ऐका हो ssss ऐका.....
तमाम हुश्शार मायबोलीकरांसाठी.......
या पत्त्यांमागे दडलयं काय?
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणेच याहीवर्षी आपण मायबोली टि-शर्ट करणार आहोत. तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल ही खात्री आम्हाला आहेच.
पण यावर्षीचे खास आकर्षण म्हणून आम्ही घेऊन येत आहोत `रंग ओळखा आणि बक्षीस जिंका' स्पर्धा. यात मायबोलीकरांना यावर्षी करण्यात येणार्या टि-शर्टचा रंग ओळखायचा आहे. बरोबर रंग ओळ्खणार्यास एक छोटसं बक्षीस.
स्पर्धेचे नियम:-
१)स्पर्धेत भाग घेणार्याला पुरुषांच्या आणि महिलांच्या असे दोन्ही टि-शर्टचे रंग सांगायचे आहेत.(दोन्ही टि-शर्टसचे रंग एकच असू शकतात ही शक्यताही ध्यानात घ्यावी. :डोमा:)
२)दोन्हीपैकी एकच रंग बरोबर ओळखला तर `मिनी प्राईझ' मिळेल. दोन्ही रंग बरोबर ओळखलेत तर `मेगा प्राईझ' मिळेल.:).
२)स्पर्धेत भाग घेणार्या प्रत्येक मायबोलीकराला रंग ओळखण्याची एकदाच संधी मिळेल. (इथे `प्रत्येक मायबोलीकराला' हा शब्द वापरला गेल्या असल्या कारणाने उगाच डु. आयडीने येऊन पुन्हा उत्तर दयायचे कष्ट अतीहुश्शार लोकांनी घेऊ नयेत.. :फिदी:)
३)या स्पर्धेची अंतीम मुदत शनिवार दि.२१.०६.२०१४, सकाळी आठपर्यंत(भारतीय प्रमाणवेळेनुसार) असेल..
४)या स्पर्धेचा निकाल शनिवार दि.२१.०६.२०१४ रोजी सकाळी दहा वाजता याच बाफवर जाहीर करण्यात येईल.
५)स्पर्धेबाबतचे सर्व अंतीम अधिकार टि-शर्ट समितीकडेच असतील.
ओळ्खा तर मग झाकलेल्या पत्त्यामागील टि-शर्टसचा रंग.............
-----------------------------------------------------------------------------------------------
निकाल लागलेला आहे, पान क्र. ४ वर बक्षिसविजेत्यांची नावं पहा..
ये चिटिंग
ये चिटिंग है........................
मी तर तानाहिनीपीपाजा.......लिहिलेले.........त्यात रॉयल डायमंड वाईन विस्की रम व्होडका सगळ्यांचे कलर येतात
@ मयुरेश कदाचित फॉर्म भरायची
@ मयुरेश कदाचित फॉर्म भरायची मुदत उलटुन गेली असावी
मी तर
मी तर तानाहिनीपीपाजा.......लिहिलेले.........त्यात रॉयल डायमंड वाईन विस्की रम व्होडका सगळ्यांचे कलर येतात....>> उदयन्, याबद्दल आपण तुमचा पुण्यात शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात शाही सत्कार करूयात..
मयुरेश ते ठिक आहे......पण
मयुरेश ते ठिक आहे......पण इतक्या लांब येणे शक्य नाही ...... ऑनलाईन सत्कार करावा.. वॉलपेपर वर शनिवारवाड्याचे चित्र लावल्यास हरकत नाही
मयुरेश, शनिवारवाड्यासमोरच्या
मयुरेश, शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात शाही सत्कार...म्हणजे ’जाहीर मुका’ घेऊन का?
वा, मस्तच आहेत दोन्ही कलर!
वा, मस्तच आहेत दोन्ही कलर! विजेत्यांचे अभिनंदन!
देवकाका,कसा ते प्रत्यक्षातच
देवकाका,कसा ते प्रत्यक्षातच अनुभवायची मजा. इथे नाही सांगणार ..
