वर्षाचा सर्वात महागडा आणि आतुरतेने वाट पहायला लावणारा चित्रपट "धुम-३" काल बघण्यात आला .
यशराज बॅनरच्या "रोजगार हामी योजना" अंतर्गत अभिषेक आणि उदय यांना काम देण्याकरीता "धुम" या चित्रपटांची साखळी तयार केली आहे असे फेबु ट्विटर भाष्य केले आहे......काही अर्थी हे बरोबरच आहे..:)
खरतर धुम -१ आणि धुम-२ हे चित्रपट तयार करताना काही लॉजिक वापरलेले होते..
पहिल्या धुम मधे जॉन बाईक वर आपली गँग घेउन पैसे लुटायचे.. मुंबई पोलिसांकडे अत्याधुनिक बाईक्स नसल्याने तसेच चोरांच्या बाईक्स २००किमी पेक्षा जास्त वेगाने पळत असल्याने त्यांचे फावत होते या साठी जय दिक्षित अली ला मदतीला घेतो.. आनि त्यांच्याच वेगाने पाठलाग करत त्यांना पकडतो..इतके पैसे चोरायचे असल्याने जॉन आपली गँग बनवतो. (लॉजिक) गँग च्या मदतीने प्रत्यक्ष चोरी देखील केली..
दुसर्या धुम मधे हृतिक रोशन ने या चित्रपटाची उंची प्रचंड म्हणजे प्रचंडच वाढवुन ठेवली..ह्रितीक चोरी फक्त एका अमुल्य वस्तुचीच करायचा...एखादा राजघराण्याचा हार, या दुर्मिळ नाणी, महाग हिरा.. अश्या छोट्या पण अत्यंत मुल्यवान वस्तुंची चोरी करायचा म्हणुन तो एकटा होता.. चोरी करताना त्याने अनेक क्लूप्त्या लढवल्या .. वेशांतर केले.. मुर्ती झाला बुटका झाला खुप काही केले...इतके केले की बहुदा काही शिल्लक ठेवलेच नाही.. ह्रितीक विदेशात चोरी करत करत भारतात आला..आणि जय दिक्षित त्याच्या मागे लागला ..(लॉजिक)
आता आपण येउया धुम-३ च्या कथेवर ..
अमेरिकेत शिकागो या शहरी "ग्रेट इंडीयन सर्कस" जॅकि श्रॉफ चालवत असतो..प्रचंड कर्ज घेतलेले असते .. हे कर्ज फेडण्यासाठी तो बँकेची मदत मागतो.. त्यासाठी शो देखील आयोजित करतो परंतु बँक कर्ज देण्यास नकार देते...कर्जाच्या चिंतेत जॅकी आत्महत्या आपल्या लहान मुलासमोर आणि बॅकेच्या अधिकार्यांसमोरच करतो.
जॅकिचा मुलगा साहीर (आमिर खान) मोठा झाल्यावर त्या बँकेचा बदला घेण्याचे ठरवतो आणि बँकेच्या प्रत्येक शाखा लुटण्यास प्रारंभ करतो एकटाच (लॉजिक???????????) .. एका बाजुला सर्कस देखील चालु करतो... बँक लुटताना साहीर हिंदीत संदेश लिहित असतो.. म्हणुन भारतातुन जय दिक्षित आणि अली यांना पाचारण केले जाते (लॉजिक???? )
जय दिक्षित केस ची स्टडी करतो..आणि साहीर च्या मागे लागतो.. साहीर वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवुन ?????? जय दिक्षित ला वेळोवेळी मात देतो.. या क्लुप्त्यांमागे एक मोठे "रहस्य" असते जे इंटरवेल आधीच उघडले जाते ..
शेवटी आमिर चे रहस्य जे प्रेक्षकांना आधीच कळते ते जय दिक्षित ला कळते का ?
बँक उध्वस्त होते का...??? कशी होते... ?
हे सगळे बघण्यासाठी धुम - ३ पहावा लागेल . (मी आग्रह करत नाही आहे...हम तो डुबे है सनम ले तुझे भी डुबे)
चला आता इतर बाबींकडे लक्ष देउ या...
