तू माझ्यातली संवेदनशीलता
परतवून दिलीस,
जगताना हरवलेली..
जणू जत्रेतून,
वाऱ्यावर गोल फिरणारं चक्र घेऊन दिलंस,
मी धावतेय,
हात उंचावून...
आशेच्या नव्या वाऱ्यावर रंगीत चक्रही गरगरतंय..
माझ्यातला रुक्षपणा माझ्याच अनवाणी पायाखाली उडतोय,
धूळ होऊन!
कित्येक दिवसात असं मुक्त धावले नव्हते..
कपड्याचं भान नको,
रस्त्याचं नको, काट्याकुट्यांच नको...
दिशेची तमा नाही,
सुसाट धावणं...
डोळ्याच्या कडा आज जरा ओलसर,
कोरड्या गालांवर मृद्गंध फ़ुलतोय..
हृदयाची धडधड ऐकू येण्याइतपत
जिवंतपणा जाणवतोय...
गती थोडीही कमी न करता आता तुझ्या दिशेने निघालेय,
माझं असं रूप तुझ्या डोळ्यांत पहायचंय...
धाव थांबली तरी भिरभिरणारं रंगीत चक्र तुला दाखवायचंय...
जत्रा पांगली तर नसेल ना?
आता डोळ्यातनं जे खळतंय ते तुझ्यासाठीचं काही आहे....
ते न बघता जाणार नाहीस ना..
चमत्कारापूरती जीवनात येतात काही माणसं
तू त्यातला नाहीस ना
अजूनही थांबून आहेस ना?
-बागेश्री
(मराठी कविता समूहाच्या 'कविता विश्व दिवाळी विशेषांक २०१३' मध्ये प्रकाशित)
हृदयाची धडधड ऐकू
हृदयाची धडधड ऐकू येण्याइतपत
जिवंतपणा जाणवतोय...<<<
जत्रा पांगली तर नसेल ना?<<<
चमत्कारापूरती जीवनात येतात काही माणसं
तू त्यातला नाहीस ना<<<
वा! या ओळी आवडल्या.
सुंदर!!!!!!
सुंदर!!!!!!
खूप सुंदर आहे ही फार
खूप सुंदर आहे ही फार आवडली
प्रगल्भ लिहितेस तू नेहमी जाशी आहेस तसं लिहितेस
काव्यलेखनातला हा जो काही काव्यप्रकार आहे त्यात तू दिवसेंदिवस अधिकच परफेक्ट होत चाललीयेस आणि एकमेवाद्वितीयही !!!
काव्यलेखनातला हा जो काही
काव्यलेखनातला हा जो काही काव्यप्रकार आहे<<<
अहो म्हणजे मुक्तछंद म्हणावे
अहो म्हणजे मुक्तछंद म्हणावे की स्फूट म्हणावे की ललितकाव्य ....यातले नेमके काय म्हणायचे मला समजले नसल्याने मी तसे म्हणालो

हा कोणताही प्रचलीत
हा कोणताही प्रचलीत काव्यप्रकार नाही (माझ्यामते). बागेश्री या फॉर्ममध्ये स्वतःला खुलवतात आणि हा फॉर्म मुळातच अनाकर्षक असल्याने त्यांचे स्वतःला खुलवणे आणि या फॉर्मने रसिकांना खुलवणे यातील गॅप तशीच राहते हा माझा वैयक्तीक अनुभव आहे. त्यांनी स्वतःला खुलवणे कितीही एनहॅन्स केले तरी शेवटी या फॉर्ममध्ये बिल्टइन असलेले कोडगेपण प्रभावीरीत्या समोर येते. (हे कदाचित मी उद्या लिहिले नसते, फॉर द रीझन्स एव्हरीवन नोज ऑन माबो).
-'बेफिकीर'!
