राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर आणि मिल्खा सिंग ह्या तिघांसाठी हा चित्रपट पाहायला गेलो. तिथे गेल्यावर दिसलं, मीच नाही शेकडो लोक आले होते, ह्याच तिघांसाठी. प्रवेशद्वाराबाहेर तोबा गर्दी होती. अशी गर्दी मी फक्त 'वाँटेड', 'एक था टायगर' ह्या सलमानपटांसाठी पाहिली होती. दरवाजा उघडण्यासाठी सगळेच आतुर होते. शर्यत सुरु होण्यापूर्वी 'गेट सेट गो' च्या वेळी सगळे स्पर्धक जसे असतात तसेच होते का? कदाचित ! कारण मी तर होतोच. दरवाजा उघडला. गर्दी इतकी होती की आम्ही - आई, बाबा, बायको, मी आणि मित्र विनायक - जागेवर पोहोचेपर्यंत नामावली सुरूही झाली.
वर्ष १९६०. रोम ऑलिम्पिक्सचे दृश्य. पिळदार शरीरयष्टीचा मिल्खा सिंग - द फ्लाईंग सिख - बाणासारखा सुटतो. पण फिनिशिंग लाईनजवळ आल्यावर, 'भाग मिल्खा भाग' च्या आरोळ्या मिल्खाला विचलित करतात. जुने काही तरी आठवते आणि शर्यतीतील लक्ष उडते. मिल्खा जिंकता जिंकता मागे पडतो, हरतो. देशभरात नैराश्य, संतापाची लाट येते. ही एक मोठी बातमी असते. 'मिल्खा हरला.' अशी चित्रपटाची रोमांचक सुरुवात होते. किंचितशी 'चक दे' ची आठवण होते. पण किंचितशीच आणि थोडा वेळच. कारण ह्या रोमांचक व वेगवान सुरुवातीनंतर चित्रपट पुन्हा हा वेग पकडत नाही. आपण 'भाग मिल्खा भाग' बघत असतो, पण मिल्खा रमतगमत चालतो. मध्येच थोडासा धावतो, पण लगेच पुन्हा थांबतो. संपूर्ण पुढचा प्रवास असाच 'थांबा - पहा - पुढे जा' आहे.
'मिल्खा सिंग' भारतीय क्रीडाजगतातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व. आज क्रिकेटव्यक्तिरिक्त कुठल्याही क्षेत्रात भारताला अजिबात भाव मिळत नाही. पण एके काळचा हॉकीतला दादा भारत, त्याच काळात अभिमानाने एक खेलरत्न मिरवत होता. 'धावपटू मिल्खा सिंग'.
सध्याच्या पाकिस्तानातील मुलतान भागात मिल्खा सिंगचा जन्म होतो. फाळणीची भयंकर झळ लागलेल्या हजारो निरापराध कुटुंबांपैकी एक मिल्खाचं कुटुंब होतं. बालवयातच बेघर, अनाथ झालेला मिल्खा दिल्लीत आला. दिल्लीच्या गल्ल्यांत उलटसुलट धंदे करणारा मिल्खा सिंग एकेक पायरी चढत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा धावपटू बनला. एक असामान्य प्रवास ! हाच प्रवास, त्यातील अनेक अडथळे, वळणे 'भाग मिल्खा भाग' मांडतो. अर्थातच ह्यात बऱ्यापैकी सूट घेऊन काही काल्पनिक भागही आहेच. ह्यातील काही काल्पनिक व सत्यकथन थरारक आहे, तर काही मनोरंजक. पण काही भाग दिग्दर्शकाला अपेक्षित थरार व मनोरंजन करण्यात कमी पडतो. काही भाग तर अगदीच अनावश्यक वाटतो. उदा. सोनम कपूरची व्यक्तिरेखा. कुठलाही आगा-पिछा न दाखवलेली ही व्यक्तिरेखा चित्रपटात येते आणि जाते. कहाणीत विशेष फरक पडत नाही. असे लहान-मोठे तुकडे मिल्खाला धावूच देत नाहीत. चित्रपटभर प्रेक्षक मिल्खाच्या वेगाची अपेक्षा करत राहातो. सव्वा तीन तास उलटून जातात, पण वेग सापडत नाही. सुरुवातीच्या दृश्यात मिल्खा हरतो आणि शेवटच्या दृश्यात चित्रपट. अगदीच शेवटचा वगैरे येत नाही, पण पदकही मिळत नाही व नैराश्य पदरी पडतं.
