पनीर अननस अपसाईड डाऊन केक- गोड- चारूता

Submitted by चारूता on 17 September, 2013 - 16:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

ग्रूप- पनीर + फळ

साहित्यः
१) गव्हाचे पीठ - १.५ कप
२) पनीर - १/२ कप
३) पनीर चे व्हे पाणी (पनीर करताना दुधाचे निघालेले पाणी) - साधारण ३/४ कप
४) साखर - १ कप
५) बेकींग पावडर - १ टेबल स्पून
६) बेकींग सोडा - १/२ टेबल स्पून
७) तेल - २ टेबल स्पून
८) कंन्डेस्ड मिल्क - ४ टेबल स्पून
९) व्हेनेगर - १ टेबल स्पून
१०) अननस चकत्या - टिन
११) चेरी - टिन
१२) दुध (जर पनीर विकतचे असेल- आणि व्हे पाणी नसेल तर साधारण ३/४ कप )
११) व्हनीला इन्सेंस
१२) केक पॅन ला लावायला बटर

क्रमवार पाककृती: 

१) मी पनीर घरी केल्यामुळे व्हे पाणी उपलब्ध होते. तेच पाककृतीत वापरले आहे.
२) सगळे कोरडे घटक - गव्हाचे पीठ, बेकींग पावडर, बेकींग सोडा एकत्र केले.
३) हाताने ( किंवा ब्लेंडर मधे) पनीर , तेल, कंन्डेस्ड मिल्क एकत्र केले.हे मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात व्हेनेगर, साखर, व्हनीला इन्सेंस एकत्र केले.
४) ओल्या मिश्रणात कोरडे मिश्रण आणि व्हे पाणी फोल्ड करत गेले. मला साधारण ३/४ कप पाणी लागले. व्हे पाणी उपलब्ध नसल्यास दूध वापरावे लागेल.
५) केक पॅन ला बटर लावून थोडी साखर भुरभुरवून प्रीहीटेड ओव्हन मधे ठेवली. त्याने केक बेसला थोडा कॅरमलाइज्ड इफेक्ट आला. वेळ असल्यास गॅस वर साखर कॅरमलाइज्ड करुन केक पॅन मधे ओतू शकतो.
६) केक पॅन मधे अननसाच्या चकत्या आणि चेरीज लावल्या.
७) हलक्या हाताने केक चे बॅटर वर ओतले.
८) १८० डिग्रीला केक ४०-४५ मिनिटे बेक केला.

वाढणी/प्रमाण: 
४-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

Guilt free केक तयार आहे. गव्हाचे पीठ, कमी तेल- तूपाच्या वापराने हा Diet केक आहे. व्हे पाणीही वापरले जाते. एगलेस असूनही हलका होतो.

माहितीचा स्रोत: 
पनीर केक जालावरून, अननस अपसाईड डाऊन केक माझे सुपीक डोके :)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं रेसिली, फोटो हवाच !
मधे इथल्या सुप्तसिध्द कॅरॅमल पुडींग करताना बर्याच जणांच भांडं उलटताना कॅरॅमल लेयर भांड्याला टणक चिकटत होता त्यामुळे या केकचं फायनल प्रॉडक्ट पहायचय :).

अरे वा मस्त आहे रेसिपी.
पनीर केकबद्दल पहिल्यांदाच ऐकले. अननस अप साइड डाऊन केक माहिती होता.

फोटोला एरर येतेय.
लोला तुला दिसले तर तू कॉपी करून टाक ना इथे प्लीज.

बुवा Proud

भारी.

अमेझिंग! ही कल्पनाच एकदम आवडली. पनीर वापरल्याने त्याला चीजकेकचा फील येतोय का?

श्या.... मायबोलीवरचे पदार्थ चाखून बघण्याची सोयही करा ना अ‍ॅडमीन! Happy

कसला क्ञुट दिसतोय तो केक
सर्लप!
माझ्या बड्डेला करेन मी हा (बहुदा)
प्रश्नांच्या फैरी साठी तयार रहा Proud

Pages