या पत्त्यांमागे दडलयं काय????

Submitted by टीशर्ट_समिती on 19 June, 2014 - 04:44

ऐका हो ssss ऐका.....

तमाम हुश्शार Happy मायबोलीकरांसाठी.......

या पत्त्यांमागे दडलयं काय?

Tshirts.jpg

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणेच याहीवर्षी आपण मायबोली टि-शर्ट करणार आहोत. तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल ही खात्री आम्हाला आहेच.

पण यावर्षीचे खास आकर्षण म्हणून आम्ही घेऊन येत आहोत `रंग ओळखा आणि बक्षीस जिंका' स्पर्धा. यात मायबोलीकरांना यावर्षी करण्यात येणार्‍या टि-शर्टचा रंग ओळखायचा आहे. बरोबर रंग ओळ्खणार्‍यास एक छोटसं बक्षीस.

स्पर्धेचे नियम:-
१)स्पर्धेत भाग घेणार्‍याला पुरुषांच्या आणि महिलांच्या असे दोन्ही टि-शर्टचे रंग सांगायचे आहेत.(दोन्ही टि-शर्टसचे रंग एकच असू शकतात ही शक्यताही ध्यानात घ्यावी. :डोमा:)
२)दोन्हीपैकी एकच रंग बरोबर ओळखला तर `मिनी प्राईझ' मिळेल. दोन्ही रंग बरोबर ओळखलेत तर `मेगा प्राईझ' मिळेल.:).
२)स्पर्धेत भाग घेणार्‍या प्रत्येक मायबोलीकराला रंग ओळखण्याची एकदाच संधी मिळेल. (इथे `प्रत्येक मायबोलीकराला' हा शब्द वापरला गेल्या असल्या कारणाने उगाच डु. आयडीने येऊन पुन्हा उत्तर दयायचे कष्ट अतीहुश्शार लोकांनी घेऊ नयेत.. :फिदी:)
३)या स्पर्धेची अंतीम मुदत शनिवार दि.२१.०६.२०१४, सकाळी आठपर्यंत(भारतीय प्रमाणवेळेनुसार) असेल.. Happy
४)या स्पर्धेचा निकाल शनिवार दि.२१.०६.२०१४ रोजी सकाळी दहा वाजता याच बाफवर जाहीर करण्यात येईल.
५)स्पर्धेबाबतचे सर्व अंतीम अधिकार टि-शर्ट समितीकडेच असतील.

ओळ्खा तर मग झाकलेल्या पत्त्यामागील टि-शर्टसचा रंग............. Happy

-----------------------------------------------------------------------------------------------

निकाल लागलेला आहे, पान क्र. ४ वर बक्षिसविजेत्यांची नावं पहा..

rang olkha 2014.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरूष आणि बायकांसाठी स्ट्रॉबेरी कलर असणाराय !...>>>नंद्या,स्ट्रॉबेरी लईच आवडते का भाऊ तुला?:फिदी:

लेडिजबायका आणि जेन्ट्स पुरुष अशी कॅटेगरी का आहे? लेडिज पुरुष आणि जेन्ट्स बायका पण असणार आहे का?
>>>>>>
आदिती, बी प्रश्न Rofl

पण मी म्हणतो स्ट्रॉबेरीच का ???????? देशी फळ का नाहीत ? Uhoh

आंबा घ्या.. पेरु घ्या.......चिकु घ्या.... कलिंगड घ्या...... काहीच मिळत नसेल तर कोकणातला "फणस" घ्या

स्त्रिया: स्ट्रॉबेरी लाल
पुरूष: चॉकलेटी(डार्क ब्राऊन)

*****
माझं उत्तर बरोबर/चूक? माहीत नाही...पण ज्यांनी अजूनही आपले अंदाज इथे व्यक्त केले नसतील त्यांच्यासाठी एक क्ल्यू देतोय...तेच उत्तर कदाचित बरोबर ठरेल. Happy
बायका: तो(आकाशी निळा) परत आलाय!
पुरुष: सुखी माणसाचा सदरा(लाल) हवाय?
अर्थात हे उलट-सुलटही होऊ शकतं म्हणा! Proud

याक यल्लो यल्लो डर्टी फेल्लो >>>>>> तुला पिवळ्या रंगाचे फायदे माहीत नाही वाटते. काही गडद रंगांना मळखाऊ का म्हणतात माहीत आहे ना...

आली निकालाची वेळ Happy

rang olkha 2014.jpg

जेन्ट्स टीशर्टचा रंग आहे "रॉयल ब्ल्यू"

आपल्यापैकी अनेकांनी निळा असा रंग लिहिलाय, पण "रॉयल ब्ल्यू"पर्यंत कोणीच नाही पोचलं. त्यामुळे 'बेनेफिट ऑफ डाऊट' देऊन ज्या ज्या माबोकरांनी 'निळा' लिहिलंय असे सर्व विजेते ठरले आहेत. ते म्हणजे:
धनुअमिता
आशिका
मृण्मयी

अभिनंदन Happy

लेडीज टीशर्टचा रंग आहे "वाईन रेड"
या शेडने मात्र माबोकरांना चांगलंच चकवलं. या अचूक उत्तरापर्यंत कोणीच पोचू शकलं नाहीये. त्यामुळे कोणीच विजेता नाही Sad

रॉयल ब्ल्यूच्या विजेत्यांना टीशर्ट समितीकडून एक छानसं बक्षिस मिळेल, पण त्यांनी वविला यायला हवं Happy तुम्हाला वविला यायला जमत नसेल तर वविला उपस्थित असलेल्या तुमच्या माबोकर मित्रमैत्रिणीला तुमच्यातर्फे तुमचं बक्षिस घ्यायला सांगितलंत तरी चालेल. पण ते तुमच्यापर्यंत पोचेल याची मात्र गॅरन्टी आम्ही देऊ शकणार नाही! Happy

एक लक्षात घ्या, डार्क ब्ल्यू, डीप ब्ल्यू, इंडिगो म्हणजे रॉयल ब्ल्यू नाहीत.
तसेच, (नुसता) लाल किंवा रेड म्हणजे वाईन रेड नाहीत.

सो बेटर लक नेक्स्ट टाईम! Happy

ओके ओके
पुरुष - राजेशाही निळा
स्त्री- रक्तवर्णी मदिरा,

मी रिचेकिंगचा फॉर्म भरला होता. आता बघा प्लीज माझी उत्तरे बरोबर आहेत का ? Wink

Pages