याक............ पुण्यात
याक............ पुण्यात "असे" होते ?
तिचा वाईन रेड ????????/ म
तिचा वाईन रेड ????????/ म चित्रात पर्पल का दाखवले आहे
>>>>
हो खरेय.. त्यात दाखवलेला रंग पर्पल आहे, वाईन रेड नाही .. उलट त्या बंद पत्त्यांच्या शेडस रेडच्या जवळ जाताहेत.. बहुतेक वाईन जास्त झाली की पर्पल रंगही रेड दिसत असावा म्हणून वाईन रेड वगैरे ..
बाकी मस्त रंग आहेत .. मग वाईन रेड असो वा पर्पल .. आणि रॉयाल ब्ल्यूज सुद्धा.. गूड सिलेक्शन.. टीशर्ट घ्यायला हरकत नाही
टि शर्ट समिती, या लिंकमधे
टि शर्ट समिती, या लिंकमधे दाखवलेला कुठला रॉयल ब्लु असणार आहे?
माझं उत्तर अल्ट्रामरीन ब्लु होतं 
जर पहीला असेल तर माझं उत्तरही बरोबर असायला हवं
छान आहेत रंग. विजेत्यांचं
छान आहेत रंग. विजेत्यांचं अभिनंदन
पण स्ट्रॉबेरी पत्यांशी ह्या रंगांचा काय पपसं आहे ते नाही लक्षात आलं.
वरिल पत्यांमधे ब्लु
वरिल पत्यांमधे ब्लु नव्हता...........
आज ब्लु है पानी पानी पानी पानी पानी......
और दिन भी सानी सानी सानी सानी
आजा ओ ऑन द ववि..
यार फोटो मेरी खिंच
फुटी किस्मत होगी तेरी
अगर तुने ये बात ना मानी..................
हे इतके रंग असतात ?
हे इतके रंग असतात ?

दोन्ही रंग मस्त . विजेत्यांच
दोन्ही रंग मस्त . विजेत्यांच अभिनंदन !!!
धन्यवाद
धन्यवाद
वाइन रेड असा असतो.
वाइन रेड असा असतो.
http://www.google.co.in/search?q=wine+red+colour&tbm=isch&tbo=u&source=u...
आज रात्री एका कंपनीकडुन एच आय व्ही वr लेक्चर आणि कॉकटेल पार्टी आहे.
रंगाची खातरजमा केली जाइल.
लहान बाळांना कोणते रंग आहेत?
वा! वा! वाईन रेड -
वा! वा! वाईन रेड - मस्त!
गेल्या वर्षी प्रमाणे व्ही-नेक टी-शर्ट्स अस्तील, तर मी नक्की घेणार. गेल्या वर्षीचा परफेक्ट होता एकदम..म्हणजे आहे. अजूनही ताबडतेय आणि अजूनही तो जुना दिसत नाही.
ववि ची तारीख ठरली का?
ववि ची तारीख ठरली का?
वाईन रेड ऑलरेडी माझ्याकडे
वाईन रेड ऑलरेडी माझ्याकडे कॉलरवाला आहे. पण मायबोलीचा म्हणून हा ही घेणार.
धन्यवाद ....... खुप खुप आभार
धन्यवाद .......
खुप खुप आभार टीशर्ट_समिती यांचे आणि सर्व मायबोलीकरांचे.
प्रमोद काकांचे कलर्स बरोबर
प्रमोद काकांचे कलर्स बरोबर होते, पण क्रम चुकला.
अरे, विजेत्यांमधे माझंपण नाव
अरे, विजेत्यांमधे माझंपण नाव आलं! लई भारी!
धन्यवाद टीशर्ट समिती! मेगाप्राइझ मिळणार का?
मंजूडी, केश्वी, पराग यांपैकी कुणीतरी कृपया माझ्यातर्फे बक्षीस घ्या.
मृण, मी घेईन तुझं बक्षीस
मृण, मी घेईन तुझं बक्षीस
Pages