निकालांचे अंदाज - लोकसभा निवडणूक २०१४

Submitted by किंकर on 15 April, 2014 - 23:17

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून लौकिक असलेल्या भारत वर्षात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. एक मराठी आणि भारतीय या नात्याने 'महाराष्ट्र ' या आपल्या राज्याच्या निवडणूक निकालांबाबत मी माझा व्यक्तिगत अंदाज आपणा समोर मांडत आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण जागा ४८ असून पक्ष निहाय स्थिती पुढील प्रमाणे असेल .
कॉंग्रेस - १४ , भारतीय जनता पक्ष - १५ , शिवसेना -१० , राष्ट्रवादी -८, इतर (स्वाभिमानी संघटना ) -१
अर्थात या अंदाजापाठीमागे कोणतेही राजकीय मत नाही. यापूर्वी सुमारे तीस वर्षांपूर्वी १९८०च्या मध्यावधी निवडणुकांचे वेळी असे अंदाज मांडले होते,त्यावेळी ते ८० टक्के बरोबर आले होते यावेळी काय घडते ते पाहू .

सर्वच अंदाज २००४ व २००९ सालातील निकाल व २०१४ मध्ये बदललेली राजकीय परिस्थिती यांचा तुलनात्मक विचार करून मांडलेले आहेत. प्रत्यक्ष निकाला नंतरच वस्तुस्थिती समजेल. आपले वेगळे मत त्या त्या मतदार संघाबाबत असेल तर जरूर नोंदवा

अकोला - भारतीय जनता पक्ष - श्री.संजय धोत्रे
अमरावती -शिवसेना - श्री. आनंदराव आडसूळ
अहमदनगर - भारतीय जनता पक्ष - श्री.दिलीप गांधी
शिर्डी - शिवसेना - श्री लोखंडे सदाशिव
औरंगाबाद - शिवसेना - श्री. चंद्रकांत खैरे
बारामती - राष्ट्रवादी - सौ सुप्रिया सुळे
कोल्हापूर - राष्ट्रवादी - महाडिक धनंजय
हातकणंगले - स्वाभिमानी - श्री देवप्पा (राजू) शेट्टी
गडचिरोली - भारतीय जनता पक्ष - श्री अशोक नेते
चंद्रपूर - भारतीय जनता पक्ष - श्री अहिर हंसराज
जळगाव - भारतीय जनता पक्ष - श्री ए टी नाना पाटील
जालना - भारतीय जनता पक्ष - श्री दानवे रावसाहेब
उस्मानाबाद - शिवसेना - श्री रवि गायकवाड
धुळे - कॉंग्रेस - श्री.अमरीश पटेल
नंदुरबार - कॉंग्रेस - श्री माणिक गावित
नागपूर - भारतीय जनता पक्ष - श्री नितीन गडकरी
रामटेक - कॉंग्रेस - श्री मुकुल वासनिक
रावेर - भारतीय जनता पक्ष - रक्षा खडसे
नाशिक - राष्ट्रवादी - श्री भुजबळ छगन
दिंडोरी - भारतीय जनता पक्ष - श्री हरिश्चंद्र चव्हाण
नांदेड - कॉंग्रेस - श्री अशोक चव्हाण
ठाणे - राष्ट्रवादी - श्री नाईक संजीव
पालघर - भारतीय जनता पक्ष श्री चिंतामण वांगा
भिवंडी - भारतीय जनता पक्ष - श्री कपिल पाटील
कल्याण - शिवसेना - श्रीकांत शिंदे
परभणी - शिवसेना - श्री संजय जाधव
पुणे - कॉंग्रेस - श्री विश्वजित कदम
मावळ - शिवसेना - श्री श्रीरंग बारणे
शिरूर - शिवसेना -श्री शिवाजी आढळराव
बीड - भारतीय जनता पक्ष - श्री. गोपीनाथ मुंडे
बुलढाणा - शिवसेना - श्री प्रताप जाधव
भंडारा - राष्ट्रवादी - श्री .प्रफुल्ल पटेल
मुंबई उत्तर - भारतीय जनता पक्ष - श्री गोपाल शेट्टी
मुंबई उत्तर मध्य - कॉंग्रेस - प्रिया दत्त
मुंबई वायव्य - कॉंग्रेस - श्री गुरुदास कामत
मुंबई ईशान्य - भारतीय जनता पक्ष - श्री किरीट सोमय्या
मुंबई दक्षिण - कॉंग्रेस - श्री मिलिंद देवरा
मुंबई दक्षिण मध्य - कॉंग्रेस - श्री गायकवाड एकनाथ
रत्नागिरी - कॉंग्रेस - श्री निलेश राणे
रायगड - राष्ट्रवादी - श्री सुनील तटकरे
लातूर - भारतीय जनता पक्ष - श्री सुनील गायकवाड
वर्धा - कॉंग्रेस - श्री मेघे दत्ता
वाशीम - कॉंग्रेस - श्री . मोघे शिवाजीराव
सातारा - राष्ट्रवादी - श्री उदयनराजे भोसले
सांगली - कॉंग्रेस - श्री प्रतिक पाटील
सोलापूर - कॉंग्रेस - श्री सुशीलकुमार शिंदे
माढा - राष्ट्रवादी - श्री विजय सिह मोहिते पाटील
हिंगोली - शिवसेना - श्री सुभाष वानखेडे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रत्नागिरी - निलेश राणे निवडुन येणे जरा कठीण वाटते. निवडणुकीच्या सुरवाती पासुनची बंडाळी ( ॒आमदार दिपक केसरकर ) सुरु आहे. सुरवातीला गुपचुप असलेला प्रकार वाटत होता पण आता आमदार दिपक केसरकरांनी उघड पवित्रा घेऊन मतदारांना आवाहन केले आहे.

