निकालांचे अंदाज - लोकसभा निवडणूक २०१४

Submitted by किंकर on 15 April, 2014 - 23:17

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून लौकिक असलेल्या भारत वर्षात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. एक मराठी आणि भारतीय या नात्याने 'महाराष्ट्र ' या आपल्या राज्याच्या निवडणूक निकालांबाबत मी माझा व्यक्तिगत अंदाज आपणा समोर मांडत आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण जागा ४८ असून पक्ष निहाय स्थिती पुढील प्रमाणे असेल .
कॉंग्रेस - १४ , भारतीय जनता पक्ष - १५ , शिवसेना -१० , राष्ट्रवादी -८, इतर (स्वाभिमानी संघटना ) -१
अर्थात या अंदाजापाठीमागे कोणतेही राजकीय मत नाही. यापूर्वी सुमारे तीस वर्षांपूर्वी १९८०च्या मध्यावधी निवडणुकांचे वेळी असे अंदाज मांडले होते,त्यावेळी ते ८० टक्के बरोबर आले होते यावेळी काय घडते ते पाहू .

सर्वच अंदाज २००४ व २००९ सालातील निकाल व २०१४ मध्ये बदललेली राजकीय परिस्थिती यांचा तुलनात्मक विचार करून मांडलेले आहेत. प्रत्यक्ष निकाला नंतरच वस्तुस्थिती समजेल. आपले वेगळे मत त्या त्या मतदार संघाबाबत असेल तर जरूर नोंदवा

अकोला - भारतीय जनता पक्ष - श्री.संजय धोत्रे
अमरावती -शिवसेना - श्री. आनंदराव आडसूळ
अहमदनगर - भारतीय जनता पक्ष - श्री.दिलीप गांधी
शिर्डी - शिवसेना - श्री लोखंडे सदाशिव
औरंगाबाद - शिवसेना - श्री. चंद्रकांत खैरे
बारामती - राष्ट्रवादी - सौ सुप्रिया सुळे
कोल्हापूर - राष्ट्रवादी - महाडिक धनंजय
हातकणंगले - स्वाभिमानी - श्री देवप्पा (राजू) शेट्टी
गडचिरोली - भारतीय जनता पक्ष - श्री अशोक नेते
चंद्रपूर - भारतीय जनता पक्ष - श्री अहिर हंसराज
जळगाव - भारतीय जनता पक्ष - श्री ए टी नाना पाटील
जालना - भारतीय जनता पक्ष - श्री दानवे रावसाहेब
उस्मानाबाद - शिवसेना - श्री रवि गायकवाड
धुळे - कॉंग्रेस - श्री.अमरीश पटेल
नंदुरबार - कॉंग्रेस - श्री माणिक गावित
नागपूर - भारतीय जनता पक्ष - श्री नितीन गडकरी
रामटेक - कॉंग्रेस - श्री मुकुल वासनिक
रावेर - भारतीय जनता पक्ष - रक्षा खडसे
नाशिक - राष्ट्रवादी - श्री भुजबळ छगन
दिंडोरी - भारतीय जनता पक्ष - श्री हरिश्चंद्र चव्हाण
नांदेड - कॉंग्रेस - श्री अशोक चव्हाण
ठाणे - राष्ट्रवादी - श्री नाईक संजीव
पालघर - भारतीय जनता पक्ष श्री चिंतामण वांगा
भिवंडी - भारतीय जनता पक्ष - श्री कपिल पाटील
कल्याण - शिवसेना - श्रीकांत शिंदे
परभणी - शिवसेना - श्री संजय जाधव
पुणे - कॉंग्रेस - श्री विश्वजित कदम
मावळ - शिवसेना - श्री श्रीरंग बारणे
शिरूर - शिवसेना -श्री शिवाजी आढळराव
बीड - भारतीय जनता पक्ष - श्री. गोपीनाथ मुंडे
बुलढाणा - शिवसेना - श्री प्रताप जाधव
भंडारा - राष्ट्रवादी - श्री .प्रफुल्ल पटेल
मुंबई उत्तर - भारतीय जनता पक्ष - श्री गोपाल शेट्टी
मुंबई उत्तर मध्य - कॉंग्रेस - प्रिया दत्त
मुंबई वायव्य - कॉंग्रेस - श्री गुरुदास कामत
मुंबई ईशान्य - भारतीय जनता पक्ष - श्री किरीट सोमय्या
मुंबई दक्षिण - कॉंग्रेस - श्री मिलिंद देवरा
मुंबई दक्षिण मध्य - कॉंग्रेस - श्री गायकवाड एकनाथ
रत्नागिरी - कॉंग्रेस - श्री निलेश राणे
रायगड - राष्ट्रवादी - श्री सुनील तटकरे
लातूर - भारतीय जनता पक्ष - श्री सुनील गायकवाड
वर्धा - कॉंग्रेस - श्री मेघे दत्ता
वाशीम - कॉंग्रेस - श्री . मोघे शिवाजीराव
सातारा - राष्ट्रवादी - श्री उदयनराजे भोसले
सांगली - कॉंग्रेस - श्री प्रतिक पाटील
सोलापूर - कॉंग्रेस - श्री सुशीलकुमार शिंदे
माढा - राष्ट्रवादी - श्री विजय सिह मोहिते पाटील
हिंगोली - शिवसेना - श्री सुभाष वानखेडे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रत्नागिरी - कॉंग्रेस - श्री निलेश राणे >> हा अंदाज नक्कीच चुकेल असे वाटते. आणि चुकावाच अशी ईच्छा आहे.

