Submitted by समीर चव्हाण on 29 May, 2013 - 06:00
संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर गझल. विकल्पवाला शेर
सुंदर गझल.
विकल्पवाला शेर थोडा वेगळा वाटला. बाकीचे एका स्पेशल क्लासचे.
मतला आणि दुसरा शेर विशेष.
धन्यवाद!
>> मात्र धुरळाच राहिला
>>
मात्र धुरळाच राहिला मागे
चालण्याला न अर्थ आताही
<<
वा!
पाहिले काय काय मी
पाहिले काय काय मी नाही
गोंधळावाचुनी कुठे काही << व्वा ! >.
मात्र धुरळाच राहिला मागे
चालण्याला न अर्थ आताही << सुंदर >>
---आवडली गझल पण
तुमच्या गझलेस असणारा स्पेशल
तुमच्या गझलेस असणारा स्पेशल बाज इथेही दिसून येतो
खयालांत विषयाचा वेगळेपणा टिपण्यापेक्षा पेक्षा आशयातली वेगळ्यापद्धतीची सखोलता टिपल्याचे़ जाणवले
पण आवडली असली तरी पट्कन भिडणारे मनात रुतू शकतील असे नाही वाटले शेर ...बहुतेक आज माझा मूड तसा लागला नसावा जसा या शेराना आस्वादताना लावायला हवाय
महीन म्हणजे काय हे माहीत नाही त्यामुळे नेमका अर्थ लागला नाही
चू भू दे घे
मात्र धुरळाच राहिला
मात्र धुरळाच राहिला मागे
चालण्याला न अर्थ आताही
खंत इतकीच लागली तंद्री
बोट सुटले तसा दिलासाही
...............मस्तच!
रश्न नव्हता महीन इतकाही>>
रश्न नव्हता महीन इतकाही>> महीन म्हणजे काय? तुम्हाला गहण म्हणायचे काय?
बाकी गझल आवडली !
धन्यवाद. महीनचा इथे अभिप्रेत
धन्यवाद.
महीनचा इथे अभिप्रेत अर्थ बारीक वा fine.
मात्र धुरळाच राहिला
मात्र धुरळाच राहिला मागे
चालण्याला न अर्थ आताही
खंत इतकीच लागली तंद्री
बोट सुटले तसा दिलासाही
वा वा !
खंत इतकीच लागली तंद्री बोट
खंत इतकीच लागली तंद्री
बोट सुटले तसा दिलासाही >>>>> क्या बात है .......
'धुरळा' आणि 'बोट सुटले' हे
'धुरळा' आणि 'बोट सुटले' हे शेर विशेष वाटले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
"शून्यही पूर्ण साधला कोठे
प्रश्न नव्हता महीन इतकाही" >>> या शेरात "शून्यही पूर्ण साधले कोठे" ऐवजी 'साधला' असे का म्हटले आहे हे समजले नाही.
त्याचप्रमाणे 'महीन' हा (माझ्या माहितीनुसार अमराठी) शब्द योजण्याचे विशेष प्रयोजन काय ते कळले नाही.
खयालांचे गांभीर्य व खोली हे
खयालांचे गांभीर्य व खोली हे दोन्ही खचितच जाणवले. पण सहजता वाटली नाही.
(अवांतर - विचार करायला प्रवृत्त करणारे शेर आणि शेर समजण्यासाठी विचार करायला लागणे यातील सीमारेषा या आणि आधीच्या - बहुतेक 'मोह' या गझलेत - नीटशी पाळली गेली नाही असे वैयक्तीक मत, राग आल्यास क्षमस्व)
उल्हासजी: उत्तर निरोपातून
उल्हासजी: उत्तर निरोपातून दिलेय.
भूषणः
खयालांचे गांभीर्य व खोली हे दोन्ही खचितच जाणवले. पण सहजता वाटली नाही.
धन्यवाद. सहजतेबाबत इतकेच म्हणेन की शेवटचा शेर सोडून सगळॅ शेर एकाच बैठकीत लिहिले (शेर ३ नंतर थोडासा बदलला). जाणीवपूर्वक अवघड लिहिणे हा माझा पिंड नाही हे तुला माहीत आहेच.
