भारतीय रेल्वे जिव्हाळ्याचा विषय

Submitted by हर्ट on 19 February, 2014 - 20:44

नमस्कार, तुम्ही आम्ही आपल्यापैकी अनेकांनी रेल्वेमधून प्रवास केलेले असतील. इथे तुम्ही तुमच्या आवडती रेल्वे , अधेमधे येणारी गावे, तालुके, जिल्हे, निसर्ग, झाडीझुडी, खा-प्यायचे पदार्थ, भेटलेले व्यक्ति आणि वल्ली, अलिकडे झालेले बदल, रेल्वेची नावे - नदीवरुन, इतिहासावरुन - ह्या सर्वांची रसभरीत चर्चा इथे करा.

पोलादी आयुष्य माझे
फिरते भारत सारा,
वाढता वाढता वाढे
माझा रुळ्-पसारा

इतिहासाची साक्ष मी,
मी 'ऑगस्ट क्रांती',
जनमाणसातील दुवा मी,
मी आहे 'संपर्क क्रांती'

टागोरांची 'गीतांजली' मी
माउलीची 'ज्ञानेश्वरी' मी
प्रेमचंदची 'गोदान' मी
नझरुलची 'अग्नीवीणा' मी

दिल्लीची 'राजधानी' मी
मी नेताजींची 'आझाद हींद'
कोल्हापुरची 'महालक्ष्मी' मी
मी गांधीजींची 'अहिंसा'

कोकणची 'कोकणकन्या' मी
सोलापुरी 'सिद्धेश्वर'
उज्जैनची 'अवंतिका' मी
एंम्.पी .यु .पी. 'फ्राँटीयर'

बोगद्यात घुसमटते जरी
तरी 'डेक्कन क्वीन'च मी
'रो-रो'कर हैराण जरी
'नेत्रावती ' अजूनही मीं

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईतून गुजरातकडे जाणाऱ्या पैसेंजर गाड्या खूप आहेत कारण तिकडे घाट नाही . इकडे म०रे० ला नाशिक आणि पुण्याकडे जातांना घाट येतात त्यामुळे मारून मुटकून केवळ एक भुसावळ गाडी दिवसा आहे .

युपी कडे जाणा-या गाड्या हा गलिच्छपणाचा राष्ट्रीय निर्देशांक असतो.

कसारा लोकल चुकल्यामुळे कल्याणाला एकदा नाशिकला जाण्यासाठी सकाळच्या गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये चढलो होतो. डब्यात शिरताच मोहरीच्या तेलाचा भयानक वास आला. लोक सकाळी सकाळी तेलाने थबथबलेले डाळवडे खाऊन वायूप्रदूषण वाढवत होते. दातून नावाच्या कांड्या चावून तो चोथा थुंकण्याचा सामुदायिक कार्यक्रम जोरात सुरु होता. कहर म्हणजे दोन बाकांच्यामध्ये पोरांना कागदावर शी करायला बसवलं होत..!! नाशिकपर्यंत तिकीट असूनही कसा-याला गाडीतून उतरल्यावर पुन्हा चढायची हिम्मत झाली नाही !

त्या दिवसापासून आजतागायत कधीही युपी च्या ट्रेन मध्ये चढलेलो नाही.

फक्त नाशिकला जाणारी गाडी सकाळी नाहीच .भुसावळ पैसेंजर वाटेत एक तास थांबवून ठेवतात तर तिला मुळातच तासभर उशिरा सोडायला हवे आणी दोन डबे रिजवचे ठेवायला हवेत .पुणे -भुसावळ इक्स सुरुवातीला सकाळी नाशिककडे होती तिलापण उलट केले .तपोवन ठीक आहे पण धुळे जळगावला कामाची नाही .थोडक्यात सांगायचे म्हणजे स्पार्टाकस युपीच्या गाड्यांशिवाय पर्याय नाही .(कसारा लोकल अधिक टैक्सीच्या येण्याच्या वेळी सातचे टैक्सीवाले फार गंडवतात ) .