mansi Salunkhe - अशोक यांनी नमूद केल्या प्रमाणे -अंदाजामध्ये मनसे उमेदवार नाहीत याचे काहीसे आश्चर्य वाटते हो अगदी खरे आहे , पण मनसेने निवडलेले मतदार संघ पाहता त्यांची यादी व उमेदवारांची निवड म्हणजे राज ठाकरे यांनी -'सेनेला नाही मनसेला नाही घाल कॉंग्रेसला' अशी भूमिका घेत निवडणूक लढवली आहे. आणि परिणामता यादीत मनसेला स्थान राहिले नाही
डेलिया ,साती आपण नमूद केले आहे "रत्नागिरी - कॉंग्रेस - श्री निलेश राणे >> हा अंदाज नक्कीच चुकेल असे वाटते. आणि चुकावाच अशी ईच्छा आहे" प्रत्यक्षात २००९ मध्ये सेना प्रमुख आपल्यात असताना आणि सुरेश प्रभू उमेदवार असताना निलेश राणे ६ टक्के अधिक मते मिळवीत विजयी झाले होते . या पार्श्व भूमीवर आता विनायक राऊत हे चित्र बदलू शकतील हि शक्यता कमी आहे .म्हणून संभाव्य विजेत्या यादीत राणे यांचे नाव आहे .

किंकर, ५ वर्षांत नीलेश राणेंनी जे 'कार्य' केले आहे त्याचे फळ त्यांना यंदा नक्कीच मिळेल. Happy मागच्या वेळेस सुरेश प्रभूंना बळजबरीने घोड्यावर बसवले होते. आणि तेव्हाही "१ लाखाचे मताधिक्य घेऊन येणार" अशा वल्गना करणार्‍या राणेंना ४८,००० मताधिक्य होते, तेदेखिल रत्नागिरीने हात दिला म्हणुन.

सांगलीतली काँग्रेसची म्हणे एक लाख नावं पुण्यात आलेली आहेत.. म्हणजे सांगलीतून कमी झाली.. की तिकडे पण आणि इकडे पण आहेत.. जर फक्त पुण्यातच असतील तर सांगली कॉग्रेसला जड जाईल..

