वर्षाचा सर्वात महागडा आणि आतुरतेने वाट पहायला लावणारा चित्रपट "धुम-३" काल बघण्यात आला .
यशराज बॅनरच्या "रोजगार हामी योजना" अंतर्गत अभिषेक आणि उदय यांना काम देण्याकरीता "धुम" या चित्रपटांची साखळी तयार केली आहे असे फेबु ट्विटर भाष्य केले आहे......काही अर्थी हे बरोबरच आहे..:)
खरतर धुम -१ आणि धुम-२ हे चित्रपट तयार करताना काही लॉजिक वापरलेले होते..
पहिल्या धुम मधे जॉन बाईक वर आपली गँग घेउन पैसे लुटायचे.. मुंबई पोलिसांकडे अत्याधुनिक बाईक्स नसल्याने तसेच चोरांच्या बाईक्स २००किमी पेक्षा जास्त वेगाने पळत असल्याने त्यांचे फावत होते या साठी जय दिक्षित अली ला मदतीला घेतो.. आनि त्यांच्याच वेगाने पाठलाग करत त्यांना पकडतो..इतके पैसे चोरायचे असल्याने जॉन आपली गँग बनवतो. (लॉजिक) गँग च्या मदतीने प्रत्यक्ष चोरी देखील केली..
दुसर्या धुम मधे हृतिक रोशन ने या चित्रपटाची उंची प्रचंड म्हणजे प्रचंडच वाढवुन ठेवली..ह्रितीक चोरी फक्त एका अमुल्य वस्तुचीच करायचा...एखादा राजघराण्याचा हार, या दुर्मिळ नाणी, महाग हिरा.. अश्या छोट्या पण अत्यंत मुल्यवान वस्तुंची चोरी करायचा म्हणुन तो एकटा होता.. चोरी करताना त्याने अनेक क्लूप्त्या लढवल्या .. वेशांतर केले.. मुर्ती झाला बुटका झाला खुप काही केले...इतके केले की बहुदा काही शिल्लक ठेवलेच नाही.. ह्रितीक विदेशात चोरी करत करत भारतात आला..आणि जय दिक्षित त्याच्या मागे लागला ..(लॉजिक)
आता आपण येउया धुम-३ च्या कथेवर ..
अमेरिकेत शिकागो या शहरी "ग्रेट इंडीयन सर्कस" जॅकि श्रॉफ चालवत असतो..प्रचंड कर्ज घेतलेले असते .. हे कर्ज फेडण्यासाठी तो बँकेची मदत मागतो.. त्यासाठी शो देखील आयोजित करतो परंतु बँक कर्ज देण्यास नकार देते...कर्जाच्या चिंतेत जॅकी आत्महत्या आपल्या लहान मुलासमोर आणि बॅकेच्या अधिकार्यांसमोरच करतो.
जॅकिचा मुलगा साहीर (आमिर खान) मोठा झाल्यावर त्या बँकेचा बदला घेण्याचे ठरवतो आणि बँकेच्या प्रत्येक शाखा लुटण्यास प्रारंभ करतो एकटाच (लॉजिक???????????) .. एका बाजुला सर्कस देखील चालु करतो... बँक लुटताना साहीर हिंदीत संदेश लिहित असतो.. म्हणुन भारतातुन जय दिक्षित आणि अली यांना पाचारण केले जाते (लॉजिक???? )
जय दिक्षित केस ची स्टडी करतो..आणि साहीर च्या मागे लागतो.. साहीर वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवुन ?????? जय दिक्षित ला वेळोवेळी मात देतो.. या क्लुप्त्यांमागे एक मोठे "रहस्य" असते जे इंटरवेल आधीच उघडले जाते ..
शेवटी आमिर चे रहस्य जे प्रेक्षकांना आधीच कळते ते जय दिक्षित ला कळते का ?
बँक उध्वस्त होते का...??? कशी होते... ?
हे सगळे बघण्यासाठी धुम - ३ पहावा लागेल . (मी आग्रह करत नाही आहे...हम तो डुबे है सनम ले तुझे भी डुबे)
चला आता इतर बाबींकडे लक्ष देउ या...
