Submitted by रसप on 15 June, 2013 - 00:41
पाऊस आवडत नाही
तो मनास भिजवत नाही
सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही
ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !
मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही
मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही
ती अशी पाहते मजला
की स्वत:स पाहत नाही
बन 'जितू' देव तू आता
माणुसपण सोसत नाही
....रसप....
१४ जून २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/blog-post_15.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चुकून दोनदा प्रकाशित
चुकून दोनदा प्रकाशित झाले............ क्षमस्व.