पुण्यात काल जो काही राडा झाला आहे तो बघता कदम यायची शक्यताच अधिक आहे.. पण एकूणात टक्केवारीत वाढ झाल्यामुळे बीजेपीला फायदा होऊ शकेल..

कानावर आलेल्या बातमी नुसार.. बरीचशी सुशिक्षित नावंच यादीतून गायब आहेत.. ज्यातले बरेच जण यंदा कमळाला वोट देण्याची शक्यता होती.. तेव्हा पुण्यासाठी सध्या तरी अळीमिळी गूपचिळी..

सॉरी अवान्तर प्रश्न ( खरे तर पेपर वाचायचीच ईच्छा नाहीये म्हणून ) इथे विचारतेय. सुळे बाई कशाला रडत होत्या?:अओ: त्यान्च्या पप्पा आणी दादानी लाखोना रडवले आहे, आपण पण मागे पडायला नको म्हणून का?

भ्रमर - मताधिक्य किती यापेक्षा शेवटी कोण जिंकले एवढेच सत्य मागे उरते , पाहू काय होतेय ते .
हिम्सकूल - येन केन प्रकारेन मी जिंकणार या मार्गाने जाणारे उमेदवार असल्यावर आपण काय अपेक्षा ठेवणार ?
रश्मी- रडकथा खरच वाचण्यात आलेली नाही
सर्वांना -धन्यवाद !

मनसेला एखादी जाग मिळणे सुध्दा अवघड आहे. नाशिकला महानगरपलिकेत सत्ता असुनही मनसेचा खासदार येणे अवघड दिसते. हीच परिस्थिती मुंबईची आहे.

नितीनचंद्र- दक्षिण मुंबईत मनसे कडून श्री बाळा नांदगावकर हे एकमेव निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार असूनही मत विभागणीचा फायदा घेत श्री मिलिंद देवरा निवडून येणार . प्रत्यक्ष निकाल जेंव्हा पाहाल तेंव्हा शिवसेना आणि मनसे यांच्या मतांची बेरीज देवरांच्या एकूण मतांच्या पेक्षा कितीतरी अधिक असेल पण अंतिम शक्यता विजय कॉग्रेसचा

NDTV महायुतीला ३७ जागा मिळतील म्हणून दाखवत आहे. आणि मनसेला १ जागा.

लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन केलेले अंदाज जास्त बरोबर वाटतात.

महायुतीच्या नेत्यांच्या तोंडात भारी दम आहे तर काँग्रेस आघाडीला निवडणुका कशा जिंकायच्या हे पाठ आहे.

१०० % खात्री देता येतील अशा ४-५ च जागा आहेत असे दिसते.

बारामती - राष्ट्रवादी - सौ सुप्रिया सुळे
नाशिक - राष्ट्रवादी - श्री भुजबळ छगन
बीड - भारतीय जनता पक्ष - श्री. गोपीनाथ मुंडे
सातारा - राष्ट्रवादी - श्री उदयनराजे भोसले
सोलापूर - कॉंग्रेस - श्री सुशीलकुमार शिंदे

नागपूर - भारतीय जनता पक्ष - श्री नितीन गडकरी (हे निवडून यावेत अशी इच्छा. पण ब्राम्हण उमेदवार आणि मोठ्या संख्येने असलेले दलित मतदार, ह्या दोन्ही कमकुवत बाजू.)

अमरावती -शिवसेना - श्री. आनंदराव आडसूळ (नवनीत कौर यांचे सेलीब्रिटी स्टेटस अडचणीत आणू शकते.)
चंद्रपूर - भारतीय जनता पक्ष - श्री अहिर हंसराज (आपच्या वामनराव चटपांमुळे काँग्रेस आघाडी विजयी होऊ शकते)
अकोला - भारतीय जनता पक्ष - श्री.संजय धोत्रे
बुलढाणा - शिवसेना - श्री प्रताप जाधव (ह्या दोन्ही जागा महायुती जिंकण्याची शक्यता)
वाशीम - कॉंग्रेस - श्री . मोघे शिवाजीराव (भावना गवळींचा दांडगा जनसंपर्क आणि अमित देशमुखांचा माणिकराव ठाकरेंच्या उमेदवाराला विरोध. शिवसेनेच्या विजयाची जास्त शक्यता)
हिंगोली - शिवसेना - श्री सुभाष वानखेडे (सुर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोध. शिवसेनेच्या विजयाची जास्त शक्यता)

