मराठी विकिला चाळीस हजारी टप्पा गाठायला आता अजून फक्त १९१ लेख हवे आहेत.
२७ फेब्रुवारी या मराठी दिवसाच्या आधी मराठी विकीला चाळीस हजार लेखांच्या टप्प्यावर घेऊन जाऊया! या साठी अजून जवळपास महिन्याभराचा कालावधी आहे.
विकिवर कस्काय लिहायचे बॉ?
मराठीविकिवर लेखन करणे अगदी सोप्पे आहे. आपल्याला हवा तो शब्द शोधपेटीत शोधायचा तो लाल रंगात आला तर त्यावर टिचकी द्यायची की लेखनाची खिडकी उघडेल त्यात लिखाणास सुरुवात करायची. झाले!
मी काय लेख लिहू?
असा प्रश्न असल्यास आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याचा शोध घ्या. काही सापडले नाही तर लेख लिहून टाका. आपले आवडते विषय छंद यातले अनेक लेख लिहिता येतील.
किंवा एखादा इंग्रजी लेख दिसला आणि त्याचा मराठी दुवा दिसला नाही तर तो लेख लिहा. सगळा लेख लिहिलाच पाहिजे असे नाही. पण किमान १०० शब्दांची ओळख तरी लिहावी. विकि कॉमन्स वर असलेली चित्रे आपल्या लेखात लावता येतात.
नवीन त काय नाय् बॉ!
काही वेळा आधीच असलेल्या लेखात मोलाची भर घालता येईल. हे ही महत्त्वाचेच आहे. अगदी एका वाक्याची भर घालायलाही स्वागतच असेल.
लेखांची आणि पानांची शीर्षके (नावे) शक्यतो मराठी भाषेतच (देवनागरी लिपीत) असावीत असा मात्र मराठी विकिचा दंडक आहे.
अजून?
लेखन करताना आंतरविकिदुवे दिले तर लेखाचे मूल्य वाढते. हे दुवे देण्यासाठी चौकोनी कंस [[ ]] वापरता येतो. उदारहरणार्थ, [[बे एरिया]] या विभागामध्ये सुमारे २% [[मराठी]] भाषीक राहतात. यातले [[बे एरिया]] आणि [[मराठी]] हे आपोआप त्या त्या पानांवर जाणारे दुवे बनतील. शिवाय आपले विकिपान इंग्रजी पानाला जोडावे. जमले तर वर्गवारी करावी. म्हणजे शोध सोपा होतो.
मदत
याशिवाय काहीही मदत लागली तर मला विचारा. किंवा चावडी अथवा प्रचालकांना विचारा. तत्परतेने मदत मिळेल!
चला मग कामाला लागू या. आपल्या मराठी विकिला आता पुढे नेऊ या!
ही या विषयावर पूर्वी झालेली
ही या विषयावर पूर्वी झालेली चर्चा - http://www.maayboli.com/node/24419
हर्पेन आता आपल्या लेखातले
हर्पेन आता आपल्या लेखातले सगळे दुवे निळे होतील असे पाहायचे. म्हणजे लेखाची गुणवत्ता वाढते.
तुमची स्वतःची चित्रेही विकि कॉमन्स वर चढवले तर ती वापरता येतात.
मी काही दुवे निळे केले. अजून काही लाल आहेत. लाल अक्षरात असलेले दुवे म्हणजे तो लेख अजून लिहिला गेला नाही. त्या अक्षरांवर टिचकले तर लेखनाची खिडकी उघडते. त्यात त्या विषयी १०० - २०० शब्द तरी लिहायचे.
काय लिहायचे असा प्रश्न असेल तर त्याच विषयाचे इंग्रजी पान पाहायचे. त्यातून अने गोष्टी सापडतात. फात तांत्रिक बाबी नको असतील तर सिंपल इंग्लिशचे विकि पान पाहा. छोटे असले तरी विषयाची ओळख तेथे असते. तीच येथे ही हवी असते.