लिहिण्यापूर्वी मीरचा ये तवह्ह्युम का कारखाना है हा शेर डोक्यात घोळत होता.
शेर ४ वगळल्यास मोह गझल आठ-दहा वर्षांपूर्वीची आहे. आता माझी प्रगती झाली की अधोगती हे मलाही ठाऊक नाही. सुचेल तसे, जमेल तसे लिहीत रहावे, एवढेच आपल्याहाती.
सगळ्यांचेच पुन्हा एकदा धन्यवाद.
महीन चा अर्थ ???
महीन चा अर्थ ???

वर महीन चा अर्थ आहे हे पाहिले
वर महीन चा अर्थ आहे हे पाहिले नव्हते क्षमस्व
बारीक किंवा फाईन असा अर्थ आहे तो आता समजला
धन्यवाद समीरजी
पहिले २ शेर आवडले. मात्र
पहिले २ शेर आवडले.
मात्र धुरळाच राहिला मागे - छान मिसरा आहे! पण एक शंका.
'मात्र' मराठीत but या अर्थी वापरतात; हिंदीत only या अर्थी वापरतात.
वरील शेरात 'मात्र' च्या ऐवजी 'फक्त' असावे असे वाटते...
पण एक शंका. 'मात्र' मराठीत
पण एक शंका.
'मात्र' मराठीत but या अर्थी वापरतात; हिंदीत only या अर्थी वापरतात.
वरील शेरात 'मात्र' च्या ऐवजी 'फक्त' असावे असे वाटते...<<<
अश्याच शंका मला इतरही काही शब्दांबद्दल (व मोह या गझलेतील शब्दांबाबतही) असल्याने मी तो सहजतेचा मुद्दा लिहिला होता.
>> वरील शेरात 'मात्र' च्या
>> वरील शेरात 'मात्र' च्या ऐवजी 'फक्त' असावे असे वाटते...
'मात्र' शब्द 'फक्त' या अर्थी मराठीतही वापरतात.
निमित्तमात्र, नाममात्र, (मायबोलीवर) वाचनमात्र इ. शब्द आठवा.
निमित्तमात्र, नाममात्र,
निमित्तमात्र, नाममात्र, (मायबोलीवर) वाचनमात्र इ. शब्द आठवा<<<
बाई, माझे मत असे की या वरील शब्दांमध्ये मात्र हा शब्द 'पुरता' अश्या ढंगाने आलेला आहे. म्हणजे, 'फक्त नावापुरता', 'फक्त वाचनापुरता' असे म्हणावेसे वाटते. (म्हणजे, नाममात्र या शब्दाचा अर्थ 'फक्त नाव' असा होत नसून 'फक्त नावापुरता' असा होतो व त्यामुळे 'पुरता' हा 'सीमा' दर्शवणारा शब्द जो 'फक्त'पेक्षा वेगळ्या अर्थाचा आहे तो आवश्यक ठरतो).
उदा: मी फक्त वाचक आहे, या वाक्यासाठी 'वाचनमात्र' हा शब्द पटणार नाही, मी फक्त वाचण्यासाठी आलेलो आहे, या वाक्यासाठी वाचनमात्र हा शब्द पटतो. (कशाचीतरी मॅक्सिमम व्याप्ती दर्शवणारा 'पुरता' हा शब्द त्यात आल्याशिवाय नुसत्या 'मात्र' मधून 'फक्त' जाणवेल अशी ती उदाहरणे वाटत नाहीत, असे म्हणायचे आहे).