औरंगाबाद - शिवसेना - श्री. चंद्रकांत खैरे (शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेवर विजय अवलंबून.)
जालना - भारतीय जनता पक्ष - श्री दानवे रावसाहेब (विजयाची शक्यता)
उस्मानाबाद - शिवसेना - श्री रवि गायकवाड (पद्मसिंह पाटलांना पाडणे फार अवघड. अजित पवारांचे चिरंजीव प्रचारात उतरले आहेत म्हणे.)
लातूर - भारतीय जनता पक्ष - श्री सुनील गायकवाड (अमित देशमुखांच्या पाठींबा असल्याने दत्ता बनसोडे विजयी होण्याची जास्त शक्यता)
पुणे - कॉंग्रेस - श्री विश्वजित कदम (गिरीश बापट यांच्यामुळे ब्राम्हणांची मते कुणाला जातात हे महत्वाचे. त्यांची नाराजी भाजपला त्रासदायक. तसेच सुरेश कलमाडीमुळे विश्वजित कदम यांच्यासाठी अवघड.)
मावळ - शिवसेना - श्री श्रीरंग बारणे (लक्ष्मण जगताप निवडून येण्याची जास्त शक्यता.)
शिरूर - शिवसेना -श्री शिवाजी आढळराव (अशोक खांडेभराड यांच्यामुळे देवदत्त निकम जिंकण्याची शक्यता)
माढा - राष्ट्रवादी - श्री विजय सिह मोहिते पाटील (अजित पवारांची सदाभाऊ खोत यांना छुपी मदत मोहिते पाटीलांना अडचणीत आणू शकते.)

मुंबई उत्तर मध्य - कॉंग्रेस - प्रिया दत्त (२४% मुस्लिम मते. आणि सपाच्या फरहान आझमीची उमेदवारी. मोदी लाट आणि मनसेची मदत - पुनम महाजन निवडून येण्याची जास्त शक्यता)

