Submitted by वैवकु on 24 June, 2013 - 04:29
चकमकी मध्ये जरासा प्राण फुंकूया चला
दुश्मनाला... जिंकण्याचे मर्म सांगूया चला
कोठुनी खेटायला येती मनाला हे ऋतू
बहरते इच्छा कशी शोधून काढूया चला
या इथे आहोत आलो तर चला जाऊ तिथे
आपल्यालाही जरा भेटून घेवूया .. चला...
झिंगते चित्तामधे मदिरा जिच्या बघण्यामुळे
आज ती गुत्त्यातली साकीच प्राशूया चला
औषधालाही कुठे मिळतात आताशा सुखे
एक विसरायास दुसरे दु:ख लावूया चला
रोज उशिरा पोचतो आपण तशी चिडतेच ती
जाउया लवकर तिला लाडात आणूया चला
जायचे असते कुठे माहीत आहे का तुला
जो पुढे भेटेल त्याला हे विचारूया चला
बायबल गीता कुराणातील ओळी संपल्या
अर्थ लावायास हे अस्तित्व चाळूया चला
विठ्ठलाच्या दर्शनाला केवढ्या गर्दीमधे ;
थांबली माणूसकी ...पाकीट मारूया चला
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर गझल.
सुंदर गझल.
सुरुवातीपासून अखेरपर्यंत
सुरुवातीपासून अखेरपर्यंत वेगळेपणा जपणारे खयाल.
विठ्ठलाच्या दर्शनाला केवढ्या गर्दीमधे ;
थांबली माणूसकी ...पाकीट मारूया चला
हे आजच्या उत्तराखंडच्या 'माणुसकी' दर्शनाच्या बातम्यांमुळे चरचरून जाणवले..
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार
मस्तच !! अख्खी गझल आवडेश
मस्तच !! अख्खी गझल आवडेश
धन्यवाद जयश्री जी
धन्यवाद जयश्री जी
वेगळीच रचना. आवडली.
वेगळीच रचना. आवडली.
मला बाकीचं कांही माहीत नाही
मला बाकीचं कांही माहीत नाही आणि समजतही नाही. गझल सुरेख. खूप आवडली.
मनःपूर्वक धन्यवाद दिनेशदा आणि
मनःपूर्वक धन्यवाद दिनेशदा आणि निशिकांत काका
ऋतू आणि विठ्ठल फार्फार आवडले.
ऋतू आणि विठ्ठल फार्फार आवडले. सुंदर रचना
धन्यवाद अमेय
धन्यवाद अमेय
दु:ख लावूया, विचारूया अप्रतिम
दु:ख लावूया, विचारूया अप्रतिम !
Pages