मात्र धुरळाच राहिला मागे
चालण्याला न अर्थ आताही
या शेराबाबत इतर चर्चा:
बाई म्हणत आहेत त्यानुसार 'मात्र'चा अर्थ 'फक्त' असा घेतला तर / तरीही:
फक्त धुरळाच राहिला मागे
चालण्याला न अर्थ आताही
यातील आताही हा शब्द, त्याचे प्रयोजन लक्षात आले नाही (दोष माझा असावा). याआधी चालण्याला अर्थ होता असे कवीला वाटत होते अणि आता मागे फक्त धुरळाच राहिला आहे म्हणून आता 'तेव्हाही अर्थ नव्हता आणि आताही अर्थ नाही आहे' असे वाटत आहे की काय ते समजत नाही आहे. बेसिकली मला हा खयाल समजलेलाच नाही. त्यामुळे पूर्णपणे वैयक्तिकदृष्ट्या मी वरील विधान केले होते की 'शेर समजण्यासाठी प्रयास पडणे' हे किंचित शेरापासून रसिकाला दूर नेणारे वाटते.
गझलेच्या शेराने गुंगावे, गुंगवावे, हे मान्य, पण 'काय म्हणायचे असावे' येथेच गुंगवावे का, असा प्रश्न पडला.
चु भु द्या घ्या.
ते पुलस्तिंच्या 'मराठीत but
ते पुलस्तिंच्या 'मराठीत but आणि हिंदीत only'ला उत्तर होतं.
'निमित्तमात्र'मधे but अर्थ नाही ना होत?
बाकी शेराचा अर्थ "याआधी चालण्याला अर्थ होता असे कवीला वाटत होते अणि आता मागे फक्त धुरळाच राहिला आहे म्हणून आता 'तेव्हाही अर्थ नव्हता आणि आताही अर्थ नाही आहे'" असाच लागला मलाही. किंबहुना मग हे कळूनही मी आता का चालतोच आहे असा गर्भित प्रश्नही.
निमित्तमात्र, नाममात्र -
निमित्तमात्र, नाममात्र - ह्म्म्म... विचारात पाडणारं आहे.
तरीही - मात्र हा शब्द स्वतंत्र्यरित्या मराठीत but या अर्थाशिवाय वापरणं मला फारसं योग्य वाटत नाही. त्यातही 'फक्त' हा साधा सरळ पर्याय असताना.
स्वाती, आपण चांगला अर्थ
स्वाती, आपण चांगला अर्थ सांगितला. लिहिताना असेच काही अपेक्षित होते.
राहिलं फक्त आणि मात्र ह्यांच्या निवडीचं तर सुचताना फक्त सुचलं. मात्र मला वाटतं प्रत्येक शेराची आपली एक डिमांड असते
कधी अर्थाच्या अंगाने तर कधी-कधी जडण-घडणीच्या. ह्या शेरात फक्त मला मिसफिट वाटला म्हणून मात्र चे प्रयोजन.
तसेही कवीने मराठीत असे आणि हिंदीत तसे असा संकोचित दृष्टीकोन ठेवून विचार करता कामा नये, असे वाटते.
हिंदी-उर्दू तील शब्द मराठीत वापरू नये, हिंदीत ह्याचा अर्थ तमका तर मराठीत अमका-तमका ही विचारधारा मला न पटणारी आहे. साहित्य हे मोठ्या प्रमाणात इन्टेक्युचअल-क्लाससाठी आहे तेव्हा संदर्भाहून अर्थ स्पष्ट होतोच की. मीरने फारसी इतकीच खडी बोली वापरली/वाकवली. त्याच्या कवितेत ह्या भाषांची घुलावट दिसून येते ती त्यामुळेच. खरेतर मीरचे ते फारमोठे योगदान आहे जे गालिबचे फार कमी आहे. वलीच्या गझलेतील व्याकरण मीरमधे बदलताना दिसते तर गालिबमध्ये जवळपास नाही. व्याकरण सर्वकाळात एकसारखे नसते हे पहायला ज्ञानेश्वर आणि नंतर तुकाराम वाचायला हवेत. कमीजास्त बोललो असल्यास सोडून द्यावे.
धन्यवाद.
मी गिरवतो तुलाच नि:शंके ठेवला
मी गिरवतो तुलाच नि:शंके
ठेवला का विकल्प तू काही
खंत इतकीच लागली तंद्री
बोट सुटले तसा दिलासाही
>> व्वा!!
प्रत्येक शेराची आपली एक
प्रत्येक शेराची आपली एक डीमांड असते. कधी अर्थाच्या अंगाने तर कधी-कधी जडण-घडणीच्या. <<<<<
मला नाही पटत ..........
