भारतीय रेल्वे जिव्हाळ्याचा विषय

Submitted by हर्ट on 19 February, 2014 - 20:44

नमस्कार, तुम्ही आम्ही आपल्यापैकी अनेकांनी रेल्वेमधून प्रवास केलेले असतील. इथे तुम्ही तुमच्या आवडती रेल्वे , अधेमधे येणारी गावे, तालुके, जिल्हे, निसर्ग, झाडीझुडी, खा-प्यायचे पदार्थ, भेटलेले व्यक्ति आणि वल्ली, अलिकडे झालेले बदल, रेल्वेची नावे - नदीवरुन, इतिहासावरुन - ह्या सर्वांची रसभरीत चर्चा इथे करा.

पोलादी आयुष्य माझे
फिरते भारत सारा,
वाढता वाढता वाढे
माझा रुळ्-पसारा

इतिहासाची साक्ष मी,
मी 'ऑगस्ट क्रांती',
जनमाणसातील दुवा मी,
मी आहे 'संपर्क क्रांती'

टागोरांची 'गीतांजली' मी
माउलीची 'ज्ञानेश्वरी' मी
प्रेमचंदची 'गोदान' मी
नझरुलची 'अग्नीवीणा' मी

दिल्लीची 'राजधानी' मी
मी नेताजींची 'आझाद हींद'
कोल्हापुरची 'महालक्ष्मी' मी
मी गांधीजींची 'अहिंसा'

कोकणची 'कोकणकन्या' मी
सोलापुरी 'सिद्धेश्वर'
उज्जैनची 'अवंतिका' मी
एंम्.पी .यु .पी. 'फ्राँटीयर'

बोगद्यात घुसमटते जरी
तरी 'डेक्कन क्वीन'च मी
'रो-रो'कर हैराण जरी
'नेत्रावती ' अजूनही मीं

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त व्हिडीयो .. नोस्टाल्जिक खरंच .. त्या इंजीनचा हॉर्न आणि रुळांचा खणखणाट .. Happy

हा व्हिडीयोही पुणे स्टेशनचा आहे असं दिसतंय .. व्हीटी स्टेशनचा वाटला नाही एका बाजूला दिसणारी टेकडी बघता ..

डेक्कन सकाळी पुण्याहून सुटते म्हणून तेथे साजरा होत असेल. व्हीटीचे मलाही फारसे दिसले नाहीत. दादर चे आहेत बरेच, किंवा शीव्/माटुंग्या वरून वेगात जाताना घेतलेले.

डेक्कन क्वीन ही पुणे यार्डाची गाडी आहे. सकाळी मुंबईला जाऊन संध्याकाळी घरी परतते ना. Happy
डे क्वी, प्रगती, सिंहगड पुण्याच्या गाड्या.

हो तसेच असावे बहुधा, नी. मात्र तिच्याबद्दल वाचलेल्या माहितीत इंग्रज लोक रेस खेळायला जायला डेक्कन वापरत असे होते. आता ते लक्षात नाही की मुंबईला दिवसभर रेस खेळून संध्याकाळी पुण्याला परतत, की पुण्यात आदल्या दिवशी रात्री जाउन मग तिसर्‍या दिवशी मुंबईत परतत. तेव्हा म्हणे ८-१० डबे घेउन डेक्कन २ तास ५५ मि. मधे जायची.

अहाहा!! बी भाऊ उत्तम धागा आहे हा!

रेलवे अन आमचे जुने ऋणानुबंध आहेत, वडिलांचे मुळ गाव सातारा जिल्ह्यात, आई सांगलीची, सेटल्ड विदर्भात त्यामुळे वर्षात एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीमधे महाराष्ट्र एक्सप्रेस कंपल्सरी होतीच्! आजोबा आजी मी आई वडील असे जात असू, आजोबा हार्ट पेशेंट म्हणून त्यांचा लो सॉल्ट मधील स्वयंपाक असे तोच सगळा आमच्यासाठी साधारण मीठातला!! आई बिचारी थकुन जात असे तेव्हा रेलवे मधे चढ़ली की सरळ अपर बर्थ ला झोपी जात असे आजोबांची वैयक्तिक श्रद्धास्थाने फिक्स असत आई वडिलांचा डोळा चुकवून आम्ही आबा नातू तुफान चंगळ करीत असू गाड़ी सुटली की शेगाव ला कचोरी, भुसावळ ला ऑमलेट पाव , नीरे ला वड़ा सांबर अन अंजीर वगैरे जांभळे वगैरे ती चंगळ.

