पापण्यांतला पाऊस
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
71
पुर्वी आपण जेव्हा जेव्हा भेटायचो,
तेव्हा तेव्हा पाऊस पडायचा.
पाऊस मग नेहमी सोबत असायचा
कधी सर..
तर कधी झर झर...
पण यंदा...
आशेचे ढग दाटत होते,
पांगत होते,
मन ओथंबून गेलं.
तू येशील... भेटशील...
शेवटी सगळा पाऊस
पापण्यांत शिल्लक राहीला...
आणि यंदाचा पावसाळा
कोरडाच गेला.
काल पाऊस आला
नि मी दार उघडलं...
पुर्वी आपण भेटलो की पाऊस यायचा,
आता निदान पाऊस आलाय म्हणून
तरी भेटूया...
येशील ना?
दार उघडचं आहे..
आपण भेटलो की पाऊस येणार हे नक्की,
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे.
विषय:
प्रकार:
शेअर करा
क्या बात !
क्या बात !
आवडलं
आवडलं
(No subject)
सुरेख.
सुरेख.
सुंदर!
सुंदर!
दक्षे कसलं सुंदर लिहिलयस...
दक्षे कसलं सुंदर लिहिलयस... आवडली..
अ प्र ती म. खूप आवडली. अतिशय
अ प्र ती म. खूप आवडली.
अतिशय सुंदर आणि ओघवती कविता.
दक्षे, हा गुण नव्हता महिती.
दक्षे, हा गुण नव्हता महिती. मस्त लिहिलीय ग. आवडली.
दक्षे काय भारी लिहीलयस ग.
दक्षे काय भारी लिहीलयस ग.
वाह!!! मस्तच गं...खुपच सुंदर
वाह!!! मस्तच गं...खुपच सुंदर जमलिये. निव्वळ अ प्र ति म
सिंब्ली ग्रेट! अत्यंत सुंदर!!
सिंब्ली ग्रेट!
अत्यंत सुंदर!!
दक्षिणा.... कित्येक दिवसांनी
दक्षिणा....
कित्येक दिवसांनी तुझे लिखाण वाचायला मिळाले आणि तेही इतक्या सुंदर चित्रमय कवितेच्या रुपात.... मन खरेच हरखून गेले....विशेषतः कवितेतील 'आशा मनी अजुनी तरंगत आहे...' हा भावनेने....खालील ओळ प्रतीकच आहे तुझ्या विचारांचे :
"......आपण भेटलो की पाऊस येणार हे नक्की,
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे...."
पाऊस पापण्यांत साठवून ठेवल्या आहे ज्याच्यासाठी तो भाग्यवंत कवितेमुळे सुखावून जाईल. काय योगायोग बघ....आजच भारती बिर्जे-डिग्गीकर यांची एक कविता वाचली. त्यातील खालील चार ओळी ह्या तुझ्या स्पर्शदायी विचाराशी किती मिळून जातात ते पाहा :
घर उभेच आहे जराजरासे थकलेले
मन माझेही तडजोडी करून झुकलेले
वेढतो मला दशबाहुंनी पण परिसर हा
सांगतो मला ,’’येथलीच तू, येथेच रहा..’’
सारेच सुंदर केलेस तू दक्षिणा....
आवडली ! एकदम मस्त.. एका
आवडली !
एकदम मस्त.. एका बैठकीत.. एकदाही फेरफार न करता.. लिहीलेली आहे असे मनाला वाटुन गेले
वर्षे अगदी अगदी काहीही फेरफार
वर्षे अगदी अगदी काहीही फेरफार न करता...
सुंदर लिहिलय आवडली
सुंदर लिहिलय
आवडली
छान लिहीलयस दक्षे
छान लिहीलयस दक्षे
खल्लास कविता! खुप तरल!!
खल्लास कविता! खुप तरल!!
दक्षे, माझा विश्वासच बसत नाहीये... तु इतकी सुंदर कविता करतेस.
लिहीत रहा गं. आम्ही आता तुझ्या कवितांची वाट पहाणार.
रच्याकने, पाऊस हा आपल्या दोघींचा जिव्हाळ्याचा विषय आहे, हे आताच समजलं.
अग्गोबाई सुरेख लिहिलियस गं!
अग्गोबाई
सुरेख लिहिलियस गं! तुझ्यातल्या कवयित्रीनं असं अधूनमधून हळूच बाहेर डोकावणं हा खुपच सुखद साक्षात्कार आहे.
आज सुर्य पश्चिमेकडून
आज सुर्य पश्चिमेकडून उगवला....!!!!
आशयघन...
दक्षे, भारीच लिहीले आहेस.
दक्षे, भारीच लिहीले आहेस.
दक्षी प्रेमात पडल्याची ही
दक्षी प्रेमात पडल्याची ही सगळी लक्षणं आहेत!
समोरच्याने लवकरात लवकर
समोरच्याने लवकरात लवकर "हेल्मेट" खरेदी करावे
दक्षे , मस्तच गं...
दक्षे , मस्तच गं...
व्वा! छान.
व्वा! छान.
मनातुन उमटलीय, मस्त!
मनातुन उमटलीय, मस्त!
खुपच आवडलं..
खुपच आवडलं..
दक्षिणा, शेवट फार आवडला.
दक्षिणा,
शेवट फार आवडला. प्रवाहीपणा आणि संयत अभिव्यक्ती हे गुणविशेष प्रामुख्याने जाणवले. कृपया लिहीत राहावेत.
मनापासून शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
खूपच सुरेख आणि अवीट… ही
खूपच सुरेख आणि अवीट… ही कविता "माझी असती" तर कित्ती बरं झालं असतं असं वाटायला लावणाऱ्या फार मोजक्या कविता माझ्याकडच्या यादीत आहेत …. तुझी ही कविता आज त्या यादीत जाउन बसली एवढं नक्की…
व्वाह!!!!
व्वाह!!!!
काल पाऊस आला नि मी दार
काल पाऊस आला
नि मी दार उघडलं...
पुर्वी आपण भेटलो की पाऊस यायचा,
आता निदान पाऊस आलाय म्हणून
तरी भेटूया...
येशील ना?
दार उघडचं आहे..
खास !!! एकदम मनातल मांडलस माझ्या
लिहीती रहा !
आपण भेटलो की पाऊस येणार हे नक्की,
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे..............वाह वा !!
-सुप्रिया.
Pages