Submitted by श्रीवल्लभ खंडाळीकर on 18 September, 2013 - 13:40
राहिलो तुम्हात पण राहिलो मी आगळा
स्वप्न हे गुंफीत जातो छंद माझा वेगळा
कार्य हे अर्पित असतो दूर देशीच्या स्थळा
अंतरी शोधीत असतो छत्रपतींचा मावळा
उत्तरे शोधीत असतो, मार्ग क्रमितो स्वबळा
अंतरी विनवीत असतो गोकुळीचा सावळा
विनोदी बोल बोलतो हासवाया वर्तुळा
ज्याची त्याला असती मग अंतरीच्या या कळा
वर्ण हे सोडीत जातो भेदीत जातो या मळा
ओलांडतो सीमा श्वास घ्याया मोकळा
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ळ ला ळ वृत्तात गडबडी
ळ ला ळ
वृत्तात गडबडी काफियांची बोंबाबोंब !!
प्लीज आधी गझलेच्या बेसिक्सचा अभ्यास करा
ही गझलच काय कविताही म्हणवत नाही
...जितके वाईट वाटून घ्याल तितकी चांगल्या गझलेबाबतची तळमळ वाढते असा वैयक्तिक अनुभव असल्याने असे म्हणत आहे मी ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रतिसादाचे वाईट वाटल्यास वाटून घेतले तरी चालेल