पुणे गटग १५ डिसेंबर २०१३

Submitted by फारएण्ड on 11 December, 2013 - 22:45
ठिकाण/पत्ता: 
गंधर्व रेस्टॉरंट. ज्यांना तो भाग माहीत नाही त्यांना सहज सापडण्याकरिता जवळच्या खुणा: बालगंधर्व रंगमंदिर, बालगंधर्व पूल, कॉर्पोरेशन, जंगली महाराज रस्ता. खाली साधारण लोकेशनचा गूगल मॅप आहे.

येत्या रविवारी पुण्यात गटग ठरवले आहे. कोणाला जमू शकेल त्यांनी कळवा व अवश्य या.

गंधर्वची गूगल मॅप लिन्क. साधारण या ठिकाणी आहे.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, December 14, 2013 - 22:30 to रविवार, December 15, 2013 - 01:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एफ. सी कॉलेज रोडलाच वैशालीच्या लाईनमध्ये आम्रपाली नावाच रेस्टो आहे. फुड छान आहे तिकडच

वेळ ऑफिशियलीच जरा पुढची करा. १०-१०.३० वगैरे. थंडी आहे आणि रविवारही.
प्रातः ९ ला कोणीही येणार नाही तिथे, कदाचित एकटा फारेन्ड सोडून Proud

पूनम - तू १० ला ये. पुढे आपण पाहिजे तेवढे बसू Happy

९ ला कोणीही येणार नाही तिथे, कदाचित एकटा फारेन्ड सोडून >>> माझ्या वेळेवर जाण्याच्या कौशल्यास बराच बेनेफिट ऑफ डाउट देत आहेस येथे तू :).

गायत्री, विद्या - जरूर या. कोथरूड मधून जाणारे आहेत. मीही आहे.

मुग्धा - आता पुढच्या वेळी ते चेक करू. या वेळेस गंधर्व आता बदलायला नको. लोकांचा गोंधळ होईल. तू येणार आहेस काय?

विद्या मी येणार आहे.
सायकलींगला एकत्र नाही जाणार आहोत.. तू येणार असशील तर सांग (गटगला Happy )

हाय लोक्स ,

म्या पण येतु ,

गंधर्व ओ के आहे , , संयोजक वरचा पुर्ण हॉलच बूक करुन टाका त्या वेळेसाठी .

पग्या तू धावत ये. परत जाताना कोणीतरी लिफ्ट देईल तुला Happy

फारेन्डा, माझे ठरत नाहीये. प्रापंचिक जबाबदार्‍या. जमले तर ऐनवेळीच येईन, पण १० नंतरच हे फिक्स! Proud

मुग्धा - आता पुढच्या वेळी ते चेक करू. या वेळेस गंधर्व आता बदलायला नको. लोकांचा गोंधळ होईल. तू येणार आहेस काय?>>>>>> प्रयत्न करेन पण ९ जरा जास्तच लवकर होतय रे आणि तेही रवीवारच्या सकाळी. वेळ थोडी उशीराची ठेव....

९ खरच लवकर होतय Sad
दहा म्हणजे आम्ही येईपर्यंत तुम्ही सगळं खाऊन संपवलेलं असणार आणि आम्हाला चहावर कटवणार (आठवा अजय गटग Proud माझ्यासाठी नाही नंतर आलेल्यांसाठी आठवण Proud )
एकच सुट्टी मिळते रविवारची झोपायला Proud
बघा की काही पुढे मागे होतं असेल तर .

रिया - एक तासात अशी किती झोप होणार आहे तुझी,

मी रोज पहाटे ९ वा, उठतो तरी मला आहे का काही कंटाळा , नाही ना मग ये वेळेवर नाहीतर तुझा ब्रेकफास्ट संपलाच म्हणून समज.

गंधर्व फायनल ना? ग्रेट! मी १० नंतरच! Proud

आम्रपाली >> इथे नंतर कधी जमायचे ठरल्यास लंच/ डिनर होऊ शकते. सकाळी ११ च्या पुढे सुरु होते ते. स्नॅक्स वगैरे प्रकार नसतो तिथे बहुतेक. पण शांत आणि मस्त आहे.

