नमस्कार, तुम्ही आम्ही आपल्यापैकी अनेकांनी रेल्वेमधून प्रवास केलेले असतील. इथे तुम्ही तुमच्या आवडती रेल्वे , अधेमधे येणारी गावे, तालुके, जिल्हे, निसर्ग, झाडीझुडी, खा-प्यायचे पदार्थ, भेटलेले व्यक्ति आणि वल्ली, अलिकडे झालेले बदल, रेल्वेची नावे - नदीवरुन, इतिहासावरुन - ह्या सर्वांची रसभरीत चर्चा इथे करा.
पोलादी आयुष्य माझे
फिरते भारत सारा,
वाढता वाढता वाढे
माझा रुळ्-पसारा
इतिहासाची साक्ष मी,
मी 'ऑगस्ट क्रांती',
जनमाणसातील दुवा मी,
मी आहे 'संपर्क क्रांती'
टागोरांची 'गीतांजली' मी
माउलीची 'ज्ञानेश्वरी' मी
प्रेमचंदची 'गोदान' मी
नझरुलची 'अग्नीवीणा' मी
दिल्लीची 'राजधानी' मी
मी नेताजींची 'आझाद हींद'
कोल्हापुरची 'महालक्ष्मी' मी
मी गांधीजींची 'अहिंसा'
कोकणची 'कोकणकन्या' मी
सोलापुरी 'सिद्धेश्वर'
उज्जैनची 'अवंतिका' मी
एंम्.पी .यु .पी. 'फ्राँटीयर'
बोगद्यात घुसमटते जरी
तरी 'डेक्कन क्वीन'च मी
'रो-रो'कर हैराण जरी
'नेत्रावती ' अजूनही मीं
आशुचँप, अशा केसेस मध्ये टीसी
आशुचँप,
अशा केसेस मध्ये टीसी अथवा रेल्वेने जेन्युन केस समजून मदत करायला हवी. राग तेव्हा येतो जेव्हा मुद्दम्हून लोकं तिकिट न काढता प्रवास करतात आणि सुटतात.
अशा केसेस ?टीटी काय करणार ते
अशा केसेस ?टीटी काय करणार ते सांगा ? तुमचे स्लीपरचे तिकीट असेल
तर आजचे प्रवासी
तिथे बसले असणार .ते कसे यांना बसू (झोपू )देतील ? स्लीपरच्या डब्यातून वेटिंगलिस्ट वाल्यांनाही हाकलतात .फारतर टीटी त्याची
स्वत:च्या सीटवर बसवेल .
(संपादित) .
थोडेफार पैसे जवळ असणारच
त्यातून एक दोनतरी जेनरल सिटिंग अधिक दंड भरून पावती फाडायची आणि तिकडे
जायचे .
टीटी खातरजमा(त्यांच्या
टीटी खातरजमा(त्यांच्या गोष्टीची) रेल्वेकडे एक माहिती पुरवून(जर शक्य असल्यास) त्या गरीब पँसेंजरना पैसे तर परत करण्यासाठी विनंती करु शकेल रेल्वेकडे. (नाहितरी त्यांची तिकिटं होतीच). नाहितर करेक्ट माणसाकडे त्या पँसेजरची केस फॉरवर्ड करु शकतोच ना? नाहितर त्यांना कसे कळणार कुथे जायचे ते? इतकी मदत होवु शकतेच असे वाटते.
पैसे परत मिळाले तर पुढच्या ट्रेनचे तिकिट अवलेबल असेल तर काढून जागा मिळेल.
पैसेच नाही म्हटल्यावर अधिक
पैसेच नाही म्हटल्यावर अधिक दंड भरायच्या काय गोष्टी करताय? आणि दुसर्या ट्रेनमध्ये कशी काय आणखी जागा मिळणार? त्यापेक्षा पैसे परत मिळाले गरीब माणूस विसरला/चुकला ट्रेनचे वेळापत्रक समजायला तर , मिळालेल्या पैशाने नंतरच्या तिकिटाने जावू शकतो ना?
रेल्वेमध्ये लोकल, मेट्रो,
रेल्वेमध्ये लोकल, मेट्रो, मोनोरेल हेही लिहायचे का?
पाय मोडल्यानंतर आता गर्दीत इम्यालन्स होतो. त्यामुळे नाइलाज म्हणून आता ह्यांडिक्याप डब्यातून फिरतो. त्याला मी विंचवाचा डब्बा असे नाव दिले आहे. मजा असते, सगळ्या व्याधी, व्यंगे पहायला मिळतात, जी पाच वर्षे मेडिकल कॉलेजातही नव्हती दिसली... मूकबधीर लोक हातवारे करत 'बोलत' असतात.
