नियमावली
हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार. ही एक काव्य-वृत्ती आहे, छोट्याशा क्षणातले चित्रमय चैतन्य टिपणारी.काळानुसार हायकूच्या स्वरूपात लवचिकता अन विविधता आली आहे. या गणेशोत्सवात आपणही एक आनंददायी खेळ म्हणून दिलेल्या विशिष्ट वस्तूंवर हायकू रचायचा आहे, जसे की खाली उदाहरण म्हणून दिलेल्या हायकूत दिवा ही वस्तू आहे.
''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.
ह्या उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे:
१. हायकू ३ ओळींचा असावा.
२.दरवेळी दिलेली वस्तू घेऊनच हायकू रचायचा आहे. उदा. दिवा. आणि त्यावर रचलेला हायकू बघा:
"नववर्षाच्या नव्या पहाटे नवीन आली हवा
क्षण थरथरला मिटून गेला
खिडकीमधला दिवा ''
३. वस्तूचा उल्लेख तिसर्या ओळीत व्हावा आणि पहिल्या दोन ओळींचा असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध त्या वस्तूशी असायला हवा. जो तिसर्या ओळीत दिसला पाहिजे. तिसरी ओळ ही विरोधाभास/ पंच ( अनपेक्षित परिणाम )साधणारी असावी.
४. हा उपक्रम गणेशोत्सवाचे पाच दिवस (दिनांक १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०१३) चालेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार १० सप्टेंबरपासून दररोज सकाळी ११ वाजता नव्या वस्तूसाठी नवा धागा काढला जाईल आणि त्यानंतरच्या २४ तासात त्या वस्तूवर हायकू या उपक्रमात भाग घेणार्यांनी प्रतिसादातच रचायचा आहे.
२४ तासांनंतर पहिला धागा वाचनासाठी खुला असेल
५. पारंपारिक जपानी हायकू हा १७ जपानी सिलॅबींचा असून पहिल्या ओळीत ५ दुसर्या ओळीत ७ आणि तिसर्या ओळीत ५ सिलॅबी असतात. पण मराठी उदाहरणे वाचताना यमकबद्ध हायकूही आढळतात. .आपल्या तिसर्या हायकू उपक्रमाला रंगत यावी म्हणून या उपक्रमाचा महत्त्वाचा नियम-
"हायकू कमीतकमी २० ते जास्तीत जास्त ४० अक्षरांचा असावा. किमान दोन ओळींत यमक साधलेले असावे. तिसर्या ओळीत आम्ही दिलेल्या विशिष्ट वस्तूचा उल्लेख अनिवार्य आहे.
६. वरील नियमांनुसार तयार न होणारा हायकू बाद केला जाईल.
७. एक आयडी एकाहून अधिक हायकू रचू शकेल.
८. हायकू बद्दल अधिक माहितीसाठी येथे एक लिंक दिली आहे.
http://www.wikihow.com/Write-a-Haiku-Poem
जालावर अन्यत्रही मोठ्या प्रमाणात अनेक भाषांत आधुनिक स्वरूपात हायकू लिहिले जातात. त्यात निसर्ग, प्रेम वगैरे पारंपारिक विषयांबरोबरच दैनंदिन जीवन , राजकारण, विनोद यांवरील हायकूंचाही समावेश असतो.
चला तर मग! या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची रंगत अनुभवूया,गणेशोत्सवाचा आनंद वाढवूया !! ऑल द बेस्ट !!!
आजच विषय आहे :- पेन
*
*
काँपसमोर की पॅड बसले सेलच्या
काँपसमोर की पॅड बसले
सेलच्या पडद्यावर टचस्क्रीन
पेन एकटे हिरमुसले.
ताकदवान रक्तरहित वार पेनची
ताकदवान
रक्तरहित वार
पेनची धार
रमड, साती- शाब्बास!
रमड, साती- शाब्बास!
शिंपडलेली शाई , अन बरबटलेले
शिंपडलेली शाई , अन बरबटलेले हात
नव्या नवलाई सोबत
हरवून गेली शाई पेनची साथ
धुळाक्षरांचा गेला जमाना टाक
धुळाक्षरांचा गेला जमाना
टाक बोरू झाले इतिहास जमा
पेन मात्र आम्हा सोडवेना
बोलले नकळत कोणीतरी अन
बोलले नकळत कोणीतरी
अन शब्दांना चढली धार
पेन सरसावून सज्ज झाले करायला मी वार
भरभर बरसत होती सरांची
भरभर बरसत होती सरांची वाणी.