पुण्यातही २००९ ला फरक फक्त २५००० मतांचा होता. यावेळेला हा फरक मोदींच्या लाटेमधे निघुन जाऊन भाजप उमेदवार यशस्वी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नितीनचंद्र - मनसे उमेदवार श्री दीपक पायगुडे यांचा स्थानिक प्रभाव आणि भाजप अंतर्गत गटवार निष्क्रियता यामुळे मागील मताधिक्य भरून काढणे काढीन वाटते
sunilt- संजीव नाईक हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. आपल्या योग्य निरीक्षणा नुसार दुरुस्ती केली आहे

किरण कुमार - 'निम्मे अंदाज चुकणार आहेत -कुठल्या जगात आहात जरा जागे व्हा ' - मान्य !
-बरेचदा एखादा उमेदवार निवडून यावा असे मनात असते पण प्रत्यक्षात अनेक घटना क्रम प्रत्यक्ष निकालावर परिणाम करतात त्यामुळे
अंदाज चुकतात. आता मांडलेले बहुतेक अंदाज कोण निवडून यावे वाटते यावर आधारित नसून मागील दोन वेळचे निकाल आणि आजची परिस्थिती यावर आधारित आहेत.
कोणते निम्मे अंदाज चुकतील असे आपणास वाटते ते जरूर सांगा .आपल्या मताचा पूर्ण आदर आहे. उमेदवारापेक्षा मतदाराचा कल
हि बाब महत्वाची ठरते

इंटरेस्टिंग. हे अंदाज "मॅक्रो" अ‍ॅनेलिसीस वरून काढले आहेत की मतदारसंघ निहाय परिस्थितीवरून - म्हणजे काँग्रेस चे १४ हा अंदाज आधी करून ते १४ "मोस्ट लाईकली" कोणते असतील असा अंदाज काढला आहे, की प्रत्येक मतदार संघा चा अंदाज करून मग टोटल नंबर्स आले आहेत?

तसेच, त्या त्या ठिकाणच्या निवडणुकांआधी शेवटच्या ४-५ दिवसांत काही बदलू शकते. तुम्ही ते ट्रॅक करत आहात काय? त्यावरून काही बदलले तर वरचे अपडेट न करता स्वतंत्र पोस्ट टाका म्हणजे अंदाजाचा ट्रेण्डही कळेल.