मिल्खा सिंगना ऑलिम्पिक पदक मिळालं नव्हतं. तरी त्यांची कामगिरी अद्वितीयच होती. ज्या परिस्थितीवर मात करून व जी मेहनत करून त्यांनी ऑलिम्पिकेतर स्पर्धांत भारताचं नाव केलं, ते निश्चितच 'क़ाबिल-ए-तारिफ़' होतंच. तद्वतच, चित्रपट चांगला असला तरी अपेक्षेइतका चांगला नसला तरी, 'मिल्खा' मन जिंकतो. फरहान अख्तरची मेहनत फक्त त्याच्या 'पॅक्स'वरूनच दिसत नाही. तर त्याची देहबोलीसुद्धा एखाद्या सैनिकाची व खेळाडूचीच वाटते. शर्यतींत धावणारा फरहान अख्तर खरोखर एखाद्या व्यावसायिक धावपटूसारखा, ते तंत्र समजून घेऊन, धावत असतो. त्याचं चालणं, बोलणं आणि आपल्या लक्ष्याला वाहून घेणं कधीच हे जाणवू देत नाही की हा 'फरहान अख्तर' आहे. आपण पूर्ण वेळ फक्त आणि फक्त 'मिल्खा'च पाहात असतो. तरुणपणी स्वतःच्या मूळ गावी आल्यावर हमसून हमसून रडणारा मिल्खा मात्र जरा कमी पडल्याचं प्रकर्षाने जाणवतं.
सोनम कपूर एका छोट्या व अनावश्यक भूमिकेत आहे. ती अभिनयाचा मनापासून प्रयत्न करते. पण ती 'मनापासून प्रयत्न करत आहे' हेच जाणवत राहतं.
दिव्या दत्ता ह्या गुणी अभिनेत्रीला अखेरीस बऱ्यापैकी वाव मिळाला आहे, ह्याचा मला खूप आनंद झाला. मिल्खावर आईसारखी माया करणारी मोठी बहिण तिने अप्रतिम साकारली आहे. तिचं प्रत्येक दृश्य ती जिंकते. दिग्दर्शक दिव्या दत्ता पडद्यावर असताना इतर कुणाला मुद्दामच जास्त वाव देत नाही. कारण इथे कदाचित फरहानचा मिल्खा कमी पडलाच असता. त्यामुळे जिथे जिथे दिव्या दत्ता आहे, तिथे तिथे ते ते दृश्य तिच्यावरच जणू एकवटलं आहे.
पवन मल्होत्रा हाही एक अत्यंत गुणी कलाकार. त्यालाही इथे बराच वाव मिळाला आहे. त्याच्यातला सैनिक त्याने खूप भावनिक बनवला आहे मात्र. दिव्या दत्ता आणि पवन मल्होत्रा निम्म्याहून अधिक दृश्यात गहिवरतात व गहिवरवतात.
इतर भूमिकांतून दिलीप ताहिलने साकारलेले पं. नेहरू लक्षात राहतात. फार काही काम नाहीये. पण एकदम डिट्टो वाटतात !
शंकर-एहसान-लॉयला बऱ्याच दिवसांनी ऐकलं का ? बहुतेक हो. हवन करेंगे, घुलमिल घुलमिल आणि रंगरेज ही गाणी छान आहेत. खासकरून 'घुलमिल घुलमिल' ऐकत असताना मनातल्या मनात आपण जरासं नाचूनही घेतो ! गाण्यांचे शब्द समजत नाहीत. पण आजकाल बहुतांश गाण्यांचं तसंच असतं !
