१) "बोलीभाषेची काव्यधारा" - मराठी भाषा दिवस २०१४

Submitted by संयोजक on 25 February, 2014 - 06:29

महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत. अगदी दर दहा कोसांवर मराठीचं रुपडं बदलतं. वर्‍हाडी, अहिराणी, मालवणी, बेळगावी, कोल्हापुरी, नागपुरी, झाडीबोली अशा अनेक बोलीभाषांतून विविध विषयांना सामावणारं, लोकांशी थेट आणि जवळचा संवाद साधणारं लिखाण झालं आहे. बहिणाबाईंची कविता अहिराणीत होत्या. मालवणी दशावतारांसारख्या लोककलांमधून सर्वत्र पोहोचली. झाडीबोली रंगभूमी आजही पूर्व विदर्भात जोम धरून आहे.

म्हणूनच यंदा आम्ही 'मराठी भाषा दिवस - २०१४'च्या निमित्तानं 'बोलीभाषेतील काव्यधारा' हा एक आगळावेगळा उपक्रम आपल्यासाठी आणला आहे. या उपक्रमात मायबोलीकरांनी महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या बोलीभाषेत कविता, गझल, चारोळ्या इत्यादी. विविध काव्यप्रकार रचणं अपेक्षित आहे.

बोलीभाषांचं संवर्धन व्हावं, त्यात मायबोलीकरांचा सहभाग असावा, बोलीभाषांचं माधुर्य सर्वांसमोर यावं, हा आमचा प्रयत्न आहे.

नियम:

१. ही स्पर्धा नाही. हा एक उपक्रम आहे.

२. या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस, २०१४' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

३. या उपक्रमासाठी खाली काही विषय दिले आहेत, या विषयांवर तिन्ही दिवशी काव्य रचायची आहेत.

४. दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही आणि कितीही विषयांवर आपल्याला महाराष्ट्रातील कोणत्याही एका बोलीभाषेत कविता / चारोळ्या / गझल रचायची आहे.

५. काव्य स्वरचितच असावे. भाषांतरीत काव्य देऊ नये.

६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा कविता / चारोळ्या / गझल देऊ शकतात. परंतु एका वेळेस एकच काव्य द्यावे.

७. कविता , चारोळ्या , गझल इत्यादी सगळ्या प्रकारांत आपण बोलीभाषेतून काव्य रचू शकतात.

८. काव्य लिहिताना सुरुवातीला ते कोणत्या बोलीभाषेत लिहिले आहे, हे नमूद करणे बंधनकारक आहे.

--------------------------------------------

विषय :-

१. शाळा

२. सूर्य , चंद्र

३. भ्रमणध्वनी / मोबाईल

४. मी आणि मायबोली

५. आमचे शेजारी

६. स्वप्न

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिल्या आहेत कविता सगळ्या

हर्षा आणि आर्या यांचे उपक्रमात भाग घेतल्या बद्दल अभिनंदन

धन्यवाद मंडळी!
आपल्या सर्वांना समजली त्यातच सर्व काही आलं. Happy

<<त्यांना लागताच गरज
बघतात दार उघडुन सावज<<
लई भारी आदे! Lol
जमलीय जमलीय!

अहिराणी वाचताना फार छान वाटते. ती बोली जरा करुण व प्रेमळ वाटते एकंदरीत वाक्यरचनेवरुन. छान लिहिलय.

Pages