मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम ''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' - क्र.५

Submitted by संयोजक on 7 September, 2013 - 04:14

नियमावली

हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार. ही एक काव्य-वृत्ती आहे, छोट्याशा क्षणातले चित्रमय चैतन्य टिपणारी.काळानुसार हायकूच्या स्वरूपात लवचिकता अन विविधता आली आहे. या गणेशोत्सवात आपणही एक आनंददायी खेळ म्हणून दिलेल्या विशिष्ट वस्तूंवर हायकू रचायचा आहे, जसे की खाली उदाहरण म्हणून दिलेल्या हायकूत दिवा ही वस्तू आहे.

''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.

ह्या उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे:

१. हायकू ३ ओळींचा असावा.

२.दरवेळी दिलेली वस्तू घेऊनच हायकू रचायचा आहे. उदा. दिवा. आणि त्यावर रचलेला हायकू बघा:

"नववर्षाच्या नव्या पहाटे नवीन आली हवा
क्षण थरथरला मिटून गेला
खिडकीमधला दिवा ''

३. वस्तूचा उल्लेख तिसर्‍या ओळीत व्हावा आणि पहिल्या दोन ओळींचा असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध त्या वस्तूशी असायला हवा. जो तिसर्‍या ओळीत दिसला पाहिजे. तिसरी ओळ ही विरोधाभास/ पंच ( अनपेक्षित परिणाम )साधणारी असावी.

४. हा उपक्रम गणेशोत्सवाचे पाच दिवस (दिनांक १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०१३) चालेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार १० सप्टेंबरपासून दररोज सकाळी ११ वाजता नव्या वस्तूसाठी नवा धागा काढला जाईल आणि त्यानंतरच्या २४ तासात त्या वस्तूवर हायकू या उपक्रमात भाग घेणार्‍यांनी प्रतिसादातच रचायचा आहे.
२४ तासांनंतर पहिला धागा वाचनासाठी खुला असेल

५. पारंपारिक जपानी हायकू हा १७ जपानी सिलॅबींचा असून पहिल्या ओळीत ५ दुसर्या ओळीत ७ आणि तिसर्‍या ओळीत ५ सिलॅबी असतात. पण मराठी उदाहरणे वाचताना यमकबद्ध हायहीकू आढळतात.
आपल्या पाचव्या हायकू उपक्रमाला रंगत यावी म्हणून या उपक्रमाचा महत्त्वाचा नियम-
"हायकू कमीतकमी २० ते जास्तीत जास्त ४० अक्षरांचा असावा.कुठल्याही दोन ओळींचे यमक साधलेले असावे. तिसर्‍या ओळीत आम्ही दिलेल्या विशिष्ट वस्तूचा उल्लेख अनिवार्य आहे.

६. वरील नियमांनुसार तयार न होणारा हायकू बाद केला जाईल.

७. एक आयडी एकाहून अधिक हायकू रचू शकेल.

८. हायकू बद्दल अधिक माहितीसाठी येथे एक लिंक दिली आहे..

http://www.wikihow.com/Write-a-Haiku-Poem

जालावर अन्यत्रही मोठ्या प्रमाणात अनेक भाषांत आधुनिक स्वरूपात हायकू लिहिले जातात. त्यात निसर्ग, प्रेम वगैरे पारंपारिक विषयांबरोबरच दैनंदिन जीवन , राजकारण, विनोद यांवरील हायकूंचाही समावेश असतो.

चला तर मग! या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची रंगत अनुभवूया,गणेशोत्सवाचा आनंद वाढवूया !! ऑल द बेस्ट !!!

आजच विषय आहे :- राखी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

Ti yet hoti,to pahat hota
to lagnachi swapne sajavat hota
an ti rakhi bandhun geli

देवासमोर गंधफुलांच्या संगतीत एक विसावली,
एक ट्रेंडी डिझाइनची ऑनलाइन पाठवली,
तुझ्या उमद्या फोटोजवळ तिसरी राखी उसासली..

Khaki varditala to usase takat hota
olavalelya dolyani
pattratlya Rakhi kade baghat hota

Bhavu bhahinichya premachi kahani
navhe hee tar she
Rakhi chya bandhanachi kahani

.

Googlayala gele online rakhi
dole satad ughade rahile
jevha samor disali ti savantachi rakhi