अरुंधती ५० म्हणजे छानच काम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो
आपण अनेकदा खुप डिजिटल फोटो काढतो. पण त्याचे काय करायचे असा प्रश्न असतो. मी असे फोटो माझ्या नावाने विकिला देतो. ते अनेक ठिकाणी वापरले जातात. नाव देण्याची अट असल्याने कुठे वापरले गेलेत ते कळत राहते.
मराठी विकिवर संचिका चढवा असा दुवा आहे त्यावरून विकि कॉमन्सला फोटो चढवता येतात.
निनाद, १ लेख लिहिला. टोमॅटोची
निनाद, १ लेख लिहिला.
टोमॅटोची कोशिंबीर
आणि तो महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ इथे जोडला.
पण जेव्हा मी 'टोमॅटोची कोशिंबीर wiki' असं गुगल करते. तेव्हा काहीच रिजल्ट येत नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
चेरी लेख छान झाला आहे. विकि
चेरी लेख छान झाला आहे. विकि कॉमन्सवर फोटो द्या ना. मला कॉमन्सवर मिळाला नाही.
मी टोमॅटोची कोशिंबीर असा शोध घेतला तर विकि मला तुमच्या लेखावर घेऊन गेला.
अवांतरः विकि हा एक संदर्भस्रोत आहे. तेव्हा येथे लेख लिहिताना गोष्टी संदर्भ म्हणून वापरता येतील याच पद्धतीने लिहिल्या पाहिजेत असे वाटते. त्यामुळे लिखाण करण्या आधी इतर लेखही पाहावेत/वाचावेत असे सुचवतो.
निनाद.. नक्की प्रयत्न करेल
निनाद.. नक्की प्रयत्न करेल लिहायचा. आभार !!!
चेरी, टोमॅटोची कोशिंबीर
चेरी, टोमॅटोची कोशिंबीर mr.wikipedia असा सर्च द्या तुमचे पान पहिलेच येते आहे.
मला विकीपीडीयावर लेख द्यायचा
मला विकीपीडीयावर लेख द्यायचा आहे " उर्दु लिपि का व कशी शिकावी , शिकणे किती सोपे आहे "
ह्या साठी लेख कोठे व कसा द्यावा , हे कुणीतरी सान्गेल काय ?
निनाद, धन्यवाद या
निनाद, धन्यवाद या धाग्याबद्दल. विकिपीडिया भारी आहे. आणि काही काही लेख खूपच माहितीपूर्ण आहे. जसेकी सातवाहन राजवंश. फार सुंदर माहिती आहे. मी अनोळखी किल्ल्यांची माहिती/लेख लिहित असतो विकिवर. कालच मला १५+ संपादने केल्याचा मेल आला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निनाद मी नक्की लेख
निनाद
मी नक्की लेख लिहीन.
बासरीबद्दल थोडं तांत्रिक असं मराठीतून लिहिण्याचा मानस अनेक दिवस होता. तो पूर्ण करेन.
माझे अहिराणी भाषेचे
माझे अहिराणी भाषेचे खान्देशबद्दलचे लेख टाकले तर चालतील का?
पण माझा कानबाईबद्दलचा लेख ऑलरेडी कुणीतरी विकीवर टाकलाय.
jayantshimpi - विकिवर
jayantshimpi - विकिवर https://mr.wikipedia.org/wiki/उर्दु हा लेख पाहा. तेथे जाण्काराची गरज आहेच! त्यातल्या 'स्त्रोत संपादन करा' या अक्षरांवर क्लिक करा. उघडलेल्या खिडकीत तुमचे लेखन करा. नंतर जतन करा.
त्यात तुम्हाला अनेक विभाग करता येतील. हा पहिलाच प्रयत्न असल्यास इतर लेख कसे लिहिले आहेत ते पाहा. मग या लेखाची सुरुवात करा. लेखाचा स्त्रोत पाहिल्या दुवे वगैरे कसे दिले जातात ते लक्षात येईल. काही मदत लागल्यास कळवा!