घाट चढायला कर्जत कसाऱ्याला गाडीला मागे दोन/ तीन एंजिने लावावी लागतात त्यामुळे थेट पैसेंजर वाढवत नाहीत .

पण तशी इंजिने एक्स्प्रेसलाही लागतातच ना? मग पॅसेंजर ला लावण्यात काय प्रॉब्लेम आहे रेल्वेला? आजकाल टाईम टेबल मधे पॅसेंजर गाड्या कमी दिसतात हे खरे. पूर्वी पुण्याहून रात्री सुटून एकदम पहाटे मुंबईला पोहोचणारी एक होती. ती नंतर बंद झाली व तिच्याऐवजी दुसरी कोणतीतरी गाडी सुरू केली होती.

सकाळी मुंबईहून नाशिकला कसारा लोकल + एसटी हा पर्याय सोयीचा वाटतो. ती पुण्याहून जाणारी गाडी कधी जाते माहीत नाही.

>>युपी कडे जाणा-या गाड्या हा गलिच्छपणाचा राष्ट्रीय निर्देशांक असतो. << +१०००००००००००
अंगाला व त्यांच्या जेवणाला पण विचित्र वास. टीसीला पण बाहेर फेकतील. आणि दादागिरी करून कुठल्याही एसी डब्यात घुसून बसतील घाण करत/सोडत. पोरं पण इतकी असतील ना कि ढिगाने इथे तिथे पसरलेली दिसतील.

कोकण रेल्वे आता खूप खराब झाली. ९८ मध्ये वगैरे छान होती. .

गीतांजलीने कोणी कोलकत्याला गेलय का? बाहेरचा रस्ता सुंदर पण आतले प्रवासी जरा त्रासदायकच.

मी बर्‍याच वर्षांपूर्वी गेलोय. तेव्हा फार जबरी होती ती. खूप कमी स्टेशने घ्यायची (मेल ई च्या तुलनेत) आणि दुसर्‍या दिवशी बहुधा १-१:३० पर्यंत पोहोचायची हावड्याला. आता स्टेशने वाढवली आहेत असे ऐकले.

कोकण रेल्वेवरच्या गोवा मंगळूरपर्यंत धावणार्या गाड्या चांगल्या असतात, ती स्टेशनपण खूप स्वच्छ आहेत. शिवाय इथले टीसी कायम मदत करनारे मिळालेत. (टीटीईसुद्धा)

झंपी, ९८ मधेय वगैरे गाड्याच किती होत्या त्या रूटवर? शिवाय तेव्हा सर्वच नवं नवं. आता बर्‍यापैकी गाड्या झाल्यात आणि कनेक्टीव्हीटी वाढली आहे.

या धाग्यावर कुणी वापी स्टेशनची आठवण काढेल असं वाटलं नव्हतं Wink
(वापी स्टेशनवर काही विकत घेऊन खाणे - ही कल्पनाही सहन झालेली नाही मला :फिदी:)

http://www.loksatta.com/vruthanta-news/now-cidco-railway-for-panvel-to-k...
या बातमीत कर्जत - पनवेल रेल्वे मार्गाचा उल्लेख आहे. पण नीट कळत नाही नक्की काय बांधणार आहेत. कर्जत- पनवेल मार्ग ऑलरेडी सुरू आहे. पुणे-नाशिक गाडी तेथूनच जाते. डेक्कन क्वीनही तेथून नेण्याबद्दल मधे विचार चालू होता. मग हे ट्रॅक्स वाढवणार की काय कळत नाही.

पुणे-रत्नागिरी गाडी सुद्धा व्हायला हवी. कर्जत-पनवेल मुळे आता मोठा वळसा पडणार नाही (दिव्यावरून) पूर्वीसारखा.

