तुम्हाला काय वाटते ?
माझा एक बालमित्र शेखर आठवले याचा ‘अक्षरधूळ’ नांवाचा ब्लॉग आहे व त्यावर तो सतत काहीतरी लिहीत असतो.
त्याने लिहीलेल्या अशाच एका वृद्धाच्या समस्येविषयी आज मी येथे तुम्हाला थोडक्यात सांगून त्यावर तुमचे मत किंवा तुम्हाला काय वाटते ते विचारणार आहे.
हा इसम एक सधन ६८ वर्षांचा वृद्ध असून डेक्कन जिमखान्यावर त्याचा स्वत:चा बंगला आहे. याला दोन विवाहित मुले आहेत. थोरला सहकुटुंब अमेरिकेत आहे व तेथे दोघेही नोकर्याि करतात. दूसरा ओरिसात भुवनेश्वरला असून ते दोघेही तेथे नोकरी करतात.
चार वर्षांपूर्वी यांची पत्नी वारली व तेंव्हापासून हे गृहस्थ एकटेच रहातात व हाताने जेवण बनवून खातात,याचे कारण त्यांना रोजच्या जेवणात साधेवरण – भात ,पोळी,भाजी,आमटी असे शुद्ध शाकाहारीच पदार्थ लागतात व मानवतातही.त्यांच्याच वयाचे त्यांचे काही समवयस्क मित्रांचा एक ग्रुप असून दरोज सकाळ संध्याकाळ दोन तास त्यांचा एकत्र येऊन गप्पा मारण्याचा परिपाठ गेले५-६ वर्षांपासून चालू आहे.
हे वृद्ध गृहस्थ कार्डियाक अस्थम्याचे पेशंट आहेत. पण नियमित आहार ,व्यायाम,औषधे व पथ्य सांभाळून त्यांनी त्याला काबूत ठेवले आहे.
दीड वर्षांपूर्वी त्यांच्या थोरल्या मुलाच्या व सुनेच्या आग्रहाखातर ते येथील सर्व मित्र-परिवाराचा निरोप घेऊन सहा महीने त्याचाकडे अमेरिकेस रहाण्यासाठी म्हणून गेले खरे ,पण प्रत्यक्षात तेथे गेल्यावर १५ दिवसातच तेथील परिस्थितीला ते फारच कंटाळून गेले. कारण मुलगा व सून भल्या पहाटेच उठून नोकरीसाठी घराबाहेर पडत त्यावेळी हे झोपेतून उठलेलेही नसत. व रात्री ते खूपच उशिरा घरी परत येत व हे वृद्ध त्यांच्या नेहमीच्या सवयीने रात्री लवकर झोपी जात. संपूर्ण दिवस एव्हढ्या मोठ्या घरात ते एकटेच असत ,फिरायला जावे तर रस्त्यावर माणूसही दिसणेही मुश्किल ,शेजार-पाजार नाही. आठवड्याचे शेवटी एक दिवस म्हणजे सुट्टीचा रविवार. त्या दिवशीसुद्धा मुलाला व सुनेला बाहेरची घरगुती कामे असत .रविवारच्या सुट्टीचे दिवशीही सबंध दिवसात जेमतेम एखादा तासच त्यांना यांचेशी बोलता येत असे. अर्थात त्यांना तेथे गुदमारल्यासारखे होऊ लागले व आणखी आही दिवस जर आपण येथे राहिलो तर आपल्याला नक्कीच वेड लागेल असे जेंव्हा वाटले तेंव्हा त्यांनी आपला गाशा गुंडाळला व एका महिन्याचे आताच ते पुण्यास परतले ,ते पुन्हा कधीही अमेरिकेचे तोंडही पहायचे नाही असा निश्चय करूनच.
काही दिवसांनी त्यांच्या धाकट्या मुलाने व सुनेने त्यांना ओरिसाला (भुवनेश्वरला) येण्याचा आग्रह केल्यामुळे त्याच्याकडे काही दिवस राहावे असे ठरवून ते मुलाकडे गेले. तेथे दुसराच प्रकार अनुभवाला आला. तेथेही दोघे (मुलगा व सून) नोकर्याव करणारे होते.सुनेला शिफ्ट ड्यूटी असे. दुसर्याक पाळीची ड्यूटी करून ती रात्री एक वाजता घरी परतली की झोपत असे ते सकाळी ९.३० पर्यन्त. सकाळच्या ब्रेकफास्ट साठी हॉटेल मधूनच काहीतरी मागवले जाई. दुपारचे जेवण २ वाजता घेऊन ती ड्यूटीसाठी निघत असे.
