Submitted by समीर चव्हाण on 29 May, 2013 - 06:00
संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माफ करा, वैवकुंचा प्रतिसाद
माफ करा, वैवकुंचा प्रतिसाद नीट वाचल्यावर तेथे खाली (संपादीत) असे दिसले, त्याजागी त्यांनि आधी काही वैयक्तीक लिहिलेले असल्यास ते मला ज्ञात नाही. त्यामुळे उर्वरीत प्रतिसादात 'वैयक्तीक रोख' नाही असे मी म्हणालो होतो.
भूषणः येथे रसिकाची कुशाग्रता
भूषणः
येथे रसिकाची कुशाग्रता गृहीत धरून कवी व्यक्त होणार असा दावा करण्यात येत आहे. याही मताचा पूर्ण आदर आहे. पण विशेषकरून गझलेची प्रवृत्ती ही थेटपणे भिडण्याची असते. कोडी सोडवायला लावणे हे ग्रेस, मर्ढेकर, चित्रे यांनी करावे, पण भटांनी आणि मुनव्वर राणांनी करू नये असे आपले वाटते. इंटेलेक्च्युअल क्लासबाहेरच्या क्लासला अन्यथा भिडणार कधी? ती, तसे भिडण्याची आवश्यकताच नसेल तर कोणत्याच क्लाससमोर काव्य प्रकाशित करण्याची आवश्यकता तरी कवीला का भासावी?
इथे माझे मत द्यावेसे वाटते. एकतर मी मोठ्या प्रमाणात हा शब्द जाणीवपूर्वक वापरला.
गझलसारखी कविता समजायला किमान बुध्दिमत्ता आणि व्यासंग हवा असे माझे ठाम मत आहे.
रस्त्यावर उतरल्यावर समजते की ग्रेस, मर्ढेकर तर सोडा भट, अदम, मुनव्वर राणाही जवळपास कुणालाच ठाऊक नाही. माझ्या शे-पाचशे नातेवाईकांमध्ये माझी सोडा कुठल्याही कविता समजून घ्यायची इच्छा वा कुवत नाही. त्यांची मजल फार-फार तर काही फिल्मी गाण्यांपर्यंत. त्यातही शब्दापेक्षा चाल महत्त्वाची.
मराठी गीतांनी झपाटलेल्यांना मराठी गझल पचवणे जड का जात होते ह्याचे उत्तर विचारायला हवे.
कोणतीही कला आस्वादण्यासाठी बुध्दिमत्तेसोबत थोडी ट्रेनिंग व रियाज लागतो.
एस्प्रेसो एकदा पिऊन त्यातली गंमत समजत नसते.
शास्त्रीय संगीत सोडा, मदनमोहनच्या सुरावटीतील वरवर आनंद घेता येईल मात्र सूक्ष्म भेद समजायला अभ्यास हवा. गालिबला विसरून कसे चालेल. गालिबची बहुतांश कविता आम लोकांसाठी थोडीच आहे.
मराठीतही ज्ञानेश्वर-तुकाराम आम्हाला समजले हा भ्रम आहे.
कवीचे कविता लिहितानाचे नेमके कोर्डीनेटस माहित नसल्याने सहजता, थेटपणे भिडणे ह्या गोष्टी व्यक्ति-व्यक्तिप्रमाणे बदलतात. मीरचा एक प्रसिध्द शेर देख तो दिल के जां से उठता है मला अजूनही नेमका समजला नाहीए. अनंतशी बोललो, मात्र नेमका अर्थ पकडणे एका कोड्याहून कमी नाही, असेच वाटत राहिले.
धन्यवाद.
इन्टेक्युचअल-क्लाससाठी
इन्टेक्युचअल-क्लाससाठी <<<<
याबाबत बेफीजी म्हणत आहेत तेच मीही म्हणत होतो पण टोन चुकला असे निदर्शनात आल्यावर मी प्रतिसाद संपादित केला
बेफीजी : माझा संपादित केल्याच्या आधीचा प्रतिसाद न वाचून माझ्या प्रतिसादातील वैयक्तिक रोखाबद्दल बोलत आहात ते नंतरचा संपादित प्रतिसाद पाहून बोलत आहात हे मी ओळखले
असो
मात्र , मात्र ह्या एका शब्दामुळे गहजब की काय म्हणतात तो माजल्यासारखा वाट्तत असला तरी मुळात मात्र तो एकमात्रच शब्द या अख्ख्या गझलेत काथ्याकूट करावा असा आहे हे मात्र पटत नाही
(चर्चा एकाच शब्दा भोवती फिरू लागली आहे असे म्हणायचे आहे .... मात्र ती चुकीची होते आहे असे मात्र म्हणायचे नाही आहे मला
माझ्या शे-पाचशे
माझ्या शे-पाचशे नातेवाईकांमध्ये माझी सोडा कुठल्याही कविता समजून घ्यायची इच्छा वा कुवत नाही.>>>
हे माझ्याही बाबतीत खरे आहे.