किरण, नऊला पोहचायचं म्हणजे मला ८ ला घरातुन निघावं लागेल रे Uhoh
मी कितीलाही आले तरी मी ब्रेफा करणारच सांगुन ठेवतेय Proud
(तरी नशिब समजा मी अजुन चॉकलेटचं नाव काढलेलं नाहीये :फिदी:)

अतुलदादाने पाहिला नाहीये का हा बाफ अजुन? Uhoh

लोकहो गंधर्व रेस्टॉ ला फोन करून सांगितले आहे. सकाळी बुकिंग ची गरज नाही असे त्याने सांगितले. मागच्या गटगचे अनुभव पाहता तसेच असावे.

हिम्या, अकु, रिया - या तुम्हाला जमेल तेव्हा. अजून कोणी येणार असाल तर वरती नाव टाका.

मला अजूनही कळत नाहीये मी येउ शकेन का नाही ते. आयत्या वेळेस आले तर चालेल ना?
कोणाचा नंबर द्याल का, म्हणजे फोन करून येऊ शकेन.

ओके,

मी वारजेमधून येतोय, कोणास लिफ्ट हवी असल्यास कळवावे , ( माझ्या गाडीतून मी एकटाच येतो आहे)

गटग सुसंपन्न झाले. मजा आली. मी गंधर्व हॉटेलात अगोदर सांगितल्याप्रमाणे १०:१० वाजता पोहोचले! मायबोलीचा ग्रूप लगेचच दिसला. गायत्री, देवा, किरणकुमार, सहेली, स्वराली यांना पहिल्यांदा पाहिले/ त्यांच्याशी बोलले. अगो सुद्धा पहिल्यांदाच भेटली. (अर्थात मायबोलीवरच्या मंडळींना पहिल्यांदाच भेटलो तरी तसे अजिबात वाटत नाही हा भाग निराळा!) फारएन्ड, पराग, शैलजा, इन्ना, हर्पेन, चिनूक्स (ह्याच्याशी मी काही बोलण्याअगोदरच तो अंतर्धान पावला), काशी, केदार यांना अगोदर भेटले होतेच! गप्पा छान रंगल्या होत्या. आळीपाळीने ओळखी करून घेणेही चालू होते. खाणेपिणे तर लगातार चालू होते. शेवटी दुपारच्या टळटळीत १२:३० वाजता गंधर्वच्या कर्मचार्‍यांनी साश्रू नयनांनी आम्हाला निरोप दिला. Proud
फारेन्डाने आणलेल्या चॉकलेट्समुळे गटगची गोडी वाढली. थँक्स फारेन्ड!
प्रत्येक टेबलावर बर्‍याच वेगवेगळ्या चर्चा समांतर पातळीवर व वेगाने होत असल्यामुळे त्यांचा गोषवारा देणे अशक्य आहे! Proud पण मायबोलीच्या बाफांच्या चर्चा नेहमीप्रमाणेच रंगल्या.

भरपेट खादाडी झाली. गंधर्व स्पेशल कटलेट मी पहिल्यांदा खाल्ले. चांगले होते. वेटरला दर खेपेस वेगवेगळ्या ऑर्डरी देऊन भंजाळून सोडण्याच्या कामी जनतेला यश आले. तरी त्याने बिचार्‍याने आमच्या सर्वांच्या ऑर्डरी बर्‍यापैकी न चुकता आणल्या हेच नशीब! सर्वात शेवटी आमच्या टेबलावर त्याने कटलरीचा साठा उर्फ चमच्यांची आरास करायचे का ठरविले ह्याचे कोडे मात्र मला उलगडले नाही!

उर्वरित वृत्तांत बाकीची मंडळी देतीलच! रविवारची सकाळ नॉनस्टॉप बडबड, हशा व खादाडीमुळे सार्थकी लागली. संयोजकांचे खास धन्यवाद! Happy

मस्त वृ अकु. मजा आली सर्वांना भेटून. आत्ता वरची लिस्ट चेक केली त्यातील कापो व योगुली सोडले तर इतर सर्व आले होते. त्या लिस्ट मधे नसलेले पण "कदाचित्/उशीरा येउ/आयत्या वेळेस सांगू" पैकी सहेली आली होती. Happy

१२:३० वाजता गंधर्वच्या कर्मचार्‍यांनी साश्रू नयनांनी आम्हाला निरोप दिला.>>> :D. ते बिचारे 'जरा बिल आणू का विचारायला गेलो तर लगेच पुढची ऑर्डर देतात" अशी तक्रार करत असतील मालकाकडे.

