काल दुरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवर आणि इतर प्रसार माध्यमांवर मदर्स डे चा घोष चालु होता. भारतीय संस्क्रूतीत अनेक असे डे आहेत जसे बैल पोळा, नागपंचमी या सारखा हा एक दिवस अस आपल मला वाटत होत.
पाश्चात्य संस्कृतीत मुलं १८ व्या वर्षी वेगळी होतात. त्यांचा संबंध आई वडीलांच्या घराशी रहात नाही. आई ची आठवण काढायचा एक दिवस म्हणुन त्यांनी तो साजरा केला तर समजु शकतो.
भारतीय संस्कृतीत मात्र आईला देव मानण्यात आल आहे. काल मला प्रश्न पडला होता की काय कारण असेल की नाव जरी वडीलांच लावायाच असेल तरी आई आणि वडील यामध्ये आईला अग्रपुजेचा मान का बर दिला असावा ?
आपल्या रक्तापासुन एक देह निर्माण करायचा. तो आपली शारिरीक आणि मानसीक अवस्था आणि नित्य व्यवहार संभाळत नउ महिने संभाळायचा. इतकच नव्हे तर पुढे त्याचे पोषण करायचे. संस्कार करायचे इतकी मोठी जबाबदारी निसर्गाने आणि परंपरेने एकट्या माणसाच्या वंशात नव्हे तर सर्व पशु आणि पक्षी यांच्यात आहे.
आईशी सातत्याने अनेक वर्ष प्रेम दिल्याने भावनीक संबंध निर्माण होणे हे स्वाभावीक आहे. भारतीय संस्कृतीत मात्र याला केवळ एक दिवस भावना व्यक्त करुन आणि त्याअनुषंगाने येणार्या जबाबदार्या झटकुन टाकण्याची परंपरा नाही.
आई हे दैवत मानुन केवळ भावना व्यक्त न करता तिची जबाबदारी पुढे आयुष्यभर स्विकारण्याची परंपरा चांगली आहे असे वाटते.
केवळ आई जिवंत असतानाच ही जबाबदारी आहे अस नाही तर आईच्या निधनानंतर मृत्युनंतरचे जीवन आहे असे मानले तर पुढचे विधी आणि श्राध्द इथपर्यंत ही परंपरा पुढे जाते.
माझ्या आईला भाऊ नव्हता. माझे आईचे वडील यांचे स्मरणार्थ अश्विन शुध्द प्रतिपदेला माझे वडील ब्राह्मणाला बोलावत व माझ्या हस्ते त्यांचे श्राध्द करवुन घेत.
इतक्या परंपरा असताना मदर्स डे च्या दिवशी आईचे स्मरण हे फारच अल्प आहे असे राहुन राहुन वाटते.
लेखन करताना सर्व अंगांना स्पर्श करण्याच्या उद्देशाने मृत्युनंतरचे जीवन याचा संदर्भ घेतला आहे. हा विषय वादग्रस्त असल्यामुळे त्यावर प्रतिसाद देत बसल्यास लेखनाच्या मुळ उद्देशापासुन आपण लांब जाऊ असे वाटते.
माझी भुमिका संस्कृती रक्षक अशी नाही. मदर्स डे बंद व्हावा आणि रोज आपण आईला नमस्कार करुन मग आपले दिनक्रम सुरु करावेत अशी आग्रही भुमिका या निमीत्ताने नाही.
मुले हयात असताना आपल्या मर्जीने वृध्दाश्रमात रहाणारे आई-वडील सोडुन ज्यांची इच्छा कुटुंबात रहाण्याची आहे अश्या आई वडीलांना ते सौख्य लाभावे इतकीच आशा आहे.
<<मुले हयात असताना आपल्या
<<मुले हयात असताना आपल्या मर्जीने वृध्दाश्रमात रहाणारे आई-वडील सोडुन ज्यांची इच्छा कुटुंबात रहाण्याची आहे अश्या आई वडीलांना ते सौख्य लाभावे इतकीच आशा आहे.>> + १
माझे मत - जेंव्हा नियमित विचार संपतो तेंव्हा "डे" चा विचार चालू होतो!