एका धाग्यावर "प्रेमळ पारधी" यांनी लिहिले तसेच मला ही वाटते की आदित्य चोप्रा यांनी अमेरिकन्स ची लायकी या चित्रपटात काढली आहे... शिकागो पोलिस हे मुंबई पोलिस पेक्षा चांगले असुच शकत नाही .. अज्याबात नाय.. नही बिल्कुल ही नही है....नोनो नो .. म्हणुनच मुंबई पोलिस मधले एसीपी जय दिक्षित आनि इंस्पेक्टर (ज्याला साधी इंग्लिश येत नाही ) अली यांना शिकागोला पाठवण्यात येते (मागच्या चित्रपटात विदेशात जाउन चोर पकडण्याचा अनुभव असल्यानेच त्यांचे सिलेक्शन होते असा दाट गाढा थिक संशय मला आहे) चोरसाहेबांनी चोरी करताना हिंदीत संदेश लिहिल्याने भारतातुन मदत शिकागो पोलिस मागतात
(असा विनोद मायबोलीच्या कोणत्याच धाग्यावर कोणत्याही आयडीने लिहिला नसेल.)
असो. जय - अली शिकागो ला पोहचतात आणि लगेच जाहीर करतात एकाच बँकच्या शाखा लुटल्यागेलेल्या आहे..( हे शिकागो पोलिसांना कळत नाय :अओ:) म्हणुन बँकेचा शत्रुचेच काम आहे ...
"द ग्रेट इंडीअन सर्कस" प्रचंड कर्जात बुडालेली असते..ती ऑक्शन होते..(बहुदा कारण चित्रपटात बँकेचे अधिकारी तसे बोलताना दाखवले आहे.) अश्या प्रचंड रकमेच्या कर्जाची परतफेड साहीर कसा करतो..? चला एकवेळ मानु की बँक लुटुन तो पैसे मिळवतो ...तर कर्जाच्या रकमेची परतफेड करताना इंकमटॅक्स वाले विचारत नाही का ...ए बाबा तु इतके पैसे कुठुन आणलेस .." तु तर काही कामधंदा करताना तर दिसत नाही..(दाखवलेच नाही ) मग सर्कस उभी कशी कोणत्या पैश्यातुन करत आहेस... हे अमेरिकन ढिसाळ कारभारावर मार्मिक बोट दाखवत आहे त्यांच्याकडे देखील भारतासारखाच भ्रष्टाचार माजलेला आहे..ढिसाळ कारभार करतात लेकाचे.. एक सामान्य मुलगा प्रचंड कर्ज्यात असलेली सर्कस सोडवतो काही ही कामधंदे न करता त्याची साधी चौकशी होउ नये ?
चोर चित्रपटात मुख्य भाग असतो ती चोरी कशी होते.. यावर दिग्दर्शकाचा मुख्य भर असतो.. च्यामायला या बिनडोक चित्रपटात चोरी दाखवलीच नाही निव्वळ चोरी कशी करायची याचे प्लॅनिंग चित्रपट भर साहीर करत असतो.. आपण मात्र वाट बघत असतो की अरे आता होईल चोरी मग होईल चोरी... दर्शकांना कळते कधी जेव्हा साहीर बँकेच्या बाहेर बाईक वरुन येतो आणि पळतो ...तेव्हा समजते..... हे भगवान चोरी हो भी गयी और पता भी नही चला.... मग सगळे त्याच्या मागे लागतात .. पाठलाग सुरु...
अरे कुठेतरी दाखवा चोरी कशी केली ? तुमच्या कडे चोरी करण्याच्या क्लुप्त्या नाहीत का.? की तुम्हालाच समजले नाही चोरी झाली ते.. निव्वळ आमिर ला बँके बाहेर पळवले की झाली चोरी....