हे असे जंक फूड वेळी-अवेळी खाऊन त्यांना पोटाचा त्रास होऊ लागला. जेथे त्यांना सकाळचा पहिला चहाही वेळेवर मिळू शकत नव्हता , तेथे वरण-भात-घडीच्या पोळ्या साधी शाकाहारी भाजी असे जेवण कुठून मिळणार ? मुलाने ते सर्व वेळापत्रक अॅाडजस्ट करून घेतले होते,पण यांची तेथे फारच कुचंबणा होऊ लागली.अखेर एक महिन्याचे आतच ते त्या मुलाकडूनही निघून पुण्यास परत आले.
दहा दिवसांपूर्वी त्यांना अचानक कार्डियाक अस्थाम्याचा जोरदार अॅ्टॅक आला. शेजार्याअ–पाजार्यांकनी व पुण्यातील त्यांच्या मित्रांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅकडमिट केले. तेथे त्यांना ICU मध्ये ठेवले. मित्रांनी त्यांच्या दोन्ही मुलांना कळवले. चार दिवसांनी दोघेही आले.तोपर्यंत त्याचे सर्व मित्रांनीच केले. आता त्यांची तब्येत ठीक आहे व दोनच दिवसापूर्वी त्यांना हॉस्पिटलमधून डिसचार्जही मिळाला असून घरी आणले आहे. पण त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना व मुलांना सांगितले की यापुढे त्यांना असे एकटे ठेवने धोक्याचे आहे.
आणि त्यामुळे त्यांना खरा प्रॉब्लेम आत्ताच सुरू झाला आहे. दोन्ही मुले त्यांचा सांभाळ करायला , त्यांना स्वत:सोबत घेऊन जायला तयार आहेत, पण मागील अनुभवावरून यांचेच मन जायला तयार होत नाही. येथे एकट्याने रहाणेही धोक्याचे आहे हेही त्यांना उमजते आहे. पण त्यांचा काही निर्णय होत नाही.
यावर तुमचे काय मत आहे ? तुम्हाला त्यांनी काय करावे असे वाटते,जेणेकरून त्यांचा हा प्रश्न चांगल्या प्रकारे सुटेल असे तुम्हाला वाटे. सुचतोय का तुम्हाला यावर काही नामी उपाय ? असेल तर जरूर कळवा.
तुम्हाला काय वाटते ?
Submitted by pltambe@yahoo.co.in on 21 April, 2014 - 03:09
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या गरजू विद्यार्थ्याला
एखाद्या गरजू विद्यार्थ्याला सोबत म्हणून घरी ठेवावे. दिवसभरासाठी एखादी नर्स ठेवावी.
माहितीतला संस्थेकडून ब्रदर
माहितीतला संस्थेकडून ब्रदर ठेवावा , सकाळी एक व रात्री एक ब्रदर. गळ्यात एक माहीतीची पाटी किंवा बॅच घालून फिरावे बाहेर गेल्यावर.
एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात
एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात जाऊन रहाणे. तिथे समवयस्क मंडळींसोबत वेळही मजेत जाईल. नियमित वैद्यकीय तपासणी होत राहील. काही वृद्धाश्रमात, अनाथ मुलांना आजी-आजोबांचे प्रेम संस्कार मिळावेत म्हणून, अशा आजी-आजोबांशी मुलांची गाठ घालून देतात, या चिमुरड्यांच्या सहवासात तर त्याना खूप आनंद मिळू शकतो.
अमेरिकेत रहायला जाणे आणि तिथे
अमेरिकेत रहायला जाणे आणि तिथे जुळवुन घेणे कठीण आहे हे एकवेळ समजु शकतो पण भारतातल्या भारतात मुलांबरोबर रहायला काय हरकत आहे? असे नाही आहे कि मुले न्यायला तयार नाहीत.. ती तयार असताना एकटे राहुन मुलांच्या डोक्याला काळजी लावावी हे पटत नाही. थोडे जुळवुन घ्यायला त्यानी तयार व्हायला हवे नाही का?