नंतर मोठा झालो भारतभर वारे प्यायल्यागत हिंडू लागलो (तरी अजुन साउथ इंडिया स्कोर शुन्य आहे) दिल्ली मार्गे हिमाचल ला युथ हॉस्टल एसोसिएशन ऑफ़ इंडिया च्या कृपेने हॉलिडे होम केले होते मी उन्हाळ्याचे २ महीने हिमाचली गारव्यात टेंट मधे घर असे, त्यावेळी आवडती गाड़ी म्हणजे एपी एक्सप्रेस जबरदस्त स्पीडी गाडी ह्या गाड़ी मधील वेज कटलेट, बिर्यानी अन मटका दही म्हणजे स्वर्ग असे, एकदा ट्रेक अन कॅम्प लीडिंग ला जायचे का नाही ह्या दुविधेत रिजर्वेशन राहिली मग तत्कालच्या नादी लागलो, तेव्हा तत्काल नवे सुरु झाले होते का आमचा प्रथम अनुभव होता आठवत नाही ,पण तेव्हा तत्काल फी नसे फ़क्त तिकीट सोर्स टु डेस्टिनेशन काढावे लागत असे बहुदा ! आम्ही म्हणजे मित्राने अन मी हैदराबाद ते हज़रत निजामुद्दीन केले होते रिजर्वेशन पण बोर्डिंग एट नागपुर करायला विसरलो होतो, आम्ही आपले चढ़लो नागपुरला तर आमच्या बर्थ वर तिसरेच लोकं! मग टीटीई आला तेव्हा उलगडा झाला, टीटीई भला माणूस होता तो म्हणाला तिकीट द्या ते त्याला दिले तर त्याने त्यावर पेनाने दोन कोंबड़े काढले (सही टाइप केली) अन म्हणाला कुठलाही टीटीई आला नंतर तर हे दाखवा आमचा कोडवर्ड आहे तुम्हाला त्रास होणार नाही! सोबत सहप्रवासी म्हणून इंद्रप्रस्थ विद्यापीठाची मुले होती इंजीनियरिंगची त्यांच्या सोबत दिवसा बसलो गप्पा केल्या , त्यातल्या एकाला शिवाजी सावंत ह्यांच्या मृत्युंजयची भारतीय ज्ञानपीठ ने प्रकाशित केलेली हिंदीतली आवृत्ती वाचताना पाहिले मग त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली तर त्याला ओरिजिनल मराठी मृत्युंजय अन हिंदी अनुवादात काही अंतर आहे का ते जाणून घ्यावी वाटत होती, मग मला तोंडपाठ (मराठीत असलेले) काही भाग आठवून शोधून वाचले, त्याला थोड़े कमी जास्त सांगितले तर पोरगा खुश झाला मग गप्पान्ना उधाण,

झोपताना म्हणले "प्राजी आपलोग सो जाओ तो हम निचे पेपर बिछा लेंगे" तर म्हणाला "रुको"

लगेच चर्चा केली आपल्या बॅचमेट्स सोबत अन म्हणाला " वीरे दोस्तानु जमीन विच सोना पड़े तो अच्छा थोड्डे ही लगेगा" मग त्या पोरांनी आपल्या बॅग मधुन हेमोक काढले (दोरीचे झोपाळे" अन मिडिल बर्थ चढ़वल्यावर उरलेल्या मोकळ्या हुक्स ना लटकवुन शक्कल लढवली!! मग मी अन मित्र त्या हेमोक मधे डाराडूर झोपलो! सकाळी उठल्यावर पोरांनी चहा पाजला, हज़रत निजामुद्दीन ते राणाप्रताप आयएसबीटी जायचा मार्ग सांगितला, अंबाला चंडीगढ़च्या बसेस चालवणाऱ्या दोन चार चांगल्या ड्राइवर्सचे पत्ते दिले, ती पोरे आजही टच मधे आहेत!! मजेदार प्रवास झाला होता एकंदरित प्रचंड! अनफोर्गेटेबल!!

आभारी आहे मित जी.

सध्या पुर्वोत्तर रेलवे अन पूर्व मध्य रेलवेचे अनुभव घेतोय, न्यू तिनसुखिया (आसाम) ते लालगढ़ (बीकानेर, राजस्थान) असा प्रवास केलाय अवध आसाम एक्सप्रेस मधे, ४ दिवस अन आठ राज्यं क्रॉस करते ही गाड़ी, अन तरीही सरप्राइज म्हणजे कधीही वीस मिनट्स पेक्षा जास्त लेट झालेली नाही/नसते (आजवर तीनवेळा झालाय हा प्रवास) हल्ली हल्ली पर्यंत वरती आलेल्या अनेक प्रतिसादांसारखे होते उत्तरप्रदेशात पण हल्ली खुपच शिस्तबद्ध झाले आहेत कारभार, मला माबो वर फोटो चिकटवता येत नाहियेत (मोबाइल फ़ोन वरुन ऑनलाइन आलोय) नाहीतर पटना किंवा समस्तीपुर सारख्या बिहार मधल्या जंक्शनचे चकाचक झालेले फोटो लोड केले असते, यूपी मधे पण तसेच आहे काही अपवाद वगळता, तसेही हा मुजोरीचा त्रास यूपी मधे जास्त बिहारात तितका नाही , असो!. आसाम मधे तर संध्याकाळी लष्करी सुरक्षेत गाड्या चालत असत