राकेश मेहरा, आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी अशी काही नावं आहेत ज्यांचे चित्रपट तीन - साडेतीन तास चालतातच. जातानाच त्याची मानसिक तयारी करून जायला हवे. ती कदाचित मी केली नव्हती म्हणून असेल पण मला असं वाटलं की इतपत कहाणी अडिच तासात सांगता येऊ शकली असती. फ्लॅशबॅक्समधून कहाणी उलगडत जाण्याचं तंत्र, कॅमेऱ्याचे विशिष्ट कोण मेहरा सुंदर वापरतात. त्यांची मेहनत व त्यांचं 'व्हिजन' दिसून येतं. पण ह्या सगळ्यावर चित्रपटाची लांबी व वेग मात करतात. चित्रपट अगदीच कंटाळवाणा नसला तरी कमी रंजक करतात.
संवाद लेखनाची बाजू ह्या चित्रपटात सगळ्यात कमकुवत असावी. हवा तर अशी होती की काही वादग्रस्त संवाद आहेत. पण एकही ओळ लक्षात राहात नाही. सपक संवादांमुळेही अपेक्षित नाट्यनिर्मिती काही ठिकाणी मार खाते.
एखादा अंतिम सामना, आपल्या आवडीच्या संघ जिंकतो. निकाल आपल्या पसंतीचा लागतो, पण सामन्यात रंजकता कमी असते. अगदीच एकतर्फी झाला असतो. अश्या सामन्याने जितका आनंद मिळतो; तितका आनंद 'भामिभा' देतो.
रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/bhaag-milkha-bhaag-movie-review.html
सर्वश्रेष्ठ गायकासाठी
सर्वश्रेष्ठ गायकासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार द्यायला १९६८ पासूनच सुरुवात झाली . लता आणि आशापेक्षा दक्षिणेच्या काही गायिकांना अधिक वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.
रसप.... कुछ भी हो ... तुमचा
रसप.... कुछ भी हो ... तुमचा अॅटीट्युड आवडला.
(आता वर लिहलेल्या प्रतिसादातील)
त्याचं काये, की रसप यांच्या
त्याचं काये,
की रसप यांच्या सारखा अॅटिट्यूड असणारे प्रेक्षक देखिल असतात, हे नंदिनी ताई विसरताहेत.
उदा. प्रत्येक पेप्रात शिंव्ह राशीचं वेगळं भविष्य छापून येतं. त्यातलं कोणतं आवडून घेऊन 'आपलं' म्हणावं, हा निर्णय त्या राशीचे जगातल्या साडेसातशे कोटी लोकांपैकी एक बारांश लोक = रफली ६० कोटी लोक आपापल्या मतानुसार घेतात. तशीच पेप्रा - पेप्रात रसग्रहणं छापून येतात. लोक आपापलं पाहून घेतात.
अहो, तुम्हाला अर्थ लै पोएटिक वाटला. किंवा फायर वॉटर इत्यादी लै भारी वाटले म्हणून सगळ्याच प्रेक्षकांनी तेच म्हणावे, त्यांना तेच वाटावे, असे कुठे आहे??
उगंच रसप यांना टंकून धोपटायची सोय आहे, (कारण त्यांनी माबोने प्रायोजित केलेल्या एका सिनेमाचे निगेटिव्ह रसग्रहण केले, ते देखिल अजाणता) म्हणून त्यांना बडवत सुटावे हा कोणता प्रकार?
त्यांनी 'रसग्रहण' केलेला पिक्चर बॉक्स ऑफिसवर आपटला, तर त्यांचे निगेटिव्ह रसग्रहण बरोबर आहे. तिथे पिक्चरने चांगली कामगिरी केली, तर रसप तोंडावर आपटले आहेत.
अॅज सिंपल अॅज दॅट.
पण, याकरता तुमची क्रेडिबिलिटी पणाला लावून तुम्ही त्यांनी लिहिलेल्या रसग्रहणांचे काऊंटर "रसग्रहण" लिहित आहात, हे मायबोलीच्या रसाला लागलेले ग्रहण आहे असे मी म्हणतो.
नंदिनीजी,
तुम्ही सध्या जे सिनेमा रिव्हू टाईप करायला लागला आहात, ते तसेच करत रहा. माबो अन प्रेक्षकांना तौलनिक अभ्यास करू द्या. अन हो, रसप यांनी केलेल्या परिक्षणांचेच "काऊंटर-रस-ग्रहण" नव्हे, तर तुम्ही स्वतःहून पाहिलेल्या नव्या सिनेमांची परिक्षणे लिहा. बॉक्स ऑफिस रिव्ह्यू अन कुणी किती पैका कमवला ते गूगलून मी लिहीन.