चला केली चोरी....मग पैसे कशाला उधळत फिरायचे.... एक इटुकली पिटुकली बॅग पाठिला अडकवली की झाले आला चोरीचा माल..?? अरे इतके कर्ज आहे तर किमान १०-१५ सुटकेस हवे ना पैश्याने भरलेले...किमान एक नोटेची किंमत १०००$ जरी धरली तरी १ करोड पाहिजे असे धरले तरी १०००० नोटा लागतील आता १०००० नोटेंसाठी एक "इंटुकली पिंटुकली" बॅगेत १०००० नोटा काय येतील का ? (लॉजिक????????)
इतकी मोठी बँक फक्त ३-४ बँकेत चोरी केल्यावर उधवस्त होईल का? काय लुटतो ते ही कळत नाही .. पैसे उधळत जातो मग स्वतः काय घेउन जातो हा ?
आमिर ची हाईट फार मोठी चुकीची दाखवली आहे....त्यामुळे त्याच्या संपुर्ण व्यक्तिरेखेवर वाईट प्रभाव पडतो.. नको त्या ठिकाणी त्याला अतिशय बुटका दाखवलेले आहे.. सुरुवातीला कटरिना आनि आमिर एकाच हाईट ची दाखवले आहे...६=६
नंतर अभिषेक आमिर समोर आल्यावर आमिर एकदमच छोटा वाटतो अगदी त्याच्या खांद्याच्या सुध्दा खाली लागतो ६.५ = ५
आणि शेवटी अभिषेक कटरिनाला भेटतो तेव्हा कटरिना अभिषेक च्या उंची जवळपास दिसते. ६.५=६
मग जेव्हा आमिर अभिषेक समोर असतो तेव्हा ५फुटी कसा होतो आणि कटरिना बरोबर असताना लगेच १ फुट वाढुन ६ फुटी कसा होतो......... (दया पता लगाओ जरुर हाईट मे काली दाल मिली हुई है)
आता तुम्हाला वाटत असेल अरे फक्त आमिर आणि अभिषेकवर लिहिले कतरिनावर नाही.....तर माझ्या प्रिय मित्रांनो तुमची अत्यंत आवडती कटरिनावर ३ गाणी आहेत....झालात ना खुश...अजुन बोनस म्हणुन तिला संपुर्ण चित्रपटात ५-६ वाक्य देखील बोलायला दिली आहेत....:टाळ्या: आमिरखान चे धन्यवाद जे इतके मोठे फुटेज तिला दिले....
चित्रपटाची गाणी फक्त तोंडी लावण्यापुरती आहेत... टॅप डांस हवा तेव्हढा प्रभाव पाडत नाही .. रितिक च्या धुम डांस ची बरोबरी करण्याकरीताच बहुदा हा डांस घेतलेला आहे.. आमिर बिल्कुल नाचताना आकर्षक दिसलेला नाही..
मलंग... अत्यंत सुंदर आणि भन्नाट .. प्रचंड खर्च करुन याला आकर्षक बनवलेले आहे.. वर एरो डांस वगैरे जे आपण डीआयडी मधे बघत होतो नाचा चे प्रकार तसेच प्रकार यात दाखवले गेलेले आहे... सुंदर नाच आणि करामती आमिर आणि कटरिनाने केलेल्या आहेत...
कमली या गाण्यात कटरिनाने चांगले मुव्ह्स दाखवले आहेत परंतु.......ते सलग न असता तुकड्या तुकड्यात असल्याने लवकर कळते की एक एक स्टेप्स घेत शुटींग घेतलेले आहे.. काही सलग आहेत त्यात.... ज्यात कतरिनाने खरच चांगला प्रयत्न केलेला आहे... गोड आणि खरच सुंदर दिसते.....
अॅक्शन्स फक्त इंटरवल पर्यंत च आहेत त्यानंतर अतिशय संथ होतो चित्रपट उगाच त्याला भावनात्मक करण्याच्या नादात त्याचा टेम्पो बिघडवला.. चित्रपटाचे नाव धुम आहे म्हणुन बहुदा फक्त पाठलाग बाईक्स यावरच भर दिलेला आहे.. चित्रपटाच्या ९०% फ्रेम मधे फक्त आणि फक्त आमिरच दिसतो..