'चेन्नई एक्स्प्रेस पाहिलास का रे? हे बघ माझ्या मोबाइलात आहे... '' एकजण दुसर्याला दाखवत होता. .. मी पाहिलं, तर दोघेही ठार आंधळे होते... !
गेल्या महिन्यात ऊस आंदोलन झाले तेंव्हा सांगली मुंबई ट्रेनने आलो.. आंदोलन असल्याने इतर लोकही अपंग डब्यात शिरले . कुठेतरी एक मनुष्य आला आणि टी सी आहे असे सांगून दोन चार लोकांकडून पैसे मागू लागला.
पण कुणीतरी त्याला ओळखले, तो भामटा होता. पुढच्या स्टेशनवर पळून गेला.
पैसेच नाही म्हटल्यावर अधिक
पैसेच नाही म्हटल्यावर अधिक दंड भरायच्या काय गोष्टी करताय? आणि दुसर्या ट्रेनमध्ये कशी काय आणखी जागा मिळणार? त्यापेक्षा पैसे परत मिळाले गरीब माणूस विसरला/चुकला ट्रेनचे वेळापत्रक समजायला तर , मिळालेल्या पैशाने नंतरच्या तिकिटाने जावू शकतो ना ?>>>
माझ्या अगदी सुरवातीच्या पोस्टमध्ये मी अशाच प्रकारे माझी ट्रेन सुटल्याबद्दल आणि पैसे नसल्याबद्दल लिहिले होते. त्यावेळी माझी सकाळची सहाची ट्रेन असताना मी संध्याकाळी सहा वाजता स्टेशनवर पोचले. तिथे पोचल्याबरोबर हमालाकडून कळालं गडबड झाल्याचं. मग त्यानेच सुचवलं की स्टेशन मास्तरला किंवा टीटीला भेटा म्हणून. ऑफिसही दाखवलं. तिथल्या (त्या टीटी ऑफिसातल्या) लोकांनी मला माझ्या तिकिटाचे ४० की ६० % रक्कम परत मिळेल असं सांगितलं आणि तिकिटावर पॅसेंजर नॉट ट्रॅव्हल्ड असं लिहून दिलं.
माझ्याकडे त्यावेळी मोजून २००-२५० च रुपये होते. सामान जरा जास्तच होतं (एक पुस्तकांची ट्रंक होती नेहेमीच्य बॅगेशिवाय. थिसिसच्या कामासाठी दोन महिने रहायचं होतं म्हणून बर्याच नोट्स, पुस्तकं घेवून चालले होते). एकटीने सामान उचलता येणार नव्हतं. हमालाला किमान ५०-६० रुपये, जनरलचं जळगावपर्यंतचं तिकिट १००-१२५ रुपये, तिथून पुढचं बसचं तिकिट ८०-१०० रुपये, जळगाव रेल्वे स्टे. ते बस स्टँड पर्यंत रिक्षाला पैसे आणि दिवसभर काहीच न खाल्ल्यामूळे काहीतरी खायला ५-१० रुपये लागणार होते. जर पैसे पुरले नाहीत तर काय हा प्रश्न होता. तिथल्या लोकांना त्याबद्दल सांगितल्यावर त्यांनी दुसर्या एका ऑफिसमध्ये जावून आजच्या आज रिफंड मिळू शकेल म्हणून सांगितलं. सामानासकट मी आणि हमाल तिथे गेलो. पण नेमकी संध्याकाळची .३०-६.०० च्या आसपासची वेळ असल्याने अगदी २ मिनीटं उशिरा पोचले मी त्या ऑफिसात आणि मला पैसे हातात मिळू शकले नाहीत. (नंतर मिळाले होते.)
हमालाचे पैसे देवून आणि जनरलचं तिकिटं काढून झाल्यावर मोजून १०० रुपये उरले होते हातात. काही खायला-प्यायला पैसे उरलेच नाहीत. रुममधून निघताना उरलेला अर्धा पार्ले जी ऑरेंज बिस्किटाचा पुडा घेतला होता तेवढंच खाल्लं. जळगावला अर्धा तास लावून सामान कसंबसं बाहेर आणलं कारण हमालाला द्यायला पैसे नव्हतेच. रिक्शाला १५ रुपये लाग्ले होते बस स्टँडपर्यंत आणि तिथे स्टँडच्या बाहेर लोकमतची व्हॅन होती.ते लोक औरंगाबादपर्यंत ६५ रुपयात नेत होते. त्यातूनच गेले कारण बसचं तिकिट जास्त होते. औरंगाबादला पोचल्यावर घरापर्यंत रिक्षाला लागले उरलेले पैसे. हुश्शं झालं होतं पोचल्यावर.