पिल्या - मिडिया ,त्यावरील मते हा आणखी एक स्वतंत्र चर्चेचा विषय ठरतो. दुरचित्र वाहिनी व वृत्तपत्रे यांची मालकी कोणत्या उद्योग समूहाकडे आहे, त्यानुसार बातमीतील ठळकपणा आपल्या निदर्शनास येतो.त्यामुळे अनेकदा मत चाचणी आणि निकाल यात अंतर आढळते
आपण नक्की निवडून येणार म्हणून नमूद केलेल्या नावात दुमत नाही ,पण त्यात खालील जागा देखील नक्की मध्ये आहेत असे माझे मत आहे -
शिर्डी - शिवसेना - श्री लोखंडे सदाशिव
कोल्हापूर - राष्ट्रवादी - महाडिक धनंजय
हातकणंगले - स्वाभिमानी - श्री देवप्पा (राजू) शेट्टी
गडचिरोली - भारतीय जनता पक्ष - श्री अशोक नेते
जळगाव - भारतीय जनता पक्ष - श्री ए टी नाना पाटील
धुळे - कॉंग्रेस - श्री.अमरीश पटेल
नंदुरबार - कॉंग्रेस - श्री माणिक गावित
रामटेक - कॉंग्रेस - श्री मुकुल वासनिक
रावेर - भारतीय जनता पक्ष - रक्षा खडसे
दिंडोरी - भारतीय जनता पक्ष - श्री हरिश्चंद्र चव्हाण
नांदेड - कॉंग्रेस - श्री अशोक चव्हाण
ठाणे - राष्ट्रवादी - श्री नाईक संजीव
पालघर - भारतीय जनता पक्ष श्री चिंतामण वांगा
भिवंडी - भारतीय जनता पक्ष - श्री कपिल पाटील
कल्याण - शिवसेना - श्रीकांत शिंदे
परभणी - शिवसेना - श्री संजय जाधव
भंडारा - राष्ट्रवादी - श्री .प्रफुल्ल पटेल
मुंबई उत्तर - भारतीय जनता पक्ष - श्री गोपाल शेट्टी
मुंबई वायव्य - कॉंग्रेस - श्री गुरुदास कामत
मुंबई ईशान्य - भारतीय जनता पक्ष - श्री किरीट सोमय्या
मुंबई दक्षिण - कॉंग्रेस - श्री मिलिंद देवरा
मुंबई दक्षिण मध्य - कॉंग्रेस - श्री गायकवाड एकनाथ
रत्नागिरी - कॉंग्रेस - श्री निलेश राणे
रायगड - राष्ट्रवादी - श्री सुनील तटकरे
वर्धा - कॉंग्रेस - श्री मेघे दत्ता
सातारा - राष्ट्रवादी - श्री उदयनराजे भोसले
सांगली - कॉंग्रेस - श्री प्रतिक पाटील
सोलापूर - कॉंग्रेस - श्री सुशीलकुमार शिंदे
अर्थात खरा निर्णय सुज्ञ मतदारांनी काय दिला हे निकालांचे दिवशी समोर येईलच तोपर्यंत सर्व चर्चा हि अपेक्षित अंदाजा बाबत राहणार .

सध्या whatsapp वर १ मेसेज फिरत आहे.

लक्ष्मण जगताप - ३७३०८४
श्रीरंग बारणे - ३४०५९४
राहुल नार्वेकर - ३०५३६०

लक्ष्मणभाउ जगताप - ३२४९० मतांनी विजयी.

खखोदेजा.

@पिल्या- खखोदेजा काय अहो खोटेच आहे हे.असे मेसेजेस सध्या कोल्हापूर, सोलापूर, मावळ आदी ठिकाणी त्या त्या उमेदवारांचे समर्थक पसरवत आहेत..कोल्हापुरात प्रा मांडलिक ४० हजार मतांनी विजयी तर दुसरीकडे महाडिक ९० हजार मतांनी विजयी असे मेसेजेस दोन्ही बाजूने येत आहेत.मावळमध्ये बारणे विजयी होतील असा अंदाज आहे.सट्टेबाजारात त्यांचेच नाव आघाडीवर असल्याचे म्हणतात.बाकी खरे काय ते १६ मेला समजेलच की.

मुंबई ईशान्य - भारतीय जनता पक्ष - श्री किरीट सोमय्या.
सोमय्यांचे पारडे अजूनही जड आहे मात्र आधी सोमय्या विरुद्ध संजय दिन पाटील अशी लढत अपेक्षित होती तिथे आता किरीट सोमय्या विरुद्ध मेधा पाटकर अशी मुख्य लढत होईल असे सध्या चित्र आहे.संजय दिन पाटील मागे पडलेत असे परवा एका ठिकाणी वाचले आहे. हे जर समजा खरे असेल तर आपने आणि मेधाताईनी आणखी जोर लावला तर आप महाराष्ट्रात खाते उघडेल की काय असे चित्र आहे. महाराष्ट्रात आपकडून मेधा पाटकर (मुंबई) आणि चंद्रपूर मध्ये वामनराव चटप या दोघांकडून अपेक्षा आहेत.वामनराव चटप यांनी चंद्रपूरमध्ये २००९ ला स्वबळावर लढून मोठी मते (१ लाख सत्तर हजार) घेतली होती.