ती शायराची डीमांड असते असे माझे अतीशय स्पष्ट मत आजवरच्या गझल लेखनावरून तयार झालेले आहे
_______
साहित्य हे मोठ्या प्रमाणात इन्टेक्युचअल-क्लाससाठी आहे <<<<<<<<
निराशा झाली
चूक भूल द्यावी घ्यावी
~ वैवकु
(संपादित)
वैभवः माझा प्रतिसाद पुन्हा
वैभवः
माझा प्रतिसाद पुन्हा एकदा सावकाश वाचावा, असे सुचवावेसे वाटते.
वैयक्तिक टीका टाळल्यात तर उत्तम.
धन्यवाद.
मला प्रतिसादाबद्दल काही
मला प्रतिसादाबद्दल काही म्हणायचे नाही ती दोन विधाने खटकली म्हणून बोलत होतो मी
आपण त्या २ विधानांबाबत काही सखोल सांगू इच्छिता का सर
'मात्र' मला तरी
'मात्र' मला तरी वैयक्तिकरीत्या खटकलेला नाहीये.
'मात्र धुरळा' आणि 'फक्त धुरळा' ह्यांच्या अर्थछटा डिस्टींक्टली डिफरन्ट आहेत असे आपले मला वाटते.
आताही बद्दलचे बेफिकीरांचे मत पटण्यासारखे आहे. अशाच प्रकारे धाकधूक ह्या गझलेतला नदीचा शेर मला दूर गेल्यासारखा वाटतो.
ती २ विधाने न करताही प्रतिसाद
ती २ विधाने न करताही प्रतिसाद देता येतोय का पहाल का असे म्हणायचे आहे
इन्टेक्युचअल<<
वैयक्तिक टीका टाळल्यात तर
वैयक्तिक टीका टाळल्यात तर उत्तम.>>> सहमत.
वैभव, तुझी तळमळ पोहोचत आहे परंतू शंका योग्य टोनमधे विचारल्यास चांगली चर्चा होऊ शकते.
"वर्डस देमसेल्वज एक्स्प्रेस हार्डली एनिथिंग ऑफ देअर मिनिंग्ज, इट इज द इमोशन वुई अॅटॅच टू द वर्ड वुईच ट्रान्स्फर इट्स रीअल मिनिंग टू द पीपल"
नदीचा शेर मला दूर गेल्यासारखा
नदीचा शेर मला दूर गेल्यासारखा वाटतो. <<<<
मलाही पटले
मला दु:ख्खांच्या शेरातही तसेच जाणवलेले होते काहीसे
पण ...........जडण-घडणीच्या शयराला असलेल्या स्वातंत्र्याचा जर मुद्दा घेतला तर समीर जी त्याबाबत जसे सजग असतात ते मलाही पटते मला वाट्तते त्यामुळेच शायरीला त्या शायराचा बाज लाभतो
परंतू शंका योग्य टोनमधे विचारल्यास चांगली चर्चा होऊ शकते.<<<< सहमत !! तो प्रतिसाद संपादित करणेत येत आहे
मात्र मला वाटतं प्रत्येक
मात्र मला वाटतं प्रत्येक शेराची आपली एक डिमांड असते<<<
एका वेगळ्या अर्थासाठी हे मत मला पटू शकेल. पण गंमत म्हणजे या विधानातच 'मात्र' हा इंग्रजी 'बट' या अर्थी समीरने वापरलेला आहे.
एका वेगळ्या अर्थासाठी म्हणजे शेरातील खयाल 'कसा' नोंदवायचा आहे यातून शेर तशी डिमांड करू शकेल. म्हणजे 'उचित' हा शब्द वापरायचा की 'योग्य' हा शब्द वापरायचा, हे (वृत्ताचा भाग सोडला तर) त्या त्या शेराच्या शैलीवर अवलंबून असेल. उदाहरणार्थ, तू असे वागणे उचितच होते यात उचित हा शब्द पटतो तर 'हा माणूस या गोष्टीसाठी योग्य नाही' या खयालात 'योग्य' हा शब्द उचितपेक्षा 'उचित' वाटतो.