अभिनय :- अभिनयात जॅकि श्रॉफ आणि छोटा आमिर झालेला मुलगा भाव खाउन जातात.. लहान मुलाने तर कमालच केली आहे.. अनेक प्रसंगात त्याचा चेहरा बोलका झालेला आहे... आमिर खान जिनिअस.. निव्वळ अप्रतिम एकाच वेळी त्याने विविध कांगोरे उभे केले आहे बर्याच ठिकाणी तो निव्वळ चेहर्यातुन फरक दाखवुन देतो.. परंतु मी आमिर खान आहे......हे त्याला खाली खेचते... आयुष्यात पहिल्यांदा खलनायकी भुमिका करताना कोणत्याही बाजुने खलनायक वाटला नाही.. स्क्रिप्ट लिहिताना देखील त्याला खलनायक न दाखवता अत्याचार झालेला युवक दाखवले गेले.. त्यामुळे तो मनाला भिडत नाही...त्याचे एक रुप किमान खलनायकी दाखवायला हवे होते.... तर तो ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट छान उभा राहिला असता.. परंतु सगळेच रुप गुडीगुडी करण्याच्या नादात सगळे केर मुसळात जातात...
खलनायकी करताना कधी तो डर , माय नेम इस खान मधला शाहरुख होतो..कधी धुम-२ च्या रितिक सारखा तर कधी धुम-१ च्या जॉन सारखा ..त्यामुळे आपल्याला आमिर कमीच दिसतो... तरी ही त्याची पकड शेवट पर्यंत सुटत नाही.चित्रपटावरुन... शेवटच्या फ्रेम पर्यंत आमिर वरच आपली नजर खिळुन असते... आणि हाच त्याचा स्ट्राँग पॉईंट आहे.....
अभिषेक आणि उदय यांच्या रोजगारा करिता त्यांना यात घेतले असल्याने त्यांच्या अभिनयावर काही बोलुन मी त्यांचा जाहीर अपमान करु इच्छित नाही..:)
आमिर चा चित्रपट स्क्रिप्ट ने परफेक्ट असायचा कमीत कमी लुपपोल्स असायचे त्यात.. आमिर स्वतः जातीने लक्ष द्यायचा .... परंतु "द - लाश" आणि "धोबीघाट" पासुन त्याने यावर लक्ष द्यायचे कमी केले असे वाटते..
निव्वळ स्पर्धेत उतरायचे ..पहिल्यांदाच खलनायक साकारायचा या निमित्ताने बहुदा आमिर चे दुर्लक्ष झाले आहे ... चुका तर सगळ्याच चित्रपटात असतात.. अतिशयोक्ती सगळ्यातच असते यालाच बहुतेक लिबर्टी घेणे म्हणतात परंतु कैच्याकै घेउ नका. पटेल असे घ्या.......
बहुदा या चित्रपटामुळे शिकागो पोलिस आदित्य चोप्रावर केस दाखल करणार असे दिसत आहे...
असो............. पहिला भाग भन्नाट पाठलाग अप्रतिम लोकेशन्स ...... आणि दुसरा भाग अत्यंत संथ रटाळ थोडेफार धक्के ...... याचे मिश्रण बघायचा असल्यास बघावा.......
मी निव्वळ आमिर खान या चित्रपटात आहे म्हणुन गेलेलो...... त्यापेक्षा शुक्रवारचा "२४" मालिकेचा एपिसोड बघितला असता तर बरे झाले असते असे वाटत आहे.....
(मी परिक्षण केलेले नाही...)
सुरबातीचा तो टॅप डान्स आहे कि
सुरबातीचा तो टॅप डान्स आहे कि स्टाँपिंग ??
टॅप डान्स... बुटांचां आवाज
टॅप डान्स... बुटांचां आवाज करुन संगीत तयार करायचे आणि त्यावर स्टेप्स बनवत नाचायचे ..असा काहीतरी प्रकार आहे....
डिआयडी मधे सलमान ने केलेला ..
दिनेश दा ............फक्त
दिनेश दा ............फक्त आमिर साठी जाणार असल्यास नक्कीच जावा....... त्याचा अभिनय सुंदर आहे.. फक्त...