कर्जत- पनवेल मार्ग ऑलरेडी सुरू आहे. पुणे-नाशिक गाडी तेथूनच जाते.>>>>>>>प्रगती एक्सप्रेसपण याच मार्गावरून जाते ना?

प्रगती काही काळ चालवली जात होती, आता नाही>>>>>अजुनही आहे.
मुंबई-पुणे प्रवासात "पनवेल"चा थांबा दाखवतोय. Happy
indianrail.gov.in

गीतांजलीने कोणी कोलकत्याला गेलय का?
----- गीतांजली एक्सप्रेस १९७७ मधे सुरु झाली.... सर्वात पहिला दिवस मला अजुनही आठवतो... गाडीच्या पहिल्या दिवशी आगमनाच्या वेळी होणारा स्वागत सोहळा दाखवायला वडील आम्हा दोन भावन्डाना घेऊन अकोला स्टेशनात गेले होते.

भारताची रेल्वे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी लहान असतानाचे दिवस आणि आता बरिच प्रगती झालेली आहे... आम्ही बाहेर गावी जाण्यासाठी स्टेशनवर गाडी पकडायला यायचो.... "गाडी अनिश्चित काल के लिये देरिसे चल रही है.... " अशी घोषणा किवा "१/२ तास उशिर..." मग १/२ तास सम्पायच्या आधी "गाडी १ घन्टा देरिसे आनेकी सम्बावना है"... तो काळ सम्पायच्या आधी "गाडी ३ घन्टा देरिसे आनेकी सम्बावना है".

लाम्ब पल्ल्याच्या गाड्या हमखास उशिरा धावणार.... वेळापत्रक कोलमडलेले असायचे.

२००९ किवा २०१३ मधे परिस्थिती खुप बदललेली आहे. जम्मू, दिल्ली, हावरा, चेन्नई अशा लाम्ब पल्ल्याच्या गाड्या मिनीट अन्तराने वेळेवर धावत आहेत. उशिर फार क्वचित प्रसन्गी होतो आणि वेळेमधे कमालीची शिस्त आलेली आहे.

आधीच्या स्टेशनवर गाडी आल्याची सुचना देण्यासाठी धातूची थाळी आणि दान्डा शा घन्टीचा वापर व्हायचा... २ वेळा (आधीच्या स्टेशन्वर ?) किवा सतत ८-१० वेळा (नुकतीच स्टेशनवर प्रवेश करत आहे) वाजवण्याचे वेग वेगळे सन्केत होते.

आमच्या घरी येणार्‍या बाबान्च्या मित्र मन्डळीत काही ड्रायव्हर काका पण असायचे त्यामुळे सर्व प्रकारच्या (कोळशाचे, डिझेल, इलेक्ट्रिक) इन्जीन मधे बसण्याचे भाग्य मला मिळाले आहे. कोळशाच्या इन्जीनची कर्कश्श शिटी वाजवता येत नव्हती (टान्गलेली वायर शक्तीने ओढायची असते)... अनेक प्रयन्त केले - प्रसन्गी काका लोक त्या तारेला लटकवायचे. शिटी वाजवायला विजेचे इन्जीन अगदी सोपे - एक कळ दाबायची.

ड्रायव्हर - गार्ड यान्चे आयुष्य अत्यन्त धाकाधकीचे असते... कुठल्याही वेळी पुस्तक (ड्युटीवर हजर रहाण्याची ऑर्डर) येणार. बहुतेक वेळी केवळ दोन तासाची पुर्वकल्पना असते. काम कराणार्‍यान्ची रात्र-दिवस झोपेचे खोबरे होते. अत्यन्त अनियमीत झोपेच्या वेळा, अनियमीत वेळी जेवण यामुळे विविध शारिरीक विकार, कर्कस्श शिट्यान्मुळे कान अर्धे निकामी होतात. भर म्हणुन रात्री जागे रहाण्यासाठी व्यसनाची सोबत. Sad

पुन्हा कधी तरी....

