पोहे फॅन क्लब

Submitted by प्राची on 22 November, 2013 - 23:42

पोहे, पौवा, पहुवा, चिवडा, चिडवा.... ही आणि अशी अनेक नावे असलेले गोरे गोरे, बारीक, शेलाट्या बांध्याचे पोहे. Happy
जाड पोहे, पात़ळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे...अनेक रुपं
'पोहे' न खाल्लेला मराठी माणूस मिळणे अवघड आहे.
'पोहे' हा आयटम नसलेली किराणामालाची यादी मिळणे अवघड आहे.
कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोके, मेतकूट पोहे, लावलेले पोहे.... अश्या बर्‍याच पाकृ आहेत पोह्यांच्या.

तुम्ही केलेले नवे नवे प्रयोग, जुन्या परंपरागत चालत आलेल्या पाककृती....सगळ्या या एका धाग्यावर एकत्र करू या.
पोहे फॅन क्ल्बचे सदस्य व्हा
जुन्या लिंक्स द्या.
नव्या पाकृ लिहा.

चला तर मग.... Happy

प्रतिसादात दिल्या गेलेल्या पाककृती आणि लिंक्स.

१. प्राची - कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.

हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.

हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे. स्मित

२. अश्विनीमामी -
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.

३. पौर्णिमा -
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे.
४. प्राची -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
५.योगेश कुलकर्णी -
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
६.योगेश कुलकर्णी -
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार.
७.भरत मयेकर
इंदोरी पोहे
८. योगेश कुलकर्णी -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
९. लक्ष्मी गोडबोले -
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
१०.के अंजली -
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
११. आरती. - आलेपाक.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे पोहे केले तर वरून (इतर) मंडळींना भाजलेले दाणे लागत्तातच, शिवाय वरून बारीक चिरलेला टोमॅटो. नाहीतर पोहे कोरडे लागतात;>> kanda bharpur ghalayacha ani gulabisar paratayacha. Pohe korade honar nahit hyachi hami mazi!

पोहे गरम.
पोह्यांना पहुवा कोणत्या भाषेत म्हणतात?

नानबा, काहीही केलं तरी टोमॅटो लागतोच. मी भरपूर कांदा घालून मस्त परतून घेते. मीच कशाला, स्वत: साबांनी मऊ लुसलुशीत पोहे केले तरी टोमॅटो लागतोच. साधा उपमा, बॉम्बिनो शेवयांचा उपमा, फोडणीची पोळी अशा पदार्थांवर हे असतं.

ओके, खाऊन पहायला हवे.
<<
"सोडे म्हणजे" हा प्रश्न विचारावा लागतो, म्हणजे त्याच्या चवीची कल्पना तुम्हाला नाही.
तेव्हा,
नको. जरा अ‍ॅडव्हान्स्ड मासेखाऊ अस्तंय ते.

काहीही केलं तरी टोमॅटो लागतोच.
<<
छे छे.
पोह्यांत टमाटा घातला तर पाप लागतं. नरकात मागच्या दारातून 'लॅटरल एंट्री' मिळते.

पोह्यांना पहुवा कोणत्या भाषेत म्हणतात?
<
ज्या भाषेत बाबु ला बबुवा म्हणतात (ई है बंबई नगरिया तू देख बबुवा) त्याच बिहारी भाषेत.

उमड घुमड घन गरजे
पी बिन मन पहुवा न भाये

सिंग केसरिया पीली भुजिया
परदेस छोड आजाओ सैया

कोणत्याही रागात बंदिश म्हणावी
Proud

काहीही केलं तरी टोमॅटो लागतोच.
<<
छे छे.
पोह्यांत टमाटा घातला तर पाप लागतं. नरकात मागच्या दारातून 'लॅटरल एंट्री' मिळते.>>>>
पोह्या'त' नाही, पोह्या'वरून' वगैरे गार्निशिंग.

उमड घुमड घन गरजे
पी बिन मन पहुवा न भाये

सिंग केसरिया पीली भुजिया
परदेस छोड आजाओ सैया

कोणत्याही रागात बंदिश म्हणावी
Proud
<<

आहाहा! पावसाळ्याचा पोहेमल्हार आहे हा.
आता जरा जो भजे.. भऽजे... भ... जेऽ... भजे .. आळवत पुढचा राग येऊ द्या

चिकनी चमेली चुप के अकेली पौव्वा चढा के आयी, यातला पौव्वा म्हणजे पोहे का?
पौव्वा चढाके म्हणजे काय?

पोह्या'वरून' वगैरे गार्निशिंग.
<<
तरी पण नै.

पण काये ना, चिकनमधे कढिपत्ता घातल्याबद्दल ओरडा खाल्ला आहे मी Wink

शेफ रणवीर ब्रार सांगतो तसं जगात कोणतीच रेस्पी 'ऑथेंटिक' नसते. ज्याने जगात पहिल्यांदा फोडणीचे-इंदोरी-कांदे-पोहे बनवले, त्यानेच पहिली अन एकमेव ऑथेंटिक रेस्पी बनवली. त्यानंतरच्या सगळ्या रेस्पी इनोव्हेशन.

तेव्हा जे हवं ते, तसं बनवा, तुमच्या रसनेला आवडलं तर एंजॉय करा. फक्त, टमाटे घातले, तर त्याला 'इंदोरी पोहे' म्हणू नका. संपला प्रश्न. हाकानाका.

Submitted by मोरोबा on 17 June, 2021 - 21:25
<<

हिक्डं या. सांगतो कानात. अद्धा चढवत बसतात लोक. पौव्वा क्या चीज हय. दोन पौव्यांचा एक अद्धा, अन दोन अद्ध्यांचा एक खंबा होतो.

खंबा उक्खाड के! Wink

(रच्याकने, अर्ध्या पौव्याची चिंटी होते. नैन्टी. जास्तीच्या चौकश्या 'तुम्ही दारू कशी पिता' या धाग्यावर कराव्या ही इनंती.)

आमच्याकडे पोह्यांमध्ये टोमॅटो असले नसले तरी फरक पडत नाही. काही वेळा टोमॅटोयुक्त पोहे खूप आवडले होते अशाही आठवणी आहेत. पोहे कोणत्या भाताच्या जातीचे आहेत याने चवीत पडणारा फरक चटकन जाणवला होता अशाही आठवणी आहेत. आठवणी म्हणायचं कारण असे की, हल्ली पोहे खाल्ले गेल्याने भुकेचे एकूण गणित बिघडून जाते. त्यामुळे पोह्यांचा कार्यक्रम क्वचितच होतो.
इंदुरी पोहे सोबत टोमॅटोचे पाप हा प्रयोग करणेत येईल याची नोंद घ्यावी Wink

पुलंच्या खाद्यजीवनात वाक्य आहे. वांगी-सोडा आणि व्हिस्की-सोडा यात जास्त चांगलं काय ते ठरवणे कठीण आहे Happy (मला दोन्हीचा अनुभव नाही ते सोडा Wink )

वांगी-सोडा
<<

वांग्यांत सोडा कसा लागेल ते नुस्ता विचार करूनच हहपुवा.

Pages