किरण कुमार, सहेली, स्वराली, गायत्री, हर्पेन व अगो यांना पहिल्यांदाच भेटलो. रीतीरिवाजाप्रमाणे केदार नुकताच आल्या आल्या होणार्‍या गटगंमधे हे ही आले आता. देवा कधी गायब झाला ते कळाले नाही.

सहेली व इतरांनी ऑर्डर देण्याआधीच त्या भागात वजन कमी करण्याबद्दल चर्चा झाली त्यामुळे नंतर टेबलच्या त्या भागातून येणार्‍या ऑर्डर्स वर परिणाम झाला असेल. तेथे बहुधा लौकरच "येथे वजन कमी करण्याबद्दल चर्चा करू नये" अशी नवीन पुणेरी पाटी लागेल. एका वेटरचा किरण कुमार खूप फेवरिट असावा (किंवा उपस्थितांत केवळ तोच बिल द्यायची क्षमता राखून आहे असे त्याला वाटले असावे). कारण प्रत्येक कॉफी त्याच्या समोर पहिल्यांदा तो ठेवत होता. मग लगेच आम्ही दुसरीकडे हलवली, तरी पुढची पुन्हा किकु समोरच Happy

हर्पेन ने एक बहुउद्देशीय कापड व त्याचे विविध रूपात उपयोग (करून) दाखवले. मात्र त्या नादात त्याला नक्की काय म्हणतात ते विचारायचे विसरलो. ते त्याने फॅशन स्ट्रीट वर विकत घेतल्यानंतर तेथे धाड पडल्याचे ही त्याने सांगितले. त्यामुळे अ‍ॅण्टीकरप्शन अधिकारी नोटा प्लॅण्ट करतात तसे अतिक्रमणविरोधी पथकाने ते प्लॅण्ट केले होते अशी शंका आली.

सर्वांना पुन्हा कधीतरी भेटायला आवडेल.

मस्त मजा आली गटगला! नेहमीप्रमाणेच खादाडी आणि गप्पा रंगल्या. Happy
अगो, स्वराली, किरणकुमार, काशी, सहेली, हर्पेन आणि गायत्रीला पहिल्यांदा भेटले.

पुन्हा कधी गटग?

एक बहुउद्देशीय कापड व त्याचे विविध रूपात उपयोग (करून) दाखवले. >> Lol प्रत्यक्ष घटना मजेदार होती.
हे एखादी बाही वरून खालून कापली असता जशी आरपार होते त्या प्रकारातले कापड होते [फक्त डोक्याच्या घेराचे व स्ट्रेचेबल प्रकारातले] - होजियरी टाईपमधले. त्याचा उपयोग बहूद्देश टोप्या / शिरस्त्राण / कानटोपी / नाकटोपी/ गळाटोपी, हाताला गुंडाळायचा [व घाम टिपायचा] बँड असा होतो हे हर्पेनकृपेने लक्षात आले आहे. Happy

अकु, बाहीपेक्षा लहान मुलांचा कापलेला टी-शर्ट किंवा बनियन असा प्रकार वाटला मला. फिदीफिदी

सगळ्यांना भेटून खूप छान वाटले.

आज आमच्याकडे जरा उशिरा उजाडल्याने जावू कि नको असा विचार होता.पण घरची ब्रेकफास्ट ची तयारी करून उशिरा का होईना जावून येवू असे वाटायला लागले .
पुण्यात कोणी मंत्री येणार होता कि काय म्हणून रस्त्यात बरेच पोलिस होते .उशिरा पोहोचली. आत मध्ये एक ग्रुप दिसला म्हटले हेच असावे मायबोलीकर !
सगळ्यांचा चहा ,खाणे झाले होते असे दिसले .मग काशी ,केदार ,अगो ,सहेली ,इन्ना ,पराग ,हर्पेन,किरण कुमार ,आणि अकु ,फारेंड शी ओळख झाली .चहा ,खाणे सुरु होतेच .काशी पण नाशिकची असल्याने छान वाटले.वत्सला ची पण आठवण काढली .हर्पेन यांनी magic स्कार्फ चा डेमो दिला.
रिया ,आर्या,दक्षिणा वर इतर पुणेकरांना मिसले.

Pages