शेपूची परतून भाजी
साहित्य : एक जुड्डी शेपूची पालेभाजी , ८-१० लसूण पाकळ्या,चवीनुसार मीठ व हिरव्या मिरच्या ,फोडणीसाठी तेल,मोहरी,हळद व हिंग
कृती : प्रथम शेपूचे कोवळे लांब देठ न खुडता तसेच ठेवून भाजी निवडून व एका चाळणीत घालून स्वच्छ धुवून घ्या व निथळत ठेवा. लसूण पाकळ्या सोलून बारीक तुकडे करून घ्या, हिरव्या मिरच्यांचेही हवे तेव्हढे बारीक /मोठे तुकडे करून घ्या. आता गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर हळद व हिंग घाला,मग लसणाचे बारीक केलेले तुकडे व हिरव्या मिरचयांचे तुकडे घाला,लसूण गडद लाल-काळसर रंगावर असा झाल्यावर चाळणीत धुवून निथळत ठेवलेला शेपू घालून चवीनुसार मीठ घालून चांगले परतून घ्या,एक पाण्याचा हबका मारून पुन्हा एकदा परतून घेऊन कढईवर एक स्टीलचे ताटात पानी घालून झाकण म्हणून ठेवा. खालून गॅसची उष्णता व वरच्या झाकण म्हणून ठेवलेल्या ताटातीळ पाण्याची वाफ होईल त्या वाफेवर दोन्हीकडून शेपूची भाजी १० मिनिटे शिजू द्या. आता गॅस बंद करा.
सर्व्ह करतेवेळी भाजीवर लसणाची गरम फोडणी घालून ज्वारीच्या भाकरीबरोबर व सोबत एक चमच हिरव्या मिरच्यांचा खर्डा घालून सर्व्ह करा.
यात भिजवलेली मूगडाळ, मसूरडाळ
यात भिजवलेली मूगडाळ, मसूरडाळ यम्मी लागते.
यात मी मूगडाळ अन कांदाही
यात मी मूगडाळ अन कांदाही घालते. छान लागते.
शेपूच्या भाजीत मूगडाळ आणि मेथीच्या भाजीत मटकीची डाळ छान लागते.
यात मी मूगडाळ अन कांदाही
यात मी मूगडाळ अन कांदाही घालते. छान लागते.
शेपूच्या भाजीत मूगडाळ आणि मेथीच्या भाजीत मटकीची डाळ छान लागते.....अगदी अगदी!
शेपूच्या भाजीत हिंग ? अपुन ये
शेपूच्या भाजीत हिंग ? अपुन ये कुछ जम्या नही तांबेकाका