आता त्यांच्या प्रकृतीचे कारण समजल्यावर त्यांचा मुलगा/सुन भात, एक भाजी, आमटी,.२ पोळ्या इतके देउ शकतील की करुन..पोळ्या घडीच्या ऐवजी बिनघडीच्या खाव्या लागतील एवढेच..
थोडीशी जुळवुन घ्यायची तयारी केली तर मुलाबरोबर राहणे हा मला बेस्ट पर्याय वाटतोय.
एकटेपणा नको होत असेल, आपले घर
एकटेपणा नको होत असेल, आपले घर आणि सवयीचे शहर हा सगळ कम्फर्ट झोन सोडायचा नसेल (जे अगदीच साहजिक आहे!) तर त्यांनी कंपॅनियनशिप वा पुन्हा लग्न याचा जरूर विचार करावा.
अर्थात यामधे भरपूर खाचाखोचा आणि फायदेतोटे आहेत पण सर्व गोष्टी जमून आल्या तर आयुष्य छान होऊ शकतं.
एखाद्या गरजू विद्यार्थ्याला
एखाद्या गरजू विद्यार्थ्याला सोबत म्हणून घरी ठेवावे. दिवसभरासाठी एखादी नर्स ठेवावी..... +१
ते आता हिंडतेफिरते झाले आहेत
ते आता हिंडतेफिरते झाले आहेत की बेडरिडनच आहेत?
थोडी तडजोड त्यांना करावी लागणारच आहे, ती मुलांबरोबर करायची की मोली कामाला ठेवलेल्या माणसांबरोबर एवढाच निर्णय घ्यायचा आहे. वृद्धाश्रमाचा पर्यायही आहेच. 'अथश्री'सारख्याही सोयी आहेत.
उन्हाळ्यात अमेरिकेतल्या मुलाकडे आणि तिथे थंडी पडली की भारतातल्या मुलाकडे असं आलटून पालटून राहू शकतात. अमेरिकेत वृद्धांना लायब्ररी, सुपरमार्केट्स इ. ठिकाणी नेणारी सरकारी वाहने इ. सोयी असतात. त्यांची माहिती मुलाला काढायला सांगावी. तिथे समवयस्क इतरही लोक भेटतील. स्वयंपाकाची, घरकामाची आवड असेल तर ती परदेशातही जोपासता येईलच.
खरंतर एकटे स्वतःचा स्वयंपाक करून राहत होते तर मुला/सुनेकडे वेळेत सकाळचा चहा मिळत नाही इ. तक्रारी का करत होते? तिथेही करू शकले असते की स्वतःचा चहा. सुनेलाही मदत झाली असती. असो.
त्यांची तयारी असेल तर त्यांना
त्यांची तयारी असेल तर त्यांना दुसरे लग्न करायला सांगा. त्यात काहीही चुकीचे नाहीये . त्यांना छान सोबतही मिळेल आणि काळजी घेणार माणूसही बर त्या बाईंनाही सोबत मिळेल
किव्वा हे जर शक्यच नसेल तर इतरांनी सुचवलेले उपायही चांगले आहेतच . बंगला आहे तर पेईन्ग गेस्ट ठेऊ शकतात. विद्यार्थी + ऑफिसे मध्ये जाणारे सुद्धा. त्यांचा खूप उपयोग होतो. मुंबईत पार्ल्यात असे भरपूर एकाकी वृद्ध आहेत जे सर्रास पेईन्ग गेस्ट ठेवत आहेत . बर्यापैकी आजारी असतील तर चांगल्या संस्थेकडून ब्रदर ठेवावा .आणि गरज संपली कि त्यांना रजा द्यावी. गरजे पुरते परत ब्रदर ठेवता येतीलच
हे गृहस्थ साधन असल्याने मीही
हे गृहस्थ साधन असल्याने मीही माझ्या त्या मित्राला त्या वृद्धासाठी " अथश्री " चाच पर्याय सुचवला आहे.
