किलांबा गार्डन, अंगोला

Submitted by दिनेश. on 5 September, 2013 - 06:05

मी मागे लिहिले होते कि आमच्या कॉलनीत एक मोठी बाग तयार करायला घेतलीय. गेल्या रविवारी गेलो तर तिथे भरभरुन फुले फुलली होती. खरं तर इथे सगळीकडे वाळवंटच आहे पण त्यामधे ज्या मेहनतीने
फुले फुलवली आहेत त्याला खरेच तोड नाही.

मी किती वेळ तिथे रमलो होतो, त्याचा पत्ताच लागला नाही. मन अगदी तृप्त झाले.
आणि मग माझी तृप्ती तुम्हा सर्वांना वाटून टाकावी म्हणतोय....

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

27

28

29

30

31

32

33

34

35

36

37

38

39

40

41

42

43

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उफ्फ... मार डाला! काय कलर आहेत एकेक. Happy
दिनेशदा, तुमच्या परवानगीने काही फोटो सेव्ह करु म्हणते.

सुंदर फोटो Happy

फुलवणारा तो. तो काही हातचे राखत नाही, मग मी कोण ? >>> 'तो' कोण? Happy 'तो' कशावरही स्वतःचा वॉटरमार्क टाकत नाही हे खरंच आहे Happy

सहीय्ये!!
प्रचि १८ पाहून जुन्या हिंदी सिनेमातल्या प्रणयदृश्यांची आठवण झाली. Happy

बाकी बागेचे नाव पण सही आहे. किलांबा!!
एकदम देवीचे नाव असल्यासारखे वाटते. Happy

सुंदर फुलं...मन खुश हुआ!!!!
काय रंग, फुलांच्या पाकळ्यात सुद्धा किती विविध आकार..वाह!!!!

अशी फुलं जिथे आहेत त्याला वाळवंट कसं म्हणायचं?
सग्गळे प्रचि घेऊन एकाहून एक टेक्स्टाइल प्रिंट बनवता येतील.

आभार दोस्तांनो !
त्या दिवशी हवा पण छान होती. प्रखर प्रकाश नव्हता. त्यामूळे जे दिसताहेत तेच रंग होते. मी काहीही प्रोसेस केलेले नाही. ( क्रॉप आणि कॉन्ट्रास्ट सोडून. )

हो अश्विनी, निसर्ग म्हणा, नियंता म्हणा.. !

दक्षे, हा फक्त एक विभाग झाला. दुसरा विभाग यायचाय अजून.

भारती वाळवंट आहे खरेच पण जर पाऊस पडला, तर अगदी आपल्या कासच्या पठाराची आठवण येईल अशी फुले इथे फुलतात.

गमभन, आमच्या कॉलनीचे नाव किलांबा ( नोवा सिदादे दो किलांबा ). गार्डनला अजून नाव दिलेले नाही.

झिनीया मधे खरंच खूप वेगळे रंग आणि वैविध्य बघायला मिळते. सह्ही!! सगळी फुलं खूप आवडली..............

पण त्याहूनही आवडली ही भावना..>>>फुलवणारा तो. तो काही हातचे राखत नाही, मग मी कोण ?<<<

दा, मानलं तुम्हाला! Happy

शांकली, खरेच. माझ्या कुठल्याच फोटोवर मी कधी वॉटरमार्क टाकत नाही. केवळ त्या क्षणी मी तिथे होतो आणि माझ्या हाती कॅमेरा होता, एवढेच माझे कर्तृत्व !

विजय, निकॉन कूलपिक्स. त्यात बरेच फिचर्स आहेत, जे मी अजून वापरलेलेच नाहीत.

दिनेशदा

खुपच सुंदर प्रचि आहेत. खरच 'त्या' च्या सॄजनशीलते पुढे नतमस्तक होण्यातच धन्यता आहे. माणसाची शक्ती त्यापुढे अगदीच फिकी आहे. प्रत्येक फुलापानाचे सौंदर्य वेगळे. प्रत्येकाचा आकार वेगळा. किती वैविध्य.

तुमच्यामुळे आम्हाला या सौंदर्याचा आस्वाद घेता आला, त्यासाठी खुप खुप धन्यवाद.

प्रिया

सुंदर फुले, सुपर्ब फोटो ........

तुमच्यामुळे आम्हाला या सौंदर्याचा आस्वाद घेता आला, त्यासाठी खुप खुप धन्यवाद. >>> +१००..

Pages