बापू फारच छान अनुभव. बस किंवा विमानापेक्षा रेल्वे प्रवास सर्वात भारी Happy
सर्व सोयी असतात.

मी ७-८ वर्षाचा असतानाची गोष्ट आहे.
पुण्याहून आम्ही डेक्कन एक्सप्रेसने मुम्बईला निघालो होतो. गाडी प्लॅटफोर्मवर आली. मी डब्यात चढून पटकन खिडकीत बसलो. आधीच्या माणसाने खिडकीची कडी अडकवलेली नसावी. थोडा धक्का लागताच खिडकीचे लोखन्डी शटर धाडकन खाली येउन माझ्या डाव्या हाताच्या शेवटच्या दोन बोटान्वर आदळले. बोटान्चा चेन्दामेन्दा झाला , रक्ताची धार लागली. त्वरित गाडी सोडून आम्ही थेट हॉस्पिटल मधेच जाउन धडकलो. रातोरात ऑपरेशन झाले , बोटे सुखरूप वाचली पण मझ्या मनावर प्रवासाच्या भीतीचे सावट पसरले. किती वर्षेतरी मला प्रवासाला जायचे हा एक तणावाचा प्रसन्ग असायचा.
परन्तू माझे अलिकडचे रेल्वे प्रवासाचे अनुभव अतिशय सुखद आहेत.
पुणे - एर्नाकुलम एक्सप्रेस आणि परतताना कोचुवेलि - मुम्बई गरीब रथ असा प्रवास केला. रेल्वेचा वक्तशीरपणा आणि उत्तम खान-पान व्यवस्था अनुभवास आली. स्वच्छ डबे आणि सहप्रवासी! खिडकीतून बाहेर सतत दिसणारा हिरवा कन्च निसर्ग ! सकाळी सकाळी कर्मचार्यान्ची "चाया-चाया" अशी गमतीदार हाळी अजून आठवते.
येताना दोन तास कोची स्टेशन्वर घालवायची वेळ आली होती पण स्वच्छ स्टेशन आणि भटके आणि भिकार्यान्चा पूर्ण अभाव यामुळे गप्पान्मधे हा वेळ कसा गेला कळलेच नाही.
पुणे -सिकन्दराबाद शताब्दीचा अनुभवही चान्गला होता. एसी जास्त गार वटल्याचे सान्गताच कर्मचार्याने तत्परतेने येउन सेटिन्ग बदलून देउन सुखद गारव्याचा अनुभव दिला. हे तर अनपेखितच होते.
या गाडीचे टायमिन्ग खूप सोयिस्कर आहे. दोन्ही प्रवासाच्या दिवशी ही अर्धा दिवस हैदराबादमधे मिळतो.
भारतीय रेल्वेच्या पसार्याच्या तुलनेत आणी अस्वच्छ जनतेच्या वावराचा विचार केला तर रेल्वेचे व्यवस्थापन अप्रतीमच म्हणावे लागेल.

त्या सिकंदराबाद शताब्दीने आम्हीही सोलापूरपर्यंत गेलो होतो. छान गाडी आहे ती.

अनेक पूर्वीचे लांबून जाणारे ट्रॅक्स बदलून (पुणे-कोल्हापूर, पुणे-बंगलोर ई) जास्तीत जास्त जवळच्या मार्गाने ते ट्रॅक्स टाकून, गाड्या सरासरी किमान १५० किमी च्या वेगाने धावतील (जे सध्याच्या रूळावरचे लिमिट आहे - १६०) इतके पाहिले तरी रेल्वे हा खूप चांगला पर्याय होईल लांबच्या प्रवासाला खाजगी गाड्यांपेक्षा.

सिकंदराबाद - पुणे शताब्दी>> गाडी मस्त, फक्त जेवण टुकार. सुधारायची त्यांची इछा नाही. खूप लोकांनी तक्रारी केल्यात. सकाळची न्याहारी ( पुणे -सि.) ठीक.

Pages