चित्रपटदृश्यं बघताना पडणारे प्रश्न

Submitted by गजानन on 30 April, 2014 - 14:42

चित्रपटातले एखादे दृश्य बघताना अनेकदा 'असे का?' प्रश्न पडतात. कधी कधी त्यामागे काहीच लॉजिक नसते (असे वाटते) तर कधी कधी त्यामागे रंजक किस्से घडलेले असतात. "एखाद्या गोष्टीचे त्या दृश्यात प्रयोजन काय?" अशासारख्या प्रश्नांसाठी हा बाफ.

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात दिनकरराव भोसले खेतवाडीतून निवडणूक लढवणार म्हटल्यावर संतप्त जनसमुदाय त्याच्या घरावर चालून येतो. त्या समुदायाला सामोरे जाण्यासाठी दिनकरराव घराच्या गच्चीवर येतो. त्याचवेळी वर आकाशात एक विमान बरोबर त्याच्या डोक्यावर येते, क्षणभर त्याचा वेग मंदावतो आणि मग ते झर्रकन पुढे निघून जाते. दिनकररावाच्या भाषणादरम्यान आणखी एकदा तेच (? आणि लगेच? ) विमान त्याच्या डोक्यावरून त्याच दिशेने उडताना दाखवलेय. हे मुद्दाम दाखवलेय की निव्वळ योगायोग?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधीकधी एखादा शॉट म्हणजे भारी डायरेक्शन आहे, दिग्दर्शकाच्या लक्षात न आलेले किंवा लक्ष न दिलेले क्षुल्लक काहीतरी आहे, की उगाच काहीतरी भारी आहे असा आभास निर्माण केलेला आहे असा प्रश्न अनेक वेळा पडतो. देऊळ मधे एका सीन बद्दल मी लिहीले होते. आठवले की लिहीतो. ढाई अक्षर प्रेम के मधे अभिषेक व ऐश्वर्या कोठेतरी डोंगरदर्‍यांत उभे असताना मागे एक पक्ष्याचा पिंजरा घेउन माणूस येतो व निघून जातो. तेव्हाही हाच प्रश्न पडला होता. Happy

आठवले (म्हणजे माझ्याच रिव्यूत वाचले Happy )- देऊळ मधे एक शॉट आहे. वर्गात शिक्षक पावतीपुस्तके वाटतात. तेव्हा फळ्यावर आझाद हिंद सेना, फॉरवर्ड ब्लॉक वगैरे बद्दल माहिती आहे. तेथील चर्चेतून असे नंतर वाटले की त्यात काही संदेश बिंदेश नसावा.

ढाई अक्षर प्रेम के मधे अभिषेक व ऐश्वर्या कोठेतरी डोंगरदर्‍यांत उभे असताना मागे एक पक्ष्याचा पिंजरा घेउन माणूस येतो व निघून जातो. >>> Rofl

फारेण्ड, जमलं तर त्या तेवढ्या (आणि तेवढ्याच) भागाची लिंक दे ना. आख्खा सिनेमा बघायला लावू नकोस. तुझ्यासारखं माझं मन घट्टं नाही.

र्‍ढाई अक्षर प्रेम के मधे अभिषेक व ऐश्वर्या कोठेतरी डोंगरदर्‍यांत उभे असताना मागे एक पक्ष्याचा पिंजरा घेउन माणूस येतो व निघून जातो. >र्‍विवेक ओबेरॉय तर नव्हता ना!

'धूमधडाका' सिनेम्यात अंबाक्काचे वडील आणि इतरांच्या मारापासून वाचून लक्ष्या पळत असताना एका मोकळ्या माळावर येतो. तिथून एक गावकरी जनरल जात असतो. त्याला पाहून लक्ष्या 'भूत.. भूत.. भूत' करून किंचाळून दुप्पट वेगाने पळत सुटतो. ते निव्वळ उगाच आहे, हे अगदी जाणवतं.

<< डायरेक्शन सुद्धा सर्वसामान्यपणे आपण ज्याला 'डायरेक्शन' म्हणतो अशा शॉट्स ने भरलेले आहे. म्हणजे 'मेरे सामने खुला आकाश था' असे ऐश्वर्या म्हणताना बॅकग्राउंड ला मोकळे आकाश, तर तिच्या मनात जरा वादळ उठू लागले की लगेच त्यांच्या जीप वर पाऊस व आजूबाजूने झाडांच्या फांद्या पडायला सुरूवात! आधीच्या त्या संवादात फक्त ते दोघेच असताना अभिषेक म्हणतो की 'मै पिंजडे मे बंद होना चाहता हू', लगेच एक पिंजर्‍यात काही पक्षी ठेवलेला माणूस त्यांच्या मागे येतो आणि दोन मिनीटांनी तेथून जातो, यांना पक्षी हवेत का वगैरे काही न विचारता. तो कोठून आला? माहीत नाही, कदाचित 'डायरेक्शन' मधे हे विचारायचे नसते!>> http://www.maayboli.com/node/2516

