गोळ्यासाठी-
लाडु बेसन/भरडा ३ वाटी, नसल्यास साधं बेसन पण चालेल.
धने, जीरे पुड, तिखट, मीठ, हळद चवीनुसार
लसुण जिरं कुटुन १ चमचा
तेल पाव वाटी
बारीक चिरलेला १ मध्यम कांदा
दिड वाटी तांदुळ
सारासाठी-
चिंच भिजवुन
गुळ, मीठ, हळद, बारीक सुकं खोबरं
साराच्या फोडणीला - जिरे, मोहरी, मेथ्या, कडिपत्ता, लसुण जिरं कुटुन, लाल मिरच्या
दाण्याचं तेल - तेल, मोहरी, उडद दाळ (एच्छिक), लाल मिरच्या, हिंग, भरपुर लसुण बारीक चिरुन
तांदुळ धुऊन पाणी घालुन घ्यावे. भात मोकळा होईल एवढेच पाणी घालावे.
गोळ्याचं साहित्य, तेल सोडुन एकत्र करुन चांगलं मिसळुन घ्यावं. त्यात तेल घालुन चांगलं मिसळावं. आता जरासा पाण्याचा हात लाऊन लाडुसारखे गोळे करावे. हे गोळे भात करणार त्या भांड्यात सोडुन, भात आणि गोळे एकत्र कुकरला २ शिट्या करुन, शिजवावे. राईस कुकरमधे पण करु शकता.
भात शिजेस्तोर, सार करुन घ्यावा. तेलात जिरे, मोहरी, मेथ्या, कडिपत्ता, लसुण जिरं कुटुन, लाल मिरच्या, हळ्द घालुन चिंचेचा कोळ आणि पाणी घालावे. चवीनुसार मीठ आणि गुळ घालावा. एक उकळी आल्यावर सुकं खोबरं घालावं.५-१० मि. उकळ्ल्यावर गॅस बंद करावा.
दाण्याचं तेल/फोडणीचं तेल
तेल कढल्यात गरम झाल्यावर प्रथम मोहोरी, मग उडद दाळ (कडक आवडत असेल तरच) ब्राऊन होऊ द्यावी, मग बारीक चिरलेला लसुण, तो लाईट ब्राऊन झाल्यावर मिरच्या आणि हिंग आणि लगेच गॅस बंद. तेल गार झाल्यावरच खायला घ्यावे, लसुण मस्त खुसखुशीत होतो.
हे तेल पण गोळा भाताचा महत्वाचा भाग आहे.
आता सगळं तयार झाल्यावर, गरम भात आणि गोळा घ्यावा. गोळा फोडुन भातात छान मिसळावा. वरतुन खमंग फोडणी घेऊन सारासोबत खावा (तोंडाला पाणी सुटलं) सोबत पाहिजे असल्यास पापड घ्यावे
गोळ्यात पाणी जास्त झालं तर गोळे दडस होतात. अगदीच कोरडं मिश्रण वाटलं तर अजुन तेल घालावे पण पाणी अगदी जस्ट गोळे करायला. कांदा टाकल्याने तेल बरचं कमी लागतं.
लाडु बेसनाने गोळे चिकट होत नाहीत, साध्या बेसनात जरा तेल जास्त लागतं.
तोन्डाला पाणी सुटले राव.
तोन्डाला पाणी सुटले राव. प्रीती तुझ्या आजच्या दोन्ही पाकृ एकदम मस्त. भात मस्त एकदम. मी भातखाऊ नाही पण वेगळी चव नक्कीच आवडते.
मस्त. आम्ही चण्याच्या डाळीचे
मस्त. आम्ही चण्याच्या डाळीचे भिजवून, भरड वाटून केलेले गोळे घालतो भातात. आता हे बेसन वापरून करून बघेन. वरून चुरचुरीत फोडणी घालून मस्त खमंग लागतो हा भात. आम्ही सोलकढी करतो ह्याच्या बरोबर. चिंचेचं सार पण ट्राय करीन पुढच्य वेळी.
वा, छान आहे.
वा, छान आहे.
ओ वॉव.. कित्येक वर्षांनी आठवण
ओ वॉव.. कित्येक वर्षांनी आठवण आली जुनी... तुझ्या या रेसिपी मुळे... सुप्पर स्लर्पीये!!!