बाय द वे नेट सिल्वर बद्दल माहिती आहे का तुम्हाला?
http://en.wikipedia.org/wiki/Nate_Silver

फारएण्ड- अंदाज मांडताना प्रत्येक मतदार संघ प्रथम विचारात घेत तेथे निवडून येण्याची सर्वाधिक क्षमता असलेला उमेदवार प्रथम निश्चित केला आहे.त्यानंतर त्याचे एकत्रीकरण करून पक्ष निहाय स्थिती नोंदवली आहे. मतदानाची वाढती टक्केवारी पूर्वी सरसकट सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जात असे यावेळी वाढती टक्केवारी मत विभागणीस जास्त हातभार लावेल अशी भीती वाटते.
तसेच नकाराधिकाराचे मत हे मत वाया जाण्यासारखेच आहे, कारण अप्रत्यक्ष त्यातून नको असलेला उमेदवार मताधिक्य घेण्याचा धोका वाढतो.

माढ्यात मोहितेपाटलांची परिस्थिती अवघड आहे, मुळात त्यांना तिकीट का मिळाले इथूनच धूसफूस आहे. शेवट्च्या क्षणी स्थानिक आमदारांनी पाठींबा दिला तरच काही होईल.

रामटेक - कॉंग्रेस - श्री मुकुल वाकनीस
<<
वासनिक.
*
रावेर - भारतीय जनता पक्ष - रक्षा खडके
<<
खडसे आहेत त्या.
भाजपाचे विरोधीपक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या.
(भाजपात वा त्यांच्या मित्रपक्षांतही कुट्ठे कुट्ठे, अजिब्बात घराणेशाही नाहिये.)

अरे जरा मायक्रोसॉफ्ट्च्या 'बिंग.कॉम / एलेक्शन' ह्या वेब साईट्वर नजर टाका काय भन्नाट माहिती आहे !

अप्रतीम!

खूप चांगला अभ्यास केलेला दिसतो आहे. अर्थात अशा धाग्यात अंदाजासमवेत अभ्यासही महत्त्वाचा असतो.

अंदाजामध्ये मनसे उमेदवार नाहीत याचे काहीसे आश्चर्य वाटते पण यांचे उमेदवार जितकी मते घेतील त्याचा परिणाम शिवसेना आणि भाजप यांच्या संभाव्य विजेत्या उमेदवारांच्या निकालावर होईल अशी रास्त भीतीही आहे.

"...तसेच नकाराधिकाराचे मत हे मत वाया जाण्यासारखेच आहे, कारण अप्रत्यक्ष त्यातून नको असलेला उमेदवार मताधिक्य घेण्याचा धोका वाढतो...." ~ याचा कसलाही धोका कुणालाच होणार नाही. कारण नोटाचा वापर केला जाईल याची शक्यता फार फार कमी आहे (कारण ते बटन अगदी तळाला आहे आणि तितका वेळ इ.व्ही.एम. पाहायला कुणालाच वेळ नसतो....अधिकृत चिन्ह पाहिले जाते केवळ). नोटा ही क्रांती नाहीच खरे तर. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेली ती एक सूचना आहे आणि तिची आयोगाने मतपत्रिकेत सोय केली....इतकेच.

>>>>> त्या त्या ठिकाणच्या निवडणुकांआधी शेवटच्या ४-५ दिवसांत काही बदलू शकते <<<<<
हो हो, अगदी अगदी, लाल पिवळे गांधीबाबा बरेच काही बदलतात....... तरी हल्ली त्यावर अन्कुश आणायचा प्रयत्न होतोय थोडाफार पेपरातील बातमीपुरता... क्याश वाहतुकीवर तपासण्या करुन.... पण बदलण्याच्या बाबी आधीच पोहोच झाल्या अस्तात म्हणे!
आमच्या दारात भगवा ध्वज आहे, त्यामुळे आमच्याकडे चुकूनहि असली बदलाबदलीची "प्रपोझल्स" येत नाहीत Wink

वरील अंदाज बरेचसे बरोबर येतिल असे वाटतय.
तरी अंदाजच ते, तेव्हा थोडाफार फरक पडेल, मोदीफ्याक्टरचा "महाराष्ट्रातील सूज्ञ" जन्तेवर किती परिणाम होईल याची मात्र शन्का आहे बर्का! अन त्यामुळेच वरील अंदाज प्रत्यक्षाच्या जास्त जवळ जातिल असे वाटतय.
असो. घोडेमैदान लाम्ब नाही, निकाल....... निकाल केव्हा आहे? कब है निकाल? (कब है होली या गब्बरस्टाईलने वाचावे) Proud