हा इसम एक सधन ६८ वर्षांचा
हा इसम एक सधन ६८ वर्षांचा वृद्ध असून डेक्कन जिमखान्यावर त्याचा स्वत:चा बंगला आहे.>>>> वय बरेच लहान आहे.पण आपला परीघ सोडायचा नसेल तर घरात १-२च पेईंगगेस्ट सोबतीसाठी ठेवावे.त्यांचा वावर रहातो.आणि आपल्याबरोबर कोणीतरी आहे ही सुरक्षिततेची भावना प्रबळ होते. किंवा दिवसभरासाठी एखादी नर्स ठेवावी.
तिथेही करू शकले असते की स्वतःचा चहा. ......हे मात्र खरे!अर्थात आतल्या गोष्टी त्यांनाच माहिती
मीही माझ्या त्या मित्राला
मीही माझ्या त्या मित्राला त्या वृद्धासाठी " अथश्री " चाच पर्याय सुचवला आहे. >>अनुमोदन .
हाच पर्याय त्यातल्या त्यात उत्तम आहे.
बाकी पेईंगगेस्ट , ब्रदर हे ही चाम्गले पर्याय आहेत.
लग्न करून जोडीदार मिळू शकेल पण प्रश्न पुर्णपणे सुटणार नाही. कारण जोडीदार देखिल बहुतेक वयोवृद्धच असणार. जोडीदाराचे स्वतःचेही मेडिकल प्रॉब्लेम असू शकतातच. त्यामुळे लग्न करा सुचवताना लोक हे गृहित धरतायेत की बायको आली की ती या गृहस्थांची सगळी काळजी घेईल. उलटपक्षी असेही होऊ शकते की उद्या ती बायको आजारी पडली तर यांनाच तिचे करावे लागेल. वृद्ध व्यक्तीने जोडीदाराचा / लग्नाचा विचार करताना उद्या वेळ आली तर जोडीदाराचीही काळजी घेण्याची तयारी, क्षमता असेल तरच करावा असे मला वाटते. अन्यथा फक्त माझी काळजी घेणारे कोणी हवे हा दृष्टीकोन असेल तर आया, ब्रदर च बरे .
सवयी बदलणे, ते देखील
सवयी बदलणे, ते देखील म्हातारपणात, तब्येत नाजूक असताना व एकटेपण असताना, गरजेचं असलं तरी खरंच खूप कठीण आहे. स्वतःच्या च घरी रहायचं असेल तर आजोबा असे काही पर्याय ट्राय करु शकतील -
१. जवळपासच्यांकडून किंवा नातेवाईकांकडून डबा मागवणे. अर्थातच डबेवाला लावणे.
२. गाडी असेल तर एखादा माणूस ड्रायव्हर कम सोबती म्हणून हायर करणे.
३. मित्रांच्या बायका किंवा नात्यातल्या स्त्री वर्गाकडून बेसिक हाऊसकीपींग, बेसिक स्वयंपाक शिकून घेणे. जसे आजकाल राइस कूकर , मावे इ. सोयींमुळे सोपे झाले आहे.
पुण्यात "Non Resident Indians' Parent Association", "नृप" अशी काही संस्था आहे. तिथे असे "सेलींग इन द सेम बोट" लोक भेटतील जे चांगले कंपॅनियन होऊ शकतील.
आजोबांचा प्रश्न लवकर मार्गी लागो.
त्यामुळे लग्न करा सुचवताना
त्यामुळे लग्न करा सुचवताना लोक हे गृहित धरतायेत की बायको आली की ती या गृहस्थांची सगळी काळजी घेईल. <<
सुचवताना असे काही गृहित धरलेले नव्हते. असो.
ते गृहस्थ मानसिक्दृष्ट्या
ते गृहस्थ मानसिक्दृष्ट्या खंबीर असतील आणि स्वतःला एकटे राहाण्याची इच्छा, आवड आणि आता सवय झालेली असेल तर ते एकटे राहू शकतील. दोन मुलगे आहेत ते रोज सकाळ - संध्याकाळ बारा तासांच्या अंतराने फोन करून त्यांची खुशाली विचारु शकतात. आजोबा मोबाईल जवळ बाळगत असतील तर काहीच प्रश्न नाही. उगीच त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून का काढा? ते आनंदी तरी असतील आणि स्वतःला हवे तसे आयुष्य जगल्याचे समाधान मिळेल. डबा लावणे, कामाला बाई लावणे इ. एकदम प्रॅक्टीकल आणि वर्केबल सोल्युशन्स आहेत. शिस्त आणि रूटीन मात्र मुळात हवं आणि मनाचा खमकेपणा.
