एम्बीएच्या निमित्ताने!!!!
काल माझी पुतणी मला म्हणाली अंकल १०० चांगले कॉलेज भरावे लागतात ऑनलाईन. एम्बीएच्या प्रवेशासाठी. द्या ना काढून नावे. मी ऑनलाईन उपलब्द्ध असलेली पीडीएफ उघडली. तिच नावे वाचून डोळे पाझरू लागले.
जमनालाल बजाज,
सिडेनहॅम,
चेतना,
लाला लजपतराय,
सोमय्या,
सिम्बी,
भारती विद्यापिठ!
खूप पुर्वी मीही एम्बीएच्या प्रवेशासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यावेळी हे चांगले ठाऊक होते की शेवटी प्रवेश कुठेही मिळाला तरी घरुन पैसे देणारे कुणीच नाही! पण तरीही प्रवेश मिळवून मागे घेतला होता फॉर्म. केवढे दु:ख झाले होते. पण ती वेळ दु:ख पचवण्याची होती. परत नवीन नोकरी पत्करली. अजून मनात जिद्द आहे कधी तरी मी 'अॅन एम्बीए' होईल.
पुण्याच्या आय एम डी आर कॉलेजमधे मी किती चकरा मारायचो. तिथली खिचडी विकत घेण्यासाठीही दमडी नसायची तेंन्व्हा. पण खूप खूप शिकायच हे एक स्वप्न अजूनही पाठलाग करत आहे. स्वप्न बघायला जात कुणाच!!!!
पिंकु इतकुशी अगदी पहिलीतही नसताना मी बी.ई. ला होतो. आता ती एम्बीए करु पाहत आहे. किती लवकर लवकर मुले मोठी होतात. त्याहीपेक्षा ती बरोबरीची होतात तेन्व्हा अजूनच विस्मय वाटतो.
काल चाय भेटला होता. अर्थात चैतन्य. तो आता अमेरिकेला चालला पुढील महिन्यात एम्बीए करायला. जाता जाता मी जीमॅट देऊन तिकडे ये असेही म्हणाला. फक्त ६३० मिळव. आरामात प्रवेश पक्का.
घरी येऊन परत जुने दिवस आठवले!!!! पलिकडे लवून पाहिल तर जीमॅटची ऑफीशियल गाईड धुळखात पडली होती.
आपल्याला खूप काही करायच असत. तेवढी क्षमताही असते. फक्त परिस्थितीची थोडीशीही सोबत नसते. तेन्व्हा आपल दुखन फक्त आपल्यालाच ठाऊक असत. अस काहीस वाटून गेल..
दिनेशदा +१ बी.... कराल
दिनेशदा +१
बी....
कराल अजुनही.... असतात अशा काही इच्छा!!!.... मला इकॉनॉमिक्स घेवुन एम.ए. करायचं होतं.... पण सीए. चं गारुड मनावर बसलं आणि बाकी सगळ्या गोष्टींना फाटा मिळाला....
सध्या जे शिकायचे राहिले ते शिकायचा प्रयत्न आहे.....
बी, भावना पोचल्या. परस्युट
बी, भावना पोचल्या. परस्युट ऑफ हॅपीनेस नावाचा सिनेमा पाहिलात का?
नक्की पहा.
स्पर्शून गेलं लिखाण. अजूनही
स्पर्शून गेलं लिखाण. अजूनही तितक्याच तीव्रतेनं वाटत असेल तर नक्की कर एमबीए. शिकणं ही एक गोष्ट आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर पूर्ण करता येऊ शकते.
जमेल जमेल ... मी पण
जमेल जमेल ... मी पण एम.एस्सीनंतर ८ वर्षांनी पी.एचडीला प्रवेश घेतला होता. सुरुवातीला काय शिकवताहेत हे कळायला उशीर लागायचा, पण जमल्म हळुहळू. शुभेच्छा.
बी, छान लिहीलयस.. ऊपदेश नाही
बी,
छान लिहीलयस.. ऊपदेश नाही पण ईच्छा असेल तर मार्ग सापडेल आज ना ऊद्या.. फक्त आलेली संधी मात्र वाया घालवायची नाही, मग त्यासाठी काहिही खर्ची पडले तरी बेहत्तर..
रच्याकने: आमच्या आईचे शिक्षण हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेत झाले.. ५ का १० रु खर्च/फी सकट वगैरे तिला तिच्या मामाकडून 'ऊधार' घ्यावे लागले होते. तिची आई तिला सणासुदीचा खाऊ कपडे वगैरे द्यायला ८-१० किलोमिटर पायी चालत जात असे कारण टांगा परवडत नसे. आईने मग BA (With Honors) पूर्ण केले.. नोकरी केली.. आणि मग लग्न, संसार ई. मध्ये पडल्यावर शिक्षण व नोकरी मागे राहिली याची तिला खंत होती. आत सर्व मुलांचे सर्व सुरळीत झाल्यावर, वय ६५+ असताना MA, मग MPhil देखिल केले. दुसरी आली मुंबई विद्यापीठात. ठाण्याहून कलिना ला बस ने जाऊन क्लास मध्ये बसायची-- "MA" करणार्या आजी म्हणून तिची ओळख झाली होती.
त्या नंतर बंगाली भाषेच्या परिक्षेत पदवी घेतली त्यात पहिली आली. अलिकडे म्हणजे आता ७०+ नंतर संतवांगमयावर Phd करायला गाईडच ऊपलब्ध नाही म्हणून 'हिरमुसली' होती.. 
खरे तर ती बाकी अनेक ऊद्योगात ईतकी व्यस्त आहे/असते की PhD करायला तिला वेळही सापडणार नाही हे १००% सत्य आहे..
मात्र, तिच्याकडे पाहिले की आजही आम्हाला पर्वताएव्हडे बळ व प्रेरणा मिळते व स्वता:च्या आळस व ईतर सबबींची लाज वाटते.
मला वाटते मागच्या पिढीतील अशी अनेक ऊदाहरणे सापडतील..
ईथे मला आईबद्दल रिक्षा फिरवायची गरज नाहीये, पण तुला निश्चीतच एव्हडा काळ थांबावे लागणार नाही.. तेव्हा अनेक शुभेच्छा!
>>शिकणं ही एक गोष्ट आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर पूर्ण करता येऊ शकते
+१०००
योग, तुझ्या आईला माझ्याकडून
योग, तुझ्या आईला माझ्याकडून अभिनंदन सांग.
मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांचे अभिप्राय मनाला स्पर्शून गेलेत. शुभेच्छांसाठी धन्यवाद.
योग तुमच्या आईला सलाम. ग्रेट
योग तुमच्या आईला सलाम. ग्रेट आहेत त्या.
एम्बीएच्या निमित्ताने ही
एम्बीएच्या निमित्ताने ही बातमी रविवारच्या लोकसत्तेत होती ती वाचताना हा धागा आठवला. आज वेळ मिळाला इथे डकवायला.
हेल्थ केअर एम बी ए करायचे
हेल्थ केअर एम बी ए करायचे आहे. कुठे करावे? एक्सर्टनल
शुभेच्छा.!
शुभेच्छा.!
वाह! योग, ग्रेट आहे तुमची
वाह! योग, ग्रेट आहे तुमची आई..
बी, ही बातमी तुम्ही कदाचित
बी,
ही बातमी तुम्ही कदाचित वाचली असेल :
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20949186.cms
स्वान्तसुखाय करणार असलात तरी चांगल्या ठिकाणाहून एमबीये करावे.
पुढील वाटचालीस शुभेच्छा!
आ.न.,
-गा.पै.
Pages