हॅलोवीन फिंगर कुकी

Submitted by रूनी पॉटर on 31 October, 2013 - 15:29

यंदाच्या हॅलोवीन पार्टीसाठी मी या फिंगर कुकीज केल्या. लाल रंग दिसतोय तो जॅम वापरला.
खूप लोक नुसतेच आले आणि कुकीज बघून इइइइ करत परत गेले. थोडक्यात प्रयोग यशस्वी झाला असे समजायला हरकत नाही. Proud

image_0.jpgकृती इथे बघून केली

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूनी, तू भयंकर आहेस!!!

मी पण खूप वेळाने चव बघितली. <<< Lol
आधी डोळे बंद करून, कुकीज टिश्श्यू ने झाकेन आणी मगच चव घेऊन पाहीन <<< वर्षूताई, चला इथेतरी तू कच खाल्लीस म्हणायची. Proud

भयंकर! Lol हॅलोवीन नसता तर कौतुकानं 'खाणारे संपेपर्यंत बोटं चाटत होते' असं तरी म्हणता आलं असतं. Proud

यक्क! ईईईईईई

Proud
मला पण फोटो पाहिल्यावर कसंतरीच झालं. म्हणजेच तुझा प्रयोग एकदम यशस्वी...

,'वर्षूताई, चला इथेतरी तू कच खाल्लीस म्हणायची. .."
हो रे गजानन.. अगदी!!!
यहाँ चायना का ट्रेनिंग फेल हो गया.. Proud

Lol अगदी इइइइइइइ प्रतिसाद आहेत सगळ्यांचे.
ज्यांनी कुकीज हातात घेतल्या ते लोक अगदी खरी बोटं हातात घेतली आहेत असा चेहरा करत होते. Happy

चमन माझ्या डोक्यात त्या बोटांना नंतर खर्‍या अंगठ्या घालायच्या असे आले होते पण तेवढ्या मोठ्या त्या पार्टीवाल्या अंगठ्या नव्हत्या घरी, पण पुढच्या वेळी नक्की.

दक्षिणा अंगठे केले होते थोडे पण कुकीजची चव कशी झालीये हे बघण्यात सगळे फस्त केले घरच्या क्रिटीकने.

वर्षु आगे बढो.

आशु Lol

अरे बापरे. भयानक दिसताहेत.
खायच्या कल्पनेनेच कसंतरीच झालं.

Pages