जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून लौकिक असलेल्या भारत वर्षात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. एक मराठी आणि भारतीय या नात्याने 'महाराष्ट्र ' या आपल्या राज्याच्या निवडणूक निकालांबाबत मी माझा व्यक्तिगत अंदाज आपणा समोर मांडत आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण जागा ४८ असून पक्ष निहाय स्थिती पुढील प्रमाणे असेल .
कॉंग्रेस - १४ , भारतीय जनता पक्ष - १५ , शिवसेना -१० , राष्ट्रवादी -८, इतर (स्वाभिमानी संघटना ) -१
अर्थात या अंदाजापाठीमागे कोणतेही राजकीय मत नाही. यापूर्वी सुमारे तीस वर्षांपूर्वी १९८०च्या मध्यावधी निवडणुकांचे वेळी असे अंदाज मांडले होते,त्यावेळी ते ८० टक्के बरोबर आले होते यावेळी काय घडते ते पाहू .
सर्वच अंदाज २००४ व २००९ सालातील निकाल व २०१४ मध्ये बदललेली राजकीय परिस्थिती यांचा तुलनात्मक विचार करून मांडलेले आहेत. प्रत्यक्ष निकाला नंतरच वस्तुस्थिती समजेल. आपले वेगळे मत त्या त्या मतदार संघाबाबत असेल तर जरूर नोंदवा
अकोला - भारतीय जनता पक्ष - श्री.संजय धोत्रे
अमरावती -शिवसेना - श्री. आनंदराव आडसूळ
अहमदनगर - भारतीय जनता पक्ष - श्री.दिलीप गांधी
शिर्डी - शिवसेना - श्री लोखंडे सदाशिव
औरंगाबाद - शिवसेना - श्री. चंद्रकांत खैरे
बारामती - राष्ट्रवादी - सौ सुप्रिया सुळे
कोल्हापूर - राष्ट्रवादी - महाडिक धनंजय
हातकणंगले - स्वाभिमानी - श्री देवप्पा (राजू) शेट्टी
गडचिरोली - भारतीय जनता पक्ष - श्री अशोक नेते
चंद्रपूर - भारतीय जनता पक्ष - श्री अहिर हंसराज
जळगाव - भारतीय जनता पक्ष - श्री ए टी नाना पाटील
जालना - भारतीय जनता पक्ष - श्री दानवे रावसाहेब
उस्मानाबाद - शिवसेना - श्री रवि गायकवाड
धुळे - कॉंग्रेस - श्री.अमरीश पटेल
नंदुरबार - कॉंग्रेस - श्री माणिक गावित
नागपूर - भारतीय जनता पक्ष - श्री नितीन गडकरी
रामटेक - कॉंग्रेस - श्री मुकुल वासनिक
रावेर - भारतीय जनता पक्ष - रक्षा खडसे
नाशिक - राष्ट्रवादी - श्री भुजबळ छगन
दिंडोरी - भारतीय जनता पक्ष - श्री हरिश्चंद्र चव्हाण
नांदेड - कॉंग्रेस - श्री अशोक चव्हाण
ठाणे - राष्ट्रवादी - श्री नाईक संजीव
पालघर - भारतीय जनता पक्ष श्री चिंतामण वांगा
भिवंडी - भारतीय जनता पक्ष - श्री कपिल पाटील
कल्याण - शिवसेना - श्रीकांत शिंदे
परभणी - शिवसेना - श्री संजय जाधव
पुणे - कॉंग्रेस - श्री विश्वजित कदम
मावळ - शिवसेना - श्री श्रीरंग बारणे
शिरूर - शिवसेना -श्री शिवाजी आढळराव
बीड - भारतीय जनता पक्ष - श्री. गोपीनाथ मुंडे
बुलढाणा - शिवसेना - श्री प्रताप जाधव
भंडारा - राष्ट्रवादी - श्री .प्रफुल्ल पटेल
मुंबई उत्तर - भारतीय जनता पक्ष - श्री गोपाल शेट्टी
मुंबई उत्तर मध्य - कॉंग्रेस - प्रिया दत्त
मुंबई वायव्य - कॉंग्रेस - श्री गुरुदास कामत
मुंबई ईशान्य - भारतीय जनता पक्ष - श्री किरीट सोमय्या
मुंबई दक्षिण - कॉंग्रेस - श्री मिलिंद देवरा
मुंबई दक्षिण मध्य - कॉंग्रेस - श्री गायकवाड एकनाथ
रत्नागिरी - कॉंग्रेस - श्री निलेश राणे
रायगड - राष्ट्रवादी - श्री सुनील तटकरे
लातूर - भारतीय जनता पक्ष - श्री सुनील गायकवाड
वर्धा - कॉंग्रेस - श्री मेघे दत्ता
वाशीम - कॉंग्रेस - श्री . मोघे शिवाजीराव
सातारा - राष्ट्रवादी - श्री उदयनराजे भोसले
सांगली - कॉंग्रेस - श्री प्रतिक पाटील
सोलापूर - कॉंग्रेस - श्री सुशीलकुमार शिंदे
माढा - राष्ट्रवादी - श्री विजय सिह मोहिते पाटील
हिंगोली - शिवसेना - श्री सुभाष वानखेडे
अल्पना - आपल्या मातोश्रींनी
अल्पना - आपल्या मातोश्रींनी चुकीच्या गोष्टी घडू न देण्यासाठी केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. नाहीतर बरेचदा आपण मला काय त्याचे अशी भूमिका घेत तटस्थ राहतो.
