मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम ''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' - क्र.२

Submitted by संयोजक on 7 September, 2013 - 04:02

हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार. ही एक काव्य-वृत्ती आहे, छोट्याशा क्षणातले चित्रमय चैतन्य टिपणारी.काळानुसार हायकूच्या स्वरूपात लवचिकता अन विविधता आली आहे. या गणेशोत्सवात आपणही एक आनंददायी खेळ म्हणून दिलेल्या विशिष्ट वस्तूंवर हायकू रचायचा आहे, जसे की खाली उदाहरण म्हणून दिलेल्या हायकूत दिवा ही वस्तू आहे.

''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.

ह्या उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे:

१. हायकू शक्यतो ३ ओळींचा असावा.हायकू मुक्तःछंद असतो, पण मराठी उदाहरणे वाचताना यमकबद्ध हायकू आढळतात, तसेही चालेल.

२.दरवेळी दिलेली वस्तू घेऊनच हायकू रचायचा आहे. उदा. दिवा. आणि त्यावर रचलेला हायकू बघा:

नववर्षाच्या नव्या पहाटे नवीन आली हवा
क्षण थरथरला मिटून गेला
खिडकीमधला दिवा

३. वस्तूचा उल्लेख तिसर्‍या ओळीत व्हावा आणि पहिल्या दोन ओळींचा असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध त्या वस्तूशी असायला हवा. जो तिसर्‍या ओळीत दिसला पाहिजे. तिसरी ओळ ही विरोधाभास/ पंच ( अनपेक्षित परिणाम )साधणारी असावी.

४. पारंपारीक जपानी हायकू सतरा मात्रांचा (सतरा जपानी सिलॅबी) असतो. अर्वाचीन काळात हे बंधन पाळले जातेच असे नाही. मात्रं हायकू साधारण एका श्वासात म्हणता यावा. याचसाठी आपल्या या दुसर्‍या हायकू उपक्रमाचा एक वाढीव नियम म्हणजे हायकूत कमीतकमी २० ते जास्तीत जास्त ३५ अक्षरे असावीत.

५.. हा उपक्रम गणेशोत्सवाचे पाच दिवस (दिनांक १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०१३) चालेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार १० सप्टेंबरपासून दररोज सकाळी ११ वाजता नव्या वस्तूसाठी नवा धागा काढला जाईल आणि त्यानंतरच्या २४ तासात त्या वस्तूवर हायकू या उपक्रमात भाग घेणार्‍यांनी प्रतिसादातच रचायचा आहे.
२४ तासांनंतर पहिला धागा वाचनासाठी खुला असेल.

६. वरील नियमांनुसार तयार न होणारा हायकू बाद केला जाईल.

७. एक आयडी एकाहून अधिक हायकू रचू शकेल.

८. हायकू बद्दल अधिक माहितीसाठी येथे एक लिंक दिली आहे.

http://www.wikihow.com/Write-a-Haiku-Poem

जालावर अन्यत्रही मोठ्या प्रमाणात अनेक भाषांत आधुनिक स्वरूपात हायकू लिहिले जातात. त्यात निसर्ग, प्रेम वगैरे पारंपारिक विषयांबरोबरच दैनंदिन जीवन , राजकारण, विनोद यांवरील हायकूंचाही समावेश असतो.

चला तर मग! या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची रंगत अनुभवूया,गणेशोत्सवाचा आनंद वाढवूया !! ऑल द बेस्ट !!!

आजच विषय आहे : - रिमोट

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजची हायकूसाठीची वस्तू आहे 'रिमोट'...
तेव्हा तुमच्या काव्यप्रतिभेचा रिमोट हाती घ्या आणि छान हायकू लिहा!!

प्रयत्न केला तरीहि
हलणार नाहीत ओठ
बाईंच्या हाती आहे यांच्या हालचालींचा रिमोट.

जगण्यावर मॄत्युचे सावट,
एन्जॉय करा प्रत्येक क्षण पटापट,काय माहीत
कुणाच्या हातात आहे कुणाच्या आयुष्याचा रिमोट

पाण्याची विहिर आणि विहिरीला मोट
झाली वेळ साताची , पकडा खुर्ची मोक्याची
आणि पळत जावून हाती घ्या आधी रीमोट

प्राची, नियती Lol
रोजच्या मालिका आणि स्वयंपाकाची
बांधायला नीट मोट
गृहिणीचा मदतनीस रिमोट.
*
लिंगनिरपेक्श हायकू:
किती तो वैताग आदळआपट
मूर्ख भंपक मालिकांवर
जरा वापरा की हातातला रिमोट.

घोषाणांचा फुसकाच राग
भारनियमनात ठेचकाळतोय
महाराष्ट्रातील रिमोट भाग

लाजो, 'ऊन पावसा'त घडणार्या 'एका लग्नाच्या गोष्टीत' ही 'वादळवाट' 'तुझं माझं जमेना' तरी 'तू तिथे मी' म्हणत पार करावी लागते 'असंभव' वाटली तरी. तरच 'उंच माझा झोका' जात 'अवघाची संसार' 'या सुखांनो या' गातो.
: सक्काळी सकाळी कैच्याकै: Proud

जवळीक साधत विचारपूशीचा गेला जमाना
वाटेल सुख की बोचेल खोट
'आपल्या' माणसांसाठीही आला जर रिमोट?
(हे लिहायला आले होते अन चुकून होम मिनिस्टर मध्ये झी मराठीचा उखाणाच घेतला. Lol संयोजक, माफी प्लीज.)

आशुडी Lol अगदी अगदी...

आपल्या 'राऊ' ची 'राधा बावरी' होऊन 'सा रे ग म प' गात सुखात रहावे....

हातावर पोट,पोटावरचे हात दरी
रोज वाढते आहे
बाई मात्र नवे विधेयक पास आहे..