अति दिसल्याने आमिर चे अजिर्ण होते![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
अरे वा म्हणजे हा कॉलेज बंक
अरे वा म्हणजे हा कॉलेज बंक करूब, निदान ८-१० जणांच्या ग्रुप नी म्याटिनीला (पॉकेट मनी मधे हेच टिकीट परवडत ना ) पहाय्चा पिक्चर आहे. आय्यॅम्मिसिंग्माय्कॉलेज्देज![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कायबिएन डोंबलाचे मतः- तुटकी
कायबिएन डोंबलाचे मतः-
तुटकी फुटकी बातमी......
आताच आलेल्या बातमी नुसार मुंबई पोलिसांनी बहुचर्चित धुम -३ चित्रपट पाहिल्या नंतर विधान सभे वर मोर्चा नेला आहे.. पोलिसांच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहमंत्री श्री आर आर पाटील यांची भेट घेउन त्यांच्या जवळ एकमुखाने मागणी केली आहे..की "धुम सिरीज मधल्या एसीपी जय दिक्षित आणि इंस्पेक्टर अली यांना तत्काळ बडतर्फ करावे अथवा "सीआरएस" देउन त्यांना सेवानिवृत्त करावे" तीनही चित्रपटात चोराला पकडण्यात अपयश आल्याने तसेच अतिशय सुमार अभिनय करुन पोलिसांची आब्रु सिनेमागृहाच्या वेशीवर टांगल्याने त्यांना शिक्षा करण्यात यावी आणि अश्या प्रकारचा अभिनय करणार्या अभिनेत्यांना आधारवाडी अथवा येरवडा तुरुंगात डांबण्यात यावे आणि त्यांना येताजाता उठता बसता "पोकळ बांबुचे फटके" देण्यात यावे. या मागण्या सुध्दा करण्यात आलेल्या आहे .
आमी पण आज पाहिला! जर आपण
आमी पण आज पाहिला!
जर आपण करमणुकीसाठी जात असाल तर ग्रेट पिक्चर आहे. जर लॉजिक बघायला जात असाल तर नाही. मी तर फक्त करमणुकीसाठी गेलो होतो; त्यामुळे प्रचंड आवडला. डोक्याला टेन्शन नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला महाभयंकर बोअर झाले. आटपा
मला महाभयंकर बोअर झाले. आटपा आता ! असं १०० वेळा म्हटले असेल.अ. आणी अ चा अतिरेक.
बिग्ग डिसपॉइन्टमेन्ट !!!!!
मला आवडला धूम ३ . आमिर चे
मला आवडला धूम ३ . आमिर चे भक्त असाल तर नक्की आवडेल. सुरवातीपासून शेवटपर्यंत its only AK and he totally rocks !! गाणी थोडी बोर आहेत पण आमिर मुळे गाण्यांकडे फार लक्ष जात नाही.
कतरिना फ्रेश आणि मस्त दिसते. डान्सेस पण मस्त केले आहेत तिने.
टीप : लॉजिक वगेरे बाहेर ठेवून हा सिनेमा बघा. करमणुकीसाठी एकदम मस्त आहे.
मला उलट आमिर ची हर्डकोअर फॅन
मला उलट आमिर ची हर्डकोअर फॅन असल्यामुळेच नाही आवडला :(.
फक्त त्याच्यासाठी मुव्ही पहायला जातो तेंव्हा त्याच्याकडून भरघोस आपेक्षा असतात !
करिअर च्या या लेव्हल ला हे असे रोल करताना पाहून कमल हसन च्या काही नार्सिस्टीक मुव्हीज ची आठवण आली :(.
तीन न पटलेल्या गोष्टी: १)
तीन न पटलेल्या गोष्टी:
१) अमेरिकेत इन्शुरन्स नावाची गोष्ट आहे, जी प्रत्येक बँकेला असते. मग बँक लुटून तिला बुडवण्याचा प्रकार आणि विचार अतिशय हास्यास्पद वाटला.