एका धाग्यावर "प्रेमळ पारधी" यांनी लिहिले तसेच मला ही वाटते की आदित्य चोप्रा यांनी अमेरिकन्स ची लायकी या चित्रपटात काढली आहे... शिकागो पोलिस हे मुंबई पोलिस पेक्षा चांगले असुच शकत नाही .. अज्याबात नाय.. नही बिल्कुल ही नही है....नोनो नो .. म्हणुनच मुंबई पोलिस मधले एसीपी जय दिक्षित आनि इंस्पेक्टर (ज्याला साधी इंग्लिश येत नाही ) अली यांना शिकागोला पाठवण्यात येते (मागच्या चित्रपटात विदेशात जाउन चोर पकडण्याचा अनुभव असल्यानेच त्यांचे सिलेक्शन होते असा दाट गाढा थिक संशय मला आहे) चोरसाहेबांनी चोरी करताना हिंदीत संदेश लिहिल्याने भारतातुन मदत शिकागो पोलिस मागतात (असा विनोद मायबोलीच्या कोणत्याच धाग्यावर कोणत्याही आयडीने लिहिला नसेल.)
असो. जय - अली शिकागो ला पोहचतात आणि लगेच जाहीर करतात एकाच बँकच्या शाखा लुटल्यागेलेल्या आहे..( हे शिकागो पोलिसांना कळत नाय :अओ:) म्हणुन बँकेचा शत्रुचेच काम आहे ...
"द ग्रेट इंडीअन सर्कस" प्रचंड कर्जात बुडालेली असते..ती ऑक्शन होते..(बहुदा कारण चित्रपटात बँकेचे अधिकारी तसे बोलताना दाखवले आहे.) अश्या प्रचंड रकमेच्या कर्जाची परतफेड साहीर कसा करतो..? चला एकवेळ मानु की बँक लुटुन तो पैसे मिळवतो ...तर कर्जाच्या रकमेची परतफेड करताना इंकमटॅक्स वाले विचारत नाही का ...ए बाबा तु इतके पैसे कुठुन आणलेस .." तु तर काही कामधंदा करताना तर दिसत नाही..(दाखवलेच नाही ) मग सर्कस उभी कशी कोणत्या पैश्यातुन करत आहेस... हे अमेरिकन ढिसाळ कारभारावर मार्मिक बोट दाखवत आहे त्यांच्याकडे देखील भारतासारखाच भ्रष्टाचार माजलेला आहे..ढिसाळ कारभार करतात लेकाचे.. एक सामान्य मुलगा प्रचंड कर्ज्यात असलेली सर्कस सोडवतो काही ही कामधंदे न करता त्याची साधी चौकशी होउ नये ?
चोर चित्रपटात मुख्य भाग असतो ती चोरी कशी होते.. यावर दिग्दर्शकाचा मुख्य भर असतो.. च्यामायला या बिनडोक चित्रपटात चोरी दाखवलीच नाही निव्वळ चोरी कशी करायची याचे प्लॅनिंग चित्रपट भर साहीर करत असतो.. आपण मात्र वाट बघत असतो की अरे आता होईल चोरी मग होईल चोरी... दर्शकांना कळते कधी जेव्हा साहीर बँकेच्या बाहेर बाईक वरुन येतो आणि पळतो ...तेव्हा समजते..... हे भगवान चोरी हो भी गयी और पता भी नही चला.... मग सगळे त्याच्या मागे लागतात .. पाठलाग सुरु...
अरे कुठेतरी दाखवा चोरी कशी केली ? तुमच्या कडे चोरी करण्याच्या क्लुप्त्या नाहीत का.? की तुम्हालाच समजले नाही चोरी झाली ते.. निव्वळ आमिर ला बँके बाहेर पळवले की झाली चोरी....
चला केली चोरी....मग पैसे कशाला उधळत फिरायचे.... एक इटुकली पिटुकली बॅग पाठिला अडकवली की झाले आला चोरीचा माल..?? अरे इतके कर्ज आहे तर किमान १०-१५ सुटकेस हवे ना पैश्याने भरलेले...किमान एक नोटेची किंमत १०००$ जरी धरली तरी १ करोड पाहिजे असे धरले तरी १०००० नोटा लागतील आता १०००० नोटेंसाठी एक "इंटुकली पिंटुकली" बॅगेत १०००० नोटा काय येतील का ? (लॉजिक????????)
इतकी मोठी बँक फक्त ३-४ बँकेत चोरी केल्यावर उधवस्त होईल का? काय लुटतो ते ही कळत नाही .. पैसे उधळत जातो मग स्वतः काय घेउन जातो हा ?