कृपया तुमचे पर्सनल घेणे थांबवा.
(आता "अहो अॅडमिन" ही हाक द्या
मग पुढचे अन मागचेही लिहितो. )
चित्रपट पहातांना रसप आपल्याला
चित्रपट पहातांना रसप आपल्याला नंतर परिक्षण लिहायचं आहे हे समजून बघतात की काय असं वाटून गेलं. चित्रपटाचा एकंदर परिणाम पहाता माझं रेटींग ४१/२ (४.५). पसंद अपनी अपने खयाल अपना अपना !!
(No subject)
हाच रिव्यू पोजीटीव असता तर
हाच रिव्यू पोजीटीव असता तर नंदिनी यांनी निगेटिव लिहिला असता असे वाटते आहे…
बाकी रसप बिंदास लिहितात… येसुदास <<< रफी असे बोलून मोकळे झाले …
थोडा रिसर्च करा रसप … एंपल अन ऑरेंज कॅम्पारीझान का करताय …
तुम्हाला रफी आवडतो … म्हणजे येसुदास पेक्षा बेटर आहे असे नाही ।
विकीपेडिया:
Yesudas has won the National Award for the Best Male Playback Singer seven times (the most by any Indian singer) and the State Award for the Best Playback Singer 43 times, which consists of awards by the state governments of Kerala, Tamil Nadu, Andhra Pradesh, Karnataka, and West Bengal. He was awarded Padma Shri in 1975 and Padma Bhushan in 2002 by the Government of Indiafor his contributions to the arts.[8] In 2011 Yesudas was honoured with the CNN-IBN outstanding achievement award having recorded over 50,000 songs in a five-decade career[9][10]
हाच रिव्यू पोजीटीव असता तर
हाच रिव्यू पोजीटीव असता तर नंदिनी यांनी निगेटिव लिहिला असता असे वाटते आहे…
<<
यक्झाक्टली.
वैयक्तिक शेरेबाजी नको (हे
वैयक्तिक शेरेबाजी नको (हे सर्वांनाच).
रसप, आपली परीक्षणे आवडतात.
रसप, आपली परीक्षणे आवडतात. सामान्य प्रेक्षकाच्या भूमिकेतून आपण लिहिता. हिंदी चित्रपटामध्ये संख्येच्या मानाने दर्जा कमीच असतो. त्यामुळे बहुतेक चित्रपटांबाबत निगेटिव लिहिणे भाग पडते. याव्यतिरिक्त वैयक्तिक आवड म्हणूनही काही असते. तलाश चित्रपट मला आवडला होता, आपल्याला तितकासा नव्हता आवडला, ही मतमतांतरे व्हायचीच. पण आपली शैली आकर्षक असते आणि त्यात एक्झिट क्राउडमध्ये ऐकू येणारी भाषाच असते. समीक्षकी थाट नसतो. तेही बरेच आहे. जुन्या काळी भाऊ पाध्यांनी समीक्षणाची एक शैली बनवली होती, पिटातल्या प्रेक्षकाच्या भाषेत आणि त्याच्या दृष्टीने लिहिण्याची. भाऊ पाध्ये साहित्यिक होते. पण इतरांनीही त्या शैलीत लिहू नये असे नाही. ज्ञानेश्वर नाडकर्णी चित्रांबाबत जे लिहीत, गणेश मतकरी अशोक राणे चित्रपटांबाबत जे लिहितात ते अचूक असेल, सर्व तांत्रिक अंगांचा विचार करून लिहिलेले असेल्,पण सामान्य प्रेक्षक-वाचकाला भावेलच असे नाही. सामान्य प्रेक्षकाला रसास्वादापेक्षा परिचय आवडतो,सरळसोट भलेबुरे हसतखेळत सांगितलेले आवडते.
लिहीत रहा, आम्ही वाचत राहू.
मला एक प्रश्न नेहमीच पडतो..
मला एक प्रश्न नेहमीच पडतो.. आणि लतादिदींच्या बाबतीतही पडला होता...