सगळ्यांनी सल्ले द्यायचे ते
सगळ्यांनी सल्ले द्यायचे ते द्या मला फक्त एक नोंद करावीशी वाटते. पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रमोद ताम्बे यांनी "अक्षरधूळ"वर वाचलेला एक प्रश्न इकडे टाकण्यात आला आहे असं मला तरी ओरिजिनल पोस्ट वाचून वाटतंय. तर ज्याला हा प्रॉब्लेम आहे तो ब्लॉगर नाही आहे. स्वाती मला वाटतं तुमची काहीतरी गफलत झाली आहे वाचताना
स्वैपाक करणाऱ्या बाई/डबेवाला
स्वैपाक करणाऱ्या बाई/डबेवाला हि लोक तसेच आजारपणा पुरते ब्रदर हि तात्पुरती/ गरजेपुरती माणस झाली. काही काही लोक इतकी बोलकी असतात कि त्यांना बोलायला गप्पा मारायला कोणी तरी हवे असे वाटू शकते. म्हणून जोडीदाराचा ( लग्नाचा ) पर्याय. अर्थात एकदा जोडीदार केल्यास तिची काळजी घेणे/ तिनेही तुमची काळजी घेणे हे ओघाने आलेच .
बर आर्थिक दृष्ट्या ते सधन असावेत अशा वेळी आजारपणात भले ब्रदर जरी ठेवला तरी त्याच्या वर लक्ष ठेवायला पण जोडीदार असू शकेल . बंगला आहेच/ मोठा असेल तर जोडीदाराच्या बरोबरीने एखाद दुसरा पेइंग गेस्ट ठेवणेही फायद्याचे . तरुण लोकांची धावपळीला मदत होते
वेल, तुमचं बरोबर आहे, माझा
वेल, तुमचं बरोबर आहे, माझा घोळ झाला.
vidyarthi sahayak samiti
vidyarthi sahayak samiti madhil mulana asha lokanchi madat havi asate....
samitichya office madhun yabaddal adhik kalel.....tyanchyashi sampark
sadhun ....kahi marg kadhata yeil....pan purn enquiry karunach ha marg
swikarava....
भुवनेश्वरच्या मुलाकडे राहून
भुवनेश्वरच्या मुलाकडे राहून कामाला एखादी बाई ठेवता येणार नाही का? तो सर्वात चांगला पर्याय ठरू शकेल. फक्त त्यांनाच नाही तर मुला-सुनेलाही जेवण चहा हवा तेव्हा मिळेल शिवाय ह्यांना मुलाची सोबत हि होइल. जर अपेक्षा अशी असेल कि "सुनेनेच काम सांभाळावे" तर मात्र कठीण आहे…
इथे बर्याच जणांनी बरेच उपाय
इथे बर्याच जणांनी बरेच उपाय सुचवले आहेत..आता नवीन काही सुचवण्यासारखं नाहीये....पण मूळ प्रश्न असा आहे की ते गृहस्थ इतर कुणाचा सल्ला मानतात का आणि मानतील का? एकदा स्वतंत्र राहण्याची सवय लागल्यावर अगदी ’आपल्या’च माणसांसोबत राहण्याचाही प्रसंगी जाच वाटतो त्यामुळेही बरेचदा असे लोक एकटेच राहतात/पडतात.
पुन्हा लग्न करणे हा पर्याय तसा वरवर बरोबर वाटतो...पण लग्न करणे ही केवळ एकाच व्यक्तीच्या मनाने अंमलात येणारी कृती नव्हे....त्यासाठी समोरूनही तशीच इच्छा असणारी व्यक्ती भेटायला हवी...एकमेकांचे गुणदोष जाणून घेऊन ते मान्य केल्याशिवाय पुढे पाऊल टाकणे होणे नाही...जिथे म्हातारपणात जोडीदार सहजपणे सापडणेच कठीण तिथे जाणूनबुजून एखाद्या आजारी व्यक्तीला जोडीदार म्हणून स्वीकारणारी व्यक्ती मिळणे तर अजूनच कठीण आहे..