खरेच, त्या रेल्वेस्टेशनच्या कंपाऊंडच्या आत एक वेगळीच दुनिया असते. पूर्वी स्टेशनात - स्टेशनमास्तरांच्या खोलीत - रेल्वेचे प्रायवेट फोन असत. हँडल मारून चार्ज करून मग त्यावर इतर स्टेशनांशी हॉटलाईन संपर्क होत असे. ते कुणाकुणाला आठवताहेत?

ससूनला होस्टेलला असताना पुणेस्टेशनच्या कँटीनमधे स्वस्तात मस्त मिळणारं नॉनव्हेज जेवायला रविवरी रात्री आम्ही लोक जात असू. प्लॅटफॉर्म तिकिटही अर्थातच न काढता. स्टेशनच्या पलिकडे आजकाल ला मेरिडियन हॉटेल आहे, तिकडून एक पादचारी पूल आहे. तो अर्थातच स्टेशनात उघडतो. पण आमच्या कॉलेजची बसने येणारी काही मुले तिथे उतरून शॉर्टकट म्हणून आरपार येत, अन नेहेमीच्या टीसी लोकांना आम्हा मुलांकडे दुर्लक्ष करण्याची सवय होती.

उदय,

>> ड्रायव्हर - गार्ड यान्चे आयुष्य अत्यन्त धाकाधकीचे असते...

अगदी अगदी! मुंबईच्या उपनगरीय गाड्यांविषयी इथे काही लेख आहेत (इंग्रली दुवा) : http://trainweb.org/railworld/Memories/ अर्थात, इथले सगळे लेख धकाधकीबद्दलचे नाहीत.

part1 ची ष्टोरी ज्याम खत्तरनाक आहे!

आ.न.,
-गा.पै.

प्रगती पनवेलवरून जात नाही का आता? मी नुकतीच आई-वडिलांची प्रगतीची तिकिटे काढली आहेत पनवेलला जाण्यासाठी ह्या येत्या शनिवारती Sad

मला वापी स्टेशनच्या बाकड्यावर डुलकी लागली आणि बऱ्याच गाड्या गेल्या वाटतं (पोष्टी पडल्या).

गाडीत पेपरवर मुलांना ---त्याला ई पेपर म्हटतात .
रेल्वेने तिकीट दिले म्हणजे पनवेल स्टॉप असणारच .कोणत्याही गाडीचे ट्रेन शेड्यूल पाहावे आणि सुटल्यावर ट्रेन रनिंग इनफमेशन उघडावे .अचूक माहिती .

कोकण रेल्वेत काही गाड्यांना थोडा अव्यवस्थितपणा आला हे खरं आहे .हावडा आणि इतर कोलकाता गाड्या नक्षलवादी भागांतून जातात त्यामुळे वेळेचा भरवसा नसतो .

http://www.loksatta.com/vruthanta-news/deccan-queen-engine-driver-nitana...

गेली १२ वर्षे डेक्कन क्वीन चालवणारे चालक निवृत्त.

यात सनईचा उल्लेख आहे. मला डेक्कन च्या वेळेस आठवत नाही पण बहुधा सिंहगड सुटायच्या वेळेस पहाटे पुणे स्टेशन वर सनई ऐकल्याचे अंधुक आठवते. कोणाला लक्षात आहे का?

मुंबई-पुणे मार्ग आता पूर्ण एसी ट्रॅक्शन चा झाला का? मुंबई-कल्याण झाला असे या बातमीत आहे. बदलापूर च्या आसपास डीसी-एसी बदलणे सध्या चालू होते असे वाचले होते.
http://www.loksatta.com/mumbai-news/central-railway-block-on-saturday-10...

म्हणजे काय ते मला काहीच कळलं नाही ..

पण परवाच ह्या बीबी ची आठवण झाली होती .. इकडच्या एका कथेत गीतांजली चं वर्णन वाचून ..

आमच्या मातोश्रींकडून गीतांजली एक्प्रेस चं असंच भारी कौतुक ऐकत आले होते .. पण कधी झालंच नाही गीतांजली ने प्रवास करणं ..