अहमदनगरचे दोन्ही जागा माघच्यावेळेस भाजप शिवसेनेकडे होत्या. त्या त्यांनी जिंकलेल्या जागा नव्हत्या तर काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानी निवडुन आणलेल्या होत्या. यावेळेस त्यातलाच येक खासदार काँग्रेसवासी झालाय. आणि शिवसेनेला धड उमेदवार देता आलेला नाहीये. नगर दक्षिणेत पण तुमचा अंदाज चुकण्याचीच शक्यता जास्त आहे. भाजपाच्या गांधीना वातावरण अनुकुल नाहीये अस दिसतय.

कारण ते बटन अगदी तळाला आहे आणि तितका वेळ इ.व्ही.एम. पाहायला कुणालाच वेळ नसतो....अधिकृत चिन्ह पाहिले जाते केवळ<<<

काही वेळा असे मतदार असतात जे हेच बटन दाबायला केंद्रात जातात.

>>>. काही वेळा असे मतदार असतात जे हेच बटन दाबायला केंद्रात जातात. <<<<< शक्य आहे, पण असे "मतदार(?)" आजवरच्या मतदानास घराच्या बाहेरही पडले नसणार हे खात्रीने सान्गतो त्यान्नी नोटा बटण दाबले तरी फरक पडत नाही.....

माझा अंदाज-
पूर्ण देशाबद्दल.

भाजपा आणि मित्र यांना २१० च्या आत.
'हे' म्हणतायत २६० च्या बाहेर.
बर्याच मोठ्या रकमेची पैज लागलीय. Wink

२१० ते २६० पडले तर दोघांनी अर्धे अर्धे पैसे काढून प्यार्टी!

फेसबूकवरून साभार!

>>>पुण्याला कलमाडी स्कूल मध्ये मतदान थांबवल्याची बातमी आहे. कारण कुठलेही बटन दाबले तरी कॉंग्रेसलाच मत जातंय म्हणे!... बिच्चारे!!...काहीच दुसरा उपाय उरु नये का यांच्या जवळ?<<<

बेफिकीर....

"....काही वेळा असे मतदार असतात जे हेच बटन दाबायला केंद्रात जातात...."

~ "नोटा" ची सोय यंदाच्या निवडणूकीपासून चालू झाल्याने याचा विकल्प किती मतदारांकडून स्वीकारला जाईल याची आकडेवारी निकालानंतर मिळेलच. पण समजा "क्ष" नामक मतदाराला त्याच्या मतदारसंघातील कुठलाच मतदार पसंत नसेल तर तो कशाला घरातून बाहेर पडेल आणि हकनाक आपला एक तास त्या प्रक्रियेत घालवेल ? उलटपक्षी तो केन्द्राकडे जाणारच नाही.....आरामात सासूसून मालिका बघत वेळ काढील घरातच.

थोडक्यात "नोटा" ची कल्पना ही फक्त कागदोपत्री मांडण्यासाठी आयोगाने केलेली सोय आहे. तेही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार. तुम्ही म्हणता तसे काही प्रमाणात शहरी भागात होईलसुद्धा, पण बिलिव्ह मी सर, ग्रामीण भागात शून्य प्रभाव पडेल नोटाचा.

तुम्ही म्हणताय ते अगदी खरे आहे अशोकराव!

ते बटन दाबायला कोण जात बसेल तिथे! मला वाटते 'नोटा'बाबत शासनाने अधिक जागरुकता निर्माण करायला हवी आहे / होती.