रीजन मी समजू शकतो आहे ...असो
रीजन मी समजू शकतो आहे :)...असो
आपला प्रतिसाद आकळला बेफीजी व पटलाही ..पण कोडगेपण हा शब्द वापरला आहे त्या बद्दल विचार करत आहे कोरडेपण असे म्हणायचे नसेल ना ! ...असे मला वाटले
फॉर्ममधील बिल्टइन कोडगेपण...
फॉर्ममधील बिल्टइन कोडगेपण... अरे वा!!
साच्यात कुठलेही शब्द घाला... कोडगी कविता बाहेर येईल.. धमाल आहे भूषणराव!
वैभव,
कवितेचा फॉर्म मला ठाऊक नाही. हा प्रचलितही आहे नाही माहित नाही.. रसिकांनी स्वीकारलाय हे खरंय.
मला असं व्यक्त होताना अभिव्यक्ती खुलवता येते आणि सादरीकरणानं अशा रचनांचं सौंदर्य खुलतं ह्याचा आत्मविश्वास आला आहे.
सादरीकरणानं अशा रचनांचं
सादरीकरणानं अशा रचनांचं सौंदर्य खुलतं <<<
हो मी पाहिलय तुझं सादरीकरण तुला ते छानच जमतं !!
पण केवळ सादरीकरणावरच भिस्त नको ,,,केवळ चांगले सादरीकरण म्हणजेच चांगले काव्य नाही हे तूही जाणतेसच तो फक्त कविता झाल्यानंतरचा नंतरचा एक भाग आहे कविता करताना तुला ज्या ज्या बाबींकडे लक्ष द्यायचे आहे त्यांवरच लक्ष केंद्रित करत जा तू प्रत्यक्ष सादर न करताही म्हणजे केवळ वाचनातून ती लोकांपर्यंत तुझ्या मनात आहे तशी व तितकी पोचायलाच हवी
अजून एक (मी पूर्वी ह्याबद्दल तुझ्याशी बोललो आहे बहुधा ) की कवितेच्या ओळी कविता समोर नसल्यावरही लोकाना जश्याच्या तश्या आठवू शकतील अश्या हव्यात ह्या काव्याच्या एका महत्त्वाच्या गुणासाठी तू नेमके काही करतेआहेस की नाही ? तू हाताळत असलेल्या फोर्म मध्ये त्यासाठी काय काय करावे लागेल ते आता तूच काय ते पहा मला तर छंद-मुक्त अशी एक ओळही साधी सुचतही नाही बघ !
असो
शुभेच्छा
होय वैभव.. आपली झाली आहे
होय वैभव..
आपली झाली आहे चर्चा ह्या मुद्द्यांवर. तेव्हाही तुझे मुद्दे पटले होते आणि आताही पटले आहेत...
लिहीते राहणे हा एक प्रवास आहे. नवे नवे टप्पे गाठत रहाणे हे योगाने येणारच.
अनेक बाबींवर एकत्रित विचार, अनेक आवडत्या कवी/ लेखकांबरोबर विचार विनीमय सुरू असतो.. खुप काहीशिकायला मिळतंय.
थोडक्यात, लिहीणं आणि निरिक्षण दोन्ही सुरू आहे.. I am enjoying the phase!
हा फॉर्म माझी अंगभूत लिखानशैली आहे, त्यामुळे सहजता असते.. आणि सहजता मला भावतेच!
सादरीकरणावर संपूर्ण भिस्त आहे किंवा लिहीताना सादरीकरणाच्या दृष्टीकोनातून लिहीतेय, असं नाही. परंतू वैभव, सादरीकरण हा निश्चितच मह्त्त्वाचा भाग आहे, जर तुम्ही तुमचं लिखाण पब्लिक फोरम वर आणणार असाल तर. तुम्ही लिहीता उत्तम मात्र सादरीकरण करताना ढेपाळत असाल तर लिहीलेल्या रचनेला संपूर्ण न्याय मिळत नाही असं मला पर्सनली वाटतं.
