बाबा आमट्यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाबद्दल नव्यानं माहिती देण्याची गरज नाही. बाबांनी वसवलेल्या आनंदाच्या या वनात अनेकांना त्यांच्या आयुष्याचं सुख गवसलं आहे. या आनंदवनात आणि महारोगी सेवा समितीच्या सोमनाथ प्रकल्पात सध्या २५० - ३०० मुलंमुली राहतात. आनंदवन हेच त्यांचं हक्काचं घर आहे.
या मुलामुलींना आनंदवनात आणि सोमनाथला प्रेम, आपुलकी, मैत्री मिळत असली, तरी बाहेरच्या जगातही त्यांचे मित्र, किंवा नातलग असावेत, अशी इच्छा आहे. याचं कारण असं की, यांपैकी काही मुलंमुली अनाथ आहेत. काहींना एकटे पालक वाढवत आहेत. काही मुलामुलींना आनंदवनातल्या रहिवाशांनी दत्तक घेतलं आहे. अनेकांच्या पालकांना त्यांच्या कुटुंबांनी कुष्ठरोगामुळे किंवा अपंगत्वामुळे घराबाहेर काढल्यानं हक्कानं आजी-आजोबा-मामा-आत्या अशी हाक मारता येईल, अशा व्यक्ती नाहीत. काहींचे पालक अंध किंवा मूकबधिर आहेत, तर काहींचे अशिक्षित. त्यामुळे पालकांशी संवाद साधणं, हीदेखील समस्या आहे. या मुलामुलींनी आनंदवनातच त्यांची नाती निर्माण केली असली, आनंदवनवासीयांनी या मुलामुलींना जिव्हाळ्यानं वाढवलं असलं, तरी आनंदवनाबाहेरची नातीही त्यांचं आयुष्य नक्कीच अधिक सुखकर, समृद्ध करतील, असं आम्हांला वाटतं.
त्या दृष्टीनं मायबोलीकरांच्या मदतीनं एक उपक्रम सुरू करावा, अशी इच्छा आहे. आपल्यापैकी अनेकांचे पूर्वी पत्रमित्र होते. उत्तम शाईच्या पेनानं आपण पानंच्या पानं भरून पत्रं लिहीत असू. आपल्या आयुष्यातल्या घडामोडी, गमतीजमती त्यांना कळवत असू.
आनंदवनातल्या या मुलामुलींचे मित्र बनून, किंवा त्यांच्याशी आजोबा-आजी, काका-मामा-मावशी-आत्या असं नातं जोडून तुम्ही त्यांना पत्रं लिहिलीत तर त्यांना खूप आनंद होईल. तीही तुम्हांला पत्रांतून उत्तर देतील. तुमचं जग आणि त्यांचं जग पत्रांच्या माध्यमातून एकत्र यावं, त्यांना आनंदवनाच्या बाहेरही आप्त आणि सुहृद लाभावेत, अशी आमची मनापासून इच्छा आहे.
सध्या शाळांना सुट्ट्या आहेत. तुमच्याशी पत्रातून संवाद साधू शकतील, अशी ५-१८ या वयोगटातली पन्नास मुलंमुली आनंदवनात आहेत. या उपक्रमात तुम्ही सहभागी होऊ इच्छित असाल, तर कृपया या बाफवर तसं लिहा. लवकरच मुलामुलींची नावं इथे आम्ही लिहू, आणि तुम्ही त्यांना पत्रं लिहू शकाल.
या उपक्रमातून तुम्हांलाही आनंदच मिळेल, याची आम्हांला खात्री आहे.
धन्यवाद.
- डॉ. शीतल आमटे, चिनूक्स (चिन्मय दामले), रार (आरती रानडे)
एक महत्त्वाचं - या उपक्रमातून तुम्ही आनंदवनातल्या मुलामुलींना आर्थिक मदत करावी, अशी अजिबात अपेक्षा नाही. तशी मदत करायची असल्यास कृपया महारोगी सेवा समितीच्या शिक्षणविभागाशी संपर्क साधावा. हा उपक्रम केवळ पत्रं लिहिण्यापुरताच मर्यादित आहे.