पुढील अंदाज बरोबर वाटत आहेत. इतर ठिकाणची माहिती नाही.
यातही ठळक केलेले अल्मोस्ट गॅरंटीडः
बारामती - राष्ट्रवादी - सौ सुप्रिया सुळे(इथे डबल बोल्ड करायची सोय नाही. नाहीतर तेही केले असते. इतकी ही सीट गॅरंटीड आहे. सुळे मॅडम सभामधे अश्रु का ढाळत आहेत उगाचच..)
नागपूर - भारतीय जनता पक्ष - श्री नितीन गडकरी
रामटेक - कॉंग्रेस - श्री मुकुल वाकनीस
नाशिक - राष्ट्रवादी - श्री भुजबळ छगन
नांदेड - कॉंग्रेस - श्री अशोक चव्हाण
ठाणे - राष्ट्रवादी - श्री नाईक संजीव
बीड - भारतीय जनता पक्ष - श्री. गोपीनाथ मुंडे
भंडारा - राष्ट्रवादी - श्री .प्रफुल्ल पटेल
मुंबई उत्तर मध्य - कॉंग्रेस - प्रिया दत्त
मुंबई दक्षिण - कॉंग्रेस - श्री मिलिंद देवरा
मुंबई दक्षिण मध्य - कॉंग्रेस - श्री गायकवाड एकनाथ

वर्धा - कॉंग्रेस - श्री मेघे दत्ता
वाशीम - कॉंग्रेस - श्री . मोघे शिवाजीराव
सातारा - राष्ट्रवादी - श्री उदयनराजे भोसले
सांगली - कॉंग्रेस - श्री प्रतिक पाटील
सोलापूर - कॉंग्रेस - श्री सुशीलकुमार शिंदे

मूळ यादीत खालील फरक संभवतात-
ठाणे - शिवसेना - श्री राजन विचारे
मुंबई दक्षिण - शिवसेना ( अरविंद सावंत) आणि कॉंग्रेस (देवरा ) ५०-५० नक्की सांगता येत नाही
मुंबई दक्षिण मध्य - शिवसेना - श्री राहुल शेवाळे
मुंबई वायव्य - शिवसेना - श्री गजानन किर्तीकर
रत्नागिरी - शिवसेना - श्री विनायक राउत
रामटेक - शिवसेना- श्री कृपाल तुमाने
पुणे- भाजप- अनिल शिरोळे
सांगली- भाजप - संजय पाटील
ठाणे आणि कल्याण यंदा शिवसेना जिंकेल. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये पण सेना बाजी मारेल.
राज्यात यंदा महायुती चांगले यश मिळवेल.

सांगली- भाजप - संजय पाटील >> ही शक्यता जरा कमी आहे. भाजपाचा स्थानिक आमदारच उघडपणे विरोधात आहे. शिवाय राष्ट्रवादीनं यावेळी पूर्ण ताकद लावली आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी जत आणि तिथल्या दुष्काळी भागात, पाण्यासाठी बरीच कामं करून घेतलीत. तिथली मतं काँग्रेसकडं जाउ शकतात.

हातकणंगल्यातपण राजू शेट्टींना यावेळी सोपं नाहिये.

इब्लिस -' वाकनीस' .................वासनिक दुरुस्ती केली आहे .
आगाऊ, अल्पना - मी दिलेली यादी विशलिस्ट नाही. पण सर्वाधिक संभाव्य विजेते नक्की आहेत .
सर्वच प्रतिसाद कर्त्यांचे आभार - कारण चर्चा शक्यतेविषयी आहे . राजकीय मतांतर नेहमीच राहणार.
आज जसे कोणतेही बटन दाबा मत एका विशिष्ठ ठिकाणी जात आहे असेच काही १९७१ च्या लोकसभा निवडणुकात झाले अशी भीती व्यक्त केली जात होती त्यावेळी बहुदा श्री अटल बिहारी वाजपिये म्हणाले होते - "हा विजय बाईचा नसून शाईचा आहे "
माढा हि जागा श्री शरद पवारांनी श्री विजय सिह मोहिते पाटील यांना दिली आहे , तर सांगली येथील वसंत दादा याची घराणे शाही अभेद्य आहे त्यामुळे माढा राष्ट्रवादी आणि सांगली कॉंग्रेस - प्रतिक पाटील हे विजय निश्चित आहेत

अंदाजामध्ये मनसे उमेदवार नाहीत याचे काहीसे आश्चर्य वाटते >>>>> हो मलाही आच्छर्य वाटल , मामा या वेळी मनसे ने शिवसेने विरुद्द उमेदवार उभे केल आहेत. त्यामुंळे त्याना विसरुन नाहि चालणार.

Pages