूप धन्यवाद !
मस्त
मस्त
धन्यवाद कविता मॅडम !
धन्यवाद कविता मॅडम !
छान आहे कविता. हाणामारी
छान आहे कविता.:स्मित:
हाणामारी करणारा विठ्ठल.:फिदी:
देहभर पाण्यात तरला जन्म
देहभर पाण्यात तरला जन्म देवा
तू खरा निष्णात नावाडी, विठोबा !>>>> हे खुप आवडलं.
हा असा हाणामारी करणारा विठ्ठल पाहण्यात येत नाही कुठे>>>> क्षणभर डोळ्यासमोर "लय भारी" चित्रपटाच्या जाहिरातीत दोन विटा हातात घेऊन विठ्ठल उभा राहिला.:D
नरेश माने , रश्मी मनापासून
नरेश माने , रश्मी
मनापासून आभार.