येसूदास यानी ५०,००० गाणी रेकॉर्ड केली ५० वर्षांच्या कारकिर्दीत...
याचा अर्थ वर्षाला १,००० गाणी, म्हणजेच दिवसाला तीन.
अगदी करियरच्या पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत दिवसाला तीन गाणी?
एक एक गाणं रेकॉर्ड करायला पूर्वी दिवस दिवस लागायचे (तंत्रज्ञान प्रगत नव्हतं, वादक समोर बसून वाजवायचे.. बाहेरचे आवाज, गोंगाट असायचे, दिवस दिवस केलेली मेहनत वाया जायची).
आता रेकॉर्डिंग स्टूडियोला Booking करावं लागतं, प्रवास करावा लागतो. Live Program, Public Appearance असतात, तरी 'दिवसाला तीन?'
मला वाटतं हे आकडे हवेतून विभूती निर्माण करणार्या एकाद्या बाबाने दिले असावेत.
गोगा, तरी ही रिलीज झालेल्या
गोगा, तरी ही रिलीज झालेल्या गाण्यांची संख्या आहे. रिलीज न झालेली अजून ५०,००० आहेत.
येसुदासांच्या ५०००० च्या
येसुदासांच्या ५०००० च्या आकड्याबद्दल माहिती नाही पण लता/आशा ह्यांच्या फुगीर आकड्यांमागे बरीच स्पर्धा, चढाओढ होती.. ते आकडे पुढे फुटलेच.. मला वाटते खरा आकडा बराच कमी आहे..
येसुदासांच्या ५०००० च्या
येसुदासांच्या ५०००० च्या आकड्याबद्दल माहिती नाही <<< तर्काच्या दृष्टीने हे चूक आहे हे दिसतं आहे तेव्हा 'भाग गोगा भाग'.. चालू द्या
रिलीज न झालेली अजून ५०,०००
रिलीज न झालेली अजून ५०,००० आहेत. >>> म्हणजे एक गाणं एका ओळीचं होतं की काय ?
>>>गोगा, तरी ही रिलीज
>>>गोगा, तरी ही रिलीज झालेल्या गाण्यांची संख्या आहे. रिलीज न झालेली अजून ५०,००० आहेत
ही ५०,००० पुढ्च्या ५० वर्षातील असतील...जसं एक्स्ट्रापोलेशन
स्वाती_आंबोळे | 17 July, 2013
स्वाती_आंबोळे | 17 July, 2013 - 13:52 नवीन
गोगा, तरी ही रिलीज झालेल्या गाण्यांची संख्या आहे. रिलीज न झालेली अजून ५०,००० आहेत. फिदीफिदी
कशाला चुकीची माहिती देताय सर्वाना …
ही चर्चा वेगळा धागा उघडून
ही चर्चा वेगळा धागा उघडून करा.
हीरा +१ बाकी मला पण धनुष त्या
हीरा +१
बाकी मला पण धनुष त्या पोस्टरवरुनच नाही आवडला अजिबात त्यामुळे तो सिनेमा नाहीच पाहिला.
तसच मला फरहान अख्तर पण नाहीच आवडत अभिनेता (असेनाका चांगला अभिनेता) म्हणून पण ह्या पोस्टरमध्ये तो ओळखूच येत नाही आहे तेव्हा हा सिनेमा पाहिन कदाचित.
admin | 17 July, 2013 -
admin | 17 July, 2013 - 14:16
ही चर्चा वेगळा धागा उघडून करा.
अगदि बरोबर...
अहो अॅडमिन, वैयक्तिक
अहो अॅडमिन, वैयक्तिक शेरेबाजीपेक्षा बरंय की हे.

असो, हेमाशेपो.
एक विनंती :- चित्रपट कसा
एक विनंती :- चित्रपट कसा बघावा आणि कसा बघु नये याबद्दलपण कोणी काहि लिहिले आहे का? नसल्यास कृपया लिहा. म्हणजे काही तांत्रिक बाजूपण आमच्यासारख्या लोकांना कळेल.
