Submitted by इब्लिस on 22 July, 2013 - 13:39
अध्यक्ष महोदय, सन्माननिय व्यासपीठ व माझ्या बंधू भगिनिंनो.
माझ्या पहिल्या कवितेच नांव आहे, 'गोळाबेरीज'
मास्लो च्या पिरॅमिडचे
पास्त्यासारखे बारीक लांब धागे
ओकॅमच्या वस्तर्याने चिरून..
माझ्या मेंदूच्या चरबीत फ्राय करून
मलाच सर्व्ह करताना
तो मठ्ठ काळा बैल
अंधारातून माझ्यावर म्यांऽव करून गुरकावतोय
असं उगीचच मला वाटत रहातं..
बैलाच्या गाडीला स्वत:ला जुंपून भीमप्रयत्नांनी ओढून नेलेला तो पास्ता
स्वतःच हादडत असताना बकासूर बनून
डँबीस असा भारतिय माणुस
अधुन मधून ठोऽ करीत
माझ्यावर लहान सहान अतिरेकी हल्ले करीत रहातो,
केविलवाण्या भगव्या पट्ट्या कपाळावर बांधून,
'तोट्याची' बंदूक घेऊन मंदश्या जोषाने..
दिवस रात्र यांना धोबी पछाड कशी मारावी
याच विचारांनी अधूनमधून पछाडलेला मी..
..मराठी संस्थळांवर वावरण्याची
गोळाबेरीज की काय म्हणतात,
ती हीच काय?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऐ , ढिंच्यॅक , ढिंच्यॅक
ऐ , ढिंच्यॅक , ढिंच्यॅक !
भारी गोळाबेरिज.
पहिल्याच कवितेत गोळाबेरिज केल्यावर मग आता पुढे?
वरवर विनोदी वाटलं तरी
वरवर विनोदी वाटलं तरी ईजीवनावर सखोल भाष्य केलेलं दिसतंय.
अगदी 'पिपात मेलेल्यां'ची आठवण झाली बघा!
मेरेको आवड्या
मेरेको आवड्या
मस्त.... स्वतःच हादडत असताना
मस्त....
स्वतःच हादडत असताना बकासूर बनून
डँबीस असा भारतिय माणुस
अधुन मधून ठोऽ करीत
माझ्यावर लहान सहान अतिरेकी हल्ले करीत रहातो,
लोल
क्या बात है
क्या बात है इब्लिसभाउ...
पुलंची गोळाबेरीज आणि पिपात मेले दोघांची आठवण करुन दिलीत.
मी सहसा कविता वाचत नाही पण ही
मी सहसा कविता वाचत नाही पण ही वाचली आणि आवदडीसुद्धा.
धन्यवाद लोकहो! मास्लो चे
धन्यवाद लोकहो!
मास्लो चे कॉपीपेस्ट करताना ऑस्लो झाले होते ते बदलले आहे.
गोळाबेरीज की गोळाफेक ??
गोळाबेरीज की गोळाफेक ?? आवडेश!
काय हे राव. ठसकलो ना हसून
काय हे राव. ठसकलो ना हसून
पोहोचली असेल पार आतवर. आता तयार रहा
मॉस्लो नाही.. मॅस्लो- तो
मॉस्लो नाही.. मॅस्लो- तो हार्यरार्कीवाला ना?
(No subject)
:हहगलो::हाहा::फिदी::खोखो::हहगलो:
(No subject)
हो हो रैना तोच. करतो रिपेयर
हो हो रैना तोच. करतो रिपेयर कीबोर्ड हाती आला की.
भारी आहे काव्य, आवडले.
भारी आहे काव्य, आवडले.