मस्त आहे सर्वांच्या आठवणी!
मस्त आहे सर्वांच्या आठवणी! छान धागा
मला वाटतं रे तिकीटाचे पैसे
मला वाटतं रे तिकीटाचे पैसे परत केव्हा आणि किती मिळू शकतात याबद्दल गैरसमज आहेत .गाडी सुटल्यानंतर (ज्या स्टेलाचढणार होतो) त्यानंतर दोन तास उलटल्यावर एक पैसाही परत देत नाहीत .(जुलै २०१३) पैसे नसतील तर सरळ जेनरल डब्यातून जायचे आणि बाहेर पडतांना तिकीट तपासले नाही तर झाला फुकटात प्रवास .
(संपादित).
एसआरडी, सध्याच्या नियमांबद्दल
एसआरडी, सध्याच्या नियमांबद्दल माहित नाहीये. मी लिहिलेली घटना १० वर्षांपूर्वीची आहे. गाडी सुटल्यानंतर १२ तासांनी माझ्या तिकिटावर तिथल्या स्टेशन मास्तरांनी पॅसेंजर नॉट ट्रॅव्हल्ड म्हणून लिहून दिले. मला पैसे परत मिळाले होते नंतर (मी औरंगाबादच्या स्थानकातून नंतर परत घेतलए होते पैसे) हे नक्की. किती मिळाले होते हे मात्र आठ्वत नाहीये.
१००
१००
घरबसल्या इ-तिकीट काढता येणे
घरबसल्या इ-तिकीट काढता येणे हे सध्याचे अतीव सुख आहे. आता तिकीटाचा एसेमेस्च पुरतो. कागद बचतीसाठी तिकीट छापू नका असे रेल्वेचे आवाहन आहे. एक काळजी मात्र सर्वान्नी जरूर घ्यावी. एसेमेस च्या जोडीला डायरीत पीएन आर क्र. हाताने लिहून ठेवावा. नियम असा आहे की ति. तपासणीच्या वेळी जर तुमचा मोबाइल अथवा संगणक अचानक बंद पडला तर ५० रू. दंड आहे. संमंजस तपासनीस लिहीलेला पीएन आर व आपले ओळखपत्र यावर आपल्याला माफ करू शकतो.
काय मस्त आठवणी आहेत
काय मस्त आठवणी आहेत ट्रेनविषयीच्या!
लहानपणी मला ट्रेनमधुन प्रवास करावा असे खुप वाटे, पण गाव कोकणात असल्याने एस.टी. ला पर्यायच नव्हता, आता मात्र हैद्राबाद-मुंबई अश्या वार्या दर महिन्याला ठरलेल्या आहेत.
हैद्राबाद - मुंबई या रुटला असा रुळलोय की एकएक स्टेशन, त्यावर मिळणारे पदार्थ, फेरीवाले, एवढेच काय ठराविक ठिकाणी चढणारे ठराविक भिकारीदेखील माहिती झालेत.
हैद्राबादवरुन दुपारी ३ ला सुटणारी हुसेनसागर माझी आवडती गाडी. आवडती यासाठी की या गाडीमुळे हैद्राबादमधुन लवकर निघता येते नि घरी लवकर म्हणजे पहाटेच पोहचता येते. शिवाय खाण्याचे शेड्युलपण नीट जमते.
म्हणजे हैद्राबाद्ला गाडीत चढल्याचढल्या वरचा बर्थ गाठून झोपायचे, संध्याकाळी ६ वाजता वाडी आले की मस्त केळीच्या पानावर इडली, वडा, चटणी खायची, रात्री ९-९.३० ला सोलापूरला पावभाजी, नाहीतर पुरीभाजी खायची आणि मग जी ताणून द्यायची ती पहाटे कल्याण आले कीच उठायचे.
खुप सार्या आठवणी आहेत, नंतर सवडीने लिहीन.
एकाच स्टेशनातून ब्रॉड गेज,
एकाच स्टेशनातून ब्रॉड गेज, मीटर गेज आणि नॅरो गेज असा प्रवास कोणी केला आहे का ?