मी जेव्हा तरूण होतो (म्हणजे वयानेसुद्धा) तेव्हा असाच (रसपसारखा) चित्रपट बघायचो. पण हळूहळू कळायला लागलय की चित्रपट बनवणे हा उद्योग आणि कला आहे. त्यात मेहनत, पैसा, वेळ लागतो. त्या कलाकारांच्या कलाकृतीला योग्य तो प्रतिसाद आवश्यक आहे, तोही काय चांगल हे जास्त लिहुन. बाकी अधिक ज्या काही अपेक्षा असतील, त्या योग्य (आणि मृदू) शब्दात लिहिल्या तर अधिक उत्तम. नाही का?
शेवटी चित्रपट बघणे एक मनोरंजन आहे. (काही चित्रपट-अभ्यासकांव्यतिरिक्त).
काऊंटर रसग्रहणाचा इब्लिस
काऊंटर रसग्रहणाचा इब्लिस यांचा मुद्दा बिनबुडाचा आहे. इथे एकाच सिनेमाची 4-4 रसग्रहणे आली आहेत. मूळ पोस्टीपेक्शा तपशील आणि अधिक सविस्तर जर पोस्ट होत असेल ( आणि त्यामुळे पुढील चर्चेचा रोख बदलू शकत असेल )तर इथे अनेक जण स्वतंत्र धागा काढणे पसंत करतात. यात मूळ धागा भरकटू नये हाच हेतू असतो. जे आता इथे झालंय. त्याला काउंटर करणे हे लेबल चुकीचे आहे. नंदिनीने रसप यांच्या ये जवानी... वरच छोटासा रिव्ह्यू टाकला होता.
आणि मायबोली मा.प्रा. असण्याचा, निगेटिव्ह रिव्ह्यू टाकण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, इथे तर मुळीच नाही.
कारण त्यांनी माबोने प्रायोजित
कारण त्यांनी माबोने प्रायोजित केलेल्या एका सिनेमाचे निगेटिव्ह रसग्रहण केले, ते देखिल अजाणता) म्हणून त्यांना बडवत सुटावे हा कोणता प्रकार?
>>> आं???? माबो प्रायोजित कुठलाही सिनेमा मी आजवर पाहिलेला नाही. ना थिएटरमधे ना डीव्हीडीवर. मग त्यांच्या रीव्ह्युला झोडपायचा संबंध येतोच कुठे? मी जे चित्रपट पाहिले आहेत त्याच्या रीव्ह्युमधे जर चुकीचे लिहिले असेल आणि ती चूक दाखवून दिली तर लगेच झोडपणे होते की काय?? तो सिनेमा यायच्या आधी तलाश सिनेमाच्या बीबीवर पण लोकांनी लिहिलेच होते की. या बीबीवर पण मी लिहायच्या आधीच काही लोकांनी निगेटीव्ह लिहिले आहे असे म्हटले आहे ते पण सर्व झोडपतच आहेत का?
तुम्ही सध्या जे सिनेमा रिव्हू टाईप करायला लागला आहात, ते तसेच करत रहा. माबो अन प्रेक्षकांना तौलनिक अभ्यास करू द्या. अन हो, रसप यांनी केलेल्या परिक्षणांचेच "काऊंटर-रस-ग्रहण" नव्हे, तर तुम्ही स्वतःहून पाहिलेल्या नव्या सिनेमांची परिक्षणे लिहा. बॉक्स ऑफिस रिव्ह्यू अन कुणी किती पैका कमवला ते गूगलून मी लिहीन<<<<<< हे सांगणारे तुम्ही कोण? मला जे चित्रपट पहायचे असतील ते बघून मी त्यावर लिहेन अथवा लिहीणार नाही. रसप यांचे काऊंटर रसग्रहण करण्याइतके त्यांचे रीव्ह्यू ग्रेट आहेत असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा अणि तुमचा गैरसमज आहे. मी लिहिते त्या रीव्ह्यूचा आणी बॉक्स ऑफिसचा काही संबंध असत नाही. माझे परीक्षण हे फक्त मला सिनेमा कसा वाटला यावरच केंद्रित असते. रसप गेले कित्येक महिने तथाकथित रीव्ह्यू लिहत आहेत. मी त्यापैकी फक्त दोन सिनेमांवर लिहिले आहे- तेदेखील मला लिहावंसं वाट्लं प्लस वेळ होता म्हणून.