मस्त
मस्त
भन्नाट! फोटो बघून तोंडाला
भन्नाट! फोटो बघून तोंडाला पाणी सुटलं.
मस्त रेसिपी. पण खरंतर त्या
मस्त रेसिपी. पण खरंतर त्या भातात मला गोळे दिसतच नाहीयेत.
प्रीती एकदम मस्त..... जुनी
प्रीती एकदम मस्त..... जुनी आठवण झाली. आता करायलाच पाहिजे.
तोंपासु पहिला फोटो आणि रेसीपी
तोंपासु पहिला फोटो आणि रेसीपी !
सायो गोळा फोडून भातात
सायो गोळा फोडून भातात मिसळलाय.
वा! मस्त ...एकदा करून बघणार
वा! मस्त ...एकदा करून बघणार नक्कीच.
प्रीति. भात शिजवताना बेसनाचे
प्रीति. भात शिजवताना बेसनाचे गोळे त्यात ठेवले तर ते फुटत नाहीत का? मी राईस कूकरमधे करायचा विचार करतेय.
भारी! भात करून पाहणार एकदा.
भारी! भात करून पाहणार एकदा.
मी लोकसत्तात आलेल्या
मी लोकसत्तात आलेल्या रेसिपीप्रमाणे करतो, हिंगमोहरीच्या फोडणीत भाजलेले बेसन गार करून त्यात तिखट, मीठ, सुक्या खोबर्याचा कीस, दाण्याचा कूट घालून पाण्याने मळून सुपारीएवढे गोळे करायचे. भात अर्धवट शिजत आला की त्यात गोळे सोडून वरून पाण्याचा हबका द्यायचा.
मी कधी खाल्ला नाही असा भात.
मी कधी खाल्ला नाही असा भात. पण बघून करावासा वाटतो आहे. पण गोळे केव्हडे असावेत. लाडू सारखे म्हणाली आहेस पण ते शिजतील का? परवा त्या गवारीच्या भाजीतील गोळे मी अगदी लहान म्हणजे शेंगदाण्या एव्हडे केले होते. तसे करायचे का??
मस्त !
मस्त !
आज हाच मेनू केला होता.
आज हाच मेनू केला होता. झणझणीत्त पदार्थ आहे. बेसनाचे गोळे मी थोडे लहान केले होते. पण गरमगरम खायला भारी वाटले.
धन्यवाद सगळ्यांना! प्रॅडी कधी
धन्यवाद सगळ्यांना!
प्रॅडी कधी कधी सोबत ताक पण करतो, सोलकढी पण छानच लागेल.
सायो, दुसर्या फोटोत जरा दिसतायत, पण प्रॅडी म्हणतेय तसं पहिल्या फोटोत, गोळा फोडुन मिसळलाय.
नंदिनी गोळे फुटले का? नाही फुटत अजिबात.
मृणाल १, व्यवस्थित शिजतात.
दोन्ही गोष्टी करुन पाहिल्या.
दोन्ही गोष्टी करुन पाहिल्या. मस्त झाल्या होत्या धन्यवाद प्रीति!
मी पण करुन बघितला हा
मी पण करुन बघितला हा प्रकार....अप्रतिम झाला :))
नंदिनी गोळे फुटले का? स्मित
नंदिनी गोळे फुटले का? स्मित नाही फुटत अजिबात<<<नाहेी, काही धाड भरली नाही.
मी राईस कूकरमध्ये केले होते. मेनू घरामध्ये लोकप्रिय झालेला आहे आनि दोन तीन दा करून झालेला आहे.
मी काल केला होता... छान झाला
मी काल केला होता... छान झाला
अरे वाह! आम्ही गोळाभात करताना
अरे वाह! आम्ही गोळाभात करताना थोडी तुर डाळीची भरड पण घेतो, आणि गोळ्याचं पीठ भिजवताना दही वापरतो. इलेक्ट्रीक राइस कुकर मधेही चांगला होतो गोळाभात, फोडणीची लसूण मिरची मस्ट, फक्त पथ्य म्हणून चिंचेऐवजी आमसुलाचे सार करतो.