कोल्हापूर - राष्ट्रवादी - महाडिक धनंजय>>>> बाकि सगळीकडचे माहित नाही. पण कोल्हापुर, सांगली आणि हातकणंगले याचे अ‍ॅनालिसिस कसे केले ते जरा प्लिज लिहाच.... किंकर आणि बाकि कुणी जाणकार असतील त्यांनी.

जाता जाता, आमच्या विधानसभा संघात ८०-८२ % मतदान झाले आहे आणि कोल्हापुर लोकसभा ७४ %.

सातारा (शुअर सिट) ५७ % झाले आहे.

पिल्या - सोशल मिडिया याचा जसा चांगला प्रभावी उपयोग असतो तसा अपप्रचार स्वरुपात देखील त्याचे काम चालते. अपेक्षित मताधिक्य /निकाल हे प्रत्यक्ष मतमोजणी पूर्वी अंदाज म्हणून सांगणे वेगळे आणि असे खोटे चित्र उभा करणे वेगळे .
अल्पना -निवडणूक आयोगाकडे तक्रार करून मार्ग निघेल कदाचित पण त्या बाबत करव्याचा पाठपुरावा नक्कीच किचकट असेल .
साकल्य - आप बाबत महाराष्ट्र व देशपातळीवर त्यांना अजून खूप काम करून पाया भक्कम करावा लागणार आहे,त्यानंतर खाते उघडणे हा विषय येतो.
निवांत पाटील - आपण चर्चा करू इच्छित असलेल्या मतदार संघांबाबत पुढील शक्यता आहेत
कोल्हापूर -याठिकाणी कधी पक्ष तर कधी व्यक्ती प्रभावी असे चढ उतार आहेत पण तरीही एकूणच राष्ट्रवादी एक पक्ष म्हणून आपले प्राबल्य राखून आहे.तर व्यक्ती म्हणून श्री धनंजय महाडिक हे संजय मंडलिक शिवसेना यांच्या पेक्षा अधिक प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे पक्ष आणि व्यक्ती यांचा एकत्रित प्रभाव लक्षात घेता सर्वाधिक विजयाची खात्री महाडिक यांची आहे .
सांगली - भारतीय स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आजपर्यंत कधीच हा मतदार संघ घराणे शाहीच्या प्रभावातून बाहेर पडलेला नाही. प्रथम श्री वसंत दादा ,नंतर प्रकाश बापू , आणि आता पुढील पिढी प्रतिक पाटील याप्रमाणे आजोबा वडील आणि आता मुलगा अशी पक्की पकड असलेल्या या घराण्यास आज तरी पर्याय नाही.
हातकणंगले - याठिकाणी पक्ष रुजलाय राष्ट्रवादी आणि यावेळी जागा सोडलीय कॉंग्रेसला आणि विरुद्ध लढत आहे स्वाभिमानी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्याशी. राजू शेट्टी यांनी त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या एकरी उसदर या मुद्यावर खूप प्रभावी काम केले आहे त्यामुळे निसटते का असेना पण विजय त्यांच्या पारड्यात असणार .

मतदानानंतर एकेक सुरस कथा ऐकायला मिळताहेत.

सिंधुदुर्गात हाथ दाखऊन अवलक्षण करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराने प्रती मतदार १०० रुपये वाटले.
काय हे, एका मताची किंमत फक्त १००??? मला कीव येतेय माझ्या गाववाल्यांची.

अरे इकडे कल्याणमध्ये या, याच्या पेक्षा कितीतरी पटीत नवनिर्माण चाललय.

