कणकेची (गव्हाच्या पिठाची) धिरडी

Submitted by चेरी on 1 July, 2013 - 23:27

साहित्य: गव्हाचे पीठ (कणिक), तिखट, मीठ, हळद, बारीक किसलेला लसूण, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ (कणिक) घेऊन त्यात थोडी हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, लसूण घाला. मग त्यात पाणी घालून दोस्याच्या पिठाइतके दाट मिश्रण बनवा.
२) तयार मिश्रणाची छान पातळ धिरडी तेल लावलेल्या निर्लेप तव्यावर खोल डावाने घाला. झाकण ठेवा.
३) धिरडी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्या आणि तूप/बटर घालून आवडेल त्या चटणी बरोबर वाढा.
(चटणी शिवायही तितकीच छान लागतात. म्हणून चटणी नसली तर नुसत्या तूपाबरोबरही छान लागतात.)

टिपः- या मिश्रणाची धिरडी घालताना थोडे विशेष कौशल्य अशासाठी लागते की धिरडी तव्यावर घातल्यानन्तर, एका कुंड्यात/बाउलमध्ये घेतलेल्या पाण्यात हात बुडवून त्या हाताने गरम धिरडे पसरावे लागते तरच ते पातळ आणि जाळीदार होते. अन्यथा ते जाडसर होते.
जर या पद्धतीने धिरडं हाताने पसरता येत नसेल तर धिरड्याचे मिश्रण थोडं पातळ बनवून मग खोल डावाने / ग्लासने (तव्याच्या परिघापासून मध्यापर्यंत डाव गोल गोल फिरवत) धिरडी घाला.

IMG_0427 - Copy.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे गोड धिरड्यात गूळ आणि कुसकरलेले पिकलेले केळे घालतात. त्यामुळे वेगळी छान चव येते. फक्त पीठ थोडे जाडसर ठेवावे लागते.

मी आज केली टोटल वाट लागली>>>

माझीही लागेल या भीतीने केली नाहीत अजून.

कणिक खूप गीचगीचीत होते, डोसा सुकत नाही व उलटायला कठीण जाते असा पूर्वानुभव आहे Happy Happy

कणिक खूप गीचगीचीत होते, डोसा सुकत नाही व उलटायला कठीण जाते असा पूर्वानुभव आहे>> असेच काहीसे झाले.
कुरकुरीत करायला जाव तर जळत होते गुळामुळे.

कणकेचे डोसे तिखट एक दोन वेळा केले होते.व्यवस्थित काढता आले.तेल लागते मात्र.
आणि एकदा फोडणी न घालता फक्त मिरची आलं कणिक मीठ मिसळून डोसे/धिरडी केली तेव्हा मात्र खूप चिकटली.तवा अगदी करेक्ट तापला पाहिजे.म्हणजे तव्यावर मिश्रण टाकल्यावर कौरव आणि पांडव बाहेरच्या लोकांशी लढताना 105 व्हायचे तसे तव्या विरुद्ध धिरड्याचा खालचा आणि वरचा लेयर एकमेकांना चिकटून तव्याशी लढले पाहिजेत.तापमान कमी पडले तर खालचा लेयर गद्दारी करून तव्याशी संगनमत करून वरच्या लेयर ला लाथ मारून एकटे सोडतो.
पण गुळाबरोबर हे गणित जुळवणे मात्र असिधाराव्रत ठरेल.

Mi_anu Lol

And i dont use nonstick. I use cast iron.

आमच्या मावशी गव्हाच्या पिठात थोडं तांदुळ पीठ घालतात आणि धिरडी क्रिस्प होतात. पोळ्यांचा कंटाळा आला किंवा पोळ्या करताना कणिक कमी पडली की पर्याय म्हणून ही धिरडी बनवली जातात. मसाला धिरडी नाहीत, तर फक्त पिठं, मीठ, किंचित साखर आणि तयार झाल्यावर वर भरपूर साजूक तूप. मग भाजीबरोबर नेहमी पोळी खातो तशी खाल्ली जातात.

नुसते कणकेचे खास नाही लागत, चिकट बुळबुळीत होतात, त्यापेक्षा माझ्या आईची रेसीपी रॉक्स..
गुळाचं पाणी घालून मग त्यात कच्चा रवा घालायचा आणि ताक. १० एक मिनिटे ठेवायचं आणि करायचं. डायरेक्ट गुळ नाही घालायचं , ती गुळ वितळवून आणि गाळून घालते मग ताक घालून सरसरीत पळीवाढ करते. करून बघा.. नो फेल रेसीपी आहे. लहानपणी , मी चार तरी खायचे. मालपोवा म्हणत कारण ह्या प्रकाराला आमच्याकडे , मालपोवा म्हणतात. कधी केळं घालायची आई.
तिखट करण्यासाठी, फोडणी द्यायची मिरची, हिंगाची.

Pages