ह्या वर्षीच्या भारतवारीत मात्र राजधानी एक्स्प्रेस मधून जाण्याचं स्वप्न पूर्ण झालं .. (ज्याकाळी हे "स्वप्न" म्हणून डोक्यात बसलं तेव्हा मी विमान प्रवास केला नव्हता .. फारीन ला आले नव्हते .. त्यामुळे प्रचंड अप्रूप होतं .. त्या अप्रूपाला पुरेसा अनुभव कदाचित नसावा आता (दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत प्रकार) ..पण तरिही खूप मजा आली .. कुटूंब कबिला बरोबर होता त्यामुळे पूर्ण वेळ खिडकी मिळाली नाही पण तर्ही खूप मजा आली .. भारतीय रेल रॉक्स् .. Happy

सशल, आणखी माहिती येथे मिळेल.
http://en.wikipedia.org/wiki/Railway_electric_traction#India

मध्यंतरी डेक्कन क्वीन कल्याण च्या जवळ पेंटोग्राफ खाली घेउन पुन्हा दुसरा पेण्टोग्राफ वर घेताना असे व्हिडीओज आले होते, कारण तेथे ट्रॅक्शन बदलत असे.
https://www.youtube.com/watch?v=7Ce4rXcLCUo

आता राजधानीचे अप्रूप वाटणार नाही एवढे कदाचित. पण मी एक दोन वर्षांपूर्वी शताब्दीने सोलापूर पर्यंत गेलो होतो तेव्हा इंटरेस्टिंग वाटला होता प्रवास. मोठ्या प्रवासाला मात्र कंपनी चांगली पाहिजे तर मजा येइल.

गीतांजली ने मी अनेक वर्षांपूर्वी (ती जुनी इंजिने असत त्या काळात) हावड्यापर्यंत गेलो होतो. मजा आली होती. तेव्हा प्रत्येक जाणारे स्टेशन बघायलाच हवे या ह्ट्टाने खिडकीत बसून पाहिले होते. तेव्हाची गीतांजली अत्यंत कमी स्टेशने घेत असे, नंतर ती वाढवली बहुधा.

मुंबईहून कलकत्त्याला "व्हाया नागपूर" व "व्हाया अलाहाबाद" असे दोन रूट्स आहेत. तेव्हा दोन्हीकडून जाणार्‍या कलकत्ता मेल्स होत्या. त्याबद्दलची चर्चा गाडीत झाल्यानंतर जेव्हा कसारा की इगतपुरी आले तेव्हा माझा लहान भाऊ "व्हाया नागपूर आले" असे म्हंटला व आजूबाजूचे सगळे हसू लागले. सहप्रवाशांशी गप्पा सुरू व्हायला जो आईसब्रेकर लागतो ते तेथे मिळाला. नंतर दुसर्‍या दिवशी दुपारी पोहोचेपर्यंत एकत्र म्हणजे गप्पा होतातच.

गीतांजलीने मी २००० ते २००४ असा चार वर्षे तर तीन महिन्यांनी कलकत्ता - मुंबई - कलकत्ता प्रवास करत असे. तेव्हा ही गाडी सुसाट वेगाने आणि खूप कमी स्टेशने घेत जात असे. माझ्या आठवणीत इगतपुरी - भुसावळ - अकोला - बडनेरा - नागपूर आणि मग पुढे!

किती दिवसांनीं हा बीबी वर आला .. Happy

डेक्कन क्वीन चा वाढदिवस पुण्याला का म्हणून साजरा केला, मुंबईला का नाही असा एक लबाड विचार माझ्या डोक्यात आल्यावाचून राहिला नाही .. Wink

१२० किलो च्या केकमागचं गुपीत काही कळलं नाही .. ८५ वा वाढदिवस तर १२० किलोचा केक का हे कोडं सोडवावं लागणार आता .. Wink

Pages