केवळ चांगले सादरीकरण म्हणजेच
केवळ चांगले सादरीकरण म्हणजेच चांगले काव्य नाही<<< गूड वन!
>>>>>> बागेश्री | 5 November, 2013 - 22:30
फॉर्ममधील बिल्टइन कोडगेपण... अरे वा!!
साच्यात कुठलेही शब्द घाला... कोडगी कविता बाहेर येईल.. धमाल आहे भूषणराव!<<<<<<
देअर सीम्स टू बी सम प्रॉब्लेम. जितके तुमच्यासाठी बोलावे तितके ते तुम्हाला तुमच्या मुळाविरुद्ध वाटते हा प्रवास अजुनही चालू आहे? भूषणराव??
काहीतरी भयंकर गैरसमज झालेला दिसतो.
लेट मी ट्राय टू एक्प्लेन इट 'यूअर' वे!
आपण काय आहोत हे समजल्याविना आपल्याला ग्रेट म्हणणारे भेटतील, आपण काय नाही आहोत हे समजल्याविनाही आपल्याला ग्रेट म्हणणारे भेटतील, पण तुम्हाला जे ग्रेट म्हणणारे भेटलेले आहेत त्यांना तुमच्या लेखनाचा फक्त आशय भावत आहे आणि 'फक्त' आशय भावण्यामागे तुम्ही रेखाटलेला आशय सहज समजण्याजोगा आहे हे कारण आहे. प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे की तो सहज रेखाटण्याजोगा आशय तुम्ही अत्यंत 'असे कोठे कोणाला म्हणता येते' या नजरियातून रेखाटत आहात.
तोच फक्त 'हे असे आणि निव्वळ असे म्हणायचे आहे, घ्यायचे तर घ्या नाहीतर सुटा' या दृष्टिकोनातून लिहिला तर उड्या पडतील. (उड्या पडणे हे माझे टारगेटच नाही, वगैरे अभिप्राय अर्थातच अपेक्षित नाहीच).
पटले तर (एक कुठलातरी निरर्थक जुना मित्र म्हणून) घ्या नाहीतर तुमची मर्जी!
मला उपरोध स्वतःलाही जमत नाही आणि दुसर्याने तो एक्सरसाईझ केलेलाही पटत नाही.
चूक भूल द्या घ्या
-'बेफिकीर'!
>>>परंतू वैभव, सादरीकरण हा
>>>परंतू वैभव, सादरीकरण हा निश्चितच मह्त्त्वाचा भाग आहे, जर तुम्ही तुमचं लिखाण पब्लिक फोरम वर आणणार असाल तर. तुम्ही लिहीता उत्तम मात्र सादरीकरण करताना ढेपाळत असाल तर लिहीलेल्या रचनेला संपूर्ण न्याय मिळत नाही असं मला पर्सनली वाटतं<<<
द मोस्ट रिडिक्यूलस स्टेटमेंट आय हॅव एव्हर हर्ड फ्रॉम अ पोएट अबाऊट द पोएट्री!
मला वाटते की डॉ. समीर चव्हाण या असल्या मतांची धीटपणे चीरफाड करतात. ही इज अॅन अॅबसोल्यूट सत्यवादी!!!!!!
(तथाकथित??????) सुस्वभावी माणूस म्हणून मी तशी चीरफाड करत नाही.
माफ करा बागेश्री, यापुढे मी
माफ करा बागेश्री, यापुढे मी कुठल्याच प्रकारचा अभिप्राय नाही देणार तुमच्या रचनांवर!
अगं आई गं. कवितेचं डिसेक्शन
अगं आई गं.
कवितेचं डिसेक्शन बघून चुकून अल्जिब्रा नाहितर इनॉरिक चेमिस्ट्रीच्या लेक्चरला येउन बसल्यासारखं वाटायला लागलं.