आमिर ची हाईट फार मोठी चुकीची दाखवली आहे....त्यामुळे त्याच्या संपुर्ण व्यक्तिरेखेवर वाईट प्रभाव पडतो.. नको त्या ठिकाणी त्याला अतिशय बुटका दाखवलेले आहे.. सुरुवातीला कटरिना आनि आमिर एकाच हाईट ची दाखवले आहे...६=६
नंतर अभिषेक आमिर समोर आल्यावर आमिर एकदमच छोटा वाटतो अगदी त्याच्या खांद्याच्या सुध्दा खाली लागतो ६.५ = ५
आणि शेवटी अभिषेक कटरिनाला भेटतो तेव्हा कटरिना अभिषेक च्या उंची जवळपास दिसते. ६.५=६
मग जेव्हा आमिर अभिषेक समोर असतो तेव्हा ५फुटी कसा होतो आणि कटरिना बरोबर असताना लगेच १ फुट वाढुन ६ फुटी कसा होतो......... (दया पता लगाओ जरुर हाईट मे काली दाल मिली हुई है)
आता तुम्हाला वाटत असेल अरे फक्त आमिर आणि अभिषेकवर लिहिले कतरिनावर नाही.....तर माझ्या प्रिय मित्रांनो तुमची अत्यंत आवडती कटरिनावर ३ गाणी आहेत....झालात ना खुश...अजुन बोनस म्हणुन तिला संपुर्ण चित्रपटात ५-६ वाक्य देखील बोलायला दिली आहेत....:टाळ्या: आमिरखान चे धन्यवाद जे इतके मोठे फुटेज तिला दिले....
चित्रपटाची गाणी फक्त तोंडी लावण्यापुरती आहेत... टॅप डांस हवा तेव्हढा प्रभाव पाडत नाही .. रितिक च्या धुम डांस ची बरोबरी करण्याकरीताच बहुदा हा डांस घेतलेला आहे.. आमिर बिल्कुल नाचताना आकर्षक दिसलेला नाही..
मलंग... अत्यंत सुंदर आणि भन्नाट .. प्रचंड खर्च करुन याला आकर्षक बनवलेले आहे.. वर एरो डांस वगैरे जे आपण डीआयडी मधे बघत होतो नाचा चे प्रकार तसेच प्रकार यात दाखवले गेलेले आहे... सुंदर नाच आणि करामती आमिर आणि कटरिनाने केलेल्या आहेत...
कमली या गाण्यात कटरिनाने चांगले मुव्ह्स दाखवले आहेत परंतु.......ते सलग न असता तुकड्या तुकड्यात असल्याने लवकर कळते की एक एक स्टेप्स घेत शुटींग घेतलेले आहे.. काही सलग आहेत त्यात.... ज्यात कतरिनाने खरच चांगला प्रयत्न केलेला आहे... गोड आणि खरच सुंदर दिसते.....
अॅक्शन्स फक्त इंटरवल पर्यंत च आहेत त्यानंतर अतिशय संथ होतो चित्रपट उगाच त्याला भावनात्मक करण्याच्या नादात त्याचा टेम्पो बिघडवला.. चित्रपटाचे नाव धुम आहे म्हणुन बहुदा फक्त पाठलाग बाईक्स यावरच भर दिलेला आहे.. चित्रपटाच्या ९०% फ्रेम मधे फक्त आणि फक्त आमिरच दिसतो..
अभिनय :- अभिनयात जॅकि श्रॉफ आणि छोटा आमिर झालेला मुलगा भाव खाउन जातात.. लहान मुलाने तर कमालच केली आहे.. अनेक प्रसंगात त्याचा चेहरा बोलका झालेला आहे... आमिर खान जिनिअस.. निव्वळ अप्रतिम एकाच वेळी त्याने विविध कांगोरे उभे केले आहे बर्याच ठिकाणी तो निव्वळ चेहर्यातुन फरक दाखवुन देतो.. परंतु मी आमिर खान आहे......हे त्याला खाली खेचते... आयुष्यात पहिल्यांदा खलनायकी भुमिका करताना कोणत्याही बाजुने खलनायक वाटला नाही.. स्क्रिप्ट लिहिताना देखील त्याला खलनायक न दाखवता अत्याचार झालेला युवक दाखवले गेले.. त्यामुळे तो मनाला भिडत नाही...त्याचे एक रुप किमान खलनायकी दाखवायला हवे होते.... तर तो ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट छान उभा राहिला असता.. परंतु सगळेच रुप गुडीगुडी करण्याच्या नादात सगळे केर मुसळात जातात...
खलनायकी करताना कधी तो डर , माय नेम इस खान मधला शाहरुख होतो..कधी धुम-२ च्या रितिक सारखा तर कधी धुम-१ च्या जॉन सारखा ..त्यामुळे आपल्याला आमिर कमीच दिसतो... तरी ही त्याची पकड शेवट पर्यंत सुटत नाही.चित्रपटावरुन... शेवटच्या फ्रेम पर्यंत आमिर वरच आपली नजर खिळुन असते... आणि हाच त्याचा स्ट्राँग पॉईंट आहे.....