आख्ख्या भारतात फक्त मिरजेच्या स्टेशनातच हे तीन्ही मार्ग होते.
स्पार्टाकस - नॅरो गेज म्हणजे
स्पार्टाकस - नॅरो गेज म्हणजे मिरज-पंढरपूर का?
@कुमार१ ,धन्यवाद मोबाईल
@कुमार१ ,धन्यवाद मोबाईल माहिती बद्दल .
@अल्पना ,तुमचे दहा वर्षाँपूर्वी बरोबर होते आणि आजही तसेच बरोबर आहे .तुम्ही जे टीसीकडून लिहून
घेतले त्या चिठीला रेल्वेच्या भाषेत "टि डी आर"TDR म्हटतात .याचे रिफंड नंतर एक आठवड्यात 'क्लेम' करूनही मिळतात .
एका शिंदे नावाच्या टीटीई ने जन्युअरी ते नोव्हेंबर २०१३ अकरा महिन्यांत दोन कोटी रुपयांच्या दंडाच्या पावत्या फाडल्या .फक्त मे महिन्यात वीस लाखांवरची रक्कम आहे .तेव्हापासून रेल्वे खडबडून जागी झाली आहे .किती मोठा धपला होतो .
आपण जी कडुनिंबाची पाने हारात घातलेली पाहातो
त्यांचे भारे कातकरी बायका
रेल्वेच्या मनभाड कडून येणाऱ्या गाड्यांच्या टॉईलटमधून आणतात .त्यांच्याकडून टीटीई दहा वीस रुपये घेतांना मीपाहिले आहे .
एकदा दसऱ्याच्या अगोदर तर एकाने "परवा येतांना आपट्याची पाने आणचील का ?" अशी "रिक्वेस्ट" केली .लाचारी अधिक गरीबी चे उदा .
खरोखरच रेल्वे सर्वांनाच जोडते .
@स्पार्टाकस ,खांडवा ला पंजाबमेलने उतरून मिटरगेजने २ वर्षाँपूर्वी ओंकारेश्वरला गेलो होतो .मिरजेला आता फक्त
ब्रॉडगेज आहे .
(संपादित) .
फारएण्ड, हो, नॅरोगेज म्हणजे
फारएण्ड,
हो, नॅरोगेज म्हणजे मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी, मीटर गेज बेळगाव मार्गे हुबळी / वास्को कडे जाणारी आणि ब्रॉड गेज पुण्याला जाणारी.
मावशी मिरजेत राहत असल्याने एका सुटीत मिरज-पंढरपूर नॅरो गेजने, पंढरपूर नंतर सोलापूर-विजापूर-गदग-हुबळी-मिरज मीटरगेजने आणि मिरज-मुंबई ब्रॉडगेज अशी त्रिगेजी यात्रा (त्रिस्थळी सारखी) घडली होती.
आता मिरजेत फक्त ब्रॉड गेजच शिल्लक आहे.
Srd,
खांडव्यावरुन मीटरगेजने ओंकारेश्वर-महू मार्गे मी इंदोरचा प्रवास केला आहे. मीटरगेजने गुजरात आणि राजस्थानमध्येही भरपूर भटकंती झाली आहे.
तीच 'बार्शी लाईट' ना
तीच 'बार्शी लाईट' ना स्पार्टाकस? तिच्याबद्दल अनेक कहाण्या ऐकलेल्या आहेत. एकच गाय चरता चरता अनेक वेळा मधे यायची ई. गाडीतून मधे उतरून टाईमपास करून पुन्हा पकडण्याएवढी स्लो ती जात असे (पूर्वीची) असे लोकांकडून ऐकले होते.
मी भारतीय आगगाड्यांवर एक
मी भारतीय आगगाड्यांवर एक कविता लिहायला घेतली आहे बघूया कितपत पुढे जाते. मला आपल्या आगगाड्याची नावे फार आवडतात.