नीरस त्या लेक्चर मधेही
माझे पेन उतरवत होते मनातली गोड गाणी .
लतांकुर, मस्तच तीनही
लतांकुर, मस्तच तीनही हायकू.
छान मूड पकडलाय तुम्ही हायकूचा.
शोभा, तुमचा हायकू माझ्या हायकूला उत्तर जणू!
मस्त सगळी हायकू!
मस्त सगळी हायकू!
साती संगणक आले, लॅपटॉप
साती
संगणक आले, लॅपटॉप आले,
सही कराताना मात्र,
पेनाचे महत्व कळले.
कित्येक अनुत्तरीत
कित्येक अनुत्तरीत प्रेमपत्रे,
एक सुईसाईड नोट,
एक स्थितप्रज्ञ, निर्मम पेन...
हर्पेन, उपक्रमाच्या नियमात
हर्पेन,
उपक्रमाच्या नियमात बसत नसला तरी हा हायकू फार आवडला.
आंतर्देशीय पत्रं न पोस्टकार्ड
आंतर्देशीय पत्रं न पोस्टकार्ड गेली
हरवल्या पोस्टाच्या लाल पेट्या
पेन म्हणे आता राहिलो फॉर्म आणि चेक्स भरण्यापुरता
<हर्पेन, उपक्रमाच्या नियमात
<हर्पेन,
उपक्रमाच्या नियमात बसत नसला तरी हा हायकू फार आवडला.>
कोणत्या नियमात बसत नाही तो हायकू? वादासाठी नव्हे तर कुतूहलापोटी विचारतोय.
कळले. यमक साधले नाही
धन्यवाद साती
धन्यवाद साती
लय वाट पहायला लावू नये
लय वाट पहायला लावू नये
वेळेतच लिहाव काय ते
नाहीतर पेनातली शाई संपते
एक काहीच्या काही हायकू
एक काहीच्या काही हायकू
टेन्शन लेनेका कायकू
करून टाकायचा यमकासकट
पेन असलेला हायकू
सात धडे कविता आठ अभ्यास करुन
सात धडे कविता आठ
अभ्यास करुन धरली पाठ
'पेन' नही तो गेन नही
लाजो मस्तंच. जपानी लोक बहुदा
लाजो मस्तंच.
जपानी लोक बहुदा पेन नाही तर येन नाही असा हायकू करतील.
हर्पेन , हा काकाहापण मस्तच आहे.
हर्पेनचा पहिला हायकू
हर्पेनचा पहिला हायकू आवडला.
*
गेल्या हातावरच्या जॉलीच्या खुणा
फिके होत स्वच्छ झाले शाईचे डाग
आता कसा लागेल पेनाचा ठाव?
आहो दुखर्या दाताचा गाल की
आहो दुखर्या दाताचा
गाल की हो.. सुजला
क्रिप्या सोबत पेन किलर ठेवा
अजून एक काकाहा, सातीच्या
अजून एक काकाहा, सातीच्या सौजन्याने
एक जपानी लेखकू
लिहित बसला हायकू
पेन नाही तर येन नाही...
(No subject)
सुचत होत बरच इकडल तिकडल पण
सुचत होत बरच इकडल तिकडल
पण म्हणतात ना
लिहिता येईना , पेन संपलं
टायपून टायपून टाईपले
टायपून टायपून टाईपले कितीही
तरी पर्सनल टच येतच नाही
त्यासाठी पेनच लागतो...
जिसे सारी दुनिया चाहे लिखते
जिसे सारी दुनिया चाहे
लिखते लिखते लव हो जाये
एक पेन, त्याचं एवढं काय...!
लिहिशील कविता जर हृदयात असेल
लिहिशील कविता
जर हृदयात असेल pain
आणि हातात pen
स्वाती, बाप्पा आले, हॅपी
स्वाती,
बाप्पा आले, हॅपी मोड..
म्हणून हाणू नका गोड..
वापरावं लागेल पेन!
असंख्य फोटोतल्या आठवणी, आवडते
असंख्य फोटोतल्या आठवणी,
आवडते सिनेमे अन गाणी,
साठवते माझे पेन ड्राइव्ह
Pages