एक मात्र मजा वाटली हां. इब्लिस यांना "सिनेमातले काही समजत नाही" "मी चित्रपट पाहतदेखील नाही" अशी वक्तव्ये एक दोन बीबींवर करताना पाहिलं होतं. इथे मात्र लगेच कीबोर्ड चालवून सांगत आहेत तेदेखील (स्वत: न पाहिलेल्या) चित्रपट रसग्रहणाबद्दल. ज्यावेळेला मेडिकल संबंधात काही लिहिलं जातं तेव्हा जसं तुम्ही म्हणता ना "आम्ही शिकलो आहोत, आम्हाला अनुभव आहे म्हणून आम्हाला जास्त समजतं...." एक्झॅक्टली.
तुम्ही जर "चित्रपट आस्वाद"
तुम्ही जर "चित्रपट आस्वाद" अथवा कसा वाटला असे लिहत असता तर प्रश्नच नव्हता, पण तुम्ही त्य्का "रीव्ह्युचे" लेबल देत आहात, स्टार रेटिंग देत आहात, मात्र हे करताना त्या कामच्या जबाबदारीचे भान तुम्ही बाळगत नाही. लिहिताना तुम्ही समीक्षकी शब्द वापरता, पण त्याचा अर्थ जाणून घेत नाही. एक परीक्षक म्हणून आपल्याला सर्वसाधारण प्रेक्षकापेक्षा सिनेमा जितका समजलाय तो इतर प्रेक्षकांना दाखवून देणे हेच तर परीक्षकाचे काम.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> +++++++११११११११११
.
.
नंदीनी मला पण मेल कर
नंदीनी मला पण मेल कर
कारण त्यांनी माबोने प्रायोजित
कारण त्यांनी माबोने प्रायोजित केलेल्या एका सिनेमाचे निगेटिव्ह रसग्रहण केले, ते देखिल अजाणता) म्हणून त्यांना बडवत सुटावे हा कोणता प्रकार?
>>> आं???? माबो प्रायोजित कुठलाही सिनेमा मी आजवर पाहिलेला नाही. ना थिएटरमधे ना डीव्हीडीवर. मग त्यांच्या रीव्ह्युला झोडपायचा संबंध येतोच कुठे? मी जे चित्रपट पाहिले आहेत त्याच्या रीव्ह्युमधे जर चुकीचे लिहिले असेल आणि ती चूक दाखवून दिली तर लगेच झोडपणे होते की काय?? तो सिनेमा यायच्या आधी तलाश सिनेमाच्या बीबीवर पण लोकांनी लिहिलेच होते की. या बीबीवर पण मी लिहायच्या आधीच काही लोकांनी निगेटीव्ह लिहिले आहे असे म्हटले आहे ते पण सर्व झोडपतच आहेत का?
तुम्ही सध्या जे सिनेमा रिव्हू टाईप करायला लागला आहात, ते तसेच करत रहा. माबो अन प्रेक्षकांना तौलनिक अभ्यास करू द्या. अन हो, रसप यांनी केलेल्या परिक्षणांचेच "काऊंटर-रस-ग्रहण" नव्हे, तर तुम्ही स्वतःहून पाहिलेल्या नव्या सिनेमांची परिक्षणे लिहा. बॉक्स ऑफिस रिव्ह्यू अन कुणी किती पैका कमवला ते गूगलून मी लिहीन<<<<<< हे सांगणारे तुम्ही कोण? मला जे चित्रपट पहायचे असतील ते बघून मी त्यावर लिहेन अथवा लिहीणार नाही. रसप यांचे काऊंटर रसग्रहण करण्याइतके त्यांचे रीव्ह्यू ग्रेट आहेत असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा अणि तुमचा गैरसमज आहे. मी लिहिते त्या रीव्ह्यूचा आणी बॉक्स ऑफिसचा काही संबंध असत नाही. माझे परीक्षण हे फक्त मला सिनेमा कसा वाटला यावरच केंद्रित असते. रसप गेले कित्येक महिने तथाकथित रीव्ह्यू लिहत आहेत. मी त्यापैकी फक्त दोन सिनेमांवर लिहिले आहे- तेदेखील मला लिहावंसं वाट्लं प्लस वेळ होता म्हणून.