त्याच अनुषंगाने अजून एक. कुठलाही गैरसमज करून न घेता तुम्ही हे वाचाल अशी अपेक्षा आहे. तुम्ही लिहिलेल्या पत्रांतून मुलांच्या मनांमध्ये कुठल्याही प्रकारच्या न्यूनगंड निर्माण होणार नाही, आपल्या आईवडलांबद्दल, संस्थेबद्दल त्यांना लाज वाटणार नाही, याची कृपया काळजी घ्या. तुम्ही लिहिलेलं पत्र कदाचित तो मुलगा / मुलगी आपल्या वर्गात वाचून दाखवू शकेल, हे कृपया ध्यानात असू द्या. हे लिहिण्यामागे तुमच्या भावनांचा अनादर करण्याचा अजिबात हेतू नाही. मात्र अजाणतेपणी असं होऊ शकतं, म्हणून केवळ हे लिहिलं.
Pl count me in. Sorry about
Pl count me in. Sorry about English. Replying from office. this is a terrific idea.
मला आपले म्हणा अर्थात मी ह्या
मला आपले म्हणा अर्थात मी ह्या उपक्रमात सामील व्ह्यायला तयार आहे
पत्र पोस्टानेच पाठवावे लागेल
पत्र पोस्टानेच पाठवावे लागेल का?
दोन पर्याय आहेत. १. पत्र
दोन पर्याय आहेत.
१. पत्र पोस्टाने पाठवणे
२. ईमेल करणे
सर्वांनीच ईमेली पाठवल्यास त्या डाऊनलोड करून त्या मुलामुलींपर्यंत पोहोचवणं, हे जरा किचकट काम होऊन बसेल. परत त्यांचं उत्तर टाईप करण्यातही वेळ जाईल. पोस्टाने पत्र पाठवल्यास ते पत्र थेट त्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातात पडेल, आणि त्यांचं उत्तरही तुम्हांला लगेच मिळेल.
व्वा! मस्त कल्पना आहे.
व्वा! मस्त कल्पना आहे. माझ्याकडूनही हो
मलाही या उपक्रमात सहभागी
मलाही या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. मस्त कल्पना आहे ही. मनापासून आवडली. मी माझ्या घरच्यांना, मित्रमैत्रिणींनाही सांगू शकते. म्हणजे मुलांना काका-काकू, मामा-मामी, आजी-आजोबा आणि समवयीन भावंडं सुद्धा मिळतील.
एक महत्त्वाचं - ही पत्रं
एक महत्त्वाचं - ही पत्रं शक्यतो मराठीत लिहिलेली असावीत.
मी पण लिहीन.
मी पण लिहीन.
मला पण आवडेल!
मला पण आवडेल!
मला पण आवडेल.
मला पण आवडेल.
मी पण लिहिणार आहे पत्र.
मी पण लिहिणार आहे पत्र.
मुलामुलींचे मित्र बनून, किंवा
मुलामुलींचे मित्र बनून,
किंवा त्यांच्याशी आजोबा-आजी,
काका-मामा-मावशी-आत्या असं नातं
जोडून >>>>>>> ताईच पत्र चालेल का
जोक्स अपार्ट
count me in
मला ही आवडेल..
मला ही आवडेल..
अरे वा छान उपक्रम, मलाही पत्र
अरे वा छान उपक्रम, मलाही पत्र लिहायला आवडेल....count me in too
एक महत्त्वाचं - या उपक्रमातून
एक महत्त्वाचं - या उपक्रमातून तुम्ही आनंदवनातल्या मुलामुलींना आर्थिक मदत करावी, अशी अजिबात अपेक्षा नाही. तशी मदत करायची असल्यास कृपया महारोगी सेवा समितीच्या शिक्षणविभागाशी संपर्क साधावा. हा उपक्रम केवळ पत्रं लिहिण्यापुरताच मर्यादित आहे.