हा फॉर्म माझी अंगभूत
हा फॉर्म माझी अंगभूत लिखानशैली आहे<<< हेच आत्ता माझ्या मनात चालले होते तुझ्या कवितेबद्दल ...नाहीतर मी काही किरकोळ बाबी सुचवणार होतो की ..
...ओळी पुरेश्या लांबीच्या करणे जागजागी तोडत न बसणे
...यमके निश्चित नसेना का पण टप्प्या टप्प्याने योजणे
....कवितेला कडव्या कडव्यांगणिक पण थोडीच / मोजकीच वळणे ..कलाटण्या देणे
....प्रस्तावनेनंतर फारसे घोळवत न बसता नेमक्या अंतरालाने समारोप साधणे व आशयाच्या एका हाईटवर पोचून तो साधणे
थोडक्यात ...कविता कमी जागेत बसवणे व थोड्या थोड्या अंतरावर एक नादसाधर्म्य साधणे ..म्हणजेच मला सादरीकरण ह्या मुद्द्यावरून तुझे लक्ष कवितेची अधिकाधिक प्रभावी/नेमकी/नेटकी मांडणी ह्या विषयाकडे न्यायचे आहे ...म्हणून मला आत्ता सुचले त्येवढे सांगीतले
पण आता ज्या फ्रेम्वर्कनिशी तू लिहितेस ते सोडले तर तेही चालण्यासारखे नाही हा फॉर्म तुझी अंगभूत लेखनशैली बनला आहे ....... इथपर मी विचार केला तोच तुझा प्रतिसाद आलेला पाहिला
______________
'असे कोठे कोणाला म्हणता येते' या नजरियातून रेखाटत आहात. <<<
मी ह्या वाक्याचा अर्थ न लागल्याने दोनदा प्रतिसाद वाचला ....तसा पवित्रा घेवून बागेश्री लिहित असावी असे मला कधी जाणवले नाही पण आपल्याला तसे जाणवत असेल तर तिने ह्याबाबत सकारात्मकतेने विचार करण्यासारखी परिस्थिती नक्कीच असावी इतकेचच म्हणेन
आपण काय आहोत हे समजल्याविना आपल्याला ग्रेट म्हणणारे भेटतील, आपण काय नाही आहोत हे समजल्याविनाही आपल्याला ग्रेट म्हणणारे भेटतील, पण तुम्हाला जे ग्रेट म्हणणारे भेटलेले आहेत त्यांना तुमच्या लेखनाचा फक्त आशय भावत आहे <<<<<< १००% सहमत बागेश्री तुझ्या बाबतीत म्हणून नव्हे तर कुणाही लेखनकर्त्याबाबतीत हे सत्य आहे म्हणून सहमत
एक माझाच शेर आठवला
खुबी कमी स्वत:स माहिती हवीच आपली
कुणी म्हणेल पावटा कुणी म्हणेल राजमा
असो
बेफीजी व बागेश्री चर्चेसाठी दोघांचे खूप खूप आभार
भूषण, At first place... कुणी
भूषण,
At first place... कुणी ग्रेट म्हणावं ह्या उद्देशाने माझा लेखनप्रवास सुरू नाही. तुम्हाला अपेक्षित असो , नसो, This is what I feel and this is what I mean!
Secondly मी रचनेबद्दल बोलत असताना, मी फक्त त्या रचनेबद्दलच बोलते, ह्यात मत देणारा घेणार्याशी काय वाद/ मैत्री आहे ह्यावर माझा भर नसतो.
कसं लिहील्याने उड्या पडतील, हा सल्ला चक्क अन्वॉन्टेड होता इथे.
तुम्ही कुणाकडून वगैरे बोलू नका. रचनेवरच्या मुद्द्यावंवर मात्र कधीही चर्चा करू शकतो.
धन्यवाद.
माफ करा बागेश्री, यापुढे मी कुठल्याच प्रकारचा अभिप्राय नाही देणार तुमच्या रचनांवर! >> choice is all yours.