सुज्ञ माणुस - अरे वा! चांगले काम करत आहात! अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी_आर्या - तुम्ही इतिहास या अक्षरांवर क्लिक केलेत तर लेखाची चोरी कुणी केली आहे त्यांचा आय पी पत्ता नोंदवलेला आढळेल.
मी थोडा शोध घेतला तर हा पत्ता मांडवी, गुजरात येथला आहे असे दिसले.
तुम्ही या चोरीची फिर्याद चावडीवर करू शकता. दुवा: https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:चावडी येथे प्रचालकांना निवेदन द्या. त्या नंतर हा लेख काढून टाकला जाईल. या बाबतीत मराठी विकि कडक धोरण ठेऊन आहे. त्यासाठी आता अनेक गाळण्याही बनवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मोठा मजकूर विकिवर आल्यास तेथे लगेच 'मोठा मजकूर प्रताधिकार पडताळणी हवी' अशी गाळणी लागते. पण तुमचा लेख या गाळणीच्या आधी आल्याने तो अडकला नसावा व चोरी झाली.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मात्र तुमच्या लिखाणावरून असे दिसते की तुम्हाला कानबाई हा लेख मराठी विकिपिडिया येथे हवा आहे. तसे असेल तर त्याचे विकिकरण करणे जरूरीचे आहे. म्हणजे आंतरविकि दुवे देणे, शीर्षके देणे वगैरे.
तुमची परवानगी असेल तर मी यात मदत करू शकेन.
अहिराणी साठी हे पान पाहा
अहिराणी साठी हे पान पाहा https://mr.wikipedia.org/wiki/अहिराणी_बोलीभाषा
यात भर घालू शकता.
तसेच https://mr.wikipedia.org/wiki/मराठी_भाषा यातील मराठीतील बोली भाषा या भागात भर घालू शकाल.
धन्यवाद निनादजी!
धन्यवाद निनादजी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विकीपिडीयाचे सदस्यत्व घेतले आहे आणि तुम्ही दिलेल्या चावडी दुव्यावर तक्रार केली आहे.
बरेच मायबोलीकर लिहायला
बरेच मायबोलीकर लिहायला निघालेत की, मस्तच, तिथे आपापले लेख लिहुन झाले की आपापल्या लेखांचा दुवा इकडे द्याल तर बरे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिथे आपापले लेख लिहुन झाले की
तिथे आपापले लेख लिहुन झाले की आपापल्या लेखांचा दुवा इकडे द्याल तर बरे >> +१
चांगलं कामं करताय निनाद.
चांगलं कामं करताय निनाद. धन्स. प्रयत्न करेन.
पियू - लेखनाची सुरुवात करून
पियू - लेखनाची सुरुवात करून टाका. शुभस्य शीघ्रम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चैतन्य - https://mr.wikipedia.org/wiki/बासरी हा लेख पाहा त्यात अजून अनेक सुधारणा करता येण्या सारख्या आहेत. त्यासाठी तुमचे स्वागत असेल!
मी_आर्या - कानबाई माता हा लेख विकिवरून वगळला गेला आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आत तो लेख तुमची इच्छा असेल तर तुम्ही परत तेथे टाकू शकता.
विकिवर लेखाचा इतिहास अस्तित्त्वात असल्याने चोरी करून लेख चढवणे अशक्य असते. लक्षात आल्यावर असे लेख तातडीने वगळले जातात.
हर्पेन - उत्तम कल्पना. तुम्ही आधी येथे लेख देऊन मग विकिवर देऊ शकता. यामुळे त्यात काही सुधारणा आवश्यक असल्या तर त्याही येऊन जातात. लेखाच्या शीर्षकात मराठी विकिसाठी असा उल्लेख करा. म्हणजे वाचणारे त्याच दृष्टिकोनातून वाचतील व सूचना सुधारणा त्याच पद्धतीने येतील.
भारती.. - नक्की प्रयत्न करा. वर म्हंटल्या प्रमाणे एक ओळ भरसुद्धा महत्त्वाचीच असते! शिवाय त्या निमित्ताने आपले वाचन होते हा आपला फायदा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)