पोलादी आयुष्य माझे
फिरते भारत सारा,
वाढता वाढता वाढे
माझा रुळ्-पसारा
इतिहासाची साक्ष मी,
मी 'ऑगस्ट क्रांती',
जनमाणसातील दुवा मी,
मी आहे 'संपर्क क्रांती'
टागोरांची 'गीतांजली' मी
माउलीची 'ज्ञानेश्वरी' मी
प्रेमचंदची 'गोदान' मी
नझरुलची 'अग्नीवीणा' मी
दिल्लीची 'राजधानी' मी
मी नेताजींची 'आझाद हींद'
कोल्हापुरची 'महालक्ष्मी' मी
मी गांधीजींची 'अहिंसा'
कोकणची 'कोकणकन्या' मी
सोलापुरी 'सिद्धेश्वर'
उज्जैनची 'अवंतिका' मी
एंम्.पी .यु .पी. 'फ्राँटीयर'
बोगद्यात घुसमटते जरी
तरी 'डेक्कन क्वीन'च मी
'रो-रो'कर हैराण जरी
'नेत्रावती ' अजूनही मीं
हा नोड बघा: http://www.maayboli.com/node/12943 मागे इथे हीच कविता लिहिली होती. चवथे कडवे प्रकाश काळेलनी लिहिले होते. पाचवे छायानी. सहावे भाउ नमसकरांनी. छान ना:)
बार्शी लाइटचे रुळ बघायला
बार्शी लाइटचे रुळ बघायला मिळतील. रोड साईडलाच आहेत. कुर्डुवाडी ते बार्शी रस्त्यावर.
मी केलाय ब्रॉड-मीटर-नॅरो गेज
मी केलाय ब्रॉड-मीटर-नॅरो गेज प्रवास एकाच स्टेशनावरून बरेचदा
पुर्वी गोवा-निजामुद्दीन, बेंगलोर वरून उत्तरेकडे जाणार्या गाड्या मिरज स्टेशनवर बदलत. मग लोकं/सामान असं सगळं प्लॅटफॉर्म ४-५ वरून २-३ वर शिफ्ट होत असे. हमालांचा धंदा बराच होत असे तेव्हा. नॅरोगेजचे स्टेशन वेगळे होते म्हणजे लागूनच होते शेजारी पण समांतर प्लॅटफॉर्म नव्हते त्याचे.
मी एकदा नदीला पूर आल्यामुळे रस्ता बंद होता म्हणुन कुर्डुवाडी गाडीत चढून शेताजवळ आल्यावर बाहेर उडी मारून उतरलो होतो. निवांत गाडी होती ती. आमच्या वर्गातले सोलापूर, कुर्डुवाडी, बार्शी, लातूर पब्लिक त्यात तिकीटं न काढता सेमिस्टर संपल्यावर घरी जात असत कारण कुणाकडे पैसे शिल्लक नसत.
स्पार्टाकस ,ती अकोला रतलाम
स्पार्टाकस ,ती अकोला रतलाम मिटरगेज खूप वेगात जाते .पैसेंजर असून
साठ किमी साठ मिनीटांत जाते या गाडीत खरा भारत भेटतो .
बी ,तुमची कविता या धाग्याला अगदी योग्यच झाली आहे .छान आहे .संपादन करून सुरुवातीलाच उचला .
फारएण्ड ,कुणाचं भाषण
फारच लांबलं की तुमचं बार्शि लाईट झालं की हो !
म्हणायचे .
टण्या ,तमच्या 'वारी'चं अजून मनावर घ्या .रेल्वेवर
एखादे ललित येऊ द्या .
फारएण्डा, तीच ती बार्शी
फारएण्डा,
तीच ती बार्शी लाईट.. पंढरीच्या वारीच्या वेळेला लोक कुर्डुवाडीहून टपावर बसूनही प्रवास करत असत. मी देखील तो अनुभव घेतला आहे. सायकल बरी अशा वेगात ती गाडी जात असे नॅरो गेज असताना
टपावर बसून प्रवास करण्याचा दुसरा अनुभव म्हणजे १९८३ च्या दिवाळीत अहमदाबाद ते अबू रोड मीटर गेजच्या टपावरुन ! आठव्या वर्षी केलेला तो भन्नाट प्रवास काल केल्यासारखा मला आठवतो. मजा म्हणजे, वाटेत मेहसाणा स्टेशनात टी.सी. चक्क टपावर येऊन तिकीटं तपासून गेला होता !
माझ्या आठवणीत १९८२ पासून अखंड भारतभर रेल्वेप्रवास झाला आहे. आई-बाबांना भटकंतीची प्रचंड हौस आणि त्यामुळे दर सुटीत कुठेतरी फिरायला जाणं हे नेहमीचंच. त्या वेळेपासून रेल्वेच्या एकापेक्षा एक आठवणी आहेत. वेळ मिळेल तेव्हा पोस्टेन.