वैभव, Very well articulated..
वैभव,
Very well articulated.. thanks!
articulated म्हणजे गं काय ?
articulated म्हणजे गं काय ?
सुस्पष्टपणे आणि मुद्देसुद.
सुस्पष्टपणे आणि मुद्देसुद.
OK ! thanks झोप आता गुड
OK ! thanks
)
झोप आता गुड नाईट
(आत्ताचे वाद विवाद सोडून दे उद्या सकाळ्पर्यंत सगळं आल्बेल असेल बघ् !
सुंदर! ((लिखाण आणि चर्चा
सुंदर! ((लिखाण आणि चर्चा सुद्धा )
चर्चा चांगली झाली आहे .
चर्चा चांगली झाली आहे .
अहाहाहा काय ती सुंदर चर्चा!
अहाहाहा काय ती सुंदर चर्चा! रम्य ती स्वर्गाहुनी चर्चा!
वेगळाच आशय...... चांगला
वेगळाच आशय...... चांगला अभिव्यक्त झालाय.
"जत्रा पांगली तर नसेल ना?" >>> यानंतरच्या ओळी सर्वात विशेष वाटल्या.
धन्यवाद, दोस्तहो..
धन्यवाद, दोस्तहो..
तू जसं लिहितेयस तसंच लिहित
तू जसं लिहितेयस तसंच लिहित रहा. अजिबात बदलू नकोस. खूप मस्त लिहितेयस. कुणीही काहीही म्हणोत. वृत्तात लिहिणं म्हणजेच कविता असा जर कुणाचा गैरसमज असेल तर असू देत. मुक्तछंदात सुद्धा एक लय असते, ताल असतोच की ! नुसता वृत्तांचा, छंदांचा अभ्यास केला म्हणजे कविता येत नाही. ती तुझ्यासारखी आतून आली तरच समोरच्याला थेट भिडते. म्हणूनच लोकांचे प्रतिसाद येतात ना ? की तू कुणाला सांगतेस की मला प्रतिसाद द्या ?
तात्पर्य काय तर कुठला प्रकार आहे, वृत्तात बसते की नाही वगैरे सगळं बाजूला राहू दे. खूप छान कविता आहे. खूप खोलवर गेली
मुक्तछंदात सुद्धा एक लय
मुक्तछंदात सुद्धा एक लय असते<<<
गेली कैक वर्षे हे विधान ऐकत आलो.
कोणीतरी कृपया उदाहरण द्या, मुक्तछंदात लय नक्की कशी काय आणि कुठे असते???????
आनंद सर... खूप छान कविता आहे.
आनंद सर...
खूप छान कविता आहे. खूप खोलवर गेली>>
ही कविता सफल झाली _/\_
मुक्तछंदात एक लय नसते
मुक्तछंदात एक लय नसते वेगवेगळ्या लयींचे वेगवेळे तुकडे असतात असे माझे मत
अवांतराबद्दल दिलगीर पण चर्चा खरोखरच उत्तम होत आहे (आत्ता वाचताना माझेच वरचे प्रतिसादही मला आवडले)
मुक्तकाव्य छान आहे.
मुक्तकाव्य छान आहे. आशयपूर्ण!
तुझ्या भावना व्यक्त करण्यासाठी तू योजलेले शब्द वाचणार्याच्या त्या वेळच्या मनःस्थितीनुसार त्याला भासतील - भावतील. मला बरेचदा वाटते जे शब्द वाचकाला नकळत विचारांच्या, आठवणींच्या दुनियेत घेऊन जातात ते जास्त रुचतात.
मला " हृदयाची धडधड ऐकू येण्याइतपत
जिवंतपणा जाणवतोय..."
" चमत्कारापूरती जीवनात येतात काही माणसं
तू त्यातला नाहीस ना " हे भावले.
Pages