या मुलांसाठी तुम्ही खेळ, पुस्तकं संस्थेच्या पत्त्यावर पाठवू शकता.
त्याच अनुषंगाने अजून एक. कुठलाही गैरसमज करून न घेता तुम्ही हे वाचाल अशी अपेक्षा आहे. तुम्ही लिहिलेल्या पत्रांतून मुलांच्या मनांमध्ये कुठल्याही प्रकारच्या न्यूनगंड निर्माण होणार नाही, आपल्या आईवडलांबद्दल, संस्थेबद्दल त्यांना लाज वाटणार नाही, याची कृपया काळजी घ्या. तुम्ही लिहिलेलं पत्र कदाचित तो मुलगा / मुलगी आपल्या वर्गात वाचून दाखवू शकेल, हे कृपया ध्यानात असू द्या. हे लिहिण्यामागे तुमच्या भावनांचा अनादर करण्याचा अजिबात हेतू नाही. मात्र अजाणतेपणी असं होऊ शकतं, म्हणून केवळ हे लिहिलं.
मलाही आवडेल या उपक्रमात
मलाही आवडेल या उपक्रमात सहभागी व्हायला..
चिन्मय, निदान सुरुवातीच्या
चिन्मय, निदान सुरुवातीच्या पत्रात कशा प्रकारचे मुद्दे आलेले चांगले असे लिहिलेस तर मला वाचायला आवडतील. तसेच, मी स्वतः कधीही कुणाशीही पत्रमैत्री केलेली नाहीये त्यामुळे, ज्यांनी कोणी हा प्रकार केलेला आहे त्यांनी आपापली पत्रमैत्री कशी फुलवली यावर लिहिले तर वाचायला आवडेल व एक आता सुरुवात कशी करावी याचीही सर्वसाधारण कल्पना येईल. इथे अस्थानी होणार असेल तर एखादा वेगळा बाफ उघडला तरी चालेल.
मला ही आवडेल निरागस लहानगीला
मला ही आवडेल निरागस लहानगीला पत्र लिहायला.
तसं काही नाही, हर्पेन. तू
तसं काही नाही, हर्पेन. तू तुला हवं तसं पत्र लिही.
इथे लवकरच आम्ही मुलामुलींची नावं आणि त्यांची वयं देऊ. कोणाला पत्र लिहायचं, हे निवडून तुम्ही इथे लिहा. म्हणजे इतर दुसर्या कोणाला पत्र लिहू शकतील. कोणा एकालाच चारपाच पत्रं आणि एखाद्याला एकही पत्र नाही, असं होणार नाही.
मलाही आवडेल.पोस्टाब्न्ने
मलाही आवडेल.पोस्टाब्न्ने पत्रपाठावायाला..
मी पण आहे
मी पण आहे
मलाही आवडेल त्या मुलामुलींना
मलाही आवडेल त्या मुलामुलींना पत्र लिहायला
मलाहि आवडेल पत्र
मलाहि आवडेल पत्र पाठ्वायला.....
मस्त आहे हा उपक्रम. लेकीने
मस्त आहे हा उपक्रम.
लेकीने लिहिले तर चालेल का? ती आठवीत आहे.
मलाही आवडेल . मी आजवर
मलाही आवडेल . मी आजवर कुणालाही पत्र लिहिले नाही किंवा मलाही कुणी कधी लिहिले नाही. आमची मोबाइल पिढी ना. त्यामुळे ही पत्रमैत्री आवडेलच करायला.
उप्क्र्माची कल्पना खुप
उप्क्र्माची कल्पना खुप आवडली!
माझा हात वर!
इंग्लिश नाहीच का चालणार? माझी लेक लिहू शकेल.
मी पण ..
मी पण ..
मला पण आवडेल.
मला पण आवडेल.
मलाही आवडेल पत्र लिहायला.
मलाही आवडेल पत्र लिहायला.
उपक्रम चांगला आहे.
उपक्रम चांगला आहे.
Pages