Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 21 June, 2013 - 07:24
बाहेर पावसाने, थैमान घातलेले
हृदयात आठवांचे काहूर पेटलेले
झड लागली कधीची, थांबेचना कशाने
आक्रोश हा घनांचा, आभाळ फाटलेले
अश्रूस पूर येता, दु:खास कोंब आले
बहरेल दु:ख माझे, अश्रूत पोसलेले
वैराण भावनांच्या, होळीत खाक झाले
डोळ्यात आटलेल्या, नवस्वप्न पोळलेले
दु:खात वेढलेल्या, या झोपडीत माझ्या
परतेल का पुन्हा सुख, दारात थांबलेले
जयश्री अंबासकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगली !!! बहुधा अशा गझल ना
चांगली !!!
बहुधा अशा गझल ना गायनानुकूल गझल म्हण्तात ...नक्की माहीत नाही पण बहुतेक म्हणतात
वैराण भावनांच्या, होळीत खाक झाले
डोळ्यात आटलेल्या, नवस्वप्न पोळलेले
(<<<<शब्दक्रम जरा गडबड्लाय किंवा >>डोळ्यात आटलेले<< असे काहीसे हवे )
तिसरा आणि चौथा शेर अप्रतिम
तिसरा आणि चौथा शेर अप्रतिम
सुंदर आशय... छान गझल...
सुंदर आशय...
छान गझल...
दु:खात वेढलेल्या, या झोपडीत
दु:खात वेढलेल्या, या झोपडीत माझ्या
परतेल का पुन्हा सुख, दारात थांबलेले
हा मला जास्त आवडला.
----------------------------
डोळ्यात आटलेल्या, नवस्वप्न पोळलेले
डोळ्यात आटलेले, नवस्वप्न पोळलेले
माझ्या अंदाजाप्रमाणे वरील दोन्ही मिसर्यांचे अर्थ वेगवेगळे निघतील.
आटलेल्या डोळ्यात
आणि
नवस्वप्न आटलेले
अशा वेगवेगळ्या अंगाने अर्थ जातात.
वैभव, अमित, अरविंद,
वैभव, अमित, अरविंद, गंगाधर........ मनापासून धन्यवाद
डोळ्यात आटलेल्या आणि डोळ्यात आटलेले......हे दोन वेगळे अर्थ आहेत.
गझल मूड सांभाळणारी व गझलेच्या
गझल मूड सांभाळणारी व गझलेच्या प्रकृतीस पोषक अशीच, तसेच वैवकु म्हणतात तशी गायनानुकूल आहे.
बाकी खयालांमध्ये थोडे हटकेपण हवे होते असा लहान तोंडी मोठा घास घेऊन थांबतो.
चु भु द्या घ्या
आवडली..
आवडली..
बाहेर पावसाने, थैमान
बाहेर पावसाने, थैमान घातलेले
हृदयात आठवांचे काहूर पेटलेले>> घातलेले व पेटलेले नाही आवडले --- त्या ऐवजी घातलेले , दाटलेले बरे वाटेल, वै. म.
मग माझा शब्दक्रम हा मुद्दा
मग माझा शब्दक्रम हा मुद्दा योग्यच म्हणावा असा!
सुट -सुटीत -पणा -साठी असे करता येईल ... (:))
डोळ्यात आटलेल्या वैराण भावनांच्या ;
होळीत खाक झाले... नवस्वप्न पोळलेले
चूक भूल द्यावी घ्यावी !!
आभाळ आणि अश्रू हे सर्वात
आभाळ आणि अश्रू हे सर्वात विशेष वाटले.
बेफिकीर..... सुचवत जा
बेफिकीर..... सुचवत जा हो...... मोकळेपणाने सांगितलं तर अधिक आवडेल
बंडोपंत,,,,, ह्म्म्म !! बाहेर पाऊस असून सुद्धा आत पेटलंय असं म्हणायहं होतं
वैभव...... तू सुचवलेला बदल आवडेश
धन्यवाद मंडळी
अश्रू शेर आवडला!
अश्रू शेर आवडला!
परतेल का पुन्हा सुख, दारात
परतेल का पुन्हा सुख, दारात थांबलेले...
आवडली !
खूप दिवसांनी तुला इथे बघितलं. छान वाटलं !
पुलस्ती, सुमती...... शुक्रिया
पुलस्ती, सुमती...... शुक्रिया
सुमती, अगं आहेस कुठे तू ?
मस्त गझल!
मस्त गझल!
धन्यु रिया
धन्यु रिया