मृत्युही गझलीय यावा.. (भावानुवाद - अपने होंठों पर सजाना चाहता हूँ..)

Submitted by रसप on 10 July, 2013 - 00:54

वाटते ओठांवरी तू हास्य व्हावे
जन्मभर केवळ तुला मी गुणगुणावे

एकदा तर एक अश्रू तू टिपावा
पापणीने मोतियाचे दान द्यावे

खूप जपली मी तुझी स्मरणे उराशी
'मी तुला स्मरतो' असे तूही स्मरावे

स्वप्न काळोखात माझे हरवलेले
वास्तवाचे दीप आता पेटवावे

श्वास शेवटचा तुझ्या डोळ्यांत घ्यावा
मृत्युही गझलीय* यावा, मी जगावे

मुळ गझल : अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
मूळ गझलकार : क़तील शिफ़ाई
भावानुवाद : ....रसप....
९ जुलै २०१३

मूळ गझल :-

अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ

कोई आँसू तेरे दामन पर गिराकर
बूँद को मोती बनाना चाहता हूँ

थक गया मैं करते-करते याद तुझको
अब तुझे मैं याद आना चाहता हूँ

छा रहा है सारी बस्ती में अँधेरा
रोशनी हो, घर जलाना चाहता हूँ

आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये
मौत भी मैं शायराना चाहता हूँ

- क़तील शिफ़ाई

* * * *

मीच गप्पा मारतो आता तुझ्याशी
एकट्याने तू मना का हिरमुसावे ?

....रसप....
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/blog-post_10.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप जपली मी तुझी स्मरणे उराशी
'मी तुला स्मरतो' असे तूही स्मराव

स्वप्न काळोखात माझे हरवलेले
वास्तवाचे दीप आता पेटवावे <<वा! आवडले शेर.

मृत्युही गझलीय यावा >> हे शब्दातीत सुंदर साधले आहे..