@किंकर- आपचा पाया भक्कम नाही हे एकदम मान्य मात्र काही मतदारसंघात त्यांना आशा नक्कीच आहेत.महाराष्ट्रात त्यांना मेधा पाटकर आणि वामनराव चटप कडून पेक्षा आहेत त्यामध्ये या दोन्ही उमेदवारांचे स्वताचे कार्य/वलय बर्यापैकी आहे.मतदार कधी कधी सगळ्यांनाच धक्का देवून आश्चर्यकारक निकाल नोंदवतात. तरीही वरील दोघे लढत आहेत त्या मतदारसंघात भाजपचेच (ईशान्य मुंबई- सोमय्या, चंद्रपूर- हंसराज अहिर) पारडे जड आहे.
बाकी कोल्हापूरमध्ये काट्याची लढत आहे.२००९ ला मंडलिकानी एनसीपीला अपक्ष राहून धोबीपछाड दिला होता. महाडिकांची बाजू तुम्ही वर सांगितली मात्र तिथे शिवसेनेची हक्काची दोनेक लाख मते आहेत त्यात मंडलिकांची स्वताची ताकद, मोदी करिश्मा वगैरे मुद्दे लक्षात घेतले तर शिवसेना तिथे राष्ट्रवादीला धक्का देवू शकते.

सांगलीवरती वसंतदादा घराण्याचा एकछत्री वगैरे अंमल अजिबात नाही. भरपूर भाउबंदकी आहे >> लोकसभेसाठी गेल्या काही निवडणुकात कायमच दादा घराण्याचा उमेदवार निवडून आलाय (अण्णासाहेब गोटखिंडेंच्या नंतर). दादांच्या नंतर प्रकाशबापू आणि विष्णूअण्णा/मदन यांच्यात बरेच इश्शूज होते पण आता प्रतीक आणी मदन बर्‍यापैकी आपापला एरीया सांभाळून आहेत (मदन - महापालिका आणि आमदारकी, प्रतीक/विशाल - कारखाना आणि खासदारकी)

बाकी कोल्हापूरमध्ये काट्याची लढत आहे >> सतेज पाटलानी जर मनापासून काम केलं असेल तर मंडलिकांना जड जाइल.

जयंत पाटलांविषयी प्रश्न विचारला होता, पण मग लक्षात आलं की ते आमदार आहेत Happy

ते आणि राजू शेट्टी विरोधी गट आहेत का?

किंकर, सॉरी टु से दॅट पण कोल्हापुर सांगली आणि हातकणंगले, तुम्ही फारच सुपर्फिशिअल मत नोंदवले आहे. प्रचंड प्रमाणत मतदान झाल्यामुळे काही सांगता येणे केवळ अशक्य आहे. १२ लाख मतांमध्ये ५००० - १०००० ने निवडुन येइल अशा शक्यतेत एवढ्या कॉन्फिडेंटली कसे काय लिहले याचेच आश्चर्य वाटले म्हणून डीटेल लिहा म्हटले.

जाता जाता, राष्ट्रवादीचे हक्काचे मतदार जास्त स्ट्रेस केल्यामुळे आणी आता मतमोजणीवेळी केंद्रनिहाय मोजणी होणार नसल्यामुळे शिवसेनेला मतदान करुन मोकळे झाले आहेत आणि आदल्या दिवशी रात्रीपर्यंत धनुष्यबाण खांद्यावर घेउन नाचणारे सकाळे ७ वाजता एकगठ्हा घड्याळाला किल्ली देउन आले आहेत.

राजु शेट्टींच्या बाबतीतः काँग्रेसची मते एकगठ्ठा आहेत, राजु शेट्टींची विखुरलेली. काँग्रेसच्या संस्थात काम करणारी जनता त्यांनाच मत देणार पण त्यांची पुढची पिढी कमळ बघुन शेट्टींना मत देणार.