एकदा स्वतंत्र राहण्याची सवय
एकदा स्वतंत्र राहण्याची सवय लागल्यावर अगदी ’आपल्या’च माणसांसोबत राहण्याचाही प्रसंगी जाच वाटतो त्यामुळेही बरेचदा असे लोक एकटेच राहतात/पडतात.............अगदी बरोबर आहे.
एकदा स्वतंत्र राहण्याची सवय
एकदा स्वतंत्र राहण्याची सवय लागल्यावर अगदी ’आपल्या’च माणसांसोबत राहण्याचाही प्रसंगी जाच वाटतो त्यामुळेही बरेचदा असे लोक एकटेच राहतात/पडतात.............अगदी बरोबर आहे.....+१ माझ्या शेजारच्या ८० वर्षांच्या काकू एकट्या पडल्या नाहीयेत तर राहतात ५ मुलं असताना !
५ स्टार सुविधा आणी २४ तास
५ स्टार सुविधा आणी २४ तास मेडिकल सपोर्ट असणार्या ओल्ड एज होम हाच सर्वात चांगला पर्याय वाटतोय.
पुण्यात किंवा आसपास च्या परिसरात अश्या संस्थांबद्दल चांगलं ऐकलंय .
perfecthomepune.in , https://www.ashianahousing.com/active-retirement-senior-living-
India/Lavasa-Pune या संकेत स्थळावर ते चेक करू शकतील डीटेल्स
हा प्रॉब्लेम आत्ता दूरचा वाटत असला तरी इवेंचुली सर्वांनाच या परिस्थितीला सामोरे जावे लागणारे..
आम्ही सर्व दोस्त कंपनी मिळून एकाच अश्या ठिकाणी इन्वेस्ट करायचा विचार करत आहोत..
म्हंजे उतारवयात म्हटलं तर निवांत , कंटाळा आला तर दोस्तांबरोबर वेळ घालवता येईल..
गुड ओल्ड डेज विल बी देअर फॉर एवर
आता त्यान्नी काय करावे याकरता
आता त्यान्नी काय करावे याकरता बरेच छान पर्याय वर सांगितले गेले आहेतच!
पण वृद्धत्वाच्या सीमारेषेवर असलेल्या माझ्यासारख्यान्नी यातुन बोध काय घ्यावा?
मी काय सधन वगैरे नाही!
हे असे वाचले की वाटते त्या "इच्छामरणाच्या कायद्याला" सपोर्ट करायची पाळी येणार की क्काय माझ्यावर?
>>>> त्यामुळे लग्न करा
>>>> त्यामुळे लग्न करा सुचवताना लोक हे गृहित धरतायेत की बायको आली की ती या गृहस्थांची सगळी काळजी घेईल. << सुचवताना असे काही गृहित धरलेले नव्हते. असो. <<<<<
तसच काही नाही नीरजे, मला वाटत की माण्साने सत्तरी गाठल्यानन्तर त्याच्या मनाची अन शरिराची काय हालत होते ते आपण इम्याजिन करु शकत नाही, त्याची कल्पनाच आपल्याला नाहीये! असो.
मी बोवा आत्तापासूनच सगळ्या बाबिन्चे एकेक कल्पनाचित्र मनासमोर रन्गवतोय अन काय घडल्यास काय करावे याच्या मानसिक रिहर्सल / चाचण्या करुन बघतोय! हो ना, उगाच आयत्या वेळेस, अग्गोबै, मला हे माहितच नव्हत अस व्हायला नको, व्यवस्थित पूर्वतयारी हवी, तहान लागली अन विहीर खणायला घेतलि असेही नकोय.
ते गृहस्थ मानसिक्दृष्ट्या
ते गृहस्थ मानसिक्दृष्ट्या खंबीर असतील
ते नसणे ही एक भली मोठी अडचण असते.
दुसरी अडचण म्हणजे परिस्थिती बदलते, स्वतःला सुखी कसे करावे हे समजत नाही. मी आपला अस्साच असा हट्ट तुम्ही धरून बसलात तरी बाकीचे जग तस्सेच रहात नाही, बदलत रहाते. त्याप्रमाणे जे होईल त्यातल्या त्यात स्वतःला अॅड्जस्ट कसे करून घ्यावे एव्हढे कळत नसल्यास सगळीकडे अडचणीच अडचणी!