एक मात्र मजा वाटली हां. इब्लिस यांना "सिनेमातले काही समजत नाही" "मी चित्रपट पाहतदेखील नाही" अशी वक्तव्ये एक दोन बीबींवर करताना पाहिलं होतं. इथे मात्र लगेच कीबोर्ड चालवून सांगत आहेत तेदेखील (स्वत: न पाहिलेल्या) चित्रपट रसग्रहणाबद्दल. ज्यावेळेला मेडिकल संबंधात काही लिहिलं जातं तेव्हा जसं तुम्ही म्हणता ना "आम्ही शिकलो आहोत, आम्हाला अनुभव आहे म्हणून आम्हाला जास्त समजतं...." एक्झॅक्टली.
<<
"वैयक्तिक बोलू नका" हे मा. अॅडमिन यांनी वर सांगितल्या नंतर मी लिहिणे बंद केले होते.
नंतर नंदिनी यांना असा प्रतिसाद लिहिण्याची स्पेशल परमिशन दिली आहे असे वाटते.
सबब, मला उत्तर देण्याची परवानगी गृहित धरून उत्तर दिलेच पाहिजे.
नंदिनीजी, उत्तर अगदी सोप्पं आहे.
मी माझ्या इथल्याच पोस्टीत लिहिलंय.
"अंडी घालता येत नाहीत, म्हणून ऑम्लेटबद्दल बोलू नये, हे लक्षात ठेवा"
हाच सल्ला तुम्ही तुमच्या पोस्टींतून रसप यांना देत आहात.
तुमची दिग्दर्शन इ. बद्दलची पोस्ट, व त्याचा फॉलो अप वाचा.
जे वर बोल्ड केले ते खरेच तसे तुमचे मत आहे का?
तुमचे "परिक्षण" तुम्हाला काय वाटले त्यावर अवलंबून असते. मग त्यांचे त्यांना काय वाटले त्यावर अवलंबून आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? त्यांना तसे वाटले यात काय चुकले?? तुम्ही जे लिहिले तोही रिव्हूच आहे ना? अन त्यांनी लिहिले ते देखिल तेच आहे??
मग, त्यांनी परिक्षण कसे लिहावे याची ट्यूशन काब्रं घेऊन राहिले ब्वा तुम्ही?
एल ओ एल.
असो. तुम्हाला मी काय म्हणतो आहे ते समजलेच नाही असे नाही, हे मला ठाऊक आहे.
हॅव फन.
ज्यावेळेला मेडिकल संबंधात
ज्यावेळेला मेडिकल संबंधात काही लिहिलं जातं तेव्हा जसं तुम्ही म्हणता ना "आम्ही शिकलो आहोत, आम्हाला अनुभव आहे म्हणून आम्हाला जास्त समजतं...." एक्झॅक्टली.
टाकलेत, तर ते कला म्हणून नव्हे, शास्त्र म्हणून असतात. ते टाके पाहून वेगळ्या 'डिझाइनचे' म्हणुन त्यात बदल केले जात नाहीत.. इ. इ.
<<
कला व शास्त्र यांतील फरक ज्या दिवशी उमजेल, त्या दिवशी इथून पुढे बोलू.
उदा. कलात्मक रित्या अपेंडिक्स कापल्यावर बनणारी जखम पाहून कुणाच्या मनात काय कविता येतात, ह्याच्याशी मेडिकल शास्त्राचा संबंध नसतो. धावदोरा घातला, की अळीचा टाका, असल्या शंकाही मनात येत नाहीत, अन बाफांवर बँडेजचे फोटू देखिल टाकले जात नाहीत
पण ते असो. अॅडमिन मारतील मला आता.
कला व शास्त्र यांतील फरक ज्या
कला व शास्त्र यांतील फरक ज्या दिवशी उमजेल, त्या दिवशी इथून पुढे बोलू. --- >>>
अशक्य हसलो....
पाहिला. चांगला वाटला. पण मनात
पाहिला. चांगला वाटला. पण मनात सतत 'पानसिंग तोमर्'शी तुलना होत राहिली. पानसिंग तोमर नक्कीच उजवा होता.
Pages