फॉल - विंटर मुव्हीज
फॉल सुरू झाला , पानांचे रंग बदलायला लागले, गुलाबी थंडी पडायला लागली, बाजारात भोपळे दिसायला लागले, कॉफी शॉप्स मध्ये दालचिनी, जायफळाचे वास दरवळायला लागले की आम्हाला फॉल मुव्हीज बघण्याचे वेध लागतात. नोरा एफ्रानने आमचे आवडते फॉल मुव्हीज बनवलेले आहेत. तिने जसे फॉल मधले न्युयॉर्क दाखवलेले आहे त्याला तोड नाही. ही यादी सुरू होते ती You've got mail ने. हा पिक्चर फॉल मध्ये सुरू होऊन - हार्ट ब्रेक्स चा विंटर आणून - स्प्रिंग मध्ये नवीन पालवी बरोबर नवे प्रेम घेऊन येतो. पण तरीही त्यातले फॉल चे चित्रीकरण आणि प्रेमकथा