Srd,
अकोला - रतलाम अद्यापही मीटरगेज आहे का ? ब्रॉडगेज करणार होते ना ??
मीटर गेज आणि ब्रॉड गजे मधला
मीटर गेज आणि ब्रॉड गजे मधला फरक सांगाल का कुणी? मी अकोल्याचा आहे. खूपदा तेथून विदर्भ, गीतांजली, हावरा घेतलेली आहे.
बी, मीटरगेजमध्ये दोन
बी, मीटरगेजमध्ये दोन रुळांमधलं अंतर एक मीटर असतं. ब्रॉडगेज मध्ये ते १ मीटरपेक्षा जास्त असतं (१.४ की १.५ मीटर. आता आठवत नाहीये, नक्की अंतर). आणि मॅरो गेज मध्ये हे अंतर एक मीटरपेक्षा कमी असतं.
अकोल्याला ब्रॉडगेज आणि
अकोल्याला ब्रॉडगेज आणि मीटरगेज असं दोन्ही आहे. रतलामपर्यंतचा मार्ग अजूनही ब्रॉडगेज झालेला नाही.
गओवा-मिरज मीटरगेजने आणि तिथून भुसावळपर्यंत ब्रॉडगेजने असा प्रवास मीही केलाय. काल्का-शिमला नॅरोगेजमध्ये बसलोय. बार्शी लाईट आणि शकुंतला या दोघींमध्ये बसायचं राहिलं.
अल्पना, एक रेल्वे कुठल्यानी
अल्पना, एक रेल्वे कुठल्यानी रुळावरुन म्हणजे नॅरो, ब्रॉड, मीटर गेज वरुन धावू शकते का?
शंकुतला आता बंद पडली आहे ना? यवतमाळवरुन निघायची असे आठ्वते.
बंद पडून पुन्हा सुरू झाली
बंद पडून पुन्हा सुरू झाली होती. सध्याचं माहीत नाही, बघायला हवं.
नाही. म्हणून तर ब्रॉड गेजवरून
नाही. म्हणून तर ब्रॉड गेजवरून मीटर गेजवर जाताना सामान घेवून दुसरीकडे (दुसर्या ट्रेनमध्ये) जावं लागायचं /लागतं.
एक रेल्वे कुठल्यानी रुळावरुन
एक रेल्वे कुठल्यानी रुळावरुन म्हणजे नॅरो, ब्रॉड, मीटर गेज वरुन धावू शकते का? >> शक्यतो नाही. कारण चाकांमधली जागा कमी-जास्त कशी करणार. कधी कधी डब्यांना दोन्ही लांबीवर चाके लावून रेल्वेने प्रयत्न केले होते असे वाचले आहे (गेज बदलतानाच्या मर्यादित काळात). पण ते ही बहुधा लाईट रेल च्या बाबतीत होते.
याव्यतिरिक्त एक "स्टॅण्डर्ड गेज" आहे. भारतात नेहमीच्या रेल्वेसाठी वापरत नाहीत पण मध्यंतरी मेट्रो करिता वापरणार होते. दिल्लीत बहुधा वापरतात. त्याची लांबी मीटर व ब्रॉड च्या मधे आहे. अमेरिकेत व इतर बर्याच देशांत ते वापरतात.
धन्यवाद!!! छान माहिती मिळाली.
धन्यवाद!!! छान माहिती मिळाली. मी आजवर फक्त ही नावे ऐकून होतो.
हा बाफ चित्रांनी मढवायला हवा त्याशिवाय मौज मस्ती येणार नाही प्रवासाची!!!!
तुमच्या पैकी कुणी वेटींग रुम मधे आराम केलेला आहे का? मी फ्ल्रोरेन्सला असताना बाहेर पाच वाजले होते पहाटेचे. पाय लटपट कापत होते. माझे हॉटेल मला सातला मिळणार होते. दोन तास मी फ्लोरेन्सच्या वेटींग रुम मधे घालवले. तिथल्या रेल्वे, स्टेशन भारतापेक्षा खूप असे काही वेगळे नाही.
फ्रान्समधे असताना मार्सेई ते पॅरीस असा दोन्हीकडचा प्रवास केला १८०० किलोमीटर अंतर फक्त ६ तासामधे!!! अत्यंत प्रचंड वेगाने धावते फ्रान्सची ट्रेन टी. व्ही. जी. पण आतमधे बसून गाडीचा वेग कासवगतीचा वाटतो. बाहेरुन सू सू सूसाट जाते आहे असे दिसते.
Pages