सांगलीची बाकि झाकली मुठ सव्वा लाखाची आहे . ती २५ लच् उघडेल Wink

आगाऊ - वसंतदादा ते प्रतिक पाटील हा एकाच घरातील खासदारकीचा प्रवास याला घराणेशाहीचा प्रभाव म्हटले होते. स्थानिक राजकारणातील भाऊबंदकी हा घटक आत्ता विचारात घेतलेला नाही.
मनीष यांनी हा मुद्दा चांगला मांडला आहेच.
साकल्य -शिवसेनेकडे विद्यमान खासदार हि जमेची बाजू नाही,राष्ट्रवादीकडे देखील विद्यमान खासदार हा मत वाढविणारा मुद्दा नसला तरी यापूर्वीच्या अपक्ष खासदारास त्यावेळी सर्वाधिक मदत राष्ट्रवादी प्रेमींची झाली होती म्हणून आत्ता राष्ट्रवादी प्रभावी ठरेल असे वाटतेय.
सूनटून्या - निवडणुका आणि सुरस कथा यावर किती लिहणार . एकच किस्सा सांगतो, पुण्याजवळ एका विधान सभा मतदार संघात एका उमेदवाराने प्रेशर कुकर वाटले पण प्रथम झाकण न देता बाकी सेट दिला आणि निवडून आल्यावर झाकण मिळेल असा निरोप दिला आणि नंतर प्रामाणिकपणे सर्वांना झाकणे दिली . प्रामाणिक पणे हे त्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचे सांगणे बर का !
वरदा - एक जयंत पाटील हे राष्ट्रवादी चे आमदार आणि मंत्री आहेत तर आणखी एक जयंत पाटील हे शे का प चे आमदार आहेत.म्हणजे दोघेही राजू शेट्टी यांचे विरोधकच म्हणावे लागेल.
निवांत पाटील - आपण मतदार संघातील वातावरण जवळून पाहता आहात त्यामुळे कल अधिक स्पष्ट जाणवला असेल पण तरीही
त्यातून निकाल पूर्णतः बदलेल असे अजूनही नाही वाटत. सांगली तर कॉंग्रेसला चांगली इतकेच म्हणता येईल

आज सकाळपासून २-३ प्रत्यक्षदर्शींकडून कळाल्याप्रमाणे औरंगाबादेत शिवसेनेकडून बोगस मतदानाची पुर्ण तयारी झाली आहे. बहूतांशी बुथवर नेमलेल्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत. बर्‍याच ठिकाणी २०० मीटरच्या आतच काँग्रेस आणि सेना दोन्ही पक्षांची टेबल लागलेली आहेत. याबाबींवर आक्षेप नोंदवल्यास सुरवातीला त्याची दखल सुद्धा घेतल्या गेली नव्हती. जरा आरडा-ओरडा करून नियम दाखवल्यावर कार्यकर्त्यांची संख्या कमी करणे आणि टेबलची जागा बदलणे केल्या गेलं.

दोन ठिकाणी सेनेचे कार्यकर्ते निवडणूक ड्युटीवरील कर्मचार्‍यांशी कानगोष्टी (अगदी कानात निरोप देणे) करताना पण दिसले.

शिवसेनेकडून बोगस मतदानाची पुर्ण तयारी झाली आहे>>> बोगस मतदान करणे आता येवढे सोपे राहिलेले नाही. थँक्स टु शेषनसाब.... त्यावेळी चालु केलेली चळवळ आताशी बाळसे धेउ लागलीय. Happy

निवांत, ज्यावेळी एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते निवडणूक अधिकार्‍याच्या कानात मतदानकेंद्राच्या आत जावून काहीतरी सांगतात आणि अधिकारी काळजी करू नका आपण दुपारनंतर बघून घेवू असं म्हणतो त्यावेळी आपल्यासारख्यांनी काय समजायचं?

(हे वर लिहिलेलं कल्पित नाहीये, आई मतदानाला गेली असताना तिने बघितलेला आणि ऐकलेला संवाद आहे हा. ती त्या भागातल्या स॑गळ्याच पक्षांच्या लोकल कार्यकर्त्यांना ओळखत असल्याने तिला कळालं. तिने कार्यकर्ता आत कसा काय येवू शकतो याबद्दल आक्षेपही नोंदवला. त्यानंतर अर्थात्च जे २-४ कार्यकर्ते बुथच्या आत होते ते बाहेर गेले.)

Pages