अभिषेक आणि उदय यांच्या रोजगारा करिता त्यांना यात घेतले असल्याने त्यांच्या अभिनयावर काही बोलुन मी त्यांचा जाहीर अपमान करु इच्छित नाही..:)
आमिर चा चित्रपट स्क्रिप्ट ने परफेक्ट असायचा कमीत कमी लुपपोल्स असायचे त्यात.. आमिर स्वतः जातीने लक्ष द्यायचा .... परंतु "द - लाश" आणि "धोबीघाट" पासुन त्याने यावर लक्ष द्यायचे कमी केले असे वाटते..
निव्वळ स्पर्धेत उतरायचे ..पहिल्यांदाच खलनायक साकारायचा या निमित्ताने बहुदा आमिर चे दुर्लक्ष झाले आहे ... चुका तर सगळ्याच चित्रपटात असतात.. अतिशयोक्ती सगळ्यातच असते यालाच बहुतेक लिबर्टी घेणे म्हणतात परंतु कैच्याकै घेउ नका. पटेल असे घ्या.......
बहुदा या चित्रपटामुळे शिकागो पोलिस आदित्य चोप्रावर केस दाखल करणार असे दिसत आहे...
असो............. पहिला भाग भन्नाट पाठलाग अप्रतिम लोकेशन्स ...... आणि दुसरा भाग अत्यंत संथ रटाळ थोडेफार धक्के ...... याचे मिश्रण बघायचा असल्यास बघावा.......
मी निव्वळ आमिर खान या चित्रपटात आहे म्हणुन गेलेलो...... त्यापेक्षा शुक्रवारचा "२४" मालिकेचा एपिसोड बघितला असता तर बरे झाले असते असे वाटत आहे.....
(मी परिक्षण केलेले नाही...)
पण फर्स्ट डेच्या कलेक्शनवर
पण फर्स्ट डेच्या कलेक्शनवर आणि ओव्हरऑल कलेक्शनवर (करंट) ब्रॅगिंग राइट्स मिळतात ना?
धुम - ३ तब्बल ४५०० सिनेमा
धुम - ३ तब्बल ४५०० सिनेमा गृहात प्रदर्शित झालेला आहे त्याच बरोबर डबिंग करुन सुध्दा ५००-७५० सिनेमागृहात लागला आहे..तसेच तिकीट प्राईझ सुध्दा ३०-४५ % वाढवलेली आहे.
वर आमिर खान पहिल्यांदाच खलनायक (?) ची भुमिका करत आहे मग कलेक्शन वर तर फरक पडणारच ना राव
चेन्नई एक्स्प्रेस ३५०० सिनेमागृहात लागलेला आणि महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी "दुनियादारी" चित्रपट लागलेला असल्याने आणि त्याची स्पर्धा असल्याने कमी स्क्रिन मिळालेत..
क्रिश-३ ला सुध्दा ३८००च स्क्रिन मिळालेत
या दोन्ही चित्रपटांचे तिकिट वाढवलेले नव्हते... तेव्हडेच होते..
.
.
बरच साम्य आहे
बरच साम्य आहे
उदयन, मलाही हेच आठवलं. हाच एक
उदयन, मलाही हेच आठवलं.
हाच एक खेळ काय तो खेळणे जमत होतं
भारी लिहल आहेस लेख उदय
भारी लिहल आहेस लेख उदय
ह्या १०० करोडक्लब च्या
ह्या १०० करोडक्लब च्या जमान्यात "सिल्व्हर ज्युबिली" हा शब्द कुणाला आठवतोय का? पुढील पिढीस त्याची ओळख असावी म्हणून शासन का पावले उचलत आहे ? सिल्व्हर ज्युबिली हा आपला सांस्कृतिक वारसा असून १०० क.क वाले त्यावर घाला घालत आहेत.
दीपांजली +१
दीपांजली +१
(No subject)
उदयन . जॉन चे लग्न, हृतिक चा
उदयन :D.
जॉन चे लग्न, हृतिक चा घटस्फोट, आमिर चा घटस्फोट यातूनही कोणी काही पॅटर्न काढेल आता
(हृतिक जॉन पेक्षा कमी उंच आहे? मला वाटले या लोकांत तोच त्यातल्या त्यात उंच आहे).
जाँन उंच आहे ....शरीर वाढले
जाँन उंच आहे ....शरीर वाढले असल्याने उंची दिसत नाही...
रितिक शिडशिडत आहे म्हणून तो उंच वाटतो
जॉन उंच आहे ह्रितिकपेक्षा.
जॉन उंच आहे ह्रितिकपेक्षा.
Pages