दुर्दैवाने असे अनेक लोक असतात, सहृदय बुद्धीने त्यांना मदत करावी, सल्ला द्यावा. पण ते सुखी होतील की नाही हे त्यांचे त्यांनीच ठरवायचे आहे.
या वयात उठून अमेरिका किंवा
या वयात उठून अमेरिका किंवा भारतातच दुसर्या ठिकाणी जुळवून घेणं त्यांना बहुतेक अवघडच जाईल. त्यानेही वृद्ध लोक खचतात. त्यांचे सर्कल आसपास असले तर मनाने उत्साही राहतात. शिवाय घरी पेईंग गेस्ट ठेवला तर तो पुर्ण वेळ घराबाहेर राहणार नाही कशावरून? नोकरी करणारा असेल तर शिफ्ट आणि कामाच्या वेळा ऑड असतील. शिकणारा असेल तर अभ्यास, सबमिशन्स... शिवाय विश्वासू कितपत असतील हा मोठा प्रश्न. त्यामूळे घरी कुणी ठेवण्यापेक्षा यांनीच जर अथश्री चा पर्याय स्विकारला तर उत्तम. हवं तर १५ दिवस तिथे १५ दिवस घरी असं ही करता येईल (तशी सोय असेल तर) तिथे मिळालेल्या सर्कल मध्ये एखादी व्यक्ती सहजीवनास सुयोग्य वाटली (अर्थात तिथे महिला असतील तर) तर लग्नाचा पर्यायही स्विकारता येईल. पण काळजी घेण्यास म्हणून खास लग्न करणं थोडं घाईचं होईल असं वाटतंय.
. मी आपला अस्साच असा हट्ट
. मी आपला अस्साच असा हट्ट तुम्ही धरून बसलात तरी बाकीचे जग तस्सेच रहात नाही, बदलत रहाते. त्याप्रमाणे जे होईल त्यातल्या त्यात स्वतःला अॅड्जस्ट कसे करून घ्यावे एव्हढे कळत नसल्यास सगळीकडे अडचणीच अडचणी! .................तसेच नेहमी असते असे नाही.
एकदा, स्वतःच्या मर्जीने रहायला सुरुवात केली तर तांबेसरांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या माणसांचा काच होऊ लागतो. माझी ७८ वर्षांच्या आईने ,मला २-३ वर्षांपूर्वी सांगितले होते की मला इथे(तिच्या घरी) राहू दे.मला आता अडवू नकोस. तिची शेवटची वर्षे ,तिच्या मर्जीने पार पडावी म्हणून मीही होकार दिला. मात्र पेईंग गेस्ट ठेवण्याच्या अटींवरच.कारण दिवस कसाही जातो पण रात्र वाईट असते.त्यातून बैठे घर,असल्यावर रात्री अपरात्री काही घरफोडी झाली किंवा इतर काही वाईट घडले तर आजूबाजूच्यांकडून दुसर्या दिवशी कळण्यापेक्षा पेईंग गेस्टनी मला फोन करणे केव्हाही चांगलेच.
आई आता ८१ वर्षांची आहे.नुकतेच मी तिला मजेत म्हटले होते की तुझे आता माझ्याकडे / सुनेकडे पटणे कठीण आहे ग!किंवा आम्ही इथे आलो तरी १-२ दिवस खपवून घेशील ,नंतर कंटाळशील.तर आईनेही 'हो ग ' म्हणून कबुली दिली. इकडे आमच्याकडे, २-४ महिन्यांतून आली तरी ३-४ दिवसांनी परत घरी जायचे वेध असतात.
एखाद्या गरजू विद्यार्थ्याला
एखाद्या गरजू विद्यार्थ्याला सोबत म्हणून घरी ठेवावे. >>> +११११११
विद्यार्थ्यांचे id डिटेल्स घेऊन ते मुलं कडे देऊन ठेवता येतील जर ह्यात रिस्क वाटत असेल तर
पण हा पर्याय खूप चांगला वाटतो
आणि ह्या पर्याय साठी अशी वेळ येई पर्यंत थांबण्या पेक्षा आधीच ठेवणे चांगले