ग्रूप- पनीर + फळ
साहित्यः
१) गव्हाचे पीठ - १.५ कप
२) पनीर - १/२ कप
३) पनीर चे व्हे पाणी (पनीर करताना दुधाचे निघालेले पाणी) - साधारण ३/४ कप
४) साखर - १ कप
५) बेकींग पावडर - १ टेबल स्पून
६) बेकींग सोडा - १/२ टेबल स्पून
७) तेल - २ टेबल स्पून
८) कंन्डेस्ड मिल्क - ४ टेबल स्पून
९) व्हेनेगर - १ टेबल स्पून
१०) अननस चकत्या - टिन
११) चेरी - टिन
१२) दुध (जर पनीर विकतचे असेल- आणि व्हे पाणी नसेल तर साधारण ३/४ कप )
११) व्हनीला इन्सेंस
१२) केक पॅन ला लावायला बटर
१) मी पनीर घरी केल्यामुळे व्हे पाणी उपलब्ध होते. तेच पाककृतीत वापरले आहे.
२) सगळे कोरडे घटक - गव्हाचे पीठ, बेकींग पावडर, बेकींग सोडा एकत्र केले.
३) हाताने ( किंवा ब्लेंडर मधे) पनीर , तेल, कंन्डेस्ड मिल्क एकत्र केले.हे मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात व्हेनेगर, साखर, व्हनीला इन्सेंस एकत्र केले.
४) ओल्या मिश्रणात कोरडे मिश्रण आणि व्हे पाणी फोल्ड करत गेले. मला साधारण ३/४ कप पाणी लागले. व्हे पाणी उपलब्ध नसल्यास दूध वापरावे लागेल.
५) केक पॅन ला बटर लावून थोडी साखर भुरभुरवून प्रीहीटेड ओव्हन मधे ठेवली. त्याने केक बेसला थोडा कॅरमलाइज्ड इफेक्ट आला. वेळ असल्यास गॅस वर साखर कॅरमलाइज्ड करुन केक पॅन मधे ओतू शकतो.
६) केक पॅन मधे अननसाच्या चकत्या आणि चेरीज लावल्या.
७) हलक्या हाताने केक चे बॅटर वर ओतले.
८) १८० डिग्रीला केक ४०-४५ मिनिटे बेक केला.
Guilt free केक तयार आहे. गव्हाचे पीठ, कमी तेल- तूपाच्या वापराने हा Diet केक आहे. व्हे पाणीही वापरले जाते. एगलेस असूनही हलका होतो.
लोला खूप खूप धन्यवाद. मला
लोला खूप खूप धन्यवाद. मला अजून फोटो चे गणित जमले नाही आहे. तुमच्यामुळे निदान फोटो दिसला.
अन्जू -- मी सुध्दा अंड खात नाही, त्यामुळे सतत एगलेस try करत राहते. तुम्हाला हा नक्की आवडेल.
दीपांजली -धन्यवाद तुमच्या followup मुळे finally फोटो आला
रूनी पॉटर ,वैद्यबुवा,चनस,रावी,Chaitrali, अल्पना,वत्सला,प्रीति,सिंडरेला,शूम्पी, मंजूडी - धन्यवाद. तुमच्या अभिप्रायामुळे खुप छान वाटते आहे.
रश्मी.. you are most welcome
मामी - हा cheesee cake सारखा लागत नाही चवीला. पण पनीर मुळे छान texture + richness येतो.
रिया - in advance happy birthday ! बाकी मी घाबरून आहे.(प्रश्नांना )
मस्तं.
मस्तं.
वा मस्त झाला आहे केक.
वा मस्त झाला आहे केक.
रिया - in advance happy
रिया - in advance happy birthday ! बाकी मी घाबरून आहे.(प्रश्नांना स्मित )
>>
अग खुप दुर आहे
अजुन दोन तीन महिने
मी स्वतःला प्रिपेअर करतेय
झकास दिसतोय केक.
झकास दिसतोय केक.
मस्त दिसतोय केक!
मस्त दिसतोय केक!
साहित्याची मोठी लिस्ट बघून
साहित्याची मोठी लिस्ट बघून जरा कठीण वाटला, पण छान दिसतोय आणि जमेल असं वाटतयं!
मस्त प्रकार आहे. लोला, थँक्स.
मस्त प्रकार आहे.
लोला, थँक्स. ( फोटोमूळे जास्तच आवडला. )
साती, जागू
साती, जागू ,शूम्पी,स्वाती_आंबोळे,धन्यवाद.
माधवी - सामान जास्त वाटत असले, तरी बरचसे नेहमीचे घरातलेच आहे.
रिया -मी पण स्वतःला प्रिपेअर करते
दिनेश- तुमची पावती, काहीतरी ग्रेट acheive केल्यासारखे वाटते आहे
छान. हा केक अंडे नसल्याने फार
छान. हा केक अंडे नसल्याने फार फुलत नाही का? का तुम्ही केकचे भांडे प्रमाणापेक्षा मोठे वापरले? फोटो वरून कळत नाहीये म्हणून विचारले. पण कल्पना एकदम छान आहे आणि सोपा वाटला.
फोटोवरुन जबरी वाटतोय केक.
फोटोवरुन जबरी वाटतोय केक. अश्या केकची कल्पना आवडली.
चारूता,
चारूता,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.
जबरी !
जबरी !
मस्तच...
मस्तच...
फोटो लय भारी. व्हे पाणॅए
फोटो लय भारी. व्हे पाणॅए वापरायची कल्पना पण मस्त.
सिमन्तिनी - हा केक व्यवस्थित
सिमन्तिनी - हा केक व्यवस्थित फुलतो. साधारण दिडपट होतो. माझे केकचे भांडे १८ सेमीचे आहे. वरील प्रमाणात १ केक + २ छोटे कप केक झाले.
पराग, सुनिधी ,भरत मयेकर - अभिप्रायासाठी धन्यवाद
मस्तच दिसतोय केक.
मस्तच दिसतोय केक.
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383
हा मी केलेला केक. पनीर +
हा मी केलेला केक. पनीर + गव्हाचं पिठ, चव कशी लागेल म्हणून मी साशंक मनाने आधी वर दिलेल्या प्रमाणाच्या निम्मेच घेऊन केला.
लय भारी.....
लय भारी.....
Chaitrali - आवडला का चवीला
Chaitrali - आवडला का चवीला ? फोटो छान दिसतोय.
प्राची - धन्यवाद !
हो चारूता, आवड्ला. आता मोठ्या
हो चारूता, आवड्ला. आता मोठ्या प्रमाणावर करायला हरकत नाही. :स्मितः
पण चेरी थोड्या कडकच झाल्या. असं का झालं असेल?
खुपच सुरेख दिसतोय. तोंडाला
खुपच सुरेख दिसतोय. तोंडाला पाणि सुटलंय जोरदार.
Chaitrali - तुम्ही पाकवलेली
Chaitrali - तुम्ही पाकवलेली चेरी वापरली का? टिन मधली चेरी मऊसर असते. जर अननस चेरी वापरायची नसेल, तर टुटी-फ्रुटी घालूनही छान लागतो.
दक्षिणा - पटकन मत दे पाहू
Pages