या पत्त्यांमागे दडलयं काय????

Submitted by टीशर्ट_समिती on 19 June, 2014 - 04:44

ऐका हो ssss ऐका.....

तमाम हुश्शार Happy मायबोलीकरांसाठी.......

या पत्त्यांमागे दडलयं काय?

Tshirts.jpg

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणेच याहीवर्षी आपण मायबोली टि-शर्ट करणार आहोत. तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल ही खात्री आम्हाला आहेच.

पण यावर्षीचे खास आकर्षण म्हणून आम्ही घेऊन येत आहोत `रंग ओळखा आणि बक्षीस जिंका' स्पर्धा. यात मायबोलीकरांना यावर्षी करण्यात येणार्‍या टि-शर्टचा रंग ओळखायचा आहे. बरोबर रंग ओळ्खणार्‍यास एक छोटसं बक्षीस.

स्पर्धेचे नियम:-
१)स्पर्धेत भाग घेणार्‍याला पुरुषांच्या आणि महिलांच्या असे दोन्ही टि-शर्टचे रंग सांगायचे आहेत.(दोन्ही टि-शर्टसचे रंग एकच असू शकतात ही शक्यताही ध्यानात घ्यावी. :डोमा:)
२)दोन्हीपैकी एकच रंग बरोबर ओळखला तर `मिनी प्राईझ' मिळेल. दोन्ही रंग बरोबर ओळखलेत तर `मेगा प्राईझ' मिळेल.:).
२)स्पर्धेत भाग घेणार्‍या प्रत्येक मायबोलीकराला रंग ओळखण्याची एकदाच संधी मिळेल. (इथे `प्रत्येक मायबोलीकराला' हा शब्द वापरला गेल्या असल्या कारणाने उगाच डु. आयडीने येऊन पुन्हा उत्तर दयायचे कष्ट अतीहुश्शार लोकांनी घेऊ नयेत.. :फिदी:)
३)या स्पर्धेची अंतीम मुदत शनिवार दि.२१.०६.२०१४, सकाळी आठपर्यंत(भारतीय प्रमाणवेळेनुसार) असेल.. Happy
४)या स्पर्धेचा निकाल शनिवार दि.२१.०६.२०१४ रोजी सकाळी दहा वाजता याच बाफवर जाहीर करण्यात येईल.
५)स्पर्धेबाबतचे सर्व अंतीम अधिकार टि-शर्ट समितीकडेच असतील.

ओळ्खा तर मग झाकलेल्या पत्त्यामागील टि-शर्टसचा रंग............. Happy

-----------------------------------------------------------------------------------------------

निकाल लागलेला आहे, पान क्र. ४ वर बक्षिसविजेत्यांची नावं पहा..

rang olkha 2014.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरुषांसाठी चॉकलेटी शेड....
स्त्रियांसाठी लालरन्गाची शेड....

दोन्ही एकच असतील तर चॉकलेटी शेड

हायला कमाल आहे.
टोटल तीन गोष्टी घडू शकतात तर पर्यायी उत्तरं पण ३ च हवीत की.
नंदिनी ने पर्फेक्ट उत्तर दिलंय.

आणि तुम्ही म्हणताय की एकच ओळखला तर मिनि प्राईज का कायतरी.
पण कुणाला तरी ३ वेगवेगळे रंग असतील असं वाटत असेल तर?

तुमच्या नियमानुसार मग कुणीच मेगाप्राईज जिंकणार नाही.

Pages