कोणतीही कला आस्वादण्यासाठी बुध्दिमत्तेसोबत थोडी ट्रेनिंग व रियाज लागतो.>>>
सहमत आहे व शास्त्रीय संगीताच्या बाबतीत तो माझा स्वतःचा अनुभवही आहे. अवेअरनेस नसल्याकारणाने माणसाला बर्याच गोष्टी आवडत नसतात. शास्त्रीय संगीताला नाके मुरडणार्यांचे तेच होते.
परवा गावी गेलो होतो तेव्हा बी. एस. सी. ला असलेल्या माझ्या चुलत भावाने माझी 'लगोरीने' ही गझल मायबोलीवर वाचली आणि म्हणाला 'दादा, भारी वाटतंय खरं काय समजत न्हाई गा'. ती काही फार कठीण गझल आहे असे वाटत नाही.
"शेर समजून घेण्यात वाचकही बर्याचदा कमी पडू शकत असावेत" हे ढवळेंचे मत मला पटलेले आहे.
कविता समजून घ्यायची इच्छा वा
कविता समजून घ्यायची इच्छा वा कुवत नाही.<<<<
)
इच्छा नाही हे समजते ....अनुभवही आला आहे ....पण कूवत नाही असे आपण म्हणू शकतो का ?
की................
>>>मला समजते दुनिया दुनियेला मी समजत नाही <<<
...........असे आपल्याला वाटत राहणे असते ते !!!!! (ओळ बेफीजींची
"शेर समजून घेण्यात वाचकही
"शेर समजून घेण्यात वाचकही बर्याचदा कमी पडू शकत असावेत" हे ढवळेंचे मत मला पटलेले आहे<<<
हे मत पटण्यासारखे आहे हे मान्य, पण हे मत कोणत्या गझलेला / शेराला कोणी कधी लागू करायचे हेही व्यक्तिसापेक्षच! एकाने रचलेला एक शेर दुसर्याला समजला नाही तर:
- न समजणारा म्हणतो समजत नाही
- ज्याचा शेर आहे तो म्हणतो वाचक कमी पडला
शेवटी अॅबसोल्यूट काही नाही हेच खरे.
समीरचा वरचा (लेटेस्ट) प्रतिसाद एकुणच फार आवडला. पटणे न पटणे या भिन्न बाबी आहेत. पण त्या प्रतिसादावर खरे तर एक मोठी व वेगळीच चर्चा होऊ शकेल असे मुद्दे त्यात आलेले आहेत. सर्वात आवडलेला उल्लेख म्हणजे 'रस्त्यावर उतरल्यावर'! या पातळीला म भा चव्हाणांची शायरी आहे हे खासकरून उल्लेखावेसे वाटले. सुरुवातीला मीही तशी कविता करत असे. नंतर माझ्या कवितेत जे बदल झाले ते स्तुत्य आहेत की निंद्य हे नोंदवण्यास मी एक कवी व एक रसिक म्हणून अपात्र आहे.
पण समीरच्या त्या प्रतिसादाला असेच मोकळे सोडून देणे योग्य ठरणार नाही. (मला वाटते वेगळ्या धाग्यान्व्यये त्यावर चर्चा व्हावी, जेणेकरून 'ही विशिष्ट' गझल वादग्रस्त ठरली असे कोणालाच वाटणार नाही).
धन्यवाद.
पाहिले काय काय मी
पाहिले काय काय मी नाही
गोंधळावाचुनी कुठे काही
.
मात्र धुरळाच राहिला मागे
चालण्याला न अर्थ आताही
.
मी गिरवतो तुलाच नि:शंके
ठेवला का विकल्प तू काही
.
खंत इतकीच लागली तंद्री
बोट सुटले तसा दिलासाही
फार आवडले.