निवांत पाटील- पुढारी लेख वाचला विश्लेषण योग्य आहे पण नक्की कोण बाजी मारेल यावर ठाम भाष्य केलेले नाही .
अरे इथे कोणीच कसे आले नाही
अरे इथे कोणीच कसे आले नाही अजून.. अंदाज वर्तवले होते त्यातले किती बरोबर आलेत...
माझे अंदाज चुकल्याबद्दल मला
माझे अंदाज चुकल्याबद्दल मला इतका आनंद कधी झाला नव्हता
फक्त एक अंदाज चुकला नाही याचे दु:ख आहे.. बारामती..
रत्नागिरी - कॉंग्रेस - श्री
रत्नागिरी - कॉंग्रेस - श्री निलेश राणे >>
हरले हरले निलेश राणे हरले. हुर्रे ( आनंदाने नाचणारी बाहुली )
मित्रहो , लोकसभा निवडणुका
मित्रहो ,
लोकसभा निवडणुका २०१४ आता पार पडल्या .आता अंदाज आणि निकाल यावर अखेरचे भाष्य करीत मायबोलीवरील ह्या धाग्यास पूर्णविराम देत आहे.
व्यक्त केलेल्या अंदाज नुसार - महाराष्ट्रातील पक्षनिहाय स्थिती अशी झाली
- कॉंग्रेस -१४ जागा अपेक्षित मिळाल्या२ ( -१२)
- भारतीय जनता पक्ष १५ जागा अपेक्षित मिळाल्या -२३ (+८)
- शिवसेना -१० जागा अपेक्षित मिळाल्या १८ (+८ )
- राष्ट्रवादी कॉंग्रेस -८ जागा अपेक्षित मिळाल्या ४ (-४)
- स्वाभिमानी -१ जागा अपेक्षित मिळाली १
अपेक्षित अंदाजातील ४८ पैकी १८ अंदाज चुकले तर ३० अंदाज बरोबर आले .
अंदाजाची अचूकता ६२.५ टक्के इतकी राहिली.प्रतिसाद कर्त्यांपैकी साकल्य यांनी दिलेली टिप्पणी सर्वाधिक व्यापक आणि अचूक राहिली
चुकलेल्या अंदाजात - सोलापूर -सुशील कुमार शिंदे , नंदुरबार -माणिकराव गावित नाशिक - छगन भुजबळ ,उत्तर मध्य मुंबई -प्रिया दत्त ,रायगड -सुनील तटकरे ,सांगली -प्रतिक पाटील हे मला जास्त धक्कादायक वाटले.
पक्षनिहाय कॉंग्रेस (-१३) नकारात्मक चुकलेला आणि शिवसेना (+९) सकारात्मक चुकलेला अंदाज ठरला.
स्वाभिमानी एकाच जागेबाबत भाष्य असल्याने १०० टक्के बरोबर तर राष्ट्रवादी पक्ष ५० टक्के अंदाज बरोबर ठरला.
सर्वच विजयी उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन आणि मतदारांचे मनपूर्वक आभार .
चर्चेत सहभागी मायबोलीकरांना धन्यवाद देत आता निरोप घेतो.
किंकर, मलाही आवडले वाचायला
किंकर, मलाही आवडले वाचायला हे. पुढे विधानसभा ई च्या वेळेस ही आवडेल हे वाचायला.
Pages