बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाई, लागू दे की. आम्ही जेवून घेऊ. तुम्ही सां.का.पर्यंत पोचा.
आता तारीख बदलू नका. २० म्हणजे दिवसा म्हणजे सोब्रायट्यांचा प्रश्न! Proud

मी न्-शाकाहारी आणलं तर त्यात येतात मासे.. (मी चिकन - मटण खात नाही).
त्यात कुर्ल्या, कोलंबी आणली तर बाईंना त्रास ...
मग फारसं काही उरत नाही. मासे मी यापूर्वी आणले आहेत.

मुलं येणार आहेत का कुणाची? त्यांच्यासाठी काही आणले असते.. Happy

ठिक आहे. मी जेवुन येईनच. मग फक्त विनयने आणलेल एक्झॉटिक थोडस, थोडीशी भेळ, एखादा बटाटावडा, दोन दहीवडे, एक गास भरुन दुध एवढच खाईन. Happy

आयुष्य किती सोप्पं झालं असतं <<< आयुष्य आधीच सोप्पं आहे.. त्यात अजून सोप्पं झालं, तर जगण्यातला राम निघून जाईल ना?

आवरा!

घ्या! चांगल्या हसत पोस्टी टाकतोय तर आवरा म्हणे. तुम्हाला रडत कुंथत लिहिलेल्या पोस्टीच आवडतात वाटतं! Proud

गोगा, तुम्ही आणा कुर्ल्या की विक्रोल्या काय त्या. मी बापडी दोन घास पुलाव खाऊन कोपर्‍यात गप्प बसेन. Proud

हे वाचून का कुणास ठाऊक गानूआजीच आठवल्या ! हॅलोविन आहे म्हणून असेल Happy
मिलिंदा एटिकेटी असल्याने त्याला गानूआजींची लिंक द्या अभ्यासाला.

मला वस्त्रहरण आठवल.
तात्याची बायको : कोपर्‍यात.
तात्या : अगो. कोपर्‍यात म्हणजे तस न्हय गो. आणि किती वेळा गो बसशील कोपर्‍यात. Happy

Pages