२) ************
३) शेवटच्या दृश्यात अभिषेक कतरिनाला घेऊन सकाळी सकाळी धरणावर जातो. तिथे असतात ते त्याला कस माहित झालं?
अवांतर: चित्रपटात उदय चोप्रा सर्वात जास्त भाव खाऊन गेला आहे.
थेटरातून प्रेक्षकांनीच धूम
थेटरातून प्रेक्षकांनीच धूम ठोकावी, असा पिच्चर आहे का?
अरे नितीन
अरे नितीन साहेब.................जरा स्पॉईलर अलर्ट द्या राव.............तुम्ही सगळेच सांगुन बसलात ...
अवांतर: चित्रपटात उदय चोप्रा
अवांतर: चित्रपटात उदय चोप्रा सर्वात जास्त भाव खाऊन गेला आहे. >>>> बापरे... कठीण आहे.
माझ्या मते आमिरचा आजपर्यंतचा
माझ्या मते आमिरचा आजपर्यंतचा सगळ्यात वाईट्ट परफॉर्मन्स.... त्याला स्वतःलाच लाज वाटावी असा... अजून फोड करावी असं वाटतंय, पण 'स्पॉयलर' होईल !!
उदयन प्रत्येक वाक्याला
उदयन प्रत्येक वाक्याला अनुमोदन...आता 'मला कधी काळी आमिर खान आवडायचा' असं म्हणायला लागतय.
आता पर्यन्त त्याने स्वतःला परफेक्श्नीस्ट म्हणून जी इमेज बनवली होती...ती धुळीला मिळवली. धूम १/२ च्या पुण्याईवर लोक धूम ३ बघायला गेले आणि थक्क होवून बाहेर पडले.
त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही धूम ३ आय्मॅक्स मधे वैगरे बघितला नाही.
आमिर खान ने खरोखर नाचू नये, एक्दम बुटलर वाटतो आणि त्याला तो टॅप डान्स अजिबात सूट झाला नाही. (आपला गोविंदा बुटलर असून पण नाचताना छान च वाटायचा) सर्कस च्या एका सीन मधे ऑडीयन्स मधे एक बाई पिन्क साडीमधे दाखवली, पुढ्च्या सीन मधे गायब होती, पुन्हा शेवटच्या सीन मधे दाखवली.
अभिषेक आणि उदय झोपड्यांच्या छ्परा वरून रिक्षा आणतात तेव्हा तर मी डोळयातून पाणी येईपर्यंत हसले.
पब्लिक अॅक्च्युअली एन्जॉय करत होते...सगळेच 'काय फालतूपणा दाखवत आहेत' अश्या टोन मधे हसत होते.
अश्याच स्टोरी चा एक ईंग्लिश सिनेमा मधे कुठेतरी पाहिला होता, नाव आठवत नाही. जबरदस्त होता आणि मेन म्हणजे सस्पेंस सगळ्यत शेवेटी ओपन होते. कुणाला नाव माहीत आहे का?
हो आहे........ जादुगार वर आहे
हो आहे........ जादुगार वर आहे वाटते तो चित्रपट ..... प वरुन काहीतरी नाव आहे
अश्याच स्टोरी चा एक ईंग्लिश
अश्याच स्टोरी चा एक ईंग्लिश सिनेमा मधे कुठेतरी पाहिला होता, नाव आठवत नाही. जबरदस्त होता आणि मेन म्हणजे सस्पेंस सगळ्यत शेवेटी ओपन होते. कुणाला नाव माहीत आहे का?<<< प्रेस्टिज.
प्रेस्टिजमधे सस्पेन्स सिनेमाभर दिसत राहतं, पण एकदाही आपल्याला ते समजत नाही ही गोष्ट अक्षरशः डोक्याला झिणझिण्या आणणारी होती. त्या अभिनेत्याची ती कमाल होतीच, पण त्याहून जास्त दिग्दर्शकाची कमाल होती. (क्रिस्तोफर नोलन... नाम ही काफी है)
आपल्याकडे दिग्दर्शकापेक्षा स्टार मोठा झाला की हे असले पिक्चर बनतात.