अरेरे किती ही असंवेदनशीलता ! प्रतिकात्मक दिग्दर्शन वगैरे म्हणतात ते हेच ! तुम्ही एक फिल्म अ‍ॅप्रिसिअशनचा कोर्स कराच म्हणजे नायक नायिका गाणे म्हणत असताना ब्याकग्राऊन्डला आकाशात दिसणा र्‍या ढगाच्या तत्क्षणीच्या वेड्याविद्र्या आकारातूनही ढायरेक्टरला काही सूचन करावयाचे असते हे लष्करात येईल... आज मौसम बडा बईमान है (बेईमान नव्हे) आनावाला कोई तूफान है या गाण्यात ब्याकग्राऊन्डास निरभ्र आकाश दाखिवलय ते काही उद्देशाने ! की नायकाला मौसम कसा आहे हे कळत नाही इतका तो बथ्थड आहे अशा माणसाशी लग्न केल्यास तो कोणत्याही गोष्टी मान्य करील व विश्वास ठेवेल. सो गो अहेड बेबी ! Proud
नायकाने फायटिंग कर्ताना निळा सदरा आणि पिवळी विजार का घातली आहे आणि फायटीच्या एखा शीणात फ्रेमच्या डाव्या कोपर्‍यात एका कुलुंगी कुत्र्याचे शेपूट दिसत आहे यालाही एक प्रकारचा दिग्दर्शकीय अर्थ असतो ते 'जाणवायला ' पाहिजे जातीचे एवढाच त्याचा अर्थ !

क्रिश ३ मधे, कंगनाच्या गाण्यात एकाच शॉटमधे दोघांच्या मागे सँड स्टॉर्म दिसते... ते खरेच झाले होते.
ती उत्तम नर्तिका असूनही ( हे माझे नाही, विश्वास पाटील यांचे मत आहे ) त्या गाण्यात ती नाचत नाही.. करण ती माणूस नसते कि जनावर नसते.. मानवर असते.

गजानन यांच्या सीनमधले ते कदाचित मलेशियन एअरलाईन्सचे विमान असावे, कुठे जावे असा क्षणभर विचार केला असेल त्याचवेळी.

मोहब्बतें बघताना आणि नंतर अनेक वेळा उदय चोप्रा ला बघून हा अ‍ॅक्टिंग का करतो? याला चित्रपटात का घेतले? असा प्रश्न मला पडतो.

farend, digdarshakala watala asel ki te tyancha pinjara panchi wagaire upma dena faracha anakalaniya aahe prekshakansathi.. mhanun apala lagech eka manasala pinjaryatla pakshi gheun dakhawala Proud ya digdarshakanchi pan kamal aahe!!

मलाही ते पि़जर्‍याचे कळले नाही. ते ठिकाण पहाता शेंगदाणेवाला किंवा गजरेवाला ठीक आहे हा पक्षीवाला कुठून उपटला? बर आला तो आला निदान इथवर आलोय तर एक दोन पक्षी विकू नयेत? मराठी असावा. गुजराती /सिंधी असता तर गोड बोलून एकतरी विकला असता. बराच विचार करून दोनच कारणे सुचतात.

१ आपण तो पिंजरेवाला डॉयलॉग मारणार हे आधीच ठरवून अभिषेकने वातावरण निर्मीती साठी त्याला थोडे पैसे देऊन बोलवले असावे. तो डॉयलॉग झाल्यावर तो पक्षीवालाही आपले काम झाले असा चेहरा करतो आणी जातो.

२ दिग्दर्शकाच्या बायकोच्या माहेरचा असावा.

आज याहूच्या होम पेजवर ही एक भन्नाट लिंक होती.
हे बघून हसून हसून मुरकुंडी वळायची वेळ आली !
ह्याद दिग्दर्शकाचा नक्की काय विचार होता कुणास ठाऊक.
बर, बायकोच्या मित्राचा फोटो दिसायला पलंगाच्या चौकटीलाच ती बॅग का टांगली असावी?

https://www.youtube.com/watch?v=2u1HvdJhRoo

धन्यवाद फारेण्ड. दिग्दर्शकाची प्रतिभा पाहून डोळे भरून आले. तुला उच्च कलेची कदरच नाहीये इतकंच म्हणू शकते.

लक्ष्या 'भूत.. भूत.. भूत' करून किंचाळून दुप्पट वेगाने पळत सुटतो.<<<< श्रद्धा, आठवलं! Rofl
आणि त्या गावकर्याला तसूभर ही फरक पडत नाही, ह्याच्या किंचाळत धावण्याचा Rofl

झपाटलेला मधे तात्या विंचु बाहुला लक्ष्या च्या छाती वर जाउन बसतो तेव्हा लक्ष्या घाबरतो....पण त्यातही त्याला त्या ब्बाहुल्याला लाडने " किती शानं माजं बाल ते" अस बोलायला सुचतं

'कुछ कुछ होता है' मध्ये अर्चना पुरणसिंगचं प्रयोजन काय ?
एकतर जो प्रिन्सिपल आपल्या मिनीस्कर्ट घालून आलेल्या लाडक्या लेकीला बर्‍यापैकी सिरीयसली हे कॉलेजमध्ये चालणार नाही सांगतो, तो तेच कपडे प्रोफेसरने घातले तर चालवून घेतो. बरं त्याचे तिच्यामागे गोंडे घोळणे ह्याला पुढे चित्रपटात काहीच स्थान नाही. त्या फ्लॅशबॅकच्या प्रसंगांनंतर ती गायबच होते. पुढच्या आयुष्यात ना ती अनुपम खेरची बायको म्हणून दाखवलीय ना त्याची विशुद्ध मैत्रीण म्हणून ! Proud एडिटिंगमध्ये कात्री लावली असावी असा मला संशय आहे.

>> 'कुछ कुछ होता है' मध्ये अर्चना पुरणसिंगचं प्रयोजन काय ?
'कॉमिक रिलीफ'ही म्हणवत नाही. रिलीफ कशापासून? Proud

सारुकानपासून रिलीफ बहुधा. Proud
सगळेच इतका आचरटपणा करत असतात त्यात, की चेन्ज ऑफ फेस इतकाच रिलीफ. Proud

Pages