...पाकीट मारूया चला

Submitted by वैवकु on 24 June, 2013 - 04:29

चकमकी मध्ये जरासा प्राण फुंकूया चला
दुश्मनाला... जिंकण्याचे मर्म सांगूया चला

कोठुनी खेटायला येती मनाला हे ऋतू
बहरते इच्छा कशी शोधून काढूया चला

या इथे आहोत आलो तर चला जाऊ तिथे
आपल्यालाही जरा भेटून घेवूया .. चला...

झिंगते चित्तामधे मदिरा जिच्या बघण्यामुळे
आज ती गुत्त्यातली साकीच प्राशूया चला

औषधालाही कुठे मिळतात आताशा सुखे
एक विसरायास दुसरे दु:ख लावूया चला

रोज उशिरा पोचतो आपण तशी चिडतेच ती
जाउया लवकर तिला लाडात आणूया चला

जायचे असते कुठे माहीत आहे का तुला
जो पुढे भेटेल त्याला हे विचारूया चला

बायबल गीता कुराणातील ओळी संपल्या
अर्थ लावायास हे अस्तित्व चाळूया चला

विठ्ठलाच्या दर्शनाला केवढ्या गर्दीमधे ;
थांबली माणूसकी ...पाकीट मारूया चला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या इथे आहोत आलो तर चला जाऊ तिथे
आपल्यालाही जरा भेटून घेवूया .. चला...

जायचे असते कुठे माहीत आहे का तुला
जो पुढे भेटेल त्याला हे विचारूया चला<<<

व्वा

कोठुनी खेटायला येती मनाला हे ऋतू
बहरते इच्छा कशी शोधून काढूया चला

औषधालाही कुठे मिळतात आताशा सुखे
एक विसरायास दुसरे दु:ख लावूया चला

चांगले शेर!

छान

>>
जायचे असते कुठे माहीत आहे का तुला
जो पुढे भेटेल त्याला हे विचारूया चला

औषधालाही कुठे मिळतात आताशा सुखे
एक विसरायास दुसरे दु:ख लावूया चला
<<

शेर आवडले. 'जायचे असते कुठे'तर भारीच आवडला. Happy

>>
रोज उशिरा पोचतो आपण तशी चिडतेच ती
जाउया लवकर तिला लाडात आणूया चला
<<

चला काय? हा काय सार्वजनिक उपक्रम आहे का? Proud

टोच्या धन्स आपल्यास (निदान ह्या नावाने तरी) प्रथमच पाहिले

नमस्ते आंबोळे आज्जी !! आहो ते वरच्या ओळीत "आपण" आहे ना ते प्रा .श्री. पप्पू... ..सॉरी प.पू. देवपूरकर इस्टाईल स्वसंम्बोधण का काय्तरी असतय बगा !! Lol
......धन्यवाद स्वातीताई Happy

बायबल गीता कुराणातील ओळी संपल्या
अर्थ लावायास हे अस्तित्व चाळूया चला

विठ्ठलाच्या दर्शनाला केवढ्या गर्दीमधे ;
थांबली माणूसकी ...पाकीट मारूया चला

खास वैभवी शेर ,मस्त !

आंबोळे आज्जी !<<<

फारच ऑब्सोलेट करताय स्वाती'ताईं'ना! Proud

बाई, काही वेळा तो खरंच सार्वजनिक उपक्रम असतो Proud

डॉक,

बेफि आणि पुलस्ति ह्यांच्या त्या मूळ प्रतिसादांच्या वेळा २३.३७ आणि २३.४२ अशा आहेत पण आपल्या स्क्रीनशॉट्च्या २२.०७ आणि २२.१२ अशा कशा काय>>>> आधी तुमच्याकडे येतात काय सगळे प्रतिसाद Rofl

कोठुनी खेटायला येती मनाला हे ऋतू
बहरते इच्छा कशी शोधून काढूया चला>>

बायबल गीता कुराणातील ओळी संपल्या
अर्थ लावायास हे अस्तित्व चाळूया चला>>> क्लासिक!
_______________________________:::::

चला काय? हा काय सार्वजनिक उपक्रम आहे का?>>> नसावा..ज्याने त्याने आपापली लाडात आणावी , असे वैवकुंना म्हणायचे असावे ...:डोमा: Proud चु.भू.द्या.घ्या.

Biggrin

बहुतेक सर्वच शेरातील खयाल वेगळ्या ढंगाचे असल्याने विशेष वाटले.

"औषधालाही कुठे मिळतात आताशा सुखे
एक विसरायास दुसरे दु:ख लावूया चला " >>> हा शेर सर्वात खास.

Rofl

सर्व हास्य व गंभीर रसिकांचे हार्दिक आभार !!

स्वगत : Sad च्याssय्ला !!! देवपूरकरांचं नुस्तं नाव काढलं तर पुढचे प्रतिसाद बोम्बलले!!............ गझलेवर कुणी बोलेचना कुणी सीरियसली घेईचना .... Lol

Pages