बाल्कन युरोप - क्रोएशिया - भाग ३ - दुब्रॉव्निक (पर्ल ऑफ अ‍ॅड्रियाटिक)

Submitted by मनीष on 4 May, 2014 - 17:53

भाग पहिला - http://www.maayboli.com/node/48703
भाग दुसरा - http://www.maayboli.com/node/48718

दुब्रॉव्निक हे सातव्या शतकात वसवलेलं आणि अ‍ॅड्रियाटिकमधले महत्त्वाचे आणि पर्यटकांचे, विशेषतः क्रूझ पर्यटकांचे आवडते ठिकाण. हे शहरसुध्दा युनेस्कोनं 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून जाहिर केलंय. क्रोएशियातील इतर शहरांप्रमाणेच हे पण भिंतींनी बंदिस्त केलेलं शहर आहे. सामुद्रिक व्यापारामुळं या शहराची १५व्या आणि १६व्या शतकात चांगलीच भरभराट झालेली. बर्‍याच आक्रमणांनंतरही या शहरानं स्वतःची स्वायत्तता बराच काळ टिकवून ठेवली होती. युगोस्लाव युध्दात या शहरावर बरेच बाँबिंग झालं पण आता त्या युध्दाच्या खुणा पुसल्या गेल्या आहेत.

दालमेशियाचा हा भाग आणि क्रोएशियाचा भाग (स्प्लिटकडचा) सलग नाहिये. मधे साधारण १५ किमीचा 'बोस्निया आणि हर्झगोविना' या देशाचा भाग आहे. त्यामुळे क्रोएशियाच्या नागरिकांनाही दुब्रॉव्निकला जाताना पासपोर्ट किंवा क्रोएशियाचे ओळखपत्र घेउन जावे लागते.

शहराजवळच्या डोंगरावर जाण्यासाठी केबल कारची सोय आहे. तिथून शहराचे आणि अ‍ॅड्रियाटिक समुद्राचे फारच सुंदर नजारे दिसतात.

दुब्रॉव्निक शहर आणि जवळचेच लोकरम (Lockrum) बेट -

जुनं बंदर -

जुन्या शहराभोवतालची भिंत

जुन्या शहरात अजूनही लोक राहतात. आत कुठलीही वाहनं येउ शकत नाहित. आतमधेच बरेच रेस्तराँ आणी दुकानं आहेत शिवाय इथल्या घरांमधून (अपार्टमेंट्स) रहायची सोय होते. आम्ही जुन्या शहरातल्याच एका घरात राहिले होतो.

जवळच्याच सेंट लॉरेन्स किल्ल्यावरून दिसणारं जुनं शहर आणि भिंत -

पिला गेटमधून आत गेलं की लगेचच हा ऑनोफ्रिओ (Onofrio) कारंज आहे. याच्या जवळच पर्यटक माहिती केंद्र आहे.

१०० कुना टिकीट काढून आपण शहराच्या भिंतीवरून फिरून येउ शकतो. तिथं ऑडिओ गाइडची सोय होती पण यावर्षीपासूनच ती सोय बंद झाली आहे. पाहिजे असेल तर खाजगी गाईड घेउन जाता येउ शकते.

भिंतीवरून दिसणारा सेंट लॉरेन्स किल्ला -

भिंतीवरून दिसणारी दृष्यं -

मिंचेता (Minceta) टॉवर(भिंतीचाच एक भाग) -

तिथून दिसणारं शहर -

भिंतीला असलेल्या एका खिडकीतून दिसणारं शहर -

इथलं समुद्राचं पाणी किती नितळ आहे हे इथं दिसून येतं -

शहरातलं भिंतींच्या आतमधे असलेलं एक चर्च -

इथंही आम्हाला एक शुध्द शाकाहारी रेस्तराँ (निष्ता Nishta) मिळाले, जिथे बाकिच्या पदार्थांबरोबरच पंजाबी थाळी मिळत होती जी चक्क बर्‍यापैकी चांगली होती. रेस्तराँचे मालक आणि मालकिण दोघं स्वतः शाकाहारी आहेत आणि भारतात बर्‍याचदा येउन गेलेत.

दोन दिवस दुब्रॉव्निकमधे काढून आम्ही तिसर्‍या दिवशी सकाळी कोटोर, माँटेनेग्रोला निघालो. आमच्या कोटोरच्या हॉटेलनं दुब्रॉव्निकहून पिक-अपची सोय केली होती. जाताना एका ठिकाणाहून दिसणारं दुब्रॉव्निकचं दॄष्य -

भाग चौथा - http://www.maayboli.com/node/49119

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच फोटो अतिशय सुरेख आलेत.
काही ठिकाणं (जागा) अगदी चित्र काढल्याप्रमाणे सुबक आणि रेखिव आहेत.

आहाहा!! डोळे तृप्त झाले. इथले पिण्याचे पाणी जगातील नं १ आहे. मस्त चव आणि गोडवा. आमच्या गाईड्ने सांगितले होते की इथून हे पाणी मोठ्याप्रमाणात जगभर एक्सपोर्ट होते.

तीनही भाग सलग वाचले..अप्रतिम फोटो! काय सुरेख जागा आहे! एकीकडे गोड्या पाण्याचे धबधबे आणि दुसरीकडे विस्तीर्ण समुद्रकिनारा!

मनीष,

छान फोटो आलेत. प्रत्येकानं दुब्राव्होनिकला जायलाच हवं आयुष्यात एकदातरी. इति माझा क्रोट मित्र.

मी बाकी काही नाही तरी निष्टासाठी जाणारच! Happy

आ.न.,
-गा.पै.