Submitted by पुरंदरे शशांक on 16 June, 2014 - 00:38
ओल .....
मनी दाटता सय कोणाची
अंधारुन ते येते सारे
उगाच कुठले कारण नसता
आठवणींची वीज थरारे
चूक-बरोबर होते का ते
जाऊनिया क्षण युगे लोटली
विचार आवर्ती सापडता
मेघगर्जना कानी घुमली
भळभळताना जखम उरींची
खोल वेदना चिरीत गेली
टपटपताना अश्रू सारे
विचित्रशी ती आर्त काहिली
नकोच ओझे आठवणींचे
नको लढा तो मनीमानसी
वाहून गेले पाणी तरी का
ओल रहाते जराजराशी .....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शशांक, मस्त शेवटच्या ओळी
शशांक, मस्त शेवटच्या ओळी सुंदर.
खूपच छान...मनी ठसली ..
खूपच छान...मनी ठसली ..
मस्त. . शेवटचं कडव तर मस्तच.
मस्त. . शेवटचं कडव तर मस्तच. .
Aprtim...!!
Aprtim...!!
आवडली.
आवडली.
वाहून गेले पाणी तरी का ओल
वाहून गेले पाणी तरी का
ओल रहाते जराजराशी .....
आहा...
नकोच ओझे आठवणींचे नको लढा तो
नकोच ओझे आठवणींचे
नको लढा तो मनीमानसी
वाहून गेले पाणी तरी का
ओल रहाते जराजराशी .....
very true
आवडली.
आवडली.
खूप छान, मलापण शेवटच्या दोन
खूप छान, मलापण शेवटच्या दोन ओळी खूप आवडल्या.
अप्रतिम !!!!
अप्रतिम !!!!