Submitted by कविन on 11 October, 2013 - 07:37
आहे खरा इथे मी संसार थाटलेला
थोडा हवाहवासा पण पंख छाटलेला
वाईट वाटते का माझी न राहिले मी?
प्रत्येक जण इथे जर नात्यात वाटलेला
अव्यक्त भावनांची दाटी बरीच झाली
जो आज व्यक्त झाला तो भाव बाटलेला
लिंपून घेतले मी नाही कुठे तडा ही
हा भास आत सारा होताच फाटलेला
उजळून दीप सारे गेला कुणी मनाचे
विझलाच तो, अता हा अंधार दाटलेला
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अव्यक्त भावनांची दाटी बरीच
अव्यक्त भावनांची दाटी बरीच झाली
जो आज व्यक्त झाला तो भाव बाटलेला
लिंपून घेतले मी नाही कुठे तडा ही
हा भास आत सारा होताच फाटलेला
>>
वाह!
तुमभी?
कित्ती सुंदर मांडलयस. लिंपून
कित्ती सुंदर मांडलयस.
लिंपून घेतले मी..... वाह, वाह.
व्वा ! तुम्ही गझल लिहिता हे
व्वा ! तुम्ही गझल लिहिता हे माहित नव्हतं.
तिसरी आणि चौथी द्वीपदी सर्वात विशेष वाटली.
मागे कविताने लिहिलेली एक
मागे कविताने लिहिलेली एक कविता गझलच्या जवळ जाणारी होती.
अव्यक्त भावनांची दाटी बरीच
अव्यक्त भावनांची दाटी बरीच झाली
जो आज व्यक्त झाला तो भाव बाटलेला>>>> आवडल
वाह छान !!! अजून येवूद्यात
वाह छान !!!
अजून येवूद्यात
कवे (y)
कवे (y)
मस्तच...
मस्तच...
धन्यवाद बागे, लिहून बघायचा
धन्यवाद
बागे, लिहून बघायचा झटका ग बाकी काही नाही
अतिशय सुंदर ...
अतिशय सुंदर ...
अग ते (y) हा प्रश्न नसुन
अग ते (y) हा प्रश्न नसुन थम्सअपचा सिंबॉल आहे

थोपुवर असं लिहिलस की तो अंगठा वर केलेला लाईक सारखा सिंबॉल येतो
बरेच शेर आवडले अजून
बरेच शेर आवडले
अजून येवूद्यात>>+1
मस्त; आवडली.
मस्त; आवडली.
वाटलेला शेर आवडला! शुभेच्छा.
वाटलेला शेर आवडला! शुभेच्छा.
पुलस्तिसाहेबांशी सहमत! तसेच,
पुलस्तिसाहेबांशी सहमत! तसेच, अंधार दाटलेला हा शेरही छान!
(सर्व शेरांमध्ये काहीतरी मस्त जमेची बाजू आणि काहीतरी किंचित कमतरता आढळणे असे काहीतरी झाले, म्हणून एक दोन दिवस प्रतिसाद काय द्यावा ते सुचत नव्हते).
(सर्व शेरांमध्ये काहीतरी मस्त
(सर्व शेरांमध्ये काहीतरी मस्त जमेची बाजू आणि काहीतरी किंचित कमतरता आढळणे असे काहीतरी झाले, म्हणून एक दोन दिवस प्रतिसाद काय द्यावा ते सुचत नव्हते). >>> +१
अजून प्रयास कर
(सर्व शेरांमध्ये काहीतरी मस्त
(सर्व शेरांमध्ये काहीतरी मस्त जमेची बाजू आणि काहीतरी किंचित कमतरता आढळणे असे काहीतरी झाले, म्हणून एक दोन दिवस प्रतिसाद काय द्यावा ते सुचत नव्हते). >>> +१
शुभेच्छा !
अव्यक्त भावनांची दाटी बरीच
अव्यक्त भावनांची दाटी बरीच झाली
जो आज व्यक्त झाला तो भाव बाटलेला
लिंपून घेतले मी नाही कुठे तडा ही
हा भास आत सारा होताच फाटलेला
बहोत खूब, कविन. माझ्यासारखी झटक्यांमधे राहू नकोस. छान लिहिते आहेस. लिही, गं. अजून लिही