येस नंदिनी...............
येस नंदिनी............... प्रेस्टिज....... अफाट चित्रपट आहे... सस्पेन्स कळल्यानंतर मी परत एकदा बघितला .. व्हाय दिस कोलावरी डी म्हणुन ...
येस्स राईट... धूम मधे फक्त तो
येस्स राईट... धूम मधे फक्त तो कन्सेप्टच उचललाय पण त्याची वाट लावलीय. चोर चोरी कसा करतो वैगरे सेकन्डरी आहे . आमिर खान ला गोळी लागते पण मिळत नाही तेव्हा दोनच मिनिटे काय ती उत्सुकता वाटली. आणि उचलेगीरी लगेच लक्षात आली. खर तर छान सस्पेन्स ठेवता आला असता. प्रेस्टिज मधे सत्य सर्वात शेवेटी कळत. दॅट वॉझ ग्रेट.
उदयन आणि यशस्विनी मस्त
उदयन आणि यशस्विनी मस्त लिहलेय..:हहगलो:
मस्त परिक्षण रे उदय... काश ,
मस्त परिक्षण रे उदय...
काश , आधी वाचलं अस्तं तर काल इतका मनस्ताप सहन करायला लागला नसता..
,'हम तो डुबे है सनम ले तुझे भी ले डुबे..![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
आमिर आणी कतरीना आर अ बिट फेस सेवर........
बाकी उदय + १००००
अश्याच स्टोरी चा एक ईंग्लिश
अश्याच स्टोरी चा एक ईंग्लिश सिनेमा मधे कुठेतरी पाहिला होता, नाव आठवत नाही.>> नाउ यू सी मी नावाचा पण जादूगारांवरचा सिनेमा आहे. त्यातही शेवटपर्यन्त उघड होत नाही सस्पेन्स.
नेक्स्ट टाईम वाच आधी वर्षा
नेक्स्ट टाईम
वाच आधी वर्षा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
ह्म्म. आमिरपण नकोसा वाटला का
ह्म्म. आमिरपण नकोसा वाटला का ह्यात? अरेरे!!
मॉलमध्ये ७०० रु तिकिट
मॉलमध्ये ७०० रु तिकिट आहे.
सिंगल स्क्रीनला ४० रु ला आला की पाहीन
Dhoom 3 has become the
Dhoom 3 has become the blockbuster of the year, doing equally well in India and abroad. Its dubbed versions in Tamil and Telugu have also done well.
The film has achieved the rare honour of crossing the Rs 100 crore collection mark in its opening weekend itself. It has also earned the distinction of maintaining the Rs 30 crore+ collections on all three days.
पण याला ब्लॉकबस्टर म्हणता येइल का? चित्रपटाचे बजेटच १५० कोटी असल्याचे वाचलेय. (अजुन ब्रेक इवनलाच ५० कोटी कमवावे लागतील).
चेन्नई एक्स्प्रेसचा पहिल्या
चेन्नई एक्स्प्रेसचा पहिल्या दिवशीच्या कलेक्शनचा रेकॉर्ड मोडलाय म्हणे. तोही सुटीचा दिवस नसताना,
कलेक्शन चं आश्चर्य वाटू नये,
कलेक्शन चं आश्चर्य वाटू नये, आमीर चा ऑडियन्स आमीर साठी जाणारच, शिवाय धूम १-२ च्या पॉप्युलॅरिटीच्या बेस वर ३ बघणारेही असणारच. आमच्याकडे फुल्ल पॅक होता हॉल, आम्ही तिसर्या दिवशी गेलो होतो.
तसेही हे मार्केट व्यवस्थित मॅनेज केलेलं असतं. १०० - २०० कोटीचे हिशेब आधीच करून रिलीज डेट ठरवली जाते.
सिनेमाचा अर्ध्याहून जास्त
सिनेमाचा अर्ध्याहून जास्त खर्च हल्ली ब्रॅन्डिंग आणि इन फिल्म पब्लिस्सीटीतून काढलेला असतो. तिकीटविक्रीचे पैसे म्हणजे बोनस असतो.
Pages