जेणेकरून 'ही विशिष्ट' गझल
जेणेकरून 'ही विशिष्ट' गझल वादग्रस्त ठरली असे कोणालाच वाटणार नाही).<<<<
आतातरी असे कोण कुठे म्हणते आहे
आताशा माबोच्या वाचकाना सवय झाली आहे त्याना समजते नक्की काय चालले आहे इथे ते ~वैयक्तिक मत
तरीही चर्चा इतरत्र हलवायची असल्यास लिंक इथे द्या नक्की म्हणजे आम्ही हजर होवू
(आम्ही = माझ्यासारखे नवशिके लोक बरका ..... देवपूरकर सर असे नव्हे :हाहा:)
धोक्याचा इशारा : मायबोलीवरील
धोक्याचा इशारा :
मायबोलीवरील 'गझल विभाग' अतिसंवेदनशील असून 'वादग्रस्त इलाका' म्हणून घोषित करण्यात येत आहे. वाचकांनी गझल वाचून तातडीने निघून जावे. प्रतिसादांवर जास्त काळ रेंगाळू नये. रेंगाळल्यास वादात उडी घेण्याचा मोह होण्याची गंभीर शक्यता आहे. तसे झाले आणि कुणाच्या बुद्धीचे रोक्ष-अपरोक्ष काही नुकसान झाले तर त्यास आम्ही जबाबदार नाही.
(विनोदबुद्धी जागृत करून वरील पॅरा वाचावा. :))
शेवटी अॅबसोल्यूट काही नाही
शेवटी अॅबसोल्यूट काही नाही हेच खरे. >>> सहमत आहे.
पण समीरच्या त्या प्रतिसादाला असेच मोकळे सोडून देणे योग्य ठरणार नाही. (मला वाटते वेगळ्या धाग्यान्व्यये त्यावर चर्चा व्हावी, जेणेकरून 'ही विशिष्ट' गझल वादग्रस्त ठरली असे कोणालाच वाटणार नाही).>>> सहमत आहे., धागा कुठला असावा हे ठरवा
अर्थातच 'गझलचर्चा'
अर्थातच 'गझलचर्चा'
>> खंत इतकीच लागली तंद्री बोट
>> खंत इतकीच लागली तंद्री
बोट सुटले तसा दिलासाही >> व्वा!
"कोणतीही कला आस्वादण्यासाठी
"कोणतीही कला आस्वादण्यासाठी बुध्दिमत्तेसोबत थोडी ट्रेनिंग व रियाज लागतो." - पूर्णपणे सहमत!!
रसिकत्व कमवावं लागतं. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. माझा एक जुना शेर आठवतो -
कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?
-----------
शेराची डिमांड्/शायराची डिमांड - वैवकुंशी सहमत.
------------
संकुचित दृष्टिकोन, इतर भाषातील शब्दांचा वापर, व्याकरण - यावर माझं काही म्हणणं नव्हतच. (बेफिकीरांच्या पोस्ट्शी या मुद्द्यांबाबत पूर्ण सहमत.)
-------------
माझी अगदी साधी शंका/आक्षेप होती/होता. एकच शब्द जेव्हा २ भाषात २ वेगळ्या (स्वातीताईंचं स्पष्टिकरण लक्षात घेऊनही) अर्थाने वापरला जातो, तेव्हा ज्या भाषेत ती रचना आहे त्या भाषेतल्या अर्थाने वापरला जावा. यात सहमत न होण्यासारखं काय आहे ते मला अजूनही समजू शकत नाही.
विदिपा - "'मात्र धुरळा' आणि 'फक्त धुरळा' ह्यांच्या अर्थछटा डिस्टींक्टली डिफरन्ट आहेत." हे डिस्टीन्क्शन समजून घ्यायला आवडेल. आणि असं असेल तर माझी शंका जास्तच व्हॅलिड ठरते!
---------------
व्याकरण, तुकाराम्/ज्ञानेश्वर कालीन भाषा इ. बद्दल दुसर्या धाग्यावर चर्चा वाचायला, करायला आवडेल!
>>मी गिरवतो तुलाच नि:शंके
>>मी गिरवतो तुलाच नि:शंके
ठेवला का विकल्प तू काही
अत्यंत प्रगल्भ !
साहित्यातलं क्लास वॉर...आकलनाचे वेगवेगळे स्तर नेहमीच रहाणार अस्तित्वात, पण साहित्याने अशी काही उपलब्धी करावी की मासचा क्लास बदलावा, स्तर उंचावावा. ही जबाबदारी दोघांचीही. लेखकाची अन वाचकांचीही.
सगळ्यांचे मनापासून
सगळ्यांचे मनापासून आभार.
चर्चेत सहभागी व्हायला मलाही आवडेल.
समीर चव्हाण
समीरजी...खूप आवडले शेर
समीरजी...खूप आवडले शेर (प्रतिसादांतून) गझलही गझलही
Pages