पण हाच थंबरुल 'मात्र' आणि 'फक्त' या दोन शब्दांना या विशिष्ट शेरात कसा लागू होतो यावर विचार करावा लागेल.
कधी अर्थाच्या अंगाने तर कधी-कधी जडण-घडणीच्या. ह्या शेरात फक्त मला मिसफिट वाटला म्हणून मात्र चे प्रयोजन.<<< मला वाटते वैवकु नेमके हेच म्हणत आहेत. या विधानातील 'मला मिसफिट वाटला' यातून ती कवीची निवड असल्याचे जाणवते. (व्यक्तिशः, मला वैवकुंनी वैयक्तीक टीका केल्यासारखे वाटले नाही, हा भाग वेगळा).
तसेही कवीने मराठीत असे आणि हिंदीत तसे असा संकोचित दृष्टीकोन ठेवून विचार करता कामा नये, असे वाटते.<<<
हे विधान या चर्चेसाठी सुसंबद्ध वाटले नाही. येथे 'हिंदी' अर्थाने 'मात्र' वापरू नये असे पुलस्तिंचे म्हणणे आहे असे वाटत नाही. मात्र आणि फक्त या समान मात्रांच्या दोन शब्दांपैकी कोणता अधिक प्रचलित असून कोणता वापरल्यामुळे सहजता अधिक आली असती असा मुद्दा असावा, असे माझे मत आहे. पुलस्तिंना काही वेगळे अभिप्रेत असल्यास माहीत नाही. ही चर्चा कवीच्या संकुचित दृष्टिकोनाकडे वगैरे वळवण्याचे विशेष कारण जाणवत नाही.
हिंदी-उर्दू तील शब्द मराठीत वापरू नये, हिंदीत ह्याचा अर्थ तमका तर मराठीत अमका-तमका ही विचारधारा मला न पटणारी आहे.<<<
वैयक्तीक मताचा पूर्ण आदर आहे. मात्र मराठीत सुप्रचलीत शब्द आहे, तो वापरून सहजता येत आहे असे असताना जर जाणीवपूर्वक एखादा परभाषिक शब्द वापरला तर त्याचे स्वच्छ प्रयोजन (अगदीच कोणी किस काढणार्याने विचारल्यास) नोंदवता यायला हवे. (कवीचे स्वातंत्र्य मान्यच आहे, पण या चर्चाही नक्कीच भरीव ठरतात). असा परभाषिक शब्द नकळतपणे वापरला गेला असल्यास तसे मान्य करण्यातही काही वावगे नाही.
साहित्य हे मोठ्या प्रमाणात इन्टेक्युचअल-क्लाससाठी आहे तेव्हा संदर्भाहून अर्थ स्पष्ट होतोच की.<<<
येथे रसिकाची कुशाग्रता गृहीत धरून कवी व्यक्त होणार असा दावा करण्यात येत आहे. याही मताचा पूर्ण आदर आहे. पण विशेषकरून गझलेची प्रवृत्ती ही थेटपणे भिडण्याची असते. कोडी सोडवायला लावणे हे ग्रेस, मर्ढेकर, चित्रे यांनी करावे, पण भटांनी आणि मुनव्वर राणांनी करू नये असे आपले वाटते. इंटेलेक्च्युअल क्लासबाहेरच्या क्लासला अन्यथा भिडणार कधी? ती, तसे भिडण्याची आवश्यकताच नसेल तर कोणत्याच क्लाससमोर काव्य प्रकाशित करण्याची आवश्यकता तरी कवीला का भासावी?
व्याकरण सर्वकाळात एकसारखे नसते हे पहायला ज्ञानेश्वर आणि नंतर तुकाराम वाचायला हवेत.<<<
व्याकरणाचा प्रश्न 'मात्र' या शब्दातून निघालेलाच नाही आहे. 'मात्र' या शब्दामधून चपखल शब्दाचा वापर व सहजता हे प्रश्